स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण 12 जानेवारीला साजरी करतो. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना अनमोल असे मार्गदर्शन केलेले आहे. या त्यांच्या विशेष कार्याची आठवण म्हणून स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरा केला जातो. युवक दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालये यामध्ये अगदी उत्साहात युवक दिन साजरा केला जातो. युवक दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयातील फलकांवरती स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सुंदर फलक लेखन केले जाते.अनेकांना फलक लेखन कसे करावे? हे समजत नाही. म्हणूनच आजच्या लेखातून स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन संकलित स्वरूपात आपणापुढे सादर करीत आहोत.
स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन |
फलक लेखनाचे महत्व |falak lekhnache mhattv
शाळा महाविद्यालयांमध्ये कोणताही कार्यक्रम असो आपण ज्यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत मध्ये एन्ट्री करतो, त्यावेळी शाळेमध्ये असलेले फलक (फळे) खूप काही सांगून जातात.मला आठवते मी ज्या मुधोजी महाविद्यालयात माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्या महाविद्यालयामध्ये अतिशय सुंदर असे फलक लेखन केले जात होते. महाविद्यालयामध्ये कोणता कार्यक्रम असो किंवा एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या तारखांबाबत तपशील असो, कोणा व्याख्यात्याच्या व्याख्यानाचे आयोजन असो,एखाद्या महान व्यक्तीचे अनमोल विचार असो की कुणाला श्रद्धांजली अर्पण करायच्या असो. सर्व काही त्या फलकावरून समजत होते. सांगण्याचे तात्पर्य असे की कार्यक्रमांमध्ये फलक लेखन कौशल्य अंगीभूत करणे अतिशय गरजेचे आहे. अलीकडच्या काळात फलकांची जागा बॅनर घेताना दिसत आहेत. असे असले तरी फलक लेखन आज देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन पाहूया.हे फलक लेखन संकलित स्वरूपाचे असल्याने ज्यांनी ज्यांनी हे फलक लेखन केलेले आहे त्यांच्या नावांचा तपशील माझ्याकडे नाही परंतु त्या सर्वांचे धन्यवाद.
स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन | swami vivekananda jayanti falak laekhan
स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन जर आपण पहिल्यांदाच करत असाल, तर सर्वप्रथम या संकलित फलक लेखनांपैकी माहितीवजा फलक लेखन असतात. त्यापासून सुरुवात करा. स्वामी विवेकानंद यांचे चित्र काढून फलक लेखन करणे तितकेसे सोपे नाही. आपण एखाद्या महापुरुषाचे चित्र काढत असून तर ते चित्र अतिशय आखीव रेखीव हवे.जर आपण त्या चित्राला न्याय देऊ शकलो नाही तर एकप्रकारे त्या महापुरुषाचा अवमान केल्यासारखेच आहे. परंतु आमची खात्री आहे. आमचे संकलित केलेले स्वामी विवेकानंद जयंती चे फळे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच अप्रतिम असे स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन करता येईल.swami vivekananda jayanti falak laekhan असो की इतर फलक लेखन असो आपल्याला काही एक माहिती या संकलनातून नक्कीच मिळेल. या संकलनाचे उपयोग करून आपण आपल्या कल्पकतेने अजून देखील बदल करू शकता. चला तर मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया.
स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन फोटो नमुने |swami vivekanand jayanti falak lekhan photo image
आपल्याला खाली दिलेले स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखनाचे फोटो संकलित स्वरूपात ठेवावेत. जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये स्वामी विवेकानंद जयंती किंवा युवक दिनाचे फलक लेखन करताना याची मदत होईल.
स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन पीडीएफ | swami vivekanand jayanti falak lekhan pdf
आपल्याला अनेक नवनवीन माहिती मिळत असते, परंतु कालांतराने ती माहिती आपल्याजवळ संग्रह स्वरूपात राहत नाही. आपल्याला जर स्वामी विवेकानंद जयंती फलक लेखन कायमस्वरूपी आपल्याजवळ संग्रह करायचे
आमचा आजचा हा स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन फलक लेखन हा लेख कसा वाटला नक्की कळवा. आपणा जबाबदार असेच काही अप्रतिम फलक लेखनाचे नमूत्र नमुने असतील तर आपण आम्हाला ते मेल करू शकता. आपल्या नावासह ते आमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील. धन्यवाद!