आजच्या लेखामध्ये आपण हेरवाड पॅटर्न आणि विधवा प्रथा बंदी कायदा 2022 या विषयी माहिती पाहणार आहो . महाराष्ट्र हे ‘पुरोगामी विचारांचे राज्य’ म्हणून महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख आहे. कोणत्या रुढी, परंपरा,अंधश्रद्धा अनिष्ठ असून त्या जर समाजाच्या विकासासाठी विघातक असतील तर सर्वप्रथम मोडिसकाढण्याचे काम महाराष्ट्र राज्याने केलेले आहे. मग अस्पृश्यता , जातीयता,केशवपन, विधवा पुनर्विवाह,स्त्री शिक्षण आणि आज नव्याने चर्चेला जातोय तो विषय म्हणजे विधवा प्रथा.
हेरवाड पॅटर्न आणि विधवा प्रथा बंदी कायदा 2022 |
हेरवाड पॅटर्न | Hervad Pattern Chi Mahiti
महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड हे छोटेसे गाव. परंतु या छोट्याशा गावाने आज पुरोगामित्वाचा एक वेगळा धडा सर्वांत पुढे ठेवला आहे. हेरवाड मधील गावकऱ्यांनी किंवा तेथील रहिवाशांनी एकत्र येऊन 4 मे 2022च्या ग्रामसभेमध्ये एक आगळा वेगळा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला.तो आगळा वेगळा निर्णय ज्या सदस्यांनी घेतला त्या सदस्यांचे प्रमुख म्हणजे गावचे सरपंच सुरगोडा पाटील यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे,कारण त्यांनीच ग्रामसभेमध्ये हा ठराव मांडला आणि यापुढे गावांमध्ये विधवा प्रथा म्हणून किंवा एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ज्या काही आजपर्यंत रूढी परंपरा चालत आलेल्या त्यातील एकाही रूढी परंपरेचे पालन यापुढे केले जाणार नाही. पती निधन झालेल्या स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असा विचार हेरवाड ग्रामपंचायतीने केला व तसा ठराव देखील पास केला. हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय महाराष्ट्र राज्यासाठी नव्हे तर पुढे जाऊन पूर्ण भारत देशा साठी देखील विधवा प्रथा बंदीसाठी एक आधारस्तंभ बनणार आहे यात शंकाच नाही.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मा. उद्धव ठाकरे यांनी देखील या निर्णयाचे कौतुक केले आणि केवळ कौतुकच करून ते थांबले नाहीत, तर हेरवाड पॅटर्नचे सर्वच ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे आणि ही विधवा प्रथा बंद करावी असे ठराव आपापल्या ग्रामसभेमध्ये पास करुन घ्यावेत असा 18 मे रोजी आदेश काढून आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेत असताना जनतेचे कल्याण हीच भूमिका घेत असतो हे दाखवून दिले.
विधवा प्रथा बंद करण्यामागे भूमिका | vidhvaa pratha band karnyamagil bhumuka
हेरवाड पॅटर्नच्या म्हणण्यानुसार प्रत्येक माणसाला समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे मग इतर स्त्रिया जर समाजात सन्मानाने जगत असतील तर ज्या स्त्रिचा पती सोडून गेला किंवा निधन पावला त्यामध्ये त्या स्त्रीचा दोष काय?तिला विधवा म्हणून वेगळी वागणूक देणे उचित नाही. खरोखरच विचार करायला लावणारी बाब आहे.परंतु हा देखील एक सामाजिक प्रश्न होऊ शकतो याकडे बहुधा कोणाचे लक्ष गेले नसावे.कदाचित गेले असळे तरी टीकेचा धनी कोण होणार? या भूमिकेतून सर्व काही आजपर्यंत चालत होते परंतु हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा स्त्रियांना असे म्हणण्यापेक्षा स्त्री जातीला अखंड सन्मानाने जगता येण्याचा अधिकार विधवा प्रथा बंदीच्या ठरावाच्या रुपाने स्त्रियांना बहाल केला आहे असे मला वाटते. यामध्ये नक्की कोणत्या बाबी येतात हे पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की खरोखरच ही प्रथा कित्येक वर्ष अगोदरच बंद व्हायला हवी होती.
विधवा प्रथेविषयी माहिती | Vidhva Prathevishyi Mahiti
विधवा प्रथेनुसार समाजात काही अलिखित असे नियमच होते की ज्यामुळे काही बाबी स्त्रीयांना करण्याचा अधिकार नाकारला गेला होता.
1. कपाळावरील कुंकू | Kapalavaril Kunku
जी स्त्री विधवा आहे किंवा तिच्या पतीचे निधन झालेले आहे त्या स्त्रीला पती निधनानंतर कपाळावर कुंकू लावता येणार नाही.कपाळाला कुंकू नाही म्हणजे ती विधवा असा एक अलिखित नियमच पिढ्यानपिढ्या चालत आला होता.ज्यावेळी पतीचे निधन होते त्यावेळी त्या स्त्रीच्या कपाळावरील कुंकू सार्वजनिकरित्या पुसले जाते आणि त्यानंतर त्या स्त्रीला कधीही कपाळावर कुंकू लावता येत नाही अशी ही परंपरा आजपर्यंत चालत आली होती.
2. गळ्यातील मंगळसूत्र | Galyatil Mangalsutra
पतिनिधनानंतर विधवा स्त्रीला गाड्यांमध्ये मंगळसूत्र घालता येत नव्हते पती निधनाचे वेळी ते मंगळसूत्र खेचून काढले जाते ही खेदाची बाब. त्या स्त्रीला तिचा जोडीदार सोडून गेला आहे या दुःखात साथ देण्याची एक प्रकारे कपाळावर कुंकू पुसणे गळ्यातील मंगळसूत्र काढून घेणे यासारख्या परंपरेने चालत आलेल्या कृतीमधून तिच्या मनाचा कधी कोणी विचारच केला नाही असेच सर्व काही.
3. बांगड्या | bangdya
पतीचे निधन झाल्यानंतर विधवा स्त्रीच्या हातातील सर्व बांगड्या फोडल्या जातात आणि काही ठिकाणी तर स्त्रीने पुन्हा कधी हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घालायच्याच नाहीत असाच एक अलिखित नियम बनला होता.काही भागांमध्ये त्या स्त्रीला ॲल्युमिनियमच्या बांगड्या घालाव्या लागत होत्या. थोडक्यात काय तर ती विधवा आहे म्हणून तिने हातामध्ये बांगड्या घालू नयेत असाच रीवाज पडला होता.
४. पायातील जोडवी | Payatil Jodavi
विधवा स्त्रीला पती निधनानंतर पायामध्ये जोडवी घालता येत नव्हती. लग्नाच्या वेळी सौभाग्याचे अलंकार म्हणून मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू आणि जोडवी हे अतिशय सन्मानाने स्त्रीला दिले जातात परंतु ती विधवा झाल्यानंतर मात्र ती सर्वच्या सर्व खेचून घेतल्यासारखे आहे.हा क्रूर प्रकार स्त्री जातीला काहीही दोष नसताना सोसावा लागत होत होता.
५. पूजा विधि,धार्मिक कार्यक्रम | Pooja Vidhi Dharmik Karykram
विधवेला सर्व सार्वजनिक कार्यक्रमात,पूजा विधी ,नवीन कामाची सुरुवात व धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिला सहभाग घेता येत नव्हता.का तर ती विधवा आहे. विशेष म्हणजे विधवा होणे यात तिचा कोणताच दोष नाही.एक प्रकारे तिच्या पतीचे निधन यामध्ये जशी काय तीच जबाबदार आहे अशी वागणूक दिली जात होती.
या वरील सर्व बाबी बघितल्यानंतर एक प्रकारे विवाहाच्या वेळी ती सौभाग्यवती होणार म्हणून एक भलामोठा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये कपाळी कुंकू,,गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या,पायात जोडवी एवडेच नाही तर यापुढे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये एक मानाचे स्थान सौभाग्यवतीला मिळत होते.परंतु पतीच्या निधनानंतर मात्र यातील कोणतीच गोष्ट करायला स्त्रियांना परवानगी नव्हती खरोखर विचार करायला लावणारी बाब आहे.
हेरवाड ग्रामसभेचा ठराव | hervaad gramsbhecha tharav
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील हेरवाड पॅटर्नने आपल्या ग्रामसभेच्या माध्यमातून अतिशय स्वागतार्ह निर्णय घेऊन स्त्रीला तू स्त्री नाही तर तू देखील माणूस आहे तुला देखील तुझी मते आहेत,सन्मान आहे. तू विधवा म्हणून तुला असं नाकारले जाऊ शकत नाही आणि आम्ही ही अनिष्ठ प्रथा पालन करून तुमच्यावर अन्याय करीत आहोत. आता यापुढे तुम्हाला सन्मानाची वागूनुक देण्याचा ठराव आम्ही संमत करीत आहोत.असाच काहिसा विचार हेरवाड पॅटर्न मधून पुढे आला.आणि हो हेरवाड ग्रामसभेने असा निर्णय घेतला की यापुढे विधवांच्या बाबतीत चालत आलेल्या कोणत्याही प्रथा गावात पाळल्या जाणार नाहीत आणि जो कोणी अशी करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे मत हेरवाड ग्रामसभेमध्ये मांडण्यात आले आणि त्याला गावातील सदस्यांनी पाठिंबा दिला. हेरवाड मधील अनेक विधवा स्त्रियांनी कपाळावर कुंकू, हातामध्ये बांगड्या पायामध्ये जोडवी घालून या निर्णयाचे स्वागत केले.पिढ्यानपिढ्या पती निधनानंतर जो अन्याय विधवा स्त्रिया सहन करत होती त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हेरवाड ग्रामसभेने किंवा हेरवाड पॅटर्नने केले आहे.
हेरवाड पॅटर्नच्या अंमलबजावणीची जबाबदारी | Hervad Pattern Amalbjavni Jbabdari
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार त्या त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपापल्या विभागांमध्ये विधवा प्रथेच्या बंदीबाबत विविध पदाधिकारी, ग्राम ग्रामपंचायत सदस्य यांच्या सभा घेऊन सदर आदेशाची अंमलबाजवणी करतील व ग्रामसभेच्या माध्यमातून हिरवळ पॅटर्न म्हणजेच विधवा प्रथा बंदी कायदा पोहचवतील व आपल्या राज्यातून विधवा प्रथेला मूठमाती देण्याचे काम करतील असे परिपत्रकच काढण्यात आले आहे.
विधवा प्रथा बंद झाल्यानंतर | Vidhva Pratha Bund zalya nantar
विधवा प्रथेला कायद्याने बंदी आल्यानंतर एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाल्यानंतर कोणतेही धार्मिक विधी करताना वर उल्लेख केलेल्या बाबी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. या नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.थोडक्यात एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले म्हणून तिचा एक वेगळा विधवा असा वर्ग निर्माण व्हावा आणि तिचा सन्मान संपुष्टात यावा मुळात हेच मानवी अधिकारांमध्ये बसत नाही.त्यासाठी त्या स्त्रीला पती नाही म्हणून तिच्या सन्मानाने जगण्यावर आपण मर्यादा आणू शकत नाही.यापुढील त्या स्त्रीला विधवा हा शब्द वापरणे देखील चुकीचे ठरणार आहे. गळ्यातील मंगळसूत्र,पायात जोडवी,हातात बांगड्या वकपाळावरील कुंकू हे पती हयात नसताना देखील स्त्रीला यापुढे करता येणार आहे.थोडक्यात विधवा म्हणून कोणतीच वेगळी वागणूक दिली जाणार नाही.
विधवा प्रथा बंदीचे स्वागत | Vidhva Prtha Bandiche Swagat
हेरवाड पॅटर्न ने विधवा स्त्रियांना सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी ग्रामसभेत ठराव पास केला आणि अनेक सामाजिक संस्था, समाजसेवक यांना असे वाटू लागले की हेरवाड सारखा अधिकार सर्वच महाराष्ट्रातील स्त्रियांना मिळाला पाहिजे अशी मागणी विविध स्तरातून जोर धरू लागली आणि म्हणूनच विधवा प्रथा बंदी बाबत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशा सूचना दिलेल्या आहेत.आता हा विधवा प्रथा बंदी कायदा आला खरा पण; त्याची अंमलबजावणी केवळ कागदावर नको तर मनामनातून झाली पाहिजे. माझ्या घरात, नातेवाइकांमध्ये, मित्र परिवारामध्ये कोणी जर विधवा असेल तर या कायद्याने मिळालेल्या सर्व बाबी करण्यासाठी ती व्यक्ती लगेच धजावणार नाहीत.अशावेळी त्या संबंधित व्यक्तीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम प्रत्येकाने केले पाहिजे .काही महिने मेहनत घेतली तर पुढच्या पिढीला अशी ही काही अनिष्ट प्रथा होती यावर विश्वासच बसणार नाही. कारण निसर्ग हा कोणतेच भेद करत नाही मग माणूस एक सामान्य स्त्री अन एक विधवा स्त्री असा भेद का करतो? यावर विचार होणे गरजेचे आहे. कायदे कागदावर असून उपयोग नसतो तर तो कायदा मना मनामध्ये यायला पाहिजे तरच त्याची अंमलबजावणी शंभर टक्के झाली असे मला वाटते.
विधवा प्रथा बंदी कायद्याचे विशेष | Vidhvaa Prtha Bandi Kaydyache Vishesh
आजपर्यंत स्त्रीला लग्नाअगोदर वडिलांच्या नावाने ओळख मिळत होती.लग्न झाल्यानंतर पती हयात असेपर्यंत त्याच्या नावाने परंतु आता या विधवा प्रथा बंदी कायद्याने स्त्रीला तिची अशी एक स्वतची ओळख मिळणार आहे.कुठेतरी स्त्रीला केवळ नावाला नाहीतर खराखुरा सन्मान म्हणजे विधवा प्रथा बंदी कायदा म्हणून हा कायदा थोड्याच दिवसात राज्यभर नाही भारतभर लागू होईल.
या कायद्यामुळे विधवा स्त्रियांना स्त्री म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे,अलंकार घालण्याचा ,नटण्याचा,धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याचा आणि तो का नसावा?पुरुषांसाठी त्याची पत्नी गेल्यावर किंवा निधन पवल्यावर अशी कोणतीच प्रथा अस्तित्वात का नाही?तर इथली पुरूषप्रधान संस्कृती.चला तर माणूस म्हणून माणसाकडे पाहूया नि अनेक वर्षे कारण नसताना अवहेलना सहन करणाऱ्या विधवा स्त्रियांना सन्मान देऊया.
आपल्या महाराष्ट्र शासनाने हेरवाड पॅटर्नला दुजोरा देऊन अतिशय तात्काळ परिपत्रक काढून विधवा प्रथा बंदी कायदा आणला त्या कायद्याचे आपण स्वागत करूया.चला तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!
FAQ | प्रश्नोतरे
1. पती निधनानंतर लाल टिकली,जोडवीआणि मंगळसूत्र घालून विधवा प्रथा बंदीला पाठिंबा
Very good information
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला लिहिण्यासाठी बळ देतात शरद सर धन्यवाद