Type Here to Get Search Results !

शेअर मार्केट मूलभूत माहिती काही संकल्पना | Basic Concept Of Stock Market In Marathi

 शेअर मार्केट | stock market 

             आजच्या लेखात आपण शेअर मार्केट मूलभूत माहिती काही संकल्पना पाहणार आहोत. मागील लेखमालेत आपण पहिले की आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे. सामान्य माणसाजवळ  पैसाच शिल्लक राहत नाही तर तर हे  ज्ञान त्याच्या काय कामाचे ?  गुंतवणूक तर खूप लांबची गोष्ट ? पण यावर देखील आपण एक सामान्य माणूस  काटकसर करून जो पैसा आपण आजपर्यंत विनाकारण होणाऱ्या खर्चात पेट्रोल,कपडे खरेदी,घरातील अन्नाची नासधूस,छंद किंवा व्यसन ,चहापान यावरील होणाऱ्या खर्चात 10 टक्के जरी कपात केली तरी वर्षाला किमान 25000 रुपयाची बचत नक्की करू शकतो.याची माहिती सविस्तर घेतली.यासाठी आर्थिक नियोजन व काटकसर हा लेख जरूर वाचा. जर आपण आर्थिक स्वयशिस्त लावली तर दरमहा जो पैसा आपला हिशोबात नव्हता . तो पैसा आपण शेअर बाजारात गुंतवू शकतो.मी स्वता दरमहा ३००० रुपयांची बचत करून गुंतवणुकीला सुरुवात केली आहे.आपण पण हे सुरू करायला हरकत नसावी.गुंतवणूक कुठे ? व कशी करावी ? हे करण्यागोदर आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील .काहीना त्या माहीत देखील असतील मात्र जे अगदी नवीन आहेत त्यांना हे सांगणे गरजेचे आहे

शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना

शेअर मार्केट मूलभूत संकल्पना(toc) 

 | Basic Concept Of Stock Market In Marathi 

१. शेअर | Stock,shear 

                    शेअर मार्केट मूलभूत संकल्पना पाहत असताना सर्व प्रथम  शेअर म्हणजे काय? हे समजून घेऊ.आपल्याला कोणताही व्यवसाय सुरू करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात आवश्यक असते ते म्हणजे भांडवल.हे भांडवल आपण विविध मार्गानी उभारत असतो. जसे की घर घेण्यासाठी आपण बँका ,पतसंस्था तर कधी कधी Privet बँकेतून देखील कर्ज काढत असतो.अगदी त्याच पद्धतीने एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा आहे ,त्याचा विस्तार करायचा असेल . अशा वेळी ती कंपनी म्हणा किंवा  Buisness ग्रुप म्हणा बँकेकडून कर्ज  व्याजा वर घेण्यापेक्षा बिन व्याजी भांडवल उभे करू पाहतात. त्या कंपन्या आपले शेअर विक्रीस काढतात.थोडक्यात आपल्या व्यवसायात भागीदारी देतात ती भागीदारी म्हणजे शेर होय.  

                    सोप्या भाषेत कंपनी आपल्या Privet कंपनीला सार्वजनिक करतात व लोकाना शेअरच्या माध्यमातून हिस्सेदारी देतात. समजा एखाद्या कंपनीने २००० करोंड चे शेअर विक्रीस काढले व त्यातील तुम्ही ५०० करोंडचे शेअर तुम्ही  विकत घेतले तर त्या कंपनीत तुमचं २५ टक्के हीसा झाला. त्या वर्षभरात कंपनीला जेवढा फायदा होईल त्याच्या २५ टक्के नफा तुम्हाला बोनस स्वरूपात मिळेल अशी ही  संकल्पना आहे. पण असे होत नाही कारण कंपनीचे शेर करोडोच्या संखेने येत असतात. आपण आपल्या ऐपती प्रमाणे गुंतवणूक करू शकतो.  उदाहरण म्हणून वरील मांडणी केली.थोडक्यात  कंपनी ज्यातून आपले भांडवल उभे करते ती व्यवस्था म्हणजे शेअर होय. 

२. शेअर बाजार | Stock Market 

                   शेअरची दररोज खरेदी विक्री होत असते . या खरेदी विक्रीला म्हणतात शेअर बाजारम्हणतात.भारतीय शेअर बाजारात ५००० च्या जवळपास कंपन्या सक्रिय आहेत . आपण ज्याप्रमाणे आपल्याला हव्या असलेल्या वस्तु बाजारातून विकत घेतो. अगदी त्याच पद्धतीने शेअरची खरेदी विक्री सुरू असते. जसे की कंपनी खूप नफा मिळवत असेल तर अनेक लोक त्या कंपनीचे शेअर विकत घेत असतात. सहाजिकच त्या शेअर ची किमत वाढत असते याचा फायदा त्या कंपनीला होतो कारण तेवढे भाग भांडवल तिला उपलब्ध होते.सार्वजनिक सुट्या, व शनिवार रविवार सोडून इतर दिवशी सकाळी ९.१५ ते दुपारी  ३.३० या वेळात भारतीय शेअर मार्केट सुरू असते. या वेळात शेअरची खरेदी विक्री होत असते. दिवसभरात करोडोच्या घरात हे शेअर लोक आपापल्या भांडवलांप्रमाणे घेत असतात व काही पुरेसा नफा मिळाला की विकत असतात . 

३. सेबी | Securities & Excahnge Board Of India 

                   याचे मुख्यालय मुंबईला आहे. सेबी ही संस्था काय करते तर शेअर बाजारातील व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवत असते. काही गैरप्रकार होत असतील. तर त्याना अटकाव ही संस्था करत असते . थोडक्यात गुंतवणूकदरांच्या हिताचे काम ही संस्था करत असते. ब्रोकरकडून गुंतवणूकदा राची फसवणूक होऊ नये यासाठी सेबी दक्ष असते. थोडक्यात Reserav  बँक ज्या  पद्धतीने इतर बँकावर लक्ष ठेवतात अगदी शेर बाजारात तेच काम सेबी करत असते. 

४. स्टॉक ब्रोकर | Stock Broker 

             आपल्याला शेअर बाजारातून सरळ सरळ शेर विकत घेता येत नाहीत अशा वेळी गुंतवणूकदार व शेर बाजार यातील खरेदी विक्री करण्यासाठी जो मधला घटक म्हणजे स्टॉक ब्रोकर होय. जसे की Zeerodhaa ,Angel ,Kotak Securities, Upstocs इत्यादि हे आपल्याला शेअर खरेदी करण्यासाठी मदत करतात. स्टॉक ब्रोकर शिवाय आपण शेर खरेदी करू शकत नाही. त्या बदल्यात ते आपणकडून काही प्रमाणात  दलाली किवा brokrage घेत असतात. त्या सर्वांचे दर जवळपास सारखेच असतात. व ती दलाली नाममात्र असते.

५. डी मॅट खाते | Demat Account 

                            आपण बँकेत व्यवहार करण्यासाठी बचत खाते काढतो. अगदी शेर खरेदी विक्रीसाठी जे खाते काढतो त्याला Demat Acount म्हणतात. हे खाते स्टॉक ब्रोकरकडे आपल्याला काढावे लागते . आपण खरेदी केलेले शेर या Demat खात्यात जमा होत असतात . थोडक्यात बँक खात्यात व्यवहार रुपयांच्या स्वरूपात तर Demat मध्ये शेअर खरेदी  व विक्री असा व्यवहार होतो. 

.nse  व bse  | Stock Exchang(अधिक माहितीसाठी क्लिक करा)

                   Exchange म्हणजे देवाणघेवाण होय. थोडक्यात शेअरची खरेदी विक्री जिथे होते त्या exchange  म्हणजे .   (National Stock Exchange)  Nse व (Bombay Stock  Exchange) म्हणजे Bse होय . Nse व Bse वर शेअर खरेदी विक्री होतात. ज्या कंपन्या Listed असतात. त्यांच्या शेर ची खरेदी विकी या platformvar होते. Bse व Nse वर त्यांचे शेर विक्रीसाठी सर्वप्रथम Ipo च्या माध्यमातून येत असतात. थोडक्यात आपल्याला शेअर स्टॉक ब्रोकरच्या मदतीने nse किंवा Bse मधून घ्यावे किंवा घेतलेले विकावे लागतात. यात जवळपास ५००० पेक्षा कंपन्या आपले शेअर विकत असतात.थोडक्यात भाजी मंडई असते अगदी तसेच Nse ,Bse या शेयर विक्री करणाऱ्या मंडई आहेत.  

७. निफ्टि व सेंसेक्स :| Nifty v  Sensex (अधिक माहितीसाठी क्लिक करा) 

                       शेअर बाजाराची सद्यस्थिति काय हे ?हे जाणून घेण्यासाठी nifty म्हणजे nse वर लिस्ट असलेल्या विविध क्षेत्रातील टॉप ५० कंपन्यांची सद्यस्थिती दाखवणारा ग्राफ/आलेख व अगदी तसेच bse वरील टॉप ३० कंपन्या त्या देखील विविध क्षेत्रातील त्यांची स्थिति दाखवणारा ग्राफम्हणजे sensex . सध्या निफ्टि १७००० अंकावर आहे काही महिन्यापूर्वी ती १८५०० च्या दरम्यान होती म्हणजेच सध्या शेअर मार्केट काही अंशी ढासळले आहे. कारण कायतर रशिया व Ukren लढाई.  
         थोडक्यात मार्केटचा प्रातिनिधिक  अंदाज या Sensex व Nifty वरुन येतो. तुम्ही TV वर बातम्या पाहत असताना आज Sensex किंवा nifty इतक्या अंकानी  ढासळली हे ऐकली असेल किंवा वाढली हे ही ऐकले असेल. 
                   एकंदरीत आजच्या सदराचे सार म्हणजे जर आपल्याला शेअर मार्केट मधील शेअर म्हणजे आपली कंपनीतील हिस्सेदारी , तसेच जिथे शेयर ची खरेदी विक्री होते ते platform म्हणजे nse व bse. ही खरेदी विक्री कोणत्या वेळात होते याची कल्पना आली. सर्वात महत्वाचे nifty व sensex यांच्या माध्यमातून सध्या मार्केट तेजीत आहे की मंदीत आहे याचा अंदाज येतो हे कळले. आणि जर आपल्याला शेअर खरेदी विक्री करायची असेल तर वर सांगितलेल्या कोना  एका ब्रोकरच्या मदतीने dmat खाते उघडावे लागेल तेंव्हाच  लखपती ,करोंडपती बनण्याच्या मार्गावर आपले पहिले  पाऊल पडेल. 
                सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे व तो मोठा होण्यासाठी या सर्व बाबी त्याला माहीत असायला हव्यात . आज विचार करा. दहा वर्षापूर्वी जो स्टॉक किंवा शेर १०० रुपयांना होता तो आज किमान १००० च्या घरात आहे. आपण आपल्या कमाइतील खूप मोठी गुणवणूक इथे करावी असे अपेक्षित नाही पण किमान वायपट जाणारा किंवा माझ्या कमाइतील १ ते दीड टक्का  रक्कम  अनुभव म्हणून गुंतवायला काय हरकत आहे? हे एक खूप मोठे घबाड  आहे पण आपल्याला ते कोणी नीट समजावले नाही व आपणही समजून घेतले नाही .हळूहळू ही मालिका Demat Account काढून आम्ही आता गुंतवणूकदार झालो आहोत. पुढच्या १० वर्षात आम्ही जो आमचा वायपट जाणारा पैसा आहे याचे योग्य नियोजन करून आर्थिक स्थैर्य मिळवणार आहोत. असे जरी आज आपल्याला वाटले तरी ही चळवळ नावारूपास आली असे मी समजेन. 
                बचतीची सवय लागली. छंद,व्यसन, अन्नाची नासाडी.---------------  या जरी बाबी कमी झाल्या तरी  आपल्या जीवनात  किती मोठे काम होईल.  या आर्थिक चळवळीतून समाजाला ढवळून टाकणारी . माणूस म्हणून बदलून टाकणारी एक नवी चांगली समाजव्यवस्था बनेल.हे चित्र माझ्या मनात आकार घेत आहे तुम्हा सगळ्यांची साथ हवीय. काही लोक म्हणतात आमच्या जीवनात नवे काही घडतच नाही मी तर म्हणेन अशा अनेक बाबी घडत असतात पण तो Tourning Point आपल्याला कधी आला हे समजतच  नाही. आपली तशी गत होता कामा नये. हे खूले  व्यासपीठ आहे. काही बाबी पटत नसतील तर जरूर बोला पण काळाची पाऊले ओळखा. व आर्थिक साक्षर बना.  उद्या आपल्यातील जे  या मार्गावर चालत राहतील  व ते सामान्य न राहता  असामान्य होतील . जे ऐकणार नाहीत त्यानं एकच खंत वाटत राहील . ती अरे करायचे काहीच नहवते फक्त आर्थिक साक्षर नि काटकसर यांचा मेळ घालयचा होता.चला तर आजच्या या सदरात शेर मार्केट मधील पायाभूत बाबी बघितल्या नंतर Nifty व Sensex याची सविस्तर माहिती पाहूया . प्रतिक्रिया अगदी बिनधास्त नोंदवा . चुकत असेल तर चुका सांगा. बरोबर असेल तर कमेन्ट मधून प्रोत्साहन  द्या . सबका मंगल हो .कल्याण हो.स्वप्न पाहू नका सत्यात उतरवण्यासाठी थोडे गंभीर व्हा. हीच अपेक्षा.    

 

 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. माहिती उपयुक्त आहे , ऑप्शन trading मधील आपला अनुभव सांगावा, future trading म्हणजे काय , advance trading व candle या विषयी,तुमच्या ज्ञानाचे दरवाजे उघडे करावे.
    आपल्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा💐💐💐💐💐

    आपला शुभचिंतक:
    मधुकर शिरसाठ.

    उत्तर द्याहटवा
  2. उपयुक्त माहिती.शेअर बाजारातील धोके व घ्यावयाची काळजी याविषयी माहिती पुढील भागात मिळेल ही अपेक्षा

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area