Type Here to Get Search Results !

सामान्य माणूस आणि शेअर मार्केट | Sher Manus Aani Shar Market

 सामान्य माणूस आणि शेअर मार्केट | Comon Man & Stock Market 

             मागील लेखमालेत आपण  आर्थिक साक्षरता व काटकसरीचे महत्व  पहिले. आज आपण  सामान्य माणूस व शेयर मार्केट यांचा अभ्यास करणार आहोत. जगाचा विचार केला तर अमेरिकेसारख्या आर्थिक महासता  असलेल्या देशात शेअर मार्केट वर आपली जीविका चालवणाऱ्या लोकांचे प्रमाण ४० टक्के आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील किंवा अनेक Foregin Country तील  लोक आपल्या देशातील शेयर बाजारात  गुंतवणूक करून प्रचंड आर्थिक प्रगती करत आहेत.  पण आपण आपल्या देशाचा विचार केला तर प्रचंड लोकसंख्या असून शेअर मार्केट मध्ये आपली गुंतवणूक करणारांचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के म्हणजे खूपच कमी आहे. यात ही जरा खोलात जाऊन यांचा विचार केला की या २ टक्के लोकात सामान्य लोकांचे प्रमाण अर्धा टक्का देखील नसेल याचे कारण काय तर आर्थिक साक्षरतेचा अभाव व आपल्यासमोर असलेल्या नकारात्मक बाबी ज्या आपल्याला मोठे बणण्याचे सोडा पण मोठी स्वप्न देखील पाहू देत नाहीत. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण केवळ मोठी स्वप्ने पाहणार नाहीत तर ती सत्यात उतरवणार आहोत. फक्त गरज आहे आर्थिक स्वयं शिस्तीची .
       आज आपण सामान्य माणूस किंवा मी तर म्हणेन मराठी माणूस यात मागे का आहे ? त्यामागे कोणती कारणे आहेत याचा  आढावा मी आज घेणार  घेणार आहे.सामान्य माणूस आणि शेअर मार्केट हे पाहिल्यावर ते नक्की समजेल.  
सामान्य माणूस व शेअर मार्केट
सामान्य माणूस आणि शेअर मार्केट

सामान्य माणूस शेअर मार्केट पासून लांब / वंचित असल्याची कारणे : (toc)

१. आर्थिक साक्षरतेचा अभाव | : Economic Ilatrecy,Arthik Sakshrta Abhaav 

                                               सामान्य माणूस आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत खूप मागे आहे . आपला पैसा कोणत्या मार्गाने वाढू शकतो याची त्याला माहिती नाही व त्याबाबत कोण सांगेल असी व्यवस्था नाही . जे मोजके लोक आहेत ज्यांना हे माहीत आहे ते इतरांना सांगण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण एकच मी सांगितले व अमुक अमुक मोठा झाला तर .... म्हणून चार चौघात पैसा कुठे गुंतवावा हे कोणी कोणाशी बोलत नाही हे बदलायला हवे. व याच प्रेरणेने ब्लॉग मधील ही मालिका अशीच पुढे चालू राहणार आहे. 

२. पूर्वग्रह | Prejudice,Purvgruh  

                   सामान्य माणूस सोडा एकंदरीतच शेअर मार्केटकडे पाहण्याचा आपला पूर्वग्रह  हा  आहे की यात माणूस गेला की त्याचे आर्थिक दिवाळे निघते. पण त्याची दुसरी बाजू अशी की या मार्केटमधूनच कितीतरी लोक घडगंज श्रीमंत झाली आहेत याकडे आपण लक्ष देत नाही. म्हणून आपण आपला दृष्टिकोण बदलायला हवा. अनुभवाणे बोलणे वेगळे पण काही लोक म्हणतात म्हणून मार्केट वाईट हा पूर्वग्रह  बदलायला हवा.व सकारात्मकता यायला हवी.  

३. शेर मार्केट जुगार अशी धारणा | Stock Market is Gamble   

                 आपण जर याकडे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून निवडाल व त्यासाठी Treding म्हणजेच आजच हजारोंच्या संखेने शेर घेणार व आजच्या आजच  विकणार व मोठा नफा कमावण्याचा प्रयत्न करणार तर आपले प्रचंड फायदा तसे प्रचंड नुकसान देखील होऊ शकते . या मार्केट कडे झटपट मोठा होण्याचा मार्ग म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पहा . कारण कोणताही व्यवसाय हळूहळू मोठा होत असतो. म्हणून शेर मार्केट ला Gambuling किंवा Jugar  म्हणणे चुकीचे आहे. 

४. पारंपरिक पद्धतीने पैसा गुंतवण्याची सवय | Traditional Approche Of Investment

                 जसे की सामान्य माणूस काय करतो तर आपल्याकडील शिल्लक पैसा बँक , पतसंस्था  यात ठेवीच्या स्वरूपात ठेऊन नाममात्र फायदा घेत असतो. साधारण ८ ते ९ वर्षानी बँकेत ठेवी ठेवलेला पैसा दुप्पट होत असतो तोच पैसा जर शेर मार्केट मध्ये गुंतवला तर तो १० वर्षात किमान  ५ पट तरी वाढू शकतो पण त्यासाठी संयम हवा. भयभीत मानसिकता असेल तर हे शक्य नाही. व थोडा जास्त नाही अभ्यास हवा. 

५. सोने, दाग दागिने यात गुंतवणूक | Gold Guntvnuk  

             सामान्य माणूस आपल्याजवळ जर काही शिल्लक रक्कम असेल तर ती सोने ,नाणे यात गुंतवत असतो.पण सोन्याच्या दरातील वाढ ही अतिशय धीम्या गतीने होत असते जसे १२ वर्षांपूर्वी सोने ३० हजार तोळा होते आज तो दर ५० हजारच्या घरात आहे . महागाईच्या तुलनेत ही वाढ नक्कीच कमी आहे. 

६. सामान्य लोकांची  नकारात्मक मानसिकता | Common Man Negatvity 

                 सामान्य माणसाची मानसिकता आपण मोठे होऊ शकतो , श्रीमंत होऊ शकतो अशी दिसतच नाही उलट कायम आर्थिक दबावात राहण्याची सवय पिढ्या दर पिढ्या त्याला लागली आहे . याउलट मोठे buisnessmen भरमसाठ कर्ज घेऊन उद्योग  उभारतात . व यशस्वी देखील होतात. काही अपवाद देखील असतील. पण आपण आपली ही मानसिकता बदलायला हवी . आपण आपल्या  आर्थिक प्रगतीसाठी सजग राहायला हवे. मला आर्थिक रुबाबात जगायची मानसिकता हवीय ती सामान्य माणसात दिसत नाही. 

७. यशस्वी लोकांची कोती मानसिकता | Selfish Mantality 

                     हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ..माझा मुलगा डॉक्टर झाला आता गावात अजून कोणी डॉक्टर झाले तर माझी ,माझ्या परिवाराची जी ओळखआहे ती पुसली जाईल म्हणून ते सुजाण पालक इतर मीतर मंडळी याना medical चे शिक्षण entrance याबाबत माहिती देत नाहीत अगदी तसेच शेर मार्केटच्या बाबतीत आहे आज कितीतरी आपल्या आजूबाजूचे लोक शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवत असतात, पण याबाबत आपले मित्र सोडा नातेवाईक याना देखील याबबाबत ते सांगत  नाहीत. असे न करता आपण राजकारण, समाजकारण यावर कितीतरी गप्पा झोडत असतो हे करत असताना बोलता बोलता मार्केट विषयी बोलायला हवे. कोणता शेअर आज वाढला. जागतिक बाजार का ढासळत आहेत, वाढत असतील तर का वाढत आहेत. अशा चर्चा व्हायला हव्यात .  विचार करा foregn चे लोक आपल्या मार्केट मध्ये पैसा लावत्तात पण आपण मात्र घबरतो कारण का जे यशस्वी झाले त्यांनी आपले यश कोणापुढे मांडले नाही.  मात्र जो बुडाला तो आपल्या चुका संगत नाही उलट मार्केट लबाड आहे यात पैसा बनत नाही अशी बोंब तो मारत सुटतो पण आपल्या चुका जगजाहीर करत नाही.  तर कोत्या  लोकानी अस न करता दिल्याने वाढते या न्यायाने वागायला हवे. मी जी चळवळ उभी  करतोय ती देखील काहींच्या पचणी पडत नसावी असो.
                  या सामान्य माणूस आणि शेअर मार्केट या वरील विवेचनावरून आपल्या ध्यानात आले असेल की नण्याला दोन बाजू असतात. व ज्याला त्या पाहयला जमल्या तो अगदी योग्य मार्गाची निवड करू शकतो . पूर्वीच्या काळी गरीब, याचकाला , नडल्या अडलेल्याला मदत करणे हे चांगले काम मानत होते. आज आपण देखील स्वत आर्थिक साक्षर बनून इतरांना देखील याविषयी माहिती द्यायला हवीय.तर मग आपण सामान्य माणसाने देखील लखपति ,करोडपती बनण्याच्या या वाटेवर एक पाऊल ठेवायला काय हरकत आहे. मला खात्री आहे आपण एकेक पाऊल करत करत हिमालयासारखी आर्थिक ऊंची गाठू शकतो. गरज आहे योग्य दिशेने पुढे जाण्याची. मी पण तुमच्यासारखाच नवखा आहे पण यातील खाज खळगे यांचा अंदाज असल्याने आपला प्रवास जपून कसा  करायचा याची जाणीव आहे.व माझ्या वाचक वर्गाला एका वेगळ्या ऊंचीवर नेण्याची माझी मनीषा आहे. हा प्रवास हळूहळू शेअर मार्केट म्हणजे काय ? यात किती व कशी गुंतवणूक करावी ? या दिशेने पुढे जाणार आहे. 
               फक्त एकच विनंती की जर खरच आपल्याला या Wonderful Journey चा घटक बनायचे असेल तर ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचून त्याची टिपणे तयार करा. त्याचा उपयोग आपल्या पुढील प्रवासात महत्वाचा ठरणार आहे. तर चला पुन्हा भेटूया शेअर मार्केट म्हणजे नेमके काय?तसेच त्यातील मूलभूत संकल्पना जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

      एक विनंती कायम लिंक पाठवणे सद्सद्विवेक बुद्धीला उचित वाटत नाही खरेच आपणास अधिक जाणून घ्यायला आवडत असेल तर खालील फक्त अर्थकारण या whats app ग्रुप ला जॉईन व्हा ही विनंती 

 

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. खुप महत्त्वाची माहिती दिली सर, त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद,, अशीच माहिती देत रहा, तुमच्या मुळे आम्ही नक्कीच आर्थिक साक्षर बनू

    उत्तर द्याहटवा
  2. अभ्यासपूर्ण विवेचन,उत्कृष्ट भाषाशैली...खूप छान सर 👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. किचकट विषय आपल्या सोप्या भाषाशैली मूळे सोपा होत जाईल ही अपेक्षा व आपल्या लेखन मालेला शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area