बालकाला समजून घेताना | balkala smjun ghetana
बालकाला समजून घेणे घेणे खरोखर गरजेचे आहे.अस म्हणतात संसार एखदा का सुरू झाला की, आपण आपले राहतच नाही .संसारात अगदी सुरुवातीचे काही दिवस गोडी गुलाबीत जातात.दोन मने एकमेकाना जाणून घेत असतात.समजून घेण्याचा प्रयत्न करत. काहींचा हा प्रयत्न यशस्वी होतो ते स्वताला भाग्यवान समजतात. ज्याना काही कळत नाही त्यांना हा प्रवास अवघड वाटतो ते मात्र लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असा मनाला आधार देऊन मार्गक्रमण करत राहतात.या प्रवासात जर खूप तनाव वाढला तर काही माणसे आपसूक वेगळी पण होतात. तर काही निर्णय घ्यायला घबरतात ती मात्र दिवसमागून दिवस काढत असतात.हा सांसारिक प्रवास म्हणजे मोठी तारेवरची कसरत. दोन मने त्यांचे एकमेकांशी जुळवून घेणे किंवा घेण्याच्या प्रयत्न करत असतील तर परंपरेने आलेला सासुरवास त्याना काही चुकत नाही. सांगण्याचा मुदा सगळ्याच पातळीवर हे दोन जीव संघर्ष करत असतात . जसे की मुलगा आईचे खूप ऐकतो ,माझे काही ऐकतच नाही म्हणून भांडणारी नवी सून . तर काही घरात मुलगा माझा होता त्याला माझ्यापासून दूर केला अशी सुनेची तक्रार करणारी सासू दिसते या सगळ्या बाबी घर तिथे पर अशा असतात. थोडक्यात प्रत्येक घरात त्या थोड्या फार फरकाने सुरूच असतात.
असा हा संसाररूपी रथ पुढे चालत असताना काही महिन्यात किंवा वर्षात म्हणा या सांसाररूपी वेलीला फुले लागतात. या दोन जीवांच्या मिलणातून एक नवीन जीव आकारास येतो.तो जीव म्हणजे त्या घरातील जन्माला येणारे बालक किंवा बालके .आज आपण पुढारलेले आहोत मुलगा मुलगी या भेदात आपल्याला जायचे नाही. तर मुख्य विषय आहे एक पालक म्हणून आपण त्यांना कशारीतीने समजून घ्यायला हवे.त्या बलकाच्या वयानुरूप गरजा वेगवेगळ्या असल्या तरी आपण त्याला समजून घेताना काही बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत याच बाबीवर आपण बोलणार आहोत.
बालकाला समजून घेताना |
बालकाला कसे समजून घ्यावे (toc)
१. शरीरशास्त्राचा अभ्यास | Physiology,Shrirshastra
बालकाला समजून घेताना ही सर्वात महत्वाची बाब आहे आपल्याला बालकाला समजून घेत असताना कोणत्या वयात त्याच्या शरीराच्या वाढीत कोणते बदल होणार आहेत. याची माहिती आपल्याला हवी, जसे की लहान बाल आहे ते ५ ते ६ महिन्याचे झाल्यावर एका अंगावर होण्याचा प्रयत्न करत आहे का ? हे पहायला हवे. ते किती वर्षाचे झाल्यावर बोलेल या नि अश्या अनेक बाबी पालक म्हणून आपल्याला माहीत हव्यात. मी लहान मुलांचे उदाहरण दिले. याच पद्धतीने वयात येणाऱ्या बलकातील बदल देखील लक्षात घेऊन त्याची शारीरिक वाढ योग्य होत आहे की नाही याबाबत निरीक्षण असले पाहिजे.
२. खानपानाच्या सवयी | Eating Habits ,Savayi
आज मी बऱ्याचदा पाहतो की चार वर्षापर्यंतची मी जेवढी बालके पहिली त्यातील बऱ्याच बालकांचे दात किडलेले दिसतात. त्या बालकांना तसे पाहिल्यावर त्या बालकाचा मला बिलकुल राग येत नाही . तर आई वडील , घरातील इतर मंडळींचा राग येतो . हे दात चॉकलेट,बिस्किट मोठ्या प्रमाणात खाल्याने किडतात. मी म्हणतो तुम्ही त्याचे लाड करा पण किमान त्याला समजत नाही तोवर त्याच्या दातांची निगा ही आपली जबाबदारी आहे. थोडक्यात त्याला कोणत्या वयात कोणता आहार द्यावा याचा अभ्यास करावा. मुलांना कुरकुरे, मॅगी , फास्ट फूड यांची जास्त सवयी लावू नयेत.त्याला सकस आहार मिळावा यासाठी तुम्ही या फास्ट फूडच्या crez मधून स्वताला बाहेर काढायला हवे. पण आज अनेक पालक स्वता देखील दक्ष नसतात व मुलांना देखील दक्ष ठेवत नाहीत यातून पोटाचे आजार, पचन शक्ति कमी होणे तर काही बालक कॅन्सर सारख्या आजारांनी बळी पडत आहेत. म्हणून त्याना चांगल्या सवयी लावाव्यात. सकस आहार गरजेचा का हे पटवून द्यावे.
३. संस्कार | Secrament म्हणजे Snskar
आपल्या बालकावर उत्तम संस्कार करावेत त्याला चांगले वाईट यातील फरक लक्षात आणून द्यावा. चार लोकात गेल्यावर कसे वागावे ? हे समजावून सांगावे. अनेक पालक अमुक करू नये म्हणून मो ओरडताना पहिले आहेत . पण का करू नये. हे त्याला नीट समजावले तर त्याच्या वर्तनात नक्की बदल होतील. कधी कधी गफलत होते. माझ्याकडून देखील झाली आहे . पण एक दक्ष पालक असे करणार नाही. खूप लहान वयात ज्या वयात त्याला काही कळत नाही तरी उगीच दबाव टाकून सवयी लावू नयेत पण वय वाढेल तश्या हळूहळू सवयी लावण्याचा प्रयत्न करावा.
४. तुलना | compare Tulana
आपण कायम आपल्या बालकांची तुलना इतरांशी करत असतो . ही सतत होणारी तुलना त्यांच्या मनात राग निर्माण करत असते. यातून तो चंगले वागण्या ऐवजी विद्रोही वर्तन करण्याची शक्यता असते अश्या वेळी काही पालक बोलतात हा आमचे ऐकतच नाही याला कारण आपण कायम त्याची कुणाशी तरी तुलना करत असतो हे टाळायला हवे. घरात दोन भवंडांची तुलना नकळत आपण करत असतो एकाचे कौतुक तर एकाला कायम ऐकवत असतो हे चुकीचे आहे.
५. भूमिकाभिनय | Bhumikaabhinay
कधी कधी आपण आपल्या बालकाकडून अति अपेक्षा करतो. त्याच्या हातून चूक झाली तर त्याच्यावर रागावतो पण हे रागवत असताना आपण आपले लहानपण आठवून बघा किंवा ते वय आठवून बघा आपण तर या वयात प्रचंड चुका करून प्रचंड मार खालेला असतो ,पण वाढत्या वयानुसार आपण आपले बालपण विसरून जातो. व एका प्रौढ दृष्टीने बाळककडे पाहतो असे न करता आपण त्याच्या जागी आहोत अशी भूमिका मनात आणा मग तुम्हाला समजेल की आपण आपल्या बालकाला समजूनच घेत नाही तर यापुढे राग आल्यावर आपण त्या ठिकाणी आहोत अशी कल्पना करा .
६. मित्र बना | make a friend Mitr Banane
आपल्या बालकाला आपण रिंग मास्टर व तो सर्कस मधील एखादा प्राणी असे करू नका. मारहान करून , दबाव टाकून त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू नका. तर त्याचा मित्र बना त्याला जवळ घ्या. दिवस भरात काय गमती जमती केल्या ते विचारा काही चुका केल्या असतील त्या देखील न घबरता आपल्याजवळ त्याने बोलायला हव्यात . त्याच्याशी मित्रासारखे खेळा. थोडक्यात त्याचा मित्र बना. आपले आई वडील एक अंतर वागून राहत होते तसे अजिबात राहू नका.
७. दोन पिढ्यातील genration गॅप कमी करा | Don Pidhyatil Antar
आपले आई वडील व आपण दोन पिढ्यात एक अंतर पहिले त्यातून आई बाप व मुले यांच्यात सर्वच पातळीवर एक एक गॅप पाहायला मिळतो. तो गॅप कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.
८. समवयस्क गट प्रभाव मान्य |peer group,Samvysk Gat
आपला बालक असा का वागला ? त्याच्या हातून एखादे अनपेक्षित वर्तन घडले तर त्याचा समवयस्क गट कसा आहे हे जाणून घ्या . कारण आपल्या पेक्षा या गटाचा प्रभाव बलकावर जास्त असतो. हे मान्य करा. त्याचे मित्र , मैत्रीणी कोणत्या वातावरणात वाढलेले आहेत ते पहा.बऱ्याचदा आपण आपल्या बालकास दोष देत राहतो असे करू नका तर बालकाला समजून घ्या.
९. जीवघेणी स्पर्धा | Jivgheni Sprdha
आजकाल जीवघेणी स्पर्धा सर्वच क्षेत्रात वाढत आहे. इतकेच काय लहान लहान मुलांना देखील बळी बनवले जात आहे. फक्त जनावरांची शर्यत होते असे नाही तर आज बालकांना या शर्यतीचा बैल केले जाते हे योग्य नाही . आपल्या पल्याला अमुक यायला हवे हे ठीक पण यायलाच हवे ते पण इतरापेक्षा छान ही या लहान वयात अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे तो बालक संज्ञान झाल्यावर खऱ्या स्पर्धेत टिकवायचा असेल तर लहानपणी त्याला पोपटपंची नका शिकवू. काही बाबी त्याच्या त्याला कळू द्या ही माफक अपेक्षा.
थोडक्यात काय तर बालकाला समजून घेताना म्हणजेच child understand करताना पूर्वापार आपले पालक आपल्याशी जसे वागत होते तसे न वागता आपल्या बालकाची मानसिकता, त्याच्या आवडी निवडी, मित्रपरिवार, आजचा प्रसार माध्यमांचा त्यांच्यावर होणारा आघात , जीवघेणी स्पर्धा,विभक्त कुटुंब पद्धती या सगळ्याच्या प्रभावतून आपले बाल्य आकार घेणार आहे याची जाणीव ठेवा. गुलाबाचे रोप कधी कळीने कसे उमलावे याचा विचार करत नाही. पण तरी फुलणारा गुलाब हा टवटवीत असतो अगदी तसेच आपला बालक नेहमी हसतमुख असावा यासाठी दक्ष रहा .हे बालपण परत नाही त्याला ते मनमुराद जगू द्या. संत तुकाराम एका अभंगात म्हणतात , लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा हे चुकीचे नाही. चला तर आपल्या बालका वरील अपेक्षांचा फास थोडा सैल करूया. नि एक नासमज बालक के समजदार पालक बनूया बरोबर ना ?हा लेख आपणास कसा वाटला ते नक्की कळवा.
बालकाला कसे समजून घ्यायचे कळले. तो आनंदी पाहिजे मग रोजच्या या दगदगीत आपल्याला देखील सुख हवय हो ना ! मग चला तर खालील लिंकवर क्लिक करताच सुख म्हणजे काय हे कळेल .मला खात्री आहे हा लेख नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आनेल.फक्त क्लिक करा सुख तुमच्या नजरेसमोर असेल ..
खूप छान सर
उत्तर द्याहटवाखुप महत्त्वाची माहिती दिली सर
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवा