Type Here to Get Search Results !

अध्यात्म व मानवी जीवन

 अध्यात्म आणि मानवी जीवन |मानवी जीवनात अध्यात्माचे महत्त्व |Importance of spirituality in human life

       मानवी जीवनात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे.जसे की मनशांती, ध्यान,उत्तम शरीर,आरोग्य  यामध्ये अशा अनेक बाबी येतात.आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे अध्यात्म आणि मानवी जीवन. यातून आपल्याला मानवी जीवनात अध्यात्म किती महत्त्वाचा आहे. हा विचार करताना  कोणत्या धर्माचे,पंथाचे लेबल लावू नये. राजकारण्यांनी धर्मावरून राजकारण केले खरे पण  ती  एक त्या त्या समूहाची , त्या त्या गटाची जगण्याची पद्धत होय आणि पुढे तिलाच जे नाव दिले गेले ते म्हणजे धर्म.धर्मात अनेक मर्यादा असतील .  हे सगळे खरे पण या सगळ्या भूमिकांमागे एक महत्वाचा  विचार आहे तो म्हणजे अखिल मानव जातीचे कल्याण .म्हणून तर प्रत्येकाला  आपला धर्म प्रिय असतो.आपला धर्म जरूर जपावा पण तो जपत  असताना आमचाच धर्म श्रेष्ठ ही कर्मकांडवादी भूमिका घेऊ नये.जनमानसात धर्म नसावा. तर आपण मूळ विषयाकडे वळूया  अध्यात्म  या शब्दाची व्याप्ती आणि विस्तार एवढा मोठा आहे की माझ्यासारख्या कुणालाही तो शब्दात मांडणे  अशक्यच.तरी हा लेखन प्रपंच वाचकांसाठी. मानवी जन्माचे मूळच मुळी अध्यातमात  उगम पावते. मानवाला त्याच्या अस्तित्वाची ओळख अध्यात्म समजून घेतल्याशिवाय होऊच शकत नाही असे माझे तरी स्पष्ट मत आहे. अध्यात्म हे कोणते वेगळे शास्त्र नसून सगळ्या शास्त्रांचा उगमच अध्यात्म शास्त्रातून होताना ठायी ठायी दिसून येतो.

     अध्यात्म शास्त्र हे  कोणत्याही जाती- धर्माशी निगडित नसून ते मानवी जीवनाशी अगदी खोलवर असे रुजलेले शास्र आहे.


अध्यात्म व्याख्या -

अध्यात्माची व्याख्या अनेक थोर पुरुष, साधू संत, महात्मे, लेखक, कवी यांनी आपापल्या अनुभव संपन्न ज्ञानाने वेगवेगळ्या शैलीत मांडले आहे. त्या सर्वांनी मांडलेल्या अध्यात्माच्या व्याख्येचा सार एकच आहे.


 ★तो म्हणजे स्वतः ला जाणणे म्हणजेच स्व चा शोध घेणे.


★ स्वतः चे अस्तित्व ओळखणे.


★ मी म्हणजे फक्त शरीर आहे कि माझ्यातला  'मी ' कुणीतरी वेगळा आहे हे शोधणे.


अध्यात्म आणि मानवी जीवन
अध्यात्म आणि मानवी जीवन


  माझ्यातल्या 'मी 'चे अस्तित्व फक्त जन्म घेतल्यापासून ते मृत्यू पर्यंत चे आहे कि त्यानंतर ही 'मी 'आहे याच्या शोधाचा खटाटोप म्हणजे अध्यात्म. एकदा कि मी म्हणजे फक्त शरीर नाही याचे ज्ञान मनुष्याला झाले कि' मी नेमका कोण ' माझे अस्तित्व नेमके कश्यासाठी अशी तळमळ त्याला लागते. आणि हे शोधण्याचा तो प्रयत्न करू लागतो आणि त्याची ती तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि त्या प्रयत्नात त्याला आधी ज्या ज्या थोर पुरुषांनी असा शोध घेऊन स्वतः च्या स्व ची ओळख करून घेतली आहे त्यांच्या अनुभवाची मोलाची मदत होते. त्या थोर पुरुषांनी स्व स्वरूप जाणण्यासाठी जे काही मार्ग अवलंबले किंवा जे जीवनात बदल करून घेतले. किंवा जे काही आचरण केले त्या सर्व गोष्टींचा  समावेश अध्यात्मात होतो.


मानवाला अध्यात्मची गरज का आहे?


1. दुःखाचा सामना करण्यासाठी : 

                  मनुष्य जन्मापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करत असतो पण काहीवेळा त्याला मोठ मोठया संकटाना तोंड द्यावे लागते.  तर कधी काही अनपेक्षित दुःखाला सामोरे जावे लागते. आणि या दुःखात जर तो स्वतः ला सावरू शकला तर ठीक नाहीतर या दुःखातून सावरण्यासाठी कधी कधी चुकीच्या मार्गांवर जाण्याची संभावना जास्त असते. काही जण तर स्वतः ला इतके व्यसनांच्या  हवाली करून टाकतात. की त्यामुळे दुःख तर कमी होत नाही परंतु आणखीनच वाढते. आणि त्यावर अवलंबून असलेली बाकीची मंडळी कोलमडून पडतात. त्यांच्यावर नाहक आणखी दुःख भोगण्याची वेळ येते.यात आधार अध्यात्म देते. हे ही दिवस जातील असे वाटते. 


2.सकारात्मकता येण्यासाठी : positive thinking 

         मनुष्य जर आध्यत्मिक मार्गाचा असेल तर तो असा विचार करतो की आपल्यावर आलेले दुःख किंवा संकट हे आपल्याला घडवण्यासाठी आहे. भगवंत आपली परीक्षा घेत आहे. आणि  भगवंत आपल्यासाठी जे काही करेल ते चांगलेच असेल.असं मानले तर तो मनुष्य शांत होतो आणि यातून मार्ग कसा शोधावा यासाठी प्रयत्न करतो. नवनवीन संधी शोधतो.किमान दुःखाचे टेन्शन घेऊन आजरांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते. थोडक्यात तो सकारात्मक बनतो. 


3. मनशांती :  mind peace 

        पूर्वी प्रत्येक गावी मंदिराच्या ठिकाणी भजन कीर्तन या गोष्टी रोजच्या रोज असत. त्यातून सकाळपासून थकल्या भागलेल्या जीवाला या भजन कीर्तनातून मनःशांती मिळत असे. आणि शरीर आणि मन पुन्हा ताजेतवाने होऊन मन प्रसन्न होत असे. शहरात सुद्धा मंदिरांच्या ठिकाणी नामसप्ताह , सप्ता, काल्याचे कीर्तन  किंवा नवरात्री उत्सवात  भजन कीर्तन , गणपती उत्सवातील भजन, आरत्या या  अध्यात्मिक गोष्टी आजही चाललेल्या दिसतात.  या सगळ्यांमधून मनाला शांती मिळते. 


4. आनंद मिळावा म्हणून : 

                     आनंदाच्या लहरी निर्माण होतात. आपल्याला या गोष्टी कळत नाहीत पण मनावर त्याचे परिणाम प्रत्येकाला जाणवत नक्कीच असतील मग ती व्यक्ती आस्तिक असो किंवा नास्तिक.भजन ऐकताना मन आपोआप प्रसन्न होते. थोडक्यात अध्यात्म आनंद देते. 


5.गुन्हेगारी प्रवृत्तीला  अटकाव : help stop crime 

                     अलीकडे या बाबी हळूहळू  कमी होऊ लागल्या आणि त्यामुळे नकळतच त्याचा परिणाम सुद्धा समाजावर दिसू लागला. रोजचे वर्तमानपत्र पाहिले किंवा crime pertol पाहिले की त्यातील भीषणता आपल्याला जाणवून येतेच. आणि म्हणूनच लहानपासून मोठ्यांपर्यत प्रत्येकाला अध्यात्माची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती जी सुज्ञ आहे तिला अध्यात्माची नितांत गरज लक्षात येतेय आणि कायतरी करायला हवंय हे प्रत्येकाला जाणवतंय कारण आपल्यासमोर पिढीच्या पिढी बिघडताना आपल्याला दिसतेय.


6.नव्या पिढीवर संस्कार होण्यासाठी : moral education 

  छोट्या छोट्या गोष्टीतून आध्यात्मिक संस्कार मनावर ठसवले जात होते जसे मोठ्यांच्या पाया पडणे, वडिलधाऱ्यांचा मान राखणे, सायंकाळी दिवाबत्ती च्या वेळी शुभम करोति आणि मनाचे श्लोक बोलणे  उपवासाच्या काळात आरती,भजन या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे आपल्यावर संस्कार नकळतपणे घडले आहेत.पण या गोष्टी विज्ञान आणि प्रगती यांच्या नावाखाली आपण विसरून गेलो आहोत. पण आता याच गोष्टींची आपल्याला आवश्यकता भासू लागली आहे. म्हणून मुलांवर आणि खरंतर आधी स्वतः वर हे संस्कार बिंबवले जायला हवेत कारण मुलं तर अनुकरणप्रिय असतात.


7. समाजसेवेची आवड :  intrest social work 

    अध्यात्मतातील  शिकवण ही समाजसेवेची आवड निर्माण करते.जसे की मानवसेवा ही ईश्वरसेवा  .नकळत सर्व धर्म,पंथ हीच शिकवण देतात.त्यामुळे समाजसेवेची आवड निर्माण होते.


8. मीपणा कमी : less ego 

      मीपणा म्हणजे काय तर आज ज्याला अहंकार म्हणतो ,अध्यात्म आहे तितुके देवाचे.या विचार धारेवर अध्यात्म चालत असते.मीपणातून माणसाला अध्यात्म बाहेर काढते. अमुक एखादी चांगली  बाब घडली तर मीच केली . असे आध्यात्मिक व्यक्ती म्हणत नाही. व्यक्ती नम्र ,ज्ञानी बनवण्याची ताकद या अध्यात्मात आहे. 


९. उत्तम कर्म : good work / karma 

    आध्यात्मिक माणूस माझे कर्म कोणीतरी पाहत आहे. या भूमिकेतून वागत असतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कर्म घडत नाहीत. जरी घडली तरी त्याच्या चुकीची कबुली तो देत असतो. व हळूहळू आपले वागणे कोणाला त्रास देणारे नसेल यासाठी तो दक्ष असतो. 


   काही विज्ञाननिष्ट मंडलिना , नास्तिक मंडळीना अध्यात्म थोतांड वाटत असेल वाटू शकते. असे असले तरी ज्यामुळे माझा अहंकार कमी होतो,मीपणा निघून जातो. माझ्या हातून वाईट काही घडू नये,मी लबाडी करू नये,कोणाला फसवू नये या बाबी मला अध्यात्म देत असेल तर का मी याचा स्वीकार करू नयेअसे मला वाटते. थोडक्यात काय कोणताही धर्म पंथ असो त्याने आपण वागावे कसे, बोलावे कसे  या बाबतची आपपली आचारसंहिता म्हणजे अध्यात्म. मग तिला कोणत्या  ग्रंथाचा आधार आहे हे महत्वाचे नाही. तर माणूस ज्यातून चांगला बणण्याचा प्रयत्न करतो तो व्यापक विचार म्हणजे अध्यात्म. आपण कोणत्या गोष्टीकडे कसे पाहतो यावर बरेच अवलंबून असते म्हणून आपले मन व्यापक करूया . जे जे चांगले आहे त्या सगल्याचे स्वगत करूया त्याचा स्वीकार करूया. चला तर पुन्हा भेटुया एका नवीन विष्यासाह. 


आमचे अप्रतिम लेख 

शिक्षण नेमके कशासाठी घ्यावे  

सुख म्हणजे काय 

आर्थिक साक्षरता काळाची गरज 

आर्थिक नियोजन व काटकसर  

सामान्य माणूस आणि शेअर मार्केट  

बालकाला समजून घेताना  

कोरोना काळातील शाळेचे आत्मकथन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area