Type Here to Get Search Results !

पैसा म्हणजे सर्व नाही पण खेदाची बाब ही पैशा शिवाय काहीच नाही money

 पैसाच झाला मोठा........ paisaa mhnje sukh nahi 

       जीवन जगत असताना आपल्याला वेवेगळे अनुभव येत असतात. कधी ते सुखकारक असतात कधी क्लेशकारक तर कधी अगदी मनाला खळखळून हसवणारे असतात. तर काही दुखही अशी असतात  की ती आपण कुणापुढेच व्यक्त करत नाही.  या दुखाच्या मुळाशी काय आहे तर आपल्या अपेक्षा . या अपेक्षाच आपल्याला छळत असतात. माझ्या सोबत आहेत त्यांनी माझ्याशी नीट वागावे ही चुकीची अपेक्षा थोडीच आहे . या मनीचे त्या मनी कधी जातच नाही. माणूस जगाला समजून घेतो पण आपल्या जवळच्या व्यक्तीला तो समजून घ्यायला कमी पडतो किंवा तसा प्रयत्न पण त्याचा दिसत नाही. 

पैसा म्हणजे सर्व काही पैश्याशिवाय काही नाही
पैसा म्हणजे सर्व काही पैश्याशिवाय काही नाही

         ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, या ओळी फक्त कवितेतच शोभुन दिसतील आणि पैशाला कोंबडीही खात नाही ही म्हण सुद्धा कालबाह्य ठरायला लागली आहे.आजच्या युगात पैशाचं महत्व आज सर्वाना कळले आहे नव्हे  तर ते  वाढलंआहे.नात्यागोत्यापेक्षा,आप्तस्वकीयांपेक्षा,माणुसकी भावना यांच्यापेक्षा प्रत्येकाला पैसाच मोठा वाटू  लागला आहे.पैशापुढे आता नाती,प्रेम,जिव्हाळा,भावना या गोष्टी खुज्या आणि अल्पमोली भासत आहे. पैसा जपुन वापर त्याची उधळपट्टी करू नको हे थोरा मोठ्यांचे बोल आता तरूणांच्या दृष्टीने आत्मसात करण्याचे दिवस जाऊन जमाना झाला  आहे.माणूस पैशाचा गुलाम झाला आहे.आणि पैशापुढे मानवाला कश्याचे भान राहिले नाही .  नितीमुल्ये कसपटाप्रमाणे भासत आहेत .पैसा मनुष्याला त्याच्या तालावर नाचवतो आणि मनुष्य मदाऱ्याच्या खेळातल्या माकडाप्रमाणे त्याच्या तालावर नाचतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आजच्या काळात फक्त पैसा बोलतो अन माणसे ऐकतात त्याच्यापुढे लाचार होऊन झुकतात.ह्ल्ली माणसाची माणसाशी बांधिलकी नसुन पैशाशी असते.लाख करोड अब्ज हे शब्द आज एकायला उच्चारायला काहीच वाटत नाही.एवढे पैसे तर आज भ्रष्ट मार्गाने कमवता येतात.        आपल्याला आपल्या जीवनातील शैक्षणिक दिवस खूप आवडत असतात. ते आज सांसारिक जीवनात अडकल्यावर तर खूप आठवतात. ते दिवस ते मित्र आज पुन्हा भेटावेत . त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारता याव्यात. त्यांचे विचार ऐकायला मिळावेत. आज ते मित्र मंडळी चाळिशीच्या टप्प्यावर काय करत असतील ,त्यांच्या विचारांची पक्वता काय असेल.अशा अनेक बाबी आपं miss करत असतो या whats app ,फेसबूक मुळे माणसे आजही एकमेकाना जोडून असतात. माझ्या मित्र परिवारातील बी एड करत असतानाचा एक मित्र सतीश वाळके. अतिशय हुशार साहित्याची आवड असलेला व आज lic मध्ये एका उच्च पदावर असून अनेक प्रतिष्ठित लोकात त्याचे उठणे बसने असते. सांगण्याचा मुद्दा असा की आज देखील त्याच्यातील लेखक ,विचारवंत ,कवी त्याने जागा ठेवला आहे. माझा आर्थिक नियोजनवरील लेख वाचून पैसा म्हणजे काय ? तर सगळ काही का? यावर त्याचे लेखन त्याने मला पाठवले नि कळले . की त्याचे विचार किती ग्रेट आहेत . माझ्या ग्रेट मित्राचे अनमोल शब्द पैसाच झाला मोठा खास वाचकांसाठी . आवडेल ना वाचायला तर सतीश काय म्हणतो पाहूया त्याच्याच लेखणीतून -

                             एखादं नादान पोर हे शब्द सहज उच्चारत ये रे येरे पावसा पैसा झाला मोठा   हे शब्द इतके परवलीचे झाले आहेत की आपण त्या पावसालाही विकत घेऊ शकतो आणि त्याला खोटही ठरवु शकतो.  इतकी पैशाच ऐपत आहे.पुर्वीच्या काळी उठता बसता परमेश्वराचे नाव तोंडी असायचे आता मात्र सकाळी उठल्यापासुन तेरात्री झोपेपर्यंत मानव पैसा सोडुन कशाचाच विचार करत नाही.पैसा कसा आणि किती मिळवायचा याच विचारचक्रात तो गुरफटलेला असतो.पैसा,प्रसिद्धी,प्रतिष्ठा या त्रिकुटांनी समाज मनावरअतिक्रमण केले आहे.

                     पुर्वीच्या काळी वस्तुच्या बदल्यात वस्तु अशी वस्तुविनिमय पद्धत प्रचलित होती.कालौघात ही पद्धत नष्ट होवुन त्याची जागा पैशांनं घेतली आणि पैशाची हुकुमत सुरू झाली.बघता बघता पैसा संपुर्ण मानवाच्या गळ्यातला ताईत होवुन बसला.पैसा कमावण्याच्या हव्यासापायी संपुर्ण समाजमन ढवळुन निघाल आहे.आज आपण ज्याही काही कृती करतो त्या केवळ पैशाच्या जोरावर चाललेल आहे.कारण पैशामुळेच आर्थिक देवाण घेवाण सुरूझाली.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापाराची पहाट झाली आणि प्रत्येकाला प्रगतीचे साधन मिळाले.त्यातुनच द्वेष,स्पर्धा आणी चढओढ यांनी जन्म घेतला.ही चडाओढ प्रचंड वाढली आहे. अजून वाढणार .  मिळेत त्या पद्धतीने आणी जमेल त्या मार्गाने प्रत्येकजण पैशाच्या मागे लागला आहे.आणि माणुसकी नसलेल्या वाळंटात प्रत्येक जण स्वप्नसुख  विकत घेण्याचे स्वप्न  पाहत आहे.

                          पैशापुढे माणसाने नात्यांना  तिलांजली दिली आहे.हे एक विदारक सत्य आहे.पुर्वीच्या काळात माणुसकीच्या जोरावर लहान मोठेपमा ठरववला जात पण आजचा मापदंड बदललेला आहे.पैसा सर्वेसर्वा होवू न बसला आहे.पैसा ही परमोच्च सुखाची गुरूकिल्ली आणि सर्वाच्या दुखावरचा रामबाण उपाय असा समज निर्माण झाला आह.पैशाचं अवडबंर एवढं माजल आहे की लोक पैशासाठी आणि पैसा मिळविण्यासाठी अनेक भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करू लागले आहे.याच पैशापायी मानवाने निती,चारित्र्य शील यांचा सौदा करून मोकळा झालाआहे.प्रत्येकालाच जीवन पैशावर अवलंबुन झाल आहे.एक प्रकारे आपणाला पैशाला शरण जाण्यावाचुन कुठलाही मार्ग उरलेला नाही.संत महात्म्यांनी सांगितलेली महत्तम मुल्ये आणि तत्वे यांनी आपल्या तलवारी संपत्तीपुढे म्यान केल्याआहे.थोडक्यात काय तर पैसा हे साधन न राहता अंतिम साध्य ठरले आहे असे म्हणावे लागत आहे.   सोने,चांदी,दागदागिने,नोटा,नाणी यांच्या  रूपात पैशाची असंख्य रूपे निर्माण झाली आहे.याच्या जोरावर मानवाने सर्व प्रकारची भौतिक सुखे विकत घेण्याचा प्रयन्त केला नव्हे तर ती विकत घेऊ शकलो नाही.

                अलिशानघर घेतले परंतु त्यात राहणारे माणसे आणि त्यांच्या प्रेमातील ओलावा विकत घेऊ शकलो नाही.भौतिक सुख तर भरपुर मिळवली परंतु भावनिक सुखाला आपण पारखे झालो.पैशाच्या भाऊगर्दीत आपण आपली नितीमुल्ये हरवुन बसलो,असो,कितीही उपदेशाचे डोस पाजले तरी जनांच्या मानसिकतेत बदल होणे शक्य नाही.आणि कुणालाच पैशाचं महत्व झुगारून चालणार नाही.पैशाच्या जोरावर आज सगळ काही विकत घेता येते.सर्व प्रकारची भौतिक सुखे मानवी पायाशी लोळण घेतात.आजच जग हे व्यवहारी आहे.आणि या व्यवहारी जगात पैशाचं मोल अनमोल आहे.पैशाला आपण कितीही नाव ठेवली तरी पैशामुळेच व्यक्ती उद्यमशील बनली आहे.पैसा हा हवाच पैसा महत्वाचा आहे.पण तो किती ?आपल्या किमान गरजा पुऱ्या करण्याइतपतच गरजा कधीच संपत नाही.उलट त्या हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढतच जातात.त्यागरजा पुर्ण करण्यासाठी मृगजळाप्रमाणे आपण त्यामागे धावतो थकुन-भागुन जातो.तरी धावतच राहतो पण पैशाचा नाद काही सोडत नाही.पैशाला सर्वच बाजुंनी वाईट म्हणणे योग्य ठरणारनाही.संपत्तीच्या विकासाशी आणि मानवी समाजाच्या उत्क्रांतीशी आहे.आजच्या जगात पैशापेक्षा कुणीच मोठा नाही आणि पैशाला पर्यायही नाही.”पैसा वाईटआहे”असे  म्हणणार नाही तर पैसा सर्व दु :खाचे मुळ आहे. तरीही आजच्या युगात पैसाच मोठा आहे. 

                            हे त्याचे विचार खूप पटले भावले देखील पण खूप खोलात गेल्यावर पैशा शिवाय अलीकडे पान तरी हलते का कुणाचे हे पण तितकेच खरे आहे.म्हणून तर सामान्य माणसाने काटकसरीचे महत्व जाणून . गरज आहे त्या बाबिसाठी जरूर खर्च करावा पण आपला वायपट जाणारा पैसा, व्यसनावर जाणारा पैसा ,एखाद्या छंदावर जाणारा पैसा तो जातच आहे असे समजून तो पैसा ज्याला पैशाचा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही अश्या sher market मध्ये गुंतवायला काय हरकत आहे. एकदा हे सगळे अंगवळणी पडले की मग मात्र या कटकसरीत किती ताकद आहे व वाचवलेली पै पै अजून पैसा कशी वाढवते ते बोलून उपयोग नाही तर त्याची सुरुवात करायला हवी. मी केलीय जे मित्र भेटतील त्याना देखील सांगतोय. बचत होईल शिवाय नको त्या आरोगयास घातक सवयी मोडल्या जटिल हे ही नसे थोडके. तर सतीश ने आम्हाला lic बद्दल देखील माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घालावी अशी विनंती केली आहे. तर पुन्हा भेटूया नवीन  विषयसाह  ------------------आपल्याकडे देखील असे लोकाना सांगण्यासारखे नक्की असेल तर विचार करत बसू नका लेखनी हातात घ्या व  नक्की पाठवा. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area