मराठी पाठ्यपुस्तक दहावी पाठ परिचय | Dahavi Path Parichay
आजच्या लेखात मराठी पाठ्यपुस्तक दहावी पाठ परिचय करुण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या कोरोना काळातील शिक्षणाचा प्रवास जरा वेगळाच आहे ना? हा कोरोना आला त्यावेळी तुम्ही इयता सातवी मध्ये शिकत होतात.कोरोना हा इतका भयावह होता की शासनाने Lokdowon केले व शाळा तर सोडा घरातून बाहेर पडणे मुश्किलीचे झाले. सहाजिकच सातवीची वार्षिक परीक्षा न देताच तुम्ही वरच्या वर्गात गेले. आठवीवीला आल्यावर शाळा सुरू होत्या, त्या पण सर्व काही ऑनलाइन.ऑनलाइन शिक्षनात सुरुवातीला उत्सुकता वाटत होती पण ती देखील काहीनाच. परीक्षा झाल्या त्या पण ऑनलाइनच. काही परीक्षा न देता नववीला आले. नववीला आल्यानंतर आपण जी शाळा पहिली नाही, शिक्षक पहिले नाहीत त्यांची ऑनलाइन भेट झाली मात्र हे सगळे काही आभासी.
कालांतराने लसीकरण वगेरे होऊ लागले व साधारण ऑक्टोबर पासून आपली शाळा पुन्हा सुरू झाली. थोडे रुग्ण वाढले की परत काही दिवसातच बंद झाली. आता मात्र नियमित वर्ग सुरू आहेत. या दोन वर्षात म्हणावे तसे शिक्षण आपल्याला भेटलेच नाही. पण आताचे वर्ष दहावीचे वर्ष . अस म्हणतात दहावी हा माणसाच्या जीवनाचा पाया असतो . जर आपली स्वप्न मोठी असतील तर आपल्याला सुरुवातीपासून मेहनत घ्यावी लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून दक्ष राहून अभ्यास करावा लागेल. तर आणि तरच आपली प्रगती होईल.
मी आज आपल्या मराठी पाठ्यपुस्तकाचा परिचय आपल्याला करुण देणार आहे. आणि हो नववीला किंवा त्या अगोदरच्या इयत्तात आपण दिवाळी पर्यन्त सत्र परीक्षा द्यायचो व त्यासाठी अर्धा अभ्यासक्रम असायचा . व दिवाळीनंतर उरलेला अर्धा पण दहावीला असे नाही पूर्ण पाठ्यपुस्तक आपल्याला अभ्यासावे लागणार आहे. तर आपण पाठ्यपुस्तकाची व त्यातील घटकांची माहिती तीन विभागात पाहणार आहोत.
घटक (toc)
अ. गद्य विभाग : धडे
आ. पद्य विभाग : कविता
इ. स्थूलवाचन
आ. पद्य विभाग : कविता
इ. स्थूलवाचन
या तिन्ही घटकातील पहिला भाग पाठ यामध्ये आपल्याला कोणकोणते पाठ आहेत व कोणत्या पाठाचा लेखक कवी कोण आहे? व त्या पाठातून काय आशय मांडला आहे. आपल्या जीवनात त्यातून काय शोध बोध घ्यायचा आहे हे पाहणार आहोत. जेणेकरून आपला दहावीचा अभ्यासक्रम नववी पेक्षा किती छान आहे हे यातून आपल्याला समजेल.
अ. गद्य विभाग : धडे
या गद्य विभागत आपल्याला खालील पाठ किंवा धडे अभ्यास करावयाचा आहे.बाकी दोन विभाग पुढील लेखात अभ्यासू.
१. बोलतो मराठी | Bolto Marathi
बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका नीलिमा गुंडी आहेत. या पाठात मराठी भाषेतील काही शब्दप्रयोग कसे विनोद निर्माण करतात ते अनेक उदाहरणातून पटवून दिले आहे. थोडक्यात आपली मातृभाषा व तिचा स्वाभिमान आपल्याला हवा. असाच संदेश या पाठातून दिला आहे.
२. आजी कुटुंबाच आगळ | Aji Kutumbache Aagal
या पाठाचे लेखक महेंद्र कदम असून त्यांच्या आगळ या कादंबरीतून हा पाठ घेण्यात आला आहे.या पाठातील आजी आपल्या परिवाराला कशी शिस्त लावते. त्याचबरोबर मुलांवर संस्कार कशी करते याची माहिती दिली आहे. आजकाल वृद्ध लोकांची उपेक्षा होते ती थांबली पाहिजे. त्याच हेतूने हा पाठ दहावी ला घेण्यात आला आहे..
३.वसंतऋदय चैत्र | Vasant Ruday Chaitra
हा पाठ ऋतुचक्र या ललित संग्रहतून घेण्यात आला आहे या पाठाच्या लेखिका दुर्गा भागवत आहेत. या पाठत त्यांनी वसंत ऋतुत चैत्र महिन्यात जे निसरागात बदल होतात. झाडांची पाने,फुले यांची माहिती दिली आहे . निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षनाची भावना वाढीस लागण्यासाठी हा पाठ अभ्यासक्रमात देण्यात आला. आहे.
४. गवताचे पाते | Gvatache Pate
हा पाठ कथेचा एक वेगळा प्रकार रुपक कथा होय. हा रुपककथा हा साहित्यप्रकार मराठी कथेत आणला तो वि . स. खांडेकर यांनी . त्यांनी या कथेत झाडावरून पडणारे पान व गवताचे पाते यांच्या रुपकातून म्हणजेच उदाहरणातून मानवी स्वभाववर भाष्य केले आहे. दोन पिढ्यातील अंतर त्यांनी दाखवून दिले आहे. जीवनात खूप मोठा संदेश ही रुपककथा देताना दिसत आहे.
५. वाट पाहताना | Vaat Pahtana
या पाठच्या लेखिका अरुणा ढेरे आहेत. या पाठतून त्यांनी अनेक उदहरणांच्या माध्यमातून वाट पाहण्यात किती आनंद असतो जसे की तुम्ही नववीत असताना दहावीत कधी जाणार याची वाट पहिली असेल. वाढदिवस जवळ आला तर त्याची वाट पहिली असेल. अशी अनेक उदाहरणे देऊन वाट पाहणे म्हणजेच धीर धरण्याचे महत्व लेखिका सांगत आहेत. आजची पिढी अभी के अभी असे म्हणते ते कसे चुकीचे हा संदेशच जणू हा पाठ देत आहे.
६. आपांचे पत्र | Aapanche Patra
चला हवा येऊ द्या या मालिकेत पोस्टमन जी पत्रे लिहितो. ती पत्रे जे लेखक लिहितात त्या अरविन्द जगताप यांचा हा पाठ आहे. या पाठात आपांच्या पत्रातून त्यांनी त्यांनी एक शिपाई म्हणून मुलांशी संवाद साधला आहे . यात कोणतेही काम लहान मोठे नसते हे सांगणारी श्रमप्रतिष्ठा या पाठातून सांगितली आहे. व कोणत्याही क्षेत्रात जा प्रमाणिकपणा किती गरजेचा आहे हे या पाठातून पटवून दिले आहे. अप्पा शिपाई असून आपले काम किती प्रमाणिकपणे करतात ते या पाठातून सांगितले. आहे.
७. गोष्ट अरुणीमाची | Gosht Arunimachi
या पाठाच्या लेखिका सुप्रिया खोत आहेत. या पाठातून त्यांनी अरुणिमा ची एक सत्य कहाणी वाचकसमोर मांडली आहे. एका खेळडू असलेल्या मुलीला चोरांशी मुकाबला करताना रेल्वे अपघात होतो. या अपघातात पाय जातात. पण तरी तिने एवरेस्ट शिखर कसे पार केले याची माहिती ती ही वास्तव माहिती या पाठतून देण्यात आली आहे. थोडक्यात जिद्द याचे ज्वलंत उदाहरण आरुणीमा कशी ते या पाठात सांगितले आहे. थोडक्यात जीवनात यशस्वी व्हायचे तर प्रयत्न करावेच लागतील हाच संदेश या पाठतून देण्यात आला. आहे.
८.कर्ते सुधारक कर्वे | Karte Sudhark Karve
या पाठाचे लेखक शिरीष देशपांडे आहेत. या पाठात लेखकाने महर्षि कर्वे यांच्या जीवनाचा परिचय करून दिलेला आहे. महिलांसाठी पहिले महाविद्यालय त्यांनी कसे काढले याची माहिती या पाठात देण्यात आली आहे. आपण जे बोललो तसे वागले पाहिजे हा संदेशच या पाठातून देण्यात आला आहे.
९. काळे केस | Kale Kes
या पाठाचे लेखक ना. सि. फडके आहेत. हा त्यांचा एक लघुनिबंध आहे. यातून त्यांनी लेखकाच्या काळ्या केसांची माहिती देऊन त्यातून घडणारे विनोद या पाठात सांगितले आहेत.या पाठाची शैली अतिशय सोपी आहे . लेखकाच्या काळ्या केसांबबत ची माहिती या पाठातून देण्यात आली आहे.
९. सोनाली | Sonali
डॉक्टर वा. ग. पूर्णपात्रे यांचा स्व अनुभव म्हणजे सोनाली पाठ. यातील माहिती खरी आहे. सिंह व कुत्र्याचे पिल्लू हे एकत्र वाढण्याचे अनुभव यात मांडले आहे. भूतदयेची शिकवण या पाठात देण्यात आली आहे.
९. निर्णय | Nirnay
या पाठाचे लेखक डॉक्टर सुनील विभूते आहेत.ही एक विज्ञानकथा असून मानव व निसर्ग मानव यातील फरक खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. किती robot आले तरी मानवी विचार व आचार यात बऱ्याच फरक पडेल.मानवाचे महत्व सांगणारा हा पाठ आहे.
१०. सर्व विश्वचि व्हावे सुखी | Sarv Vishvchi Sukhi Vhave
या पाठाचे लेखक डॉक्टर यशवंत पाटील आहेत. माणसे जवळजवळ राह्यला आली की संपूर्णं विश्व सुखी होईल. माणूस मनाने जवळ आला पाहिजे. तरच विश्व सुखी होईल. अशी मांडणी लेखक करत आहेत.संत कबीर,संत गाडगेबाबा, संत तुकाराम,संत रामदास अशा अनेक संतांचा परिचय व त्यांचे विचार या पाठातून सांगितलले आहेत .
अशा पद्धतीने गद्य विभागात १० पाठांचा अभ्यास करावयाचा आहे. गद्य विभागावर दोन उतारे बोर्ड परीक्षेस येतात. व एक पुस्तकाबाहेरच असतो. त्याला अपठीत म्हणतात. तिसरा उतारा हा unseen किंवा पुस्तका बाहेरचा असतो. थोडक्यात आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील पाठातून काय शिकायचे आहे त्या पाठाचे लेखक यांची ओळख करून घेतली आहे. नंतरच्या लेखात पद्य व स्थूलवाचन यांचा अभ्यास करूया.(निळ्या अक्षरांवर क्लिक करा.)
आपल्याला यापुढेही अशीच माहिती मिळत राहणार आहे. ही माहिती तात्काळ मिळण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फॉलो करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून दहावी संपूर्ण मार्गदर्शन हा wtp ग्रुप आवश्य जॉइन करा.