Type Here to Get Search Results !

दहावी मराठी पुस्तक परिचय पद्य व स्थूलवाचन | Dahavi Stulvachan

दहावी मराठी पुस्तक परिचय पद्य व स्थूलवाचन  विभाग | kavita v      Sthulvachan 

       मागील लेखात आपण गद्य विभागात कोणते पाठ आहेत व त्यातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे म्हणजेच पाठ परिचय पहिला.आज आपण पद्य विभाग म्हणजेच कवितांचा व स्थूलवाचंन यांचा  अभ्यास करणार आहोत.
पद्य व स्थुपवाचन
पद्य व स्थूलवाचन 

        कविता (toc)

अ . कविता | Kavita 

                  कविता हा पाठ्यपुस्तकातील काहीना अतिशय आवडीचा पण काहीना मात्र तो कंटाळवाणा वाटतो तर हा घटक सोपा जावा यासाठी कविता वारंवार वाचल्या पाहिजेत त्या तालासुरात गायला हव्यात. कवितेतील कठीण शब्दार्थ तोंडपाठ केल्यास ती कविता आपल्याला समजायला मदत होईल. यातील कवितेवरीळ कृतींची तयारी सुरुवातीपासून केल्यास आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात.तर दहावी मध्ये आपल्याला कोणत्या कविता अभ्यासायच्या आहेत त्यांची माहिती पुढीलप्रमाणे  

१.जय जय भारत देश | Jay Jay Bhart Desha 

                      ही कविता म्हणजे मंगेश पाडगावकर यांचे एक गाजलेले गीत आहे. या गीतात त्यांनीदेशभक्तीचे महत्व पटवून दिले आहे. देशभक्ती व विविधतेत असणारी एकता या गीतात वर्णन केली आहे. आणि हो हे गीत म्हणजे कविता फक्त गायनासाठी आहे परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. 

२. उत्तमलक्षण | Uttam Lakshnn 

                    ही कविता संत रामदास यांची आहे. या ओव्या त्यांच्या दासबोध या ग्रंथातून घेण्यात आल्या आहेत. संत रामदास यांनी या कवितेत काय करावे ? व काय करू नये याची उत्तम मांडणी केलेली आहे. थोडक्यात उत्तम माणसाजवळ कोणते गुण असावे याची माहिती देणारी व जीवनात कामी पडेल असा खूप मोठा संदेश या कवितेत देण्यात आलेला आहे. 

३. वस्तु | Vastu 

                वस्तु या कवितेचे कवी द. भा. धामणस्कर  आहेत. या कवितेत माणूस व निर्जीव वस्तु यांचा जो बंध असतो तो या कवितेत मांडला आहे. त्यांच्यामते माणसाप्रमाणे वसतुणा देखील मानाची वागणूक मिळायला हवी. त्यांचा आदर व्हायला हवा. असा संदेशच ही कविता देत आहे. थोडक्यात समाजात वावरत असताना पण आपण सगळ्यांचा आदर केला पाहिजे हाच संदेश वस्तूच्या उदाहरणातून द्यायचा आहे असे मला वाटते. 

४. आश्वासक चित्र | Aashvask chitra 

                 या कवितेच्या कवयित्री नीरजा आहेत. या कवितेतून त्यांना अपेक्षित अशी स्त्री पुरुष समानता या कवितेत मंडळी आहे. कवयित्री म्हणतात समाजात वावरत असताना किंवा घरात अमुक कामे फक्त स्त्रीनेच करावीत हे त्याना मान्य नाही त्या म्हणतात अशी समानता हवइ की कोणत्याच पातळीवर इथे भेद नसेल . अशा आश्वासक चित्राची मांडणी त्यांनी केली आहे. 

५. खोद आणखी थोडेसे | Khod Aankhi Thodese  

                    ही कविता आसावरी काकडे यांची असून या कवितेतून त्यांनी जीवनात प्रयत्न किती गरजेचे आहेत तसेच प्रयत्न करताना कधी थांबू नये त्यांच्या मते अजून थोडे प्रयत्न बाकी असतात. व आपण हात पाय गाळतो असे करू नये. असा आशावाद य अकवितेतून मांडला आहे. 

६. आकाशी झेप घे रे | Akashi Zep Ghe Re 

                     ही कविता जगदीश खेबुडकर यांची असून या कवितेत पक्षाच्या उदहरणातून खूप मोठा संदेश कवी आपल्याला देताना दिसत आहेत. कवी म्हणतता इतरांवर अवलंबून राहणे माणसाने सोडायला हवे. आपल्याजवलील क्षमता जाणून घ्यायला हव्यात . थोडक्यात आत्मविश्वासाचे महत्व सांगणारी ही कविता आहे. 

७ . तू झालास मुक समाजाचा नायक |Tu  Zalas Muk Samajacha Nayak  

                      ज. वि . पवार यांची ही कविता असून या कवितेतून आंबेडकरणी जो चवदार तळ्याचे  पाणी दलित वर्गाला मिळावे यासाठी जो सत्याग्रह केला याची माहिती देताना आजचे आंबेडकरांचे अनुयायी पूर्वीसारखे पेटून उठत नाहीत . आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत नाहीत. असा आरोप कवी करत आहेत . थोडक्यात दलित चळवळ अलीकडे थंडावली आहे असेच त्यांना म्हणायचे आहे. पण असे होऊन चालणार नाही असे ते या कवितेतून संगत आहेत. 

८. भरतवाक्य | Bhratvakya 

                      ही कविता मोरोपंत यांची आहे. या कवितेत सज्जन माणसाच्या संगतीचे महत्त्व सांगताना दिसत आहेत. लोभाला बळी पडून आपला भक्तिमार्ग सोडू नये असा सल्ला ते या कवितेतून देत आहे. 

स्थूलवाचन | Sthulvachan 

                             या विभागात आपल्याला चार पाठ पहायचे आहेत. परीक्षेत या स्थूल वाचनावर  ६ गुणांचा प्रश्न विचारला जातो. आपल्याला जी स्थूल वाचने अभ्यासाययाची आहेत त्यांची थोडक्यात माहिती पाहूया 

१. बाल साहित्यिका गिरिजा कीर | Bal Sahitiyika Girija Kir 

                      या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड आहेत.. या पाठातूनलेखिकेने गिरिजा कीर यांच्या साहित्याची माहिती व जमेच्या बाजू मांडलेल्या आहेत. थोडक्यात कोण लेखकाचे साहित्य कसे आहे? ते आस्वाद घेतल्यावर सांगता यायला हवे असेच विजया  वाड सांगताना दिसत आहेत. 

२. मणक्या पेरेन लागा | Mankya Peren Laga 

                     ही कविता वीरा राठोड यांची असून ती बनजारा बोलीतील आहे. एका बि च्या उदहरणातून माणुसकी जीवनात किती गर्जेचीब आहे याची माहिती या कवितेत शब्दबद्ध केली आहे. मांसाटली माणुसकी हरवत चाली आहे ही मोठी चिंतेची बाब आहे असे कवी म्हणत आहेत. 

३. वीरांगना Verangnaa 

                      या स्थूलवाचनातून स्वाती महाडीक यांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे. एक विधवा स्त्री पती निधनानंतर स्वत सैनिक बनून देशाची सेवा करते. तर रेखा मिश्रा रेल्वे पोलिस दलात काम करत्व करत संजीक बांधिलकी कशी जपत आहेत याची माहिती या पंथात दिली आहे. देशबकटी व समाजसेवा असे दोन्ही संदेश या दोन उदहरणातून वाचकाकपुढे मांडेलेले आहेत.  

   या घटकाची तयारी कशी करावी. 

१.पाठाखालील प्रश्न  | Patha Khalil Prashan   

                    या घटकात तुम्हाला जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्ही स्थूलवाचणं घटकाखाली जे प्रश्न दिले आहेत त्या घटकाची तयारी नीट करावी. या भागावर शक्यतो पाठाखालील प्रश्न विचारले जातात. पाठ्यपुस्तकात चार स्थूल वाचनांचा अभ्यास म्हणजे जास्त अवघड नाही . अगदी सुरुवातीपासून यातील एकेक प्रश्न पाठ करून ठेवल्यास ६ पैकी ६ गुण आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे ही सोपी स्थूल वाचने व त्या खालील प्रश्नाची नीट तयारी करावी. 

२. काही मोजके प्रश्न पाठ | mojke prashn  

                        स्थूलवाचनात काही प्रश्न वारंवार विचारले जातात. मागील प्रश्नपत्रिका अभ्यासून त्यातील प्रश्नणाची  तयारी करून ठेवावी. काही प्रश्न जे वारंवार विचारले जातात. ते प्रश्न पुढीलप्रमाणे 
१. गिरिजा किर यांच्या यडबमबु ढब्बू या कादंबरीतील विनोद सांगा. 
२. व्युत्पती कोशाचे कार्य लिहा. 
३.स्वाती महाडीक यांच्या जीवनातील संघर्ष लिहा. 
               अशा पद्धतीने कविता या घटकावर बोर्ड परीक्षेत १६ गुणांचे प्रश्न विचारले जातात. 


    कविता १६  गुणांचे विभाजन 

१. कविता दिली जाते व त्यावर आकृत्या किंवा आकलनावर प्रश्न विचारले जातात. यात चौकटी,विधाने असे प्रश्न विचारले जातात. 
२. सरळ अर्थ : दोन गुणसाठी यावर कवितेच्या दोन ओळी दिल्या जातात. व त्यांचा समजलेला अर्थ विध्ययरतींनी लिहिणे अपेक्षित असते. 
३. रसग्रहण हे ४ गुणांसाठी विचरले जात असल्याने या घटकाची तयारी अगदी सुरुवाटिपासून करायला हवी. यासाठी त्या कवितेच्या ओली कोणत्या कवितेतील आहेत हे ओळखता यायला हवे त्याननर त्यांचा अर्थ व शेवटच्या परीचेडात भाषिक वैशिसते लिहिणे अपेक्षित आहे. 
४. कवितेची नावे दिली जातात व त्या कवितेचा कवी, विषय,व आवडली की नाही असे प्रश्न विचारले जातात ४ पैकी चार गुण नीट तयारी केल्यास मिळू शकतात. 
                 आज आपण स्थूलवाचणं व कविता यांचा व त्यावर आधारित प्रश्न तसेच कविता व त्यावर कोणकोणते प्रश्न प्रकार येतात. याची जुजबी ओळख करुण घेतली नंतरच्या भागात आपण व्याकरण व लेखन विभागात कोणते घटक अभ्यास करणार आहोत. दहावीचे वर्ष महत्वाचे असल्याने अगदी सुरुवातीपासून तुम्ही अभ्यास केला तर जास्तीत जास्त नक्की मिळू शकतात. यासाठी गरज आहे ती आपल्या मागील दीड वर्षात जे घटक आपणास समजले नाहीत त्यांची अगदी सुरुवातीपासून करायला हवी.या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल यात शंका नसावी. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. 

   इतिहास व राज्यशास्त्र पाठ परिचय पाहण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा. 


         

                    
                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area