आर्थिक नियोजनात काटकसरीचे महत्त्व |
arthik nitojnaat katksriche mhatva
आर्थिक नियोजन हा शब्द ऐकायला खूप अवघड,भयानक , कायतरी वेगळा असा वाटत असला तरी तसे नाही. आपल्याकडील अर्थाचे म्हणजेच पैशाचे उत्तम नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन किंवा आर्थिक साक्षरता याविषयी आपण मागील लेखात माहिती पहिली. आता काहीजण म्हणतील आम्ही सामान्य माणसे आमच्याजवळ पैसाच नाही तर त्याचे नियोजन ही लांबची गोष्ट आहे.पण असे नाही आपण जर नीट आत्मपरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की आपण आजपर्यंत कोणत्याही बाबीचा बारकाईने विचार केलाच नाही. म्हणून आपली आर्थिक प्रगती झालीच नाही . अगदी तुमच्यासकट मी ही त्याला अपवाद नाही . आपल्याला आर्थिक नियोजन करायचे तर आगळपगळ राहून कसे चालेल? म्हणून तर या आर्थिक नियोजनात आज आपण नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत. ही खूप लांबची गोष्ट आहे. आज आपण केवळ काटकसर ही आर्थिक नियोजनात किती
आर्थीक नियोजन व काटकसर |
महत्वाची भूमिका बजावते हे पाहणार आहोत.आर्थिक नियोजन आणि काटकसर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
काटकसर म्हणजे नेमके काय ?|what is thrift?
काटकसर हा शब्द वाचताच अनेकांना असे वाटले असेल की काटकसर म्हणजे जीव मारून जगणे काय ? तर असे अजिबात नाही तर आपल्याला खर्च करताना लागलेल्या वाईट सवयी बदलणे एवढेच इथे अपेक्षित आहे. थोडक्यात जीवनात सगळ्या बाबीचा आनंद घ्यायचा पण तो घेत असताना थोडे सजग सावध राहायचे. पूर्वीच्या काळी सोडा आपले लहानपण आठवा आपले आई वडील घर कसे चालवत होते. पैसा जपून वापरत होते. थोडक्यात अंथरूण पाहून पाय पसरणे ही मानसिकता त्याकाळी होती. आज तसे आहे का तर नाही. आज आपण कितीतरी खर्च आपली ऐपत नसताना करत असतो. यातून होते असे की आपण शिलकीचा अर्थसंकल्प न मांडता कायम तुटीचा अर्थसंकल्प मांडत असतो. क्रेडिट कार्डरूपी नवा सावकार यात खूप महत्वाची भूमिका बजावत आहे. हातात पत म्हणजे पैसा नसला तरी आपण पुढील काही दिवसात येणाऱ्या पैशांची आधीच बेरीज लाऊन मोकळे होत असतो. यावर विचार व्हायला हवा. खाईन तर तुपाशी ही भूमिका बदलावी लागेल. जे गरजेचे आहे तो खर्च करणार व इतर खर्चावर नियंत्रण मिळवून जी बचत होईल ही झाली काटकसर. Economical planing मध्ये Saving Power ला महत्त्व आहे.
काटकसर करता येण्याजोग्या बाबी :(toc)
या कटकसरीत सर्वांची एकवाक्यता असू शकत नाही पण काही बाबी प्रातिनिधिक स्वरूपात मांडत आहे. अगदी आपण आपल्या खर्चाची नोंद घेऊन किती बचत करता येईल याचा विचार करावा व त्यापद्धतीने आपल्या सवयी बदलाव्यात ही अपेक्षा --------- तर बघूया ठळक बाबी .
१. प्रवास खर्च | Travling Allounce
हा मुद्दा वाचल्यानंतर सगळ्यांना वाटले असेल आम्ही प्रवास खर्च वाचावा म्हणून जिकडे जायचे तिकडे पायी जावे का ? तर असे नाही समजा आपल्याकडे मोटर सायकल उठसूट काही काम असले तर तिच्या वापरावर लगाम घालू शकतो. दररोज २ km जरी आपण मोटर सायकल ऐवजी पायी चाललो तरी एका महिन्याचे ६० km अवास्तव मोटर सायकल फिरवणे थांबले व २ लीटर म्हणजेच २२० रुपयांची बचत अगदी सहज करू शकतो . शिवाय आपला व्यायाम झाला तो तर दुहेरी फायदा म्हणता येईल. वेळ कमी आहे अशा वेळी मात्र मोटर सायकल वापरायलाच हवी. in case of emergency
२. चैनीच्या वस्तूवरील खर्च | Luxury Goods
आपल्याला जीवनावश्यक बाबी वरील खर्च टाळता येणार नाही, पण काही बाबी या केवळ चैन , मौज म्हणून केल्या जातात. त्या आपण टाळू शकलो. तरी खूप मोठी बचत आपण करू शकतो. जसे की महागडे मोबाईल, perfum,earphones यासारख्या खर्चावर नियंत्रण ठेवले तर खूप मोठी बचत होऊ शकते.
३. मोबाईल रीचार्ज | Mobile Recharg
आज आपण पाहतो की घरात जेवढी डोकी तेवढे मोबाईल असे समीकरण आज बनले आहे. लहान मुले , विद्यार्थी याला अपवाद होती. मात्र कोरोना महामारीने online education च्या नावाखाली ती ही हौस पूर्ण केली . या मोबाईलमुळे मुले किती शिकली ? नि इतर बाबी किती शिकली हे न बोललेले बरे.मुद्दा हा आहे की मोबाईल प्रत्येकाकडे मोबाईल आहे . आपण आपल्याला कोणत्या मोबाईलला महिन्याला कीती data लागतो याच्या नोंदी घ्यायला हव्यात . मी घेतल्या व लक्षात आले ५० टक्के पैसे असेच वाया जातात. काहींकडे तर दोन सिमकार्ड आहेत . जास्त वापर तर एकाचाच पण केवळ तो नंबर चालू राहवा या साठी recharge करतात. माझ्या मते गरज आहे तेवडेच डेटा पॅक घेऊन गरज पडलीच तर १८ ते २० रुपयात अधिकचा data घ्यावा पण केवळ आळस व सजगतेचा अभाव म्हणून किमान एका कुटुंबाचे किमान ५०० रुपये तरी व्यर्थ जातात हे सत्य आहे . काटकसरीत याचा विचार आवर्जून व्हावा.
४.छंद/ व्यसन | Hobby , Addiction
कोणाला व्यसन म्हटल्यावर राग म्हणून मुद्दाम छंद हा शब्द वापरला. असो माणसाला अश्या कितीतरी सवयी लागलेल्या असतात. की माणूस त्यातून आजारपण विकत घेत असतो. जसे की चहा पिण्याची सवय. काही लोक दिवसातून २ वेळा ठीक आहे पण मनाला वाटेल त्यावेळेला चहा पितात यावर नियंत्रण हवे. समजा त्या व्यक्तीने आरोग्यास घातक म्हणून जर काही प्रमाण कमी केले व चहा पूर्ण बंद जरी केला नाहीतरी खूप बचत होईल. तुम्ही बोलाल जीव मारून काटकसर नकोय आम्हाला . मी तर म्हणतोय अश्या जीवघेण्या बाबी हद्दपार करायला हव्यात.जसे की थंड पेय पिण्याची सवय. तळलेले पदार्थ खाण्याची सवय यामुळे देखील आपण दर दिवशी एका कुटुंबातून किमान १०० रुपये वाचवू शकतो. विचार करा महिन्याला किमान ३००० तर वाचतील त्या बदल्यात आरोग्य देखील छान राहील. हे केवळ चहाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. थंड चहा पिणारे मंडळी तर (drinker) किती पैसे वाचवू शकतात. याचा हिशोब ज्याने त्याने करावा. पैसा वाचू शकतो गरज आहे ----------- त्याच्या नोंदी घेऊन हाताला व मनाला लगाम घालण्याची.
५.अन्न धान्याची नासाडी | Wastage Of Food
वरील छंद किंवा व्यसन ही बाब बऱ्याचदा पुरुष मंडळीना लागू पडते तर अन्नधान्य नासाडी ही गृहूनिंना
. आज घरातील किती तरी अन्न ,भाज्या शिल्लक राहतात म्हणून दररोज फेकून दिल्या जातात. आपण जर योग्य खबरदारी घेतली तर ही नासाडी थंबवून अन्न पूर्ण ब्रहम या वचनाला न्याय देऊ शकतो व काटकसर पण करू शकतो. समजा दर दिवशी किमान १० रुपयांचे अन्न वाया जाणे आपण वाचवले तर महिना ३०० रुपयांची बचत होऊ शकते. आहे ना विचार करण्यासारखी बाब.
६.लहान मुलांचा पॉकेट मनी | Pocket Money
काहीजण बोलतील आम्ही सामान्य माणसे आम्ही असले लाड करत नाही.पण कधीतरी आपण दहा पाच रुपये देत असतोच की .. तर ते देणे बंद करू नका त्या ऐवजी त्याला money bank बनवायला सांगा. आपल्या लहानपणी त्याला गल्ला हा शब्द होता. ते साठलेले पैसे त्याला/ तिला वाढदिवसाला , शाळा सुरू झाल्यानंतर वह्या पुस्तक खरेदीला वापरा.एक प्रकारे हा पण बचतीचाच भाग झाला. समजा वाढदिवसाला कपड्याचा खर्च २००० होता त्यातील अर्धा किमान १००० त्याने / तिने लावलेल्या या सवयीमुळे झाला आहे. मुलांच्या या सवयीमुळे पै पै कसा वाचवावा ही सवय आपल्याला नाही पण त्याला सुरुवातीपासून लागेल हा आर्थिक नियोजनाचा पहिला धडा त्याला द्यायला सुरुवात करा .
७ . विचारपूर्वक निर्णय | Decision Ability
जीवनात आर्थिक निर्णय घेताना विचार नीट घ्या. घाईघाई मध्ये घेतलेले निर्णय आर्थिक नुकसान करतात. समजा घरात TV खरेदी करायचा तर तो किमान किती वर्षे मी तो वापरणार त्याचा आकार, Clearity याबाबी नीट पहा . बऱ्याचदा वस्तु घेताना गफलत होते व आपला पैसा वाया जातो.
उदा . वॉशिंग मशीन घेताना पाण्याचा फोर्स ,त्यातील Function,Automatic आहे की नाही अश्या अनेक बाबी आहेत यावर विचार करा.
थोडक्यात वस्तु घेताना अनेकांची मते जाणून घ्या व नग घ्या नाहीतर आपला पैसा वाया जाऊ शकतो.
८. हॉस्पिटल खर्च | Hospital Charges
आपण किंवा घरातील व्यक्ती आजारी पडल्यास लगेच घाबरून न जाता प्रथम घरगुती उपाय व ते करून जर फरक न जाणवल्यास family डॉक्टरला भेटणे . कित्येक वेळा आपण किरकोळ आजाराला घाबरून जे आजारपण काही अल्प पैशात बरे होणार असते त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतो. थोडक्यात काय तर या सगळ्या बाबी आपणास कळतात पण वेळ निघून गेलेली असते. पैसा गेलेला असतो. तर असे करू नका.
९. वाढदिवस,सौंदर्य प्रसाधने व इतर सणासुदीला होणारे खर्च | Birthday , Beauty Cosmetice And other Function Allounce
वाढदिवस ,सण साजरेच करायचे नाहीत असे नाही तर हे करत असताना दरवर्षी करतो त्यापेक्षा किमान २० टक्के खर्च कमी केला तरी वर्षभरात किमान घरात ४ सदस्य असतील तर खूप पैसे वाचतील यातून किमान वार्षिक ५००० रुपयांची बचत होईल यावर आपण कधी विचार केला आहे का ?
अशा अनेक बाबी आहेत ज्यावरील खर्चात कपात करून / आर्थिक बचत( काटकसर ) करू शकतो. गरज आहे आहे चांगल्या सवयीप्रमाणे चांगल्या आर्थिक सवयी लावण्याची.आर्थिक नियोजन आणि काटकसर करून समजा वरील वार्षिक खर्च आजपर्यंत आपण करतच होतो. त्यात अंदाजे वाढदिवसावरील किमान खर्च ५००० ,मोबाईल recharge वरील एक्स्ट्रा खर्च ६००० ,व्यसनावरील किंवा छंदावरील किमान ५००० ,इंधन खर्च किमान ३०००, हॉस्पिटलवरील किमान वाचवलेला खर्च २०००, अन्नधान्य नासाडी यावरील दर दिवशी १० म्हटले तरी वर्षाचा किमान ४००० या सर्वांची गोळाबेरीज केली तर किमान २५००० वार्षिक रुपयांची बचत डोळे झाकून होऊ शकते. मी प्रातिनिधिक खर्च मांडला तुम्ही देखील वही व पेन घेऊन बसा व या काटकसरीचे मूल्य जाणून घ्या. थोडक्यात बात छोटी है ,लेकिन काम की है हे ध्यानात घ्या ------------- तुम्ही अजून काटकसरीविषयी बाबी सांगू शकत असाल तर कॉमेंट मध्ये जरूर कळवा. हा ब्लॉग न राहता एक चळवळ बनायला हवी अशी माझी मनापासून इच्छा आहे.
मागील ५ वर्षापूर्वी हे काटकसरीचे मूल्य आपल्या अंगी आले असते व आपला हा बेहिशोबी पैसा जो असाच जातोय याची जाणीव असती व हाच पैसा शेर मार्केट मध्ये गुंतवला असता किंवा mutual फंड मध्ये असता तर आज त्याचे मूल्य आज किमान ५००००० (पाच लाख ) झाले असते यात शंका नाही देर है दुरुस्त है ----------------------------- चला तर मग उशिरा का होईना मार्ग सापडलाय हा वसा आजन्म पाळूया . आणि हो कुठेही मन मारायचे नाही बरे फक्त आहे त्यात अति होत ते कमी करायचे आहे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा . यापुढे कोणत्या विषयावर मांडणी करावी अगदी बिनधास्त कळवा ------- आजच्या पुरता लेखणीला विराम देतो 👍
काटकसर केलेल्या पैश्यांची गुंतवणूक कुठे करायची याचा विचार करत असाल तर nifti fifty मध्ये ज्या कंपन्या आहेत त्यामध्येच गुंतवण्याचा प्रयत्न करा. अजून माहिती हवीय क्लिक करा.
👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय छान माहिती👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखरंच खूप चांगली माहिती दिली सर,, धन्यवाद
उत्तर द्याहटवा