Type Here to Get Search Results !

दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र उजळणी | Ithihas Mhtvache Prashn Board Exam 2022

 इतिहास व राज्यशास्त्र परीक्षेला जाता जाता | Parikshela Jata Jata Itihas 

                            नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. काही पेपर सोडता माझ्या माहितीप्रमाणे सर्व प्रश्नपत्रिका अगदी सोप्या आहेत. आता केवळ दोनच पेपर बाकी आहेत. ते म्हणजे इतिहास  आणि भूगोल. गेल्यावर्षी तर कोरोना महामारीमुळे परिक्षाच झाल्या नाहीत.यावर्षी परीक्षा होत आहेत त्या देखील अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही व उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी देखील तुम्हाला जास्त वेळ दिला जातोय. आपण वर्षभर अभ्यास करत असतो. पण तरी परीक्षेला जाता जाता आपण काही महत्वाचा भाग वाचून जात असतो . तुमचे काम जरा सोपे व्हावे. यासाठी म्हणून आपल्याला कोणत्या बाबी वाचून जायला हव्यात. किंवा त्यावर एक नजर मारायला हवी. अशा बाबी किंवा काही मोजके प्रश्न मी आज आपणापुढे संग्रही स्वरूपात ठेवत आहे. परीक्षेत प्रश्न असतो तशी त्याची मांडणी नक्कीच नाही. पण या घटकावर प्रश्न आला की तुम्ही नक्कीच  त्यांची उत्तरे  लिहू शकता यात शंका नाही. थोडक्यात हे घटक एकदा नजरेखालुन  घातल्यास किंवा काही मुद्दे पाहिल्यास इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर लिहिताना तुम्हाला मदत होईल. 

इतिहास उजळणी
इतिहास उजळणी

    मी ही मांडणी फक्त मूदयांच्या स्वरूपात करत आहे . मग ते प्रश्न जोड्या किंवा ,योग्य पर्याय निवडून  वाक्य परत लिहा यात कुठेही विचारला  जाऊ शकतो. 


अ . वस्तुनिष्ट प्रश्नाची तयारी :(toc)

१. कुक - पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय 
२. भिलार - पुस्तकांचे गांव ( महाराष्ट्र मध्ये महाबळेश्वर ) 
३. मोनालीसाचे चित्र काढणारा चित्रकार - लिओनार्दो द वींची  
४. कोलकाता - पहिले भारतीय संग्रहालय 
५. ऑलिंपिकची सुरुवात - ग्रीस 
६. महाराष्ट्रात तयार होणारी लकडी बाहुली - ठकी 
७.  ऑगस्टस हिकी - १ ले engraji वर्तमानपत्र 
८. दूरदर्शन -दृक श्राव्य माध्यम 
९. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय - उर 
१०. भारताचे राष्ट्रीय अभिलेखंगार - दिल्ली 
११. आ. इति. लेखन जनक - व्हॅलटेर
१२. kningham-  भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक 

२. आ. संकल्पना चित्रावर आधारित प्रश्न फक्त माहिती 

१. पर्यटनाचे चार गटात विभाजन /प्रकार -
                           स्थानिक पर्यटन , प्रादेशिक पर्यटन , राष्ट्रीय पर्यटन , आंतरराष्ट्रीय पर्यटन  

२. महाराष्ट्रातील वारसास्थळे - 
         नैसर्गिक वारसा - कास पठार , 
          लेणी - अजिंठा वेरूळ 
         रेल्वे स्टेशन - छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई 

३. देशी खेळ - लगोरी,गोट्या, विटीदांडू ,कुस्ती लंगडी 
     विदेशी खेळ - क्रिकेट , हॉकी,बॅडमिंटन गोल्फ 
    बैठे खेळ - पत्ते सोंगट्या , भातुकली सापशिडी 

४. महाराष्ट्र लोककला - पोवाडा ,कीर्तन , तारपा नृत्य कोळी नृत्य , कोकणातील दशावतार 

५. १. तूजुक इ बाबरी- बाबर - बाबरला कराव्या लागणाऱ्या युद्धाचे वर्णन 
     २. राजतरंगिनी - कल्हण  - काश्मीरचा इतिहास. 
     ३. सभासद बखर कृष्णाजी  अनंत सभासद - छत्रपती शिवाजी महाराज कारकीर्दीचा इतिहास 

६. १. जेम्स  मिल - द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 
     २. जेम्स ग्रँट डफ -  द हिस्ट्री ऑफ द मराठाज
     3. . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - हू वेअर  शुद्राज 

३. महत्वाच्या टीपा किंवा संकल्पना |: 

१. उपयोजित इतिहास- 

        १.  इतिहास अभ्यासातून भूतकळच्या घटना बाबतचे ज्ञान घेऊन वर्तमानात व भविष्यकाळात त्याचा उपयोग कसं होईल ते सांगणे म्हणजे उपयोजित इतिहास होय. 
       २.  इतिहासाचा मानवी जीवनात उपोयोग करून घेणे म्हणजे -----------

२. प्रसारमध्यमांची गरज / आवश्यकता : 

     - माहितीची देवाणघेवाण 
    -  ज्ञानात भर 
    - जगातील घटनांची माहिती 
   -  मनोरंजन 



  ३. खेळणी आणि उत्सव : 

   - विविध सणांना खेळणी वाटली जातात. जसे की नाताळ 
  - दिवाळीत मातीच्या किल्ल्यावर ठेवले जाणारे सैनिक - खेळणीच आहेत. 
  - गावी जत्रा होतात त्यात अनेक खेळणी विकायला असतात 
  -  मातीचे बैल बनवने ,नाग बनवणे , संक्रातीला पतंग उडवणे 
       थोडक्यात खेळणी व उत्सव यांचा जवळचा संबंध आहे. 
         हे काही महत्वाचे प्रश्न आहेत या पद्धतीने इतर घटकांची तयारी करावी. 

४. विधाने सकारण स्पष्ट करा. 

१. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. कारण 
      - ब्रिटिश अधिकाऱ्यानी केलेली मांडणी पूर्वग्रह दूषित होती. 
      - इंग्रजी शिक्षणातून काही जाणिवा निर्माण झाल्या याचा परिणाम म्हणून 
      - राष्ट्रवादी इतिहास लेखन मोठ्या प्रमानातून वाढत गेले व या सगळ्याच परिणाम प्रादेशिक इतिहास लेखनाला  चालना मिळाली -------

२. दूरदर्शन अतिशय लोकप्रिय आहे. 
     - कारण  हे द्रुक श्राव्य माध्यम आहे. 
     - चित्र व आवाज यांचा मेल यात आहे थोडक्यात जिवंतपणा असणारे माध्यम आहे म्हणून 
     - जगातील बातम्या ,सिनेमे,खेळ या सर्वांची माहिती मिळते म्हणून 
    - माहिती व मनोरंजन दोन्ही साध्य म्हणून लोकप्रिय आहे. 

३. आपण आपला नैसर्गिक वारसा जपला पाहिजे. कारण 
       - नैसर्गिक वारसा ही निसर्गाची देन आहे. 
       - नद्या ,पर्वत,समुद्र किनारे जंगले यांचा यात समावेश होतो. 
       - पुढच्या पिढीला हा वारसा पाहता यावा म्हणून 
       - हे नैसर्गिक वारसे आपला इतिहास सांगतात व आपल्याला प्रेरणा देतात.   जसे किल्ले शिवाजी महराजांच्या कार्याची आठवण करून देतात. 

४. इतिहास संशोधनात विविध कृतीसाठी प्रशिक्षणची आवश्यकता असते कारण 
      - कोणतेही काम करताना पूर्वतयारी अतिशय गरजेची असते. 
      - यात साधनांचे जतन यासरख्या बाबी येतात व ते कसे करावे हे प्रशिक्षणातून कळते म्हणून 
      - प्रशिक्षण घेतल्याने आपण कोणती दक्षता घ्यावी हे समजते म्हणून.. 

५. थोडक्यात उत्तरे लिहा. |

१ वॉल्टेअर ला आ. इतिहास ले. जनक  ----------
      - इतिहासच्या अभ्यासात केवळ घटना न मांडता त्यावेळचा समाज ,व्यापार ,शेती यांची देखील मांडणी इतिहासात झाली पाहिजे हा महत्वाचा वीचे त्याने मांडला. 
-  घटनाक्रम योग्य असेल हवा असे मत त्याने मांडले. 
- थोडक्यात मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार इतिहासातून व्हावा हे महत्वपूर्ण वीचे त्याने मांडले म्हणून 

२. खेळाचे महत्त्व  सांगा. 
    - व्यक्ती तनाव मुक्त होते. 
    - आनंद मिळतो 
     - शरीर लवचिक व बळकट बनते 
     - नेतृत्व गुण वाढतो. 
      - निर्णय क्षमता वाढते 
      - मनाला प्रसन्नता

३. पर्यटन विकासासाठी कोणती काळजी घ्यावी ? 
     - पर्यटकांची उत्तम निवास व राहण्याची सोय 
     - प्रयत्न स्थळे निटनेटकी व साफ ठेवणे 
     - वाहतुकीची साधने उपलब्ध असावीत. 
    - गाईड ची सोय जे पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकणा नीट सांगतील 
    - थोडक्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. 

६. मोठे प्रश्न 

                   यात केवळ मुद्दे दिले आहेत आपण सपस्टिकरणे याला अनुसरुण केल्यास गुण अधिकाधिक मिळतील मी काही मोजकेच पण महत्वाचे प्रश्न घेतले आहेत. 
१. आधिनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये 
     - योग्य प्रश्नांची मांडणी करून सुरुवात 
     - मानव केंद्रित 
    - पुराव्यांचा  आधार 
   - खरी माहिती 
   - मानवाची वाटचाल कशी होत गेली याची माहिती 
    - वास्तव मांडणी 

२. इतिहासाच्या साधनाचे जतन होण्यासाठी किमान १० उपाय  
   उत्तर  १. संग्रहालयातील वस्तु जपून हाताळणे. उदा. जुन्या तलवारी ,फोटो 
            २. किल्ले , स्मारके,मंदिरे यांची डागडुजी म्हणजे दुरुस्ती करणे. 
            ३. चोरी होणार नाही याची दक्षता उदा. जुनी नाणी ,वस्तु दागिने 
            ४. कागदपत्र व ग्रंथ याना वाळवी व बुरशी  लागणार नाही याची खबरदारी 
           ५. कडक कायदे 
            ६. हे टिकवणे आपली जबाबदारी याची जाणीव निर्माण करणे 
            ७. सेवाभावी संस्थांची मदत घेणे व देखबजाळ करणे. 
            ८. अनुभवी लोकाना वस्तु हातळण्याची संधि देणे. 
             ९. किल्ल्यावर नावे लिहिणे ,कोरणे टाळावे 
             १० शासनाने मदत करावी. 

३. बैठे खेळ व मैदानी खेळ यातील फरक सांगा 
उत्तर १ मैदानी खेळ मैदानात खेळले जातात. व बैठे खेळ कमी जागेत घरात खेळले जातात. 
         २. मैदानी खेळ खेळताना ऊर्जा जास्त खर्च होते तर बैठ्या खेळात तुलनेने कमी होते. 
          ३. मैदानी खेळातून जास्त आयंड मिळतो तेवढा बैठ्या खेळातून मिळत नाही. 
          ४. मैदानी खेळात खो खो कबड्डी यासरख्या खेळांचा समावेश तर बैठ्या खेळात पत्ते , करम ,बुद्धिबळ यांचा समावेश 
           ५. मैदानी खेळात प्रशिक्षण व जास्त सराव करावा लागतो बैठ्या खेळात तुलनेने कमी सराव करावा लागतो 
                     यासारखे अजून दोन ते तीन मुद्दे लिहा. 


                          राज्यशास्त्र 

१.  रिकाम्या जागा

१ mahrashtra   स्थानिक संस्थेत आरक्षण - ५० टक्के 
२. लोकशाहीचा गाभा - सत्तेचे विकेंद्रीकरण 
३. संविधानात बदल करण्याचा अधिकार - संसद 
४. निवडणूक आयुक्त ची नेमणूक - राष्ट्रपती
५. भारत पहिले निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन 
६. परिसिमन समिति - मतदार संघ निर्माण करण्याचे काम 
७. भारत - बहुपक्ष पद्धत आहे 
८  सत्तेसाठी सोबत    - राजकीय पक्ष 
९. नॅशनल Confrance - जम्मू कश्मिर  मधील पक्ष 
१०. शेतकरी चळवळ मुख्य मागणी - शेतीमालाला योग्य भाव मिळावा 
११. हरितक्रांती - शेती उत्पादन वाढवण्या साठी झाली 

२. चूक की बरोबर 

१. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते - बरोबर 
२. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते - चूक 
३. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली - बरोबर 
४. rajkiy paksh शासन व jantaa यातील दुवा आहेत.- बरोबर 
५. राजकीय पक्ष सामाजिक संघटनाच असतात - बरोबर 
६. शिरोमणि दल राष्ट्रीय पक्ष आहे - चूक 
७. विशीसट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणूक घेतात. - बरोबर 
८. निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करते - बरोबर 
९. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही - बरोबर 
१०. माहिती अधिकाराणे शासनाच्या करभरातील गोपनीयता वाढली आहे. - चूक 
११ संविधान हा जीवंत दस्तऐवज आहे - बरोबर 

३. महत्वाच्या संकल्पना 

                            यात काही घटक दिले आहेत आपण माहिती मिळवावी. 
    १. माहितीचा अधिकार     
     २. अदिवासी चळवळ 
      ३. राष्ट्रीय पक्ष 

   ४. थोडक्यात उत्तरे 

१. राजकीय पक्षांची वैशिष्टे 
२. निवडणूक आयोगाची कार्ये लिहा 
                               
                    वरील प्रश्न परीक्षेला जाता जाता महत्वाचे आहेत.हा एक अंदाज आहे तरी सर्व घटकांची नीट तयारी करून मुद्देसूद मांडणी करून इतिहासाचा पेपर अगदी आत्मविश्वासाने सोडवा . काही शंका असल्यास कमेन्ट करा. परीक्षेसाठी लहुप खूप सुभेछा Ithihas Imp Prashn ,Rajyshastr Imp questions 
 10th 

आमचे हे लेख वाचा  


दहावीनंतर पुढे काय करावे ? अर्थात कोणते शिक्षण घ्यावे 




  


   

टिप्पणी पोस्ट करा

11 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. छान
    विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता जाता खरंच या प्रश्नांचा खूप उपयोग होईल.

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area