आर्थिक नियोजन (पैशाचे गणित ) | Economical Planinag
आज एक अतिशय महत्वाचा विषय मी आपणसमोर मांडणार आहे तो म्हणजे आर्थिक साक्षरता काळाची गरज.Need of Economic Literacy . एक काळ असा होता की लोकांना शिक्षणाचे महत्त्व म्हणावे तितके कळले नव्हते याचाच फायदा काही सुशिक्षित लोकानी उचलला व अनेक निरक्षर लोकांची फसवणूक केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ५ मे १९८८ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन कार्यक्रमाला सुरुवात केली. हेतू हाच की १५ ते ३५ वयोगटातील साक्षर करणे त्यानं लिहिता वाचता येणे,आकडेमोड करता येणे. या योजनेचा फायदा असा की लोक जेवढे साक्षर तेवढे राष्ट्र उन्नतीला योगदान देतील व त्यांची कोण फसवणूक करणार नाही असा दुहेरी फायदा होणार होता.
आर्थिक साक्षरता काळाची गरज |
आर्थिक साक्षरतेबाबत काही माहिती |(toc)
१. आरोग्य विमा | Mediclaim
आज आपण पाहिले कोरोना महामारी आली नि अनेक लोक दगावले. ते सोडा पण यातून जे वाचले ज्याना दवाखाण्यात भरती व्हावे लागले. ते आज जीवंत आहेत पण कित्येक लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. हे का झाले ? तर आर्थिक साक्षरतेचा अभावच .समजा त्या परिवारांचे आरोग्य विमा म्हणजेच Mediclaim असते तर त्यांचे लाखों रुपये वाचले असते. बरे Mediclaim साठी साधारणत महिना हजार रुपये पुरेसे आहेत. हे हजार रुपये लाखों रुपयांचे कवच आपल्याला देतात.
२ . शासकीय बॉन्ड | Goverment Bond
काही रकमेचे आपण शासकीय बॉन्ड खरेदी करू शकतो व त्याची किंमत वाढल्यास पुन्हा विकू शिकतो यातून देखील आपण आपला पैसा वाढवू शकतो.
३. शेअर मार्केट | Stok Market
हा सामान्य माणसाला जरा अवघड वाटणारा व जास्त जोखीम असलेला भाग वाटतो पण तसे काहीच नाही . एक गुंतवणूकदार म्हणून जर तुम्ही याकडे पहिले तर पैश्याने पैसा कसा वाढवावा याचे सगळ्यात मोठे गुपित या शेअर मार्केट मध्ये आहे. आपल्याजवळील नाममात्र रक्कम जर दरमहा आपण गुंतवत गेलो तर आपण करोडपतीही बनू शकतो पण त्यासाठी थोडा अभ्यास हवा. यावर एक स्वतंत्र लेखमालिका नंतर येईल. तूर्तास शेअर मार्केट चे ज्ञान हा आर्थिक साक्षरतेचा भाग आहे हे ध्यानात घ्या.
उदा. ५ वर्षापूर्वी तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या dmart कंपनीचा एक शेर तुम्ही घेतला असता तर तो केवळ ७४३ रुपयांना होता आज तो ४००० च्या घरात आहे. व मागील २ महिन्यापूर्वी तो ६००० च्या घरात होता. असे अनेक स्टॉक म्हणजेच शेर आहेत याबबत सामान्य माणसाने माहिती मिळवायला हवीय.म्हणून सगळे पैसे शेर मध्ये गुंतवणे मूर्खपणा आहे असे मला तरी वाटते . याचे भान म्हणजेच तर आर्थिक साक्षरता.
४. म्यूचुअल फंड | Mutual Fund
ज्यांना शेर मार्केट मधील कळत नाही त्यांना शेर मार्केट मधून पैसे मिळवून देण्यासाठी हा एक नामी मार्ग आहे तो म्हणजे म्यूचुअल फंड यात आपण काही रक्कम दरमहा sip स्वरूपात एका फंड मॅनेजर ला देत असतो. तो ती रक्कम अनेक कंपन्यांचा अभ्यास करून शेर मार्केट व इतर क्षेत्रात देखील गुंतवत असतो व आपल्याला वार्षिक किमान २० ते २५ टक्के नफा मिळवून देत असतो. थोडक्यात काय तर थेंबे थेंबे तळे साचे असे आहे हे म्यूचुअल फंड चे गणित.
५. पोस्ट योजना | Post Skim
पोस्टाच्या अश्या अनेक योजना आहेत ज्यातून आपल्याला बँकेपेक्षा जास्त परतावा मिळतो याची देखील महिती करून घ्यायला हवीय .
उदा मुलींच्या शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना
६. प्रॉपर्टी विमा | Property Policy
आपण एखादे घर लाखोंना खरेदी करतो. समजा कमावती व्यक्ती या जगातून निघून गेली तर त्या घरावर ज्या बँकेचे कर्ज आहे ती बँक ताबा घेते. त्यासाठी प्रॉपर्टी घेताना काही रक्कम देऊन प्रॉपर्टी विमा घेतल्यास आपण बिनधास्त राहू शकतो.
७. टर्म इन्शुरंस | Term Insurance
च्या माध्यमातुन समजा आपले काही बरे वाईट झाले तर माझे कुटुंब व त्याची आर्थिक दृष्ट्या त्यांची वाताहत होणार नाही यासाठी किमान ५० लाखाचा का होईना टर्म प्लान आपल्याजवळ असणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर एलआयसी ची किमान एखादी पॉलिसी असावी .
८ . सुवर्ण बीसी योजना | Gold bc
हिच्या माध्यमातून दरमहा किमान एक ग्रॅमचे १० ते ११ महीने याप्रमाणे आपण पैसे त्या सुवर्ण पेढीकडे जमा करत गेलो तर बाराव्या महिन्यात या योजनेमार्फत आपल्याला वाढीव १ ग्राम सोने भेटू शकते इथे पैश्याची बचत पण झाली सोन्याची खरेदी पण झाली असा दुहेरी फायदा आपल्याला मिळू शकतो .
९. घर,जागा , जमीन व गाळे यासारख्या गुंतवणूका | Home ,Plot ,Flat
जर आपल्याजवळ बऱ्यापैकी पैसे असतील तर वरील गुंतवणुकीबाबत पण आपण विचार करू शकता मात्र कागदपत्रे नीट माहिती करून घ्या. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
१० इतर मार्ग | Other Sources
Npf , वेगवेगळ्या Pension योजना यात देखील आपण गुंतवणूक करू शकतो.
अश्या अनेक बाबी आर्थिक साक्षरतेत येतात .मला ज्या माहीती आहेत त्या तुम्हाला माझ्यापरीने सांगितल्या.अजून देखील आहेत पण त्यांच्या तपशिलात आपण जाणार नाही. केवळ आर्थिक भान हाच या लेखमागील हेतु आहे. काही महिन्यापूर्वी आपण पहिले फाटे कंपनीसारखे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित लोकांना देखील गंडा घालून गेले. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्याजवळ किती पैसा आहे हे महत्वाचे नाही तर तर तो पैसा तुम्ही कसा गुंतवता कुठे गुंतवता याला महत्व आहे . समजा मी गावी जात आहे रात्रीची वेळ आहे माझ्याजवळ पैसे आहेत अचानक चोर आले तर काय ? तर आपण काही रक्कम आपल्या बॅगेत ठेवतो ,स्वताची गाडी असेल तर काही गाडीच्या डीकीत ठेवतो, काही रक्कम आपण बसलोय त्या शिट खाली ठेवतो. थोडक्यात आपण त्याचे छोटे छोटे कप्पे केले. सोप्या भाषेत हिच आहे आर्थिक साक्षरता . आपल्या जवळील पैसा एकाच क्षेत्रात न गुंतवता अनेक क्षेत्रात त्यातील जोखीम लक्षात घेऊन गुंतवायला हवा . यासाठीच आर्थिक साक्षरता काळाची गरज बनली आहे.
या आर्थिक साक्षरतेवर खूप बोलण्यासारखे आहे. नंतरच्या सदरात यातील कोणत्या बाबीवर सविस्तर माहिती हवी असल्यास कॉमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्याकडे अजून काही नवीन ज्ञान असल्यास ते ही शेर करा. मी म्हटले ना ही विचारांची क्रांती आहे. व ती व्हायला हवी .. मी बोलतोय तुम्हीही बोला. काही नवीन विषय ज्यावर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की कळवा. त्याबबत मला माहिती असल्यास मी त्यावर नक्की लिखान करेन तर आज आपण आर्थिक साक्षरतेचा श्रीगणेशा केला असे मी समजतो व थांबतो----------------- पुन्हा भेटूया अश्याच एका नवीन व जीवनोपयोगी विषयासह 👍
आर्थिक नियोजनात पैशाने पैसा वाढवण्या बरोबर काटकसर देखील गरजेची आहे. काटकसर आणि आर्थिक नियोजन व या नियोजनातून कसे बनू शकतो आपण करोडपती जाणून घेण्यासाठी फक्त क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/03/economical-planing-saving-power.html
अति. उत्तम व उपयुक्त माहती
उत्तर द्याहटवाKhup chhan sir , keep it up👍👍
उत्तर द्याहटवामहत्त्वपूर्ण माहिती
उत्तर द्याहटवाअतिशय मुद्देसूद माहिती
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवालेख वाचून ज्ञानात भर पडली खूप खूप छान
उत्तर द्याहटवासर्वोत्तम माहिती, समाजाला खरोखर आर्थिक साक्षर करणे आवश्यक आहे.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाकामाची माहिती दिली सर, धन्यवाद!
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती प्रशांत सर, वर्गमित्र म्हणून आम्हांस आपला अभिमान वाटतो आहे.
उत्तर द्याहटवाखूप उपयुक्त माहिती सर
उत्तर द्याहटवा