निफ्टी मधील पन्नास कंपन्यांची माहिती | Nifty Fifty Mahiti
आजच्या लेखात निफ्टी मधील पन्नास कंपन्या किंवा स्टॉक ची माहिती आज पाहणार आहोत.शेअर मार्केट मधील पायाभूत माहितीमध्ये आपण अगदी सुरुवातीला शेअर म्हणजे काय ,स्टॉक एक्स्चेंज म्हणजे काय,Bse व Nse म्हणजे काय ? यांची माहिती आपण सविस्तर घेतली त्यानंतर शेर मार्केटचा कल काय आहे. तेजी आहे की मंदी आहे हे आपणास कळण्यासाठी आपल्याला निफ्टि व सेंसेक्स यांची माहिती असावी हे आपण पहिले. सेंसेक्स ,निफ्टि किती अंकानी वाढली किंवा खाली आला . यावरून तो कल आपणास दिसतो. आज आपण सेंसेक्स विषयी माहिती न पाहता निफ्टि फिफ्टी मध्ये कोणकोणत्या कंपन्या कोणत्या क्षेत्रातील आहेत यांची माहिती पाहणार आहोत. कारण का तर सेंसेक्स मधील जवळजवळ सर्वच कंपन्या निफ्टि मध्ये पण आहेत.
निफ्टी मधील पन्नास कंपन्या |
निफ्टी मधील क्षेत्रे (toc)
थोडक्यात निफ्टि व सेंसेक्स यांचे आलेख थोड्या फार फरकाने सारखेच असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सेंसेक्स nifty च्या आधीपासून असल्याने त्याची किमत जास्त दिसते त्या तुलनेत निफ्टि मागील काही वर्षातील बाजाराचे चित्र दाखवताना दिसते. Top 50 kmpnyanchi mahiti थोडक्यात आपण निफ्टि फिफ्टी चा अभ्यास केला तर एखादी दुसरी कंपनी सोडली तर बाकी बाबी सारख्याच आहेत. तर आज आपण या निफ्टि फिफ्टी मध्ये कोणत्या क्षेत्रातील व कोणकोणत्या कंपन्या किंवा त्यांचे Stock म्हणजे कोणते शेअर आहेत हे पाहणार आहोत. हे पाहिल्यावर आपणास गुंतवणूक करताना बऱ्यापैकी मदत होईल हे नक्की.
निफ्टि फिफ्टी क्षेत्र निहाय माहिती | Nirty Fifty Companies
1. तेल व गॅस क्षेत्र | Enrgy , Oil & Ggs
निफ्टि फिफ्टी मध्ये या क्षेत्राचा वाटा वाटा जास्त आहे . प्रचंड उलाढाल असलेले क्षेत्र म्हणजे तेल व गॅस होय. या क्षेत्रात Relaince Industries ही कंपनी असून निफ्टि फिफ्टी मधील जवळ जवळ 10 टक्के भारांश या एका कंपनीचा आहे यावरून आपण जर Long Term Investor बनणार असू . याविषयी स्वतंत्र लेख येईल.तूर्तास जर आपण एक वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी पैसे गुंतवणार असू तर रिलायन्स Industries मध्ये काही रक्कम गुंतवायला हरकत नाही . हे आपणं का ठरवू शकलो तर ही निफटी फिफ्टी मधील कंपनी असुनं 10 टक्के Watege तिला आहे वत्याच बरोबर Indian Oil corporation म्हणजेच ioc या स्टॉकचा देखील यात समावेश आहे ही एक सरकारी कंपनी आहे.
2. बँकिंग क्षेत्र | Bank kshetr
बँकिंग क्षेत्रात प्रमुख्याने खाजगी व सरकारी बँका याना स्थान देण्यात आले आहे. या क्षेत्रात hdfc बँक ,sbi ,icici बँक ,kotak bank ,axis bank यासरख्या बँकांचा समावेश आहे. खाजगी बँकेत सर्वात अग्रगण्य स्थानवर असलेल्या hdfc बँकेला 8 टक्के watege निफ्टि 50 मध्ये देण्यात आलेले आहे व सरकारी बँक म्हणून sbi ही महत्वपूर्ण बँक आहे. इतरही काही बॅंका आहेत पण एक तोंडओळख म्हणून एवढी माहिती पुरेशी आहे.
3. IT कंपन्या | It Kampnya
शेअर मार्केट मध्ये अलीकडच्या काळात कोणते क्षेत्र जास्त तेजीत आहे तर ते म्हणजे it. कोंरोंना महामारीत सर्व कामे घरून सुरू होती. याचाच फायदा it कंपण्याना खूप मोठ्या प्रमाणात झाला. या क्षेत्रात infosyis ,tcs ,wipro ,hcl या सारख्या कंपन्या सध्या आहेत. यात infosis ला 8 टक्के watage असल्याचे दिसते. म्हणून बाकी कंपन्या चांगल्या नाहीत असे नाही . सांगण्याचा मुद्दा infosis कंपनीचे शेअर घेण्यासाठी लोक जास्त उत्सुक असतात असे यातून दिसते. wipro ही देखील IT क्षेत्रातील खूप चांगली व ज्या स्टॉक ची किमत सामान्य गुणवणूकदार गुंतवू शकतो एवढी आहे.
4. Fmgc | Dainndin Vaprachya Vastu
थोडक्यात यात दैनदीन वापराचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या येतात. जसे की हिंदुस्थान uniliver लिमिटेड,नेस्ले nestle ,itc यासारखे स्टॉक या क्षेत्रात येतात. दैनदीन वापराच्या वस्तू या व्यक्ती कोणत्या स्तरातील असो त्याला घ्यावयाच लागतात. सांगण्याचा मुद्दा असा की जर आपण गुंतवणूक करणार असू तर आपल्याला जास्त काही समजत नसेल तर यातील काही स्टॉक खरेदी करून काही वर्षे तुम्ही आपल्याजवळ ठेवले तर नक्कीच आपल्याला bank fd किंवा अन्य पर्यायापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे.
5. मोटार क्षेत्र | वाहन क्षेत्र,Vahan Kshetra
या वाहन क्षेत्रात Maruti Suzuki , Tata Motor ,Bjaja Auto यासरख्या स्टॉक म्हणजे शेअर चा समावेश आहे. वाहनाची मागणी कायम वाढत आहे हे आपणास माहीत आहे. व या क्षेत्रातील या जर टॉप कंपन्या असतील तर जादा Risk न घेता यातील काही कंपन्यांच्या सद्य Poilicy पाहून आपण स्टॉक घेऊ शकतो.
जसे की एक उदाहरण द्यायचे तर Tata Motor ही कंपनी ही सध्या Electric कार व आपल्या नवनवीन उत्पादणातून Tata Punch , Tata Nexon यासरख्या गाड्यांची मागणी बाजारात वाढत आहे . एवढे निरीक्षण देखील पुरेसे आहे शिवाय ही कंपनी निफ्टि ५० मध्ये आहे. असे काही आडाखे बांधून आपण शेअर मार्केट मधून आपली wealth वाढवू शकतो.
6. औषध निर्मिती व्यवसाय | Pharma Sector
या क्षेत्रात सन Pharma,Cipla,Divis Lab यासरख्या कंपन्या आहेत. कोरोना काळात या शेअर निन लोकांचे पैसे किती तरी पटीने वाढवून दिले. थोडक्यात काय तर शेअर विकत घेताना आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे फक्त वरवर तरी लक्ष असयला हवे असे मला वाटते.
उदाहरण द्यायचे झाले तर सध्या Ukren व Rashiya यांच्यात लढाई सहाजिकच आपण अंदाज करू शकतो भविष्यात सौरक्षण क्षेत्रात भारत प्रगती करेल मग आजच आपण असे स्टॉक व त्यांची माहिती मिळवून काही गुणवणूक करायला हवी.
7. Metal | Steel Sector Stil Kshetra
देशाच्या विकासात हे क्षेत्र अतिशय महत्वाचे आहे. या क्षेत्रात tata steel, jsw स्टील यासरख्या कंपन्या येतात. उद्योग धंदे यांचा विचार करता स्टील ला इमारत ,कारखाने उभारणी,रेल्वे निर्मिती, रूळ निर्मितीब अश्या अनेक बाबी या क्षेत्राशी संबंधित आहेत.
8.सीमेंट | cement
या क्षेत्रात Shri Cement ,Grasim Industries यांचा समावेश होतो.आज आपण पाहतो की घर बांधणी व्यावसायिक किती मोठ्या प्रमाणात इमारती उभारत आहेत. थोडक्यात या क्षेत्रातील स्टॉकमधे देखील आपण गुंतवणूक करायला हवी.
9. इतर | Itar
याचबरोबर इतर देखील क्षेत्रांचा यात समावेश आहे मात्र त्यांचे wateg कमी आहे जसे Telicom क्षेत्रातील airtail सारख्या कंपनी निफ्टि फिफ्टी मध्ये आहे. काही Stok Infrastuctur क्षेत्रातील आहेत. तसेच काही Texstile मधील देखील आहेत.
थोडक्यात काय तर या nifty 50 मध्ये विविध क्षेत्रातील टॉप 50 कंपन्या असतात याचप्रमाणे किंवा यातील बहुतेक कंपन्या सेंसेक्स मध्ये देखील आहेत. आज आपण निफ्टि फिफ्टी चा अभ्यास का करत आहोत? तर आपण या क्षेत्रात नवीन आहोत. व आपल्याला काटकसर करून आर्थिक प्रगती करायची आहे मग आपण अगदी सुरुवातीला 5000 कंपन्यांचा अभ्यास करत न बसता मी तर म्हणेन हे रेस मध्ये जिंकणारे घोडे आहेत यावर दाव लावायला जास्त risk नाही म्हणण्यापेक्षा बिलकुल नाही म्हटले तरी चालेल.
समजा माझ्याकडे 10000 शिल्लक आहेत तर एक प्रयोग म्हणून ते बँकेत न ठेवता यातील काही स्टॉक मध्ये गुंतवले तर नक्कीच आपल्या पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त परतावा मिळेल हे नक्की.यासाठी आपल्याला निफ्टि म्हणजे काय सध्या Nifty किती अंकावर आहे ,मागील महिन्यात किती अंकावर होता याच्या नोंदी घ्यायला हव्यात . जसे की कोंरोंना काळात Nifty 12000 च्या जवळपास होता तो ७५०० च्या जवळपास आला थोडक्यात मार्केट खूप खाली आले ही घाबरण्याची वेळ नहवती तर शेअर विकत घेण्याची वेळ होती हे कोणताही अभ्यास न करता केवळ nifty चा आलेख पहिल्याने कळले काही महिन्यातच निफ्टि इतक्या झपाट्याने वर गेली की ती जवळपास १८५०० चा टप्पा गटेपर्यंत खाली आलीच नाही. आज ती १७००० च्या जवळपास आहे म्हणजे आता देखील संधी खुणावत आहे हे ओळखता आले पाहिजे. यानंतर येणारी तेजी जास्त असेल यात शंका नाही असे मला वाटते.
हे सगळ तुम्हाला आले पाहिजे हीच आहे खरी आर्थिक साक्षरता. तर आज तुम्हाला निफ्टी मधील पन्नास कंपन्या त्यांचा भारांश व विविध क्षेत्रे व त्यातील कंपन्या यांची माहिती झाली असेल. हळुहळू google वर जाऊन ifty Index /आलेख पाहयची सवय लाऊन घ्या.त्यात होणारे चढ उतार का होतात त्यामागील करणाची नोंद घ्यायला शिका.तर मला वाटते nifty ५० म्हणजे काय? त्यातील कंपन्या यांची माहिती आपल्याला कळली असेल पुढचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे.
मी शेअर मार्केट करणार आहे त्यात कोणती भूमिका मी ठेवणार आहे एक गुंतवणूकदार की ट्रेडर या नक्की संकल्पना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी यापुढील लेख नक्की वाचा. आपल्या काही शंका असतील तर नक्की विचारा. मोठ व्हायचे असेल तर Demat Account काढले नसेल तर नक्की काढा. आपल्याला या क्षेत्रातील कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल ते कमेन्ट मध्ये जरूर कळवा. हळूहळू आपण अनुक्रमणिका पाहून पहिल्या धड्याकडे चाललो आहे असे समजायला हरकत नाही. तर पुन्हा भेटूया कोणती भूमिका मी मार्केट मध्ये पार पाडणार आहे किनावा पाडावी या एका नवीन विषयासह . आणि हो ही एक चळवळ आहे मी आपणास सांगतोय तुम्ही देखील ही माहिती इमाने इतबारे आपल्यासारख्या सामान्य लोकाना पाठवा . मी मोठा झालो पाहिजे असे म्हटल्यावर मोठे होत नाही तर सर्वच मोठे झाले पाहिजेत ते केवळ कटकसरीतून . किती छान संकल्पना आहे. विचार करा. या व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे एवढीच अपेक्षा.
मागील काही दिवसांपासून पुन्हा शेअर बाजार कोसळत आहे अशावेळी घाबरून न जाता आपली मानसिकता कशी ठेवावी याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खुप महत्वाची माहिती आहे,,, तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल,, खूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद .
हटवामला पण ब्लॉगर बनाचे काय करावे लागेल.
हटवामाहिती अतिशय महत्वाची आहे. सामान्यांतल्या सामान्य माणसाला ही माहिती कळेल आणि तुमच्या या चळवळीला भरगोस प्रतिसाद मिळतील हे नक्की
उत्तर द्याहटवासामान्य माणसाला असामान्य बनवण्याची ही चळवळ आहे. फक्त digital मिडियावर दररोज इतकी माहिती येते की लोक जाणीवपूर्वक वाचत नाहीत . पण आपण ही टिप्पणी दिली खरच मनापासून धन्यवाद .
हटवानिफ्टी फिफ्टी बद्दल खूप मोलाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा