Type Here to Get Search Results !

सेंसेक्स व नीफ्टी | Sensex V Nifty

सेंसेक्स व नीफ्टी |  Sensex & Nifty 

                                       आज आपण जो घटक पाहणार आहोत. तो घटक म्हणजे सेंसेक्स व निफ्टि. मागील लेखात आपण ज्याना शेअर मार्केट बद्दल काही माहिती नाही त्यांना शेअर म्हणजे काय? शेअर बाजार सकाळी कितीला सुरू व दुपारी  बंद होण्याच्या वेळा व शेअर मार्केट मध्ये शेयर खरेदीसाठी ब्रोकर कडून  ,Dmat Account, या सगळ्यांची मूलभूत माहिती पहिली.शेअर मार्केटमध्ये काय स्थिति आहे याची कल्पना आपल्याला या सेंसेक्स व निफ्टि वरुन  समजते. हे पाहण्यागोदर आपल्याला दोन स्टॉक Exchange म्हणजेच जिथे शेर ची खरेदी विक्री होते ती ठिकाणे होय. . भारतात  bse व nse या  दोन एक्स्चेंज आहेत यांची  माहिती करून घेऊया
सेन्सेक्स व निफ्टी
सेंसेक्स व निफ्टी


सेंसेक्स व निफटी (toc)

१. BSE  | बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (अधिक माहितीसाठी क्लिक )

                Bse म्हणजे Bombay Stock Exchange . थोडक्यात जिथे   शेयर ची खरेदी व विक्री होत असते. bombay stock exchange / मुंबई शेअर बाजार . अतिशय जुना शेअर बाजार  आहे. bse exchange ची सुरुवात १८७५ मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. थोडक्यात Bse Exchange आशियातील सर्वात जुनी एक्स्चेंज म्हणजेच शेअर बाजार आहे. bse मध्ये जवळ जवळ ५ हजारच्या आसपास कंपन्या नोंदवलेल्या  आहेत. म्हणजेच या कंपन्यांचे शेअर खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

२. NSE  | नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 

        National Sock Exchange म्हणजे Nse . हा Exchange देखील मुंबई येथे आहे. Nse १९९२ ला सुरू झाले. व सर्वप्रथम बोली किंवा खरेदी विक्री इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाने  साह्याने होऊ लागली. पूर्वी ही खरेदी बोलीच्या स्वरूपात व कागदावर नोंदी  करून होत होती. पण nse मुळे लोकाना घरबसल्या माहिती मिळू लागली. सध्या Bse ,Bse पूर्ण ऑनलाइन खरेदी विक्री होते. मात्र मध्ये स्टॉक ब्रोकर असतात. हे आपण पहिलेच. 
                      आपल्या देशाची आर्थिक प्रगती कशी आहे .हे कळण्यासाठी Bse व Nse हे दोन इंडेक्स प्रमुख मानले जातात. Bse मधील टॉप  ३० कंपन्यांचा Performance कसा आहे . आपल्याला Bse इंडेक्स जो सेंसेक्स नावाने ओळखला जातो. तर Nse मध्ये टॉप ५० कंपन्यांचा विचार करून जो इंडेक्स दाखवला जातो तो म्हणजे निफ्टि. थोडक्यात शेअर मार्केट मधील देवाण घेवाण इतक्या ५००० कंपन्यांची कशी कळणार. त्यासाठी प्रातिनिधिक  स्वरूपात Nse वरील ५० व Bse वरील टॉप ३० कंपनन्या  कसा  perform करतात. ते पाहणे  म्हणजे nifty किंवा sesex होय. हे शेअर विचारात घेताना कंपनीकडे असलेल्या शेअरचा  विचार होत नाही public कडे असणाऱ्या शेयर चा विचार केला जातो. थोडक्यात हा एक आलेख आहे की शेअर बाजार कोणत्या दिशेने जात आहे हे कळण्यासाठी. जी कंपनी नफ्याच्या बाबत  मागे पडते तिला या दोन्ही index मधून वगळले जाते. व जी कंपनी Performncee चांगला देते तिला Add केले जाते . सध्या निफ्टि १७१०० च्या जवळपास आहे. तोच कोऱ्ओना काळात ७५०० वर आला होता. थोडक्यात शेअर बाजारात एंट्री करण्याची सुवर्ण संधी  होती. हे सर्व कळण्यासाठी Nifty - Sensex यांची माहिती हवी .   

Nifty, Sensex | याविषयी  माहीत असण्याचे फायदे  Nifti Aaklnache fayde 

१. शेअर बाजाराची कल्पना | Idea In Stock Market 

                     सेंसेक्स व नीफ्टी मधून शेअर बाजार मंदित की तेजीत आहे हे समजते. जसे की अचानक निफ्टि ३०० अंकाणी खाली आला. तर का आला ? त्यामागील करणे यांचा अभ्यास हवा. 

उदा.   सध्या रशिया व Yukren  लढाईमुळे शेअर बाजारात भीतीचे वातावरण म्हणून तर मार्केट खाली जात आहे . हे आपण Nifty, Sensex पाहून सांगू शकतो. Koronaa Pendamic ,आर्थिक मंदी  

२. गुंतवणूक कधी करावी हे कळण्यासाठी  | Guntvnuk Klnyasathi 

             समजा स्टॉक मार्केट सातत्याने खाली येत आहे.Nifty ,Sensex वरून ते आपल्याला समजते. जर एखाद्या महिन्यात अचानक २००० अंकांनी Nifty खाली आली तर गुंतवणकदारानी  न घाबरता जास्तीत जास्त मोठ्या कंपण्यात गुंतवल्यास  आज ना उद्या त्यात वाढ ही होतच असते. थोडक्यात गुंतवणूक कधी करावी. शेअरची  किमत वाढल्यावर नफा किती घ्यावा याची कल्पना या इंडेक्स वरुन समजते. 

३. मार्केट मूड  | Market Trend,Market Mood 

                      शेअर मार्केटचा  मूड तेजीत आहे  म्हणजे वाढत जाणारे की मंदीत म्हणजे खाली येणारे हे सर्व चित्र nifty व सेंसेक्स वरुण समजते. ट्रेडर म्हणजे जे शेर खरेदी विक्री रोजच्या रोज करता असतात. त्यांना सेंसेक्स,  निफ्टि, इंडेक्स पाहून कोणते शेअर घ्यावेत. व घेऊ नयेत हे समजेल.थोडक्यात काही गुंतवणकदारांना  दिशा देण्याचे काम हे २ इंडेक्स करता असतात . 

४. कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी | Idea For Investment 

                   Nifty व Sensex यात कंपन्या टॉप च्या कंपन्या असतात Nifty मध्ये ५० व सेंसेक्स मध्ये ३० कंपन्या   आहेत Google वर आपण त्यांची लिस्ट पाहू शकतो. गुंतवणूक  करण्यासाठी ज्याना शेर बाजारातील जास्त कळत नाही ते या nifty व सेंसेक्स  मधील काही स्टॉक मध्ये पैसे लू शकतात. हा फायदा Nifty , सेंसेक्स मुळे होते.  

५. ट्रेडिंग साठी मदत  | Help to Treding  

                           काही लोक शेअर ची विक्री रोजच्या रोज करत असतात. त्यानं trader म्हणतात.. मग आज nifty कसं आहे उप ट्रेंड की down ट्रेड आहे याची कल्पना येते. पण शक्यतो ट्रेडिंग करूच नये.कारण यात प्रचंड नफा तसा प्रचंड तोटा देखील  होतो. यात आपण ट्रेडर की investor याविषयी स्वतंत्र माहिती दिली जाईल. 

६. बाजारात entry व exit  | Bajarat Entry v Out 

                        शेअर बाजार पडत आहे त्यावेळी तो किती अंकांनी  खाली जात आहे ते nifty व सेंसेक्स वरुण समजते. मार्केट पडत असताना आपण गुंतवणूक करू शकतो व मार्केट पुन्हा वरती गेल्यावर आपल्याला हवे ते Target Achive झाल्यावर विकुही शकतो. थोडक्यात कधी  शेअर घ्यावेत कधी विकावेत याची काही अंशी कल्पना गुणवणूकडरणा nifty व sensex वरुन येते. 

७. जागतिक बाजार |  Jagtik Bajar Mahiti 

                    Nifty  व Sensex प्रमाणे इतर बाजारभाव त्यांचे इंडेक्स पाहून देखील काही निर्णय घ्यावे लगतात . कोऱ्ओण संकटात अनेक देशांचे इंडेक्स खाली जात होते. याचाच परिणाम  आपला  भारतीय शेअर बाजार देखील खालीच जात होता. हे सर्व इंडेक्स बद्दल माहिती असेल तरच समजते हे नक्की. money centrol वर ते सहज पाहता येतात. 

८. शेअर बाजाराचे काही अंशी चित्र  | Shear Bajaracha Graf Samjto 

                      शेअर बाजार कोणत्या दिशेने जात आहे याची कल्पना या दोन इंडेक्स मधून येते. Sensex व Nifty प्रमाणे बँकेच्या व्यवहासाठी बँक nifty व it क्षत्रासाठी it nifty असे क्षेत्र वाइज इंडेक्स देखील आहेत . तूर्तास इतक्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही. 
                 समजा आपल्याजवळ अमुक रक्कम आहे व आपल्याला ती शेअर बाजारात गुंतवायची आहे. तर Nifty खूप वर असेल त्यावेळी  आपण पैसे गुंतवले व अनेक लोक नफा कमवण्यासाठी आपले शेर विकू लागले तर काही दिवस बाजार हा खाली येत असतो. तर आपला तोटा  दिसेल . म्हणून  Nifty ,Sensex किमान ५ टक्के  खाली आल्यावर किंवा त्यानंतरही खाली येत असेल तर प्रतेक टप्प्यावर  अजून खरेदी करावी. कालांतराने त्याची किमत वाढल्यास विक्री करून नफा कमवू शकता. हे सगळे कधी समजेल जर nifty व सेंसेक्स काय  आहे ? हे समजल्यावर याआधी आपण  शेअर म्हणजे काय? स्टॉक ब्रोकर म्हणजे काय? Demat Acount याबाबत माहिती पहिली . तर सर्वाना या क्षेत्रात जो पैसा वायपट जात होता. व कटकसरीने किमान महिन्याला २००० पासून आपण मार्केट मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करावी. पुढील लेखात आपण Nifty व Sensex मध्ये कोणत्या कंपन्या आहेत .यांची माहिती करून घ्यायला हवीय.
             आपण आतापर्यंत जे शेयर मार्केट मध्ये अगदी नवीन आहेत असे गृहीत धरून शेअर म्हणजे काय? इथपासून स्टॉक एक्स्चेंज ,त्यांच्या कामकाजाच्या वेळा, स्टॉक ब्रोकर कडून demat account काढणे व आज nifty व सेंसेक्स  म्हणजे काय हे पहिले. आता शेअर बाजारात जवळपास  ५००० स्टॉक किंवा शेअर कंपन्या आहेत यातील  नेमक्या कोणत्या  क्षेत्रातील स्टॉक या सेंसेक्स व निफ्टि साठी घेतले जातात. त्यांचे Watage कसे ठरवले जाते. ते नंतरच्या सत्रात पाहणार आहोत. ही अजून पायाभूत माहिती जरी असली तरी भविष्यात कोणताही स्टॉक घेताना ,विकताना हे ज्ञान अगदी कायम कामाला येणार आहे . Sensex , Nifty यात अजून काही माहिती हवी असल्यास कॉमेंट मध्ये जरूर विचार. एका वाचकाने Option ,Future ट्रेडिंग याविषयी अनुभव सांगा ही अपेक्षा व्यक्त केली आहे. यावर देखील चर्चा केली जाणार आहे.                              
                जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. अजूनही असे दिसत आहे वाचक आर्थिक साक्षर बनण्यासाठी उत्सुक नाहीत तर  असे करू नका. आज आपण आपला पैसा Mutual Fund मध्ये गुंतवून वर्षाला १८ ते २० टक्के परतावा मिळवताय पण जे आपला पैसा दुसऱ्याच्या हाती देऊन इतकी वाढ होत असेल तर आपण थोडे ज्ञान स्वत घ्यायला हरकत नसावी. थोडक्यात उंटावरून शेळ्या न राखता आपण काही रक्कम स्वत गुंतवायला सुरुवात करावी. मी केली------- करतोय नि अजून करणार आहे. ----- फक्त सामान्य माणूस पण खूप मोठी स्वप्न पाहू शकतो. नाही ती सत्यात उतरवू शकतो. एवडिच अपेक्षा . किसी को मिसाल बनते देखा होगा . आज हम सबको  मिसाल बनके दीखाना है. हे सगळ शक्य आहे फक्त एकेक पाऊल टाकत जाऊया एक दिवस नक्कीच आपण आर्थिक सक्षम बनू याची मला खात्री आहे.

   NIFTY FIFTY मधील Fiftees म्हणजे 50 कंपन्या कोणत्या आहेत कोणत्या क्षेत्रातील आहेत जे जाणून आपण हळूहळू गुंतवणूक सुरूकरायला हरकत नाही.या 50 कंपन्यांच्या माहितीसाठी क्लिक करा. 
                     
              

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area