Type Here to Get Search Results !

वाक्प्रचार vakprcharancha arth v vakyat upyog

  वाक्प्रचार : vakprchar arth v vakyat upyog 

                                 वाक्प्रचार हा व्याकरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. हा घटक इतका महत्वाचा आहे म्हणून तर स्पर्धा परीक्षा,पोलीस भरती ,आरोग्य खात्यातील भरती यातदेखील या घटकावर प्रश्न विचारला जातो. वाक्प्रचारावरून त्या विदयरट्याला भाषेची किती जान आहे याची कल्पना येते. आज आपण व्याकरण अभ्यासतील वाक्प्रचार हा घटक पाहणार आहोत. सर्वप्रथम वाक्प्रचार म्हणजे काय याचा अभ्यास करूया.
वाक्प्रचार वाक्यात उपयोग
वाक्प्रचार व वाक्यात उपयोग

वाक्प्रचार :(toc)

 कधी कधी भाषेत असे काही शब्दसमूह येतात त्यांचा शब्दश: अर्थ घेऊन चालत नाही.थोडक्यात मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो अशा शब्द समूहाला वाक्प्रचार म्हणतात.

 उदा. १. भारतीय सैन्यांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले.

     या वाक्यात कंठ – गळा

      स्नान – अंघोळ असा रूढ अर्थ घेऊन चालत नाही तर कंठस्नान घालणे – ठार मारणे

                       असा वाक्प्रचार येथे आला आहे. 

  २. बाबा रागावताच आई मूग गिळून बसली.

या वाक्यात मूग गिळणे याचा शब्दश: अर्थ घेतला तर त्या वाक्याचा बोध नीट होणार नाही म्हणून

                 मूग गिळणे - गप्प बसणे

                           असा अर्थ येथे घ्यावा लागतो 

 * वाक्प्रचारांचे महत्त्व *

 १.तेच तेच शब्द वापरुन भाषेत येणारा रटाळपणा कमी करण्यासाठी

 २.भाषा सदाबहार बनण्यासाठी

 ३.भाषा समृद्धीसाठी

 ४.स्पर्धा परीक्षा 

 ५. भाषा दमदार वाटण्यासाठी 

 उदा. १. भारतीय सैन्यांनी आतंकवाद्याना ठार मारले.  

          हे वाक्य तेवढे दमदार वाटत नाही त्याऐवजी

       भारतीय सैन्यांनी आतंकवाद्यांना  कंठस्नान घातले.

उदा.२. अनाथ अजयला मावशीने प्रेम दिले.       याऐवजी

           अनाथ अजयला मावशीने लळा लावला

      थोडक्यात वाक्प्रचारांना भाषेत विशेष महत्त्व आहे. म्हणून तर माध्यमिक स्तरावर परीक्षेमध्ये या घटकाला ४ गुण आहेत. जुन्या अभ्यासक्रमात या घटकावर वाक्प्रचारांच्या अर्थ सांगा, वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.वाक्प्रचार कंसात देऊन ते वाक्यात वापरा. अशा  विविध प्रश्नप्रकारापैकी एक किंवा दोन प्रकार विचारले जात होते. अलीकडे विद्यार्थ्यांना केवळ एकाच प्रकारे प्रश्न विचारले जातात. तो प्रश्नप्रकार पुढीलप्रमाणे... 

 * मूल्यमापन    

प्रश्न.बोर्डाच्या परीक्षेत आपणास ५ वाक्प्रचार विचारले जातात. यापैकी आपल्याला कोणत्याही २ वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करावा. लागतो. 

              गुण विभागणी

                       वाक्प्रचाराचा अर्थ – १ गुण

                        वाक्यात उपयोग - १

उदा. १. विचारपूस करणे – चौकशी करणे.

   आमच्या परिसरात चोरी झाल्याने पोलीस चौकशी करत होते.

      असे न करता वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करावा बरेच विद्यार्थी अर्थाचा उपयोग करतात व त्यांचा १ गुण जातो. 

    आमच्या परिसरात चोरी झाल्याने पोलीस विचारपूस करत होते. 

 २. कपाळाला आठ्या पाडणे – नाराजी व्यक्त करणे.

वाक्य :  राणीला कोणी काम सांगताच तिच्या कपाळावर आठ्या पडतात.

. पित्त खवळणे – खूप संतापणे.

वाक्य :  मुले आरडाओरड करीत होती हे पाहून आजोबांचे पित्त खवळले.

४. प्रतीक्षा करणे – वाट पाहणे.

 वाक्य :  मामाच्या गावी जायचे असल्याने आम्ही बस स्थानकावर बस येण्याची प्रतीक्षा करत होतो. 

५. धूम ठोकणे – पळून जाणे.

वाक्य : पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली. 

६. आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे. 

वाक्य: दहावीच्या परीक्षेत माझा शाळेत प्रथम क्रमांक आल्याने माझा आनंद गगनात मावत नव्हता.                     

७ .कसब दाखवणे – कौशल्य दाखवणे.

वाक्य : कोणताही खेळ असू खेळाडू त्यात आपले कसब दाखवतात. 

८. कानोसा घेणे – अंदाज घेणे.

 वाक्य : मी क्रिकेट खेळून घरी आल्यावर घरात वडील आहेत की नाहीत याचा कानोसा घेतो व मगच घरात जातो. 

९.कित्ता गिरवणे – सराव करणे.

वाक्य: गणिताचा अवघड भाग समजावा म्हणून मी त्याचा सतत कित्ता गिरवत असतो. 

१०.  गुडघे टेकणे – शरण येणे

वाक्य : शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे मुघल फौजांनी गुडगे टेकले होते. 

११. मन आतून फुलून येणे - मनातल्या मनात आनंद होणे. 

वाक्य : वर्गात शिक्षक कौतुक करतात त्यावेळी मन यातून फुलून जाते. 

१२. थक्क होणे - चकित होणे. 

वाक्य : बाबांनी मला वाढदिवसाला एक हजार रुपये दिल्याने मी तर थककच झालो. 

१३.कटाक्षाने टाळणे - आवर्जून टाळणे 

वाक्य : मंदिरात गेल्यावर बोलणे कटाक्षाने टाळावे. 

१४. आत्मसाद करणे - शिकणे 

वाक्य : एखादी नवीन कला आत्मसाद करावी लागते. 

१५ . दाद देणे - स्तुती करणे. 

वाक्य : गायकाचा आवाज ऐकून श्रोते टाळ्या वाजवून दाद देत होते. 

१६. देवाघरी जाणे- मरण पावणे. 

वाक्य : माझी आजारी बरेच दिवस आजारी होती ती सकाळीच देवाघरी गेली. 

१७ . कास धरणे - सोबत धरणे. 

वाक्य : प्रगती करायची असेल तर चांगल्या विचारांची कास धरायला हवी.  

१८.दंडया मारणे : गैरहजर राहणे 

वाक्य : शिक्षकांनी अभ्यास दिला की मुके दुसऱ्या दिवशी दंडया मारतात.  

१९. गगनभरारी घेणे -खूप प्रगती करणे. 

वाक्य : माझ्या मित्राने बालवैज्ञानिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून गगनभरारी घेतली.  

२०. लाडीगोडी लावणे - खुश करणे. 

 वाक्य : लहान भाऊ आईने पैसे द्यावेत म्हणून लाडीगोडी लावत होता.     

        अशा पद्धतीने सराव करून आठवणीने अर्थाचा वाक्यात उपयोग न करता त्या वाक्प्रचारचा वाक्यात उपयोग करावा. बोर्ड परीक्षेसाठी काही महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण टी वाक्प्रचारची वाक्ये बनवण्याचा सराव करावा. या वाक्प्रचारांचा नीट अभ्यास केल्यास चार पैकी चार गुण नक्की मिळतील. 

- सरावासाठी काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 

२१. इनाम मिळणे - बक्षीस मिळणे. 

२२. ध्यानात घेणे - लक्षात घेणे. 

२३. साकडे घालणे : विनंती करणे. 

२४. समरस होणे- एकरूप होणे. 

२५. पाठ फिरवणे - मदत न लरणे. 

२६. प्रतीक्षा करणे - वाट पाहणे. 

२७. तावडीत सापडणे - कचाट्यात सापडणे. 

२८. उमेदीने जगणे - जिद्दीने जीवन जगणे. 

२९. तगादा लावणे - एकच बाब पुनः पुनः विचारणे. 

३०. दाखवून देणे - सिद्ध करणे. 

३१. धडा देणे - शिकवण देणे. 

३२. डोळ्यातील पाणी पुसणे - सांत्वन करणे. 

३३. चित्र बदलून जाणे - स्वरूप बदलणे. 

३४. हातात हात असणे - सहकार्य असणे. 

३५. जीव खाणे - खूप त्रास देणे 

३६. पेवफुटणे - भरभरून मिळणे.

३७. हुक्की येणे - लहर येणे. 

३८. गुण्यागोविंदाने नांदणे - आंनंदाने राहणे. 

३९. ताव मारणे- भरपूर खाणे. 

४०. मुग्ध होणे - गुंग होणे 

४१. तुटून पडणे - हल्ला करणे. 

४२. माश्या मारणे - वेळ वाया घालवणे. 

४३. कान देऊन ऐकणे - लक्षपूर्वक ऐकणे. 

४४. तमा न बाळगणे - पर्वा न करणे. 

४५. डोक्यावर घेणे - खूप कौतुक करणे. 

४६. खस्ता खाणे - खूप हालअपेष्टा सोसणे. 

४७. आभाळ फाटणे - चारी बाजूने संकटे येणे. 

४८.डाव साधणे - संधी साधणे. 

४९. नाचक्की होणे - बदनामी होणे. 

५०. मन फुलून येणे - खूप आनंद होणे.

५१. अकलेचा कांदा असणे - अतिशहाणा  असणे . 

५२. ताव मारणे - भरपूर खाणे. 

५३. डोळ्यात भरणे - खूप आवडणे. 

५४. कपाळाला आठ्या पडणे - वैताग येणे ,राग येणे 

५५. तोंडसुख खाणे - रागावून वाटेल ते बोलणे. 

५६. धीर धरणे - संयम रखणे. 

५७. उपदेश करणे - सल्ला देणे. 

५८. कान देऊन ऐकणे - लक्षपूर्वक ऐकणे. 

५९. जीव लावणे - प्रेम करणे , लळा लावणे. 

६०. वावड्या उठणे - अफवा पसरवणे. 

६१. अंतरंग घायाळ होणे- प्रचंड दुख वाटणे. 

६२. आवर घलणे - स्वतावर बंधने घालणे. 

६३. तमा न बाळगणे - पर्वा न करणे. 

६४. मुहूर्तमेढ रोवणे - आरंभ करणे,सुरुवात करणे. 

६५. विद्रोह करणे - विरोध करणे.  

           वरील सर्व वाक्प्रचारांची नीट तयारी केल्यास या घटकाचे पैकीच्या पैकी गुण मिळतील . पाठ्यपुस्तकाचे वचन करताना ते वाक्य कोणत्या संदर्भात आले आहे यावरून वाक्प्रचार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास जास्त पाठांतर करावे. लागत नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area