सुख म्हणजे काय | Sukh Mhanje Kay
सुख म्हणजे नक्की काय असते ? याचा प्रत्येकजण शोध घेत असतो याचाच भाग म्हणून की काय याच नावाची एक मालिका सध्या खूप गाजत आहे. नक्की सुख म्हणजे काय असते? हे जाणण्यासाठी मी देखील वेड्या आशेने ही मालिका पाहायला सुरुवात केली. जेणेकरून सुख म्हणजे नक्की काय ? ते कळेल पण त्यातील पात्रे पाहून तर अजूनच गुंता वाढला कारण त्यात कोण सुख अनुभवत आहे हे दिसलेच नाही तर उलट त्यातील पात्रे एकमेकांना त्रास देण्यात मश्गुल दिसली. लबाड वागताना दिसली.
सुख म्हणजे काय? |
अस म्हणतात माणसाच्या मनात आले तर तो काहीही करू शकतो. समजा एखादा मजुर आहे व तो दिवसाला पाचशे रुपये कमावतो. त्याने ठरवलेआजपासून एक हजार रुपये कमवायचे . काही होवो त्याने मनाचा निग्रह केला व तो विचार करू लागला . त्याच्या लक्षात आले यार मला रीक्षा चालवता येते माझ्या मित्राची रीक्षा आहे तो सकाळी १० वाजता घराच्या बाहेर पडतो तर मग त्याला काही पैसे देऊन सकाळी कामावर जाण्याआधी सकाळी ६ ते ९ मी रिक्शा चालवली तर त्यातून मला काही रुपये मिळतील. त्याने याची अंमलबजावणी केली . या तीन तासात त्याला किमान ३०० रुपये अजून मिळू लागले. आता त्याला फक्त अजून २०० रुपये कमवायचे आहेत मग एक हजार रुपये मिळवण्याचा त्याचा उद्देश्य सफल होईल. यावर तो अजून तो विचार करू लागला . त्याच्या डोक्यात नवीन कल्पना आली कामावरून ४ वाजता घरी येताना लोकल मध्ये १ तास वेळ असतो या वेळात लोकांना भूक लागलेली असते यांना मी आपला ग्राहक बनवतो .रात्री झोपताना तो खारे शेंगदाणे बनवून त्याच्या पुड्या बांधू लागला यातून त्याला अजून २०० रुपये मिळू लागले. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मला हे सांगायचे आहे की माणसाने ठरवले तर तर तो कितीही शारीरिक श्रम करू शकतो. अशक्य ते प्रयत्नाच्या जोरावर शक्य करू शकतो.हेच ज्याच्याशी संबंधित सुख आहे तिथे होईल का ? समजा मला आज शांत झोप हवीय, अस आपण ठरवले व झोपण्याचा प्रयत्न केला तर उलट नको नको ते विचार मनात येतात. झोप लागतच नाही. लांब कशाला मी शिक्षक आहे व मला सकाळी शाळेत जावे लागते. समजा मला ११ वाजले तरी झोप आली नाही मला तनाव येतो. उद्या लवकर उठायचे आहे म्हणून मी उगीच झोप आणण्याचा प्रयत्न केला तर उलट झोप आणण्याच्या तानात ११ चे १२ वाजतात पण झोप काही येत नाही. या प्रसंगात झोप हेच माझ सुख समजू तर ते मला भेटले का ? नाही ना.
आपले शरीर कायम सुखासाठी आसुसलेले असते पण नेमके तेच आपल्याला मिळत नाही. माझ्याजवळ बँकेत काही लाख रुपये आहेत. याचा आनंद घ्यायचा ते सोडून व्यक्ती लाखाचे करोड कसे बनतील असा विचार करत बसतो. मला एक छानसे घर आहे तर अजून एक असते तर ते मी भाड्याने दिले असते व अजून एक Income Source मिळाला असता असा विचार करत बसतो. एक गरीब श्रीमंत माणसाला पाहून विचार करत असतो की मी इतका श्रीमंत असतो तर किती बरे झाले असते. याउलट एक उद्योगपती माणूस त्याच्याच कंपनीतील कामगाराकडे पाहून विचार करतो हा किती खुश आहे. ८ तास काम केले घरी गेल्यावर आराम . माझ तसे नाही माझ्या धंद्यात जर कोणी स्पर्धक आला तर माझा धंदा बंद पडणार. थोडक्यात तुझ आहे तुझपाशी .. असे हे सुख आहे .
आपल्याला कायम सुखाच्या बाबतीत एक वाटत असते ते म्हणजे सर्व जग सुखी आहे केवळ माझ्याजवळ ते नाही या खोट्या धारणेत आपण जगत असतो. म्हणूनच विचारमंथन करावेसे वाटले. सुख म्हणजे नेमके काय असते. आज मला देवाने दोन हात, दोन पाय दिलेत . थोडक्यात मी शरीर संपन्न आहे .एखाद्या अंध व्यक्तीला विचारा तुझ्यासाठी सुख म्हणजे काय ? तो सांगेल की भगवंताने ही इतकी सुंदर सृष्टी निर्माण केलीय पण मला ती पाहता येत नाही, तर माझ्यासाठी मला दृष्टी म्हणजेच डोळे हवे होते हेच खरे सुख. ज्याला पाय नाहीत,ज्याला वाचा नाही ,जो बहिरा आहे ,ज्याला बुद्धी नाही अश्या अनेकांना विचारा सुख कश्यात आहे. हीच उतरे मिळतील . की आमच्याकडे जे अपंगत्व आहे ते नको होते.थोडक्यात आपल्याकडे आहे ते पाहता यायला हवेय.
थोडक्यात काय तर सुख मिळवायची बाब नाहीच मुळी तर ती मानण्यावर आहे. ज्याला दोन डोळे आहेत त्याने ज्याला एक डोळा आहे त्याच्याकडे पहावे मग समजेल की तो किती सुखी आहे . ज्याला एकच डोळा आहे त्याने पूर्ण अंध व्यक्तीकडे पहावे. मग समजेल त्याला तर हे सुंदर विश्व एकदा देखील पहायला मिळाले नाही. मी किमान एका डोळ्याने तरी हे जग पाहत आहे. तात्पर्य माझ्याकडे काय नाही हेच पाहत बसलो तर सुख दिसणारच नाही तर माझ्याकडे काय काय आहे याचा आपण विचार केला तर समजेल की मी किती सुखी आहे.सुख हे भौतिक गोष्टींवर अवलंबून नाही.
आज ज्याच्याजवळ प्रचंड पैसा आहे. त्याला आपल्याला कोण संपत्तीसाठी जीवे मारील की काय ? याची भीती असते तर तर मोल मजुरी करून खाणारा मात्र रात्री घोरत पडतो त्याला उद्याची चिंता नसते. पुन्हा तोच मुद्दा की सुख ही मानण्याची गोष्ट आहे. जनमाणसात वावरत असताना जाणवते की एखाद्या गरिबाच्या घरी जा तो आपला पाहुणचार चांगला करतो पण तेच आर्थिक सधन व्यक्तीकडे जा तो कायम काटकसर करताना दिसतो. थोडक्यात काय तर जो केवळ लक्ष्मीच्या मागे लागला म्हणजे पैशाच्या मागे लागला त्याला सुख म्हणजे नारायण कधी भेटत नाही.पण जो आहे तितुके देवाचे या न्यायाने वागू लागला तर त्याला काही कमी पडत नाही. हे वास्तव आहे . देव आहे की नाही या विषयावर मला बोलायचे नाही . मला एवढेच म्हणायचे आहे समोर एक पाण्याने भरलेला अर्धा ग्लास आहे तो पाहून जो बोलला अरे वा ! अर्धा ग्लास भरलेला आहे याने माझी तहान भागेल तर तो सुखी माणूस. नि जो बोलला अर्धा ग्लास तर रिकामच आहे याचा अर्थ हा दुखी माणुस. सांगण्याचा मुद्दा असा की जे आपल्याजवळ आहे त्याकडे सकारात्मकतेने पाहता येणे याला सुख म्हणतात. शिक्षण जर आपण मनाने समाधानी तरच घेऊ शकतो.
चला तर मग रडगाणे बंद करून सुख म्हणजे काय असते ? हे कोणाला विचारत बसण्यापेक्षा आता हा लेख वाचताना जे तुम्हाला जाणवले ते म्हणजे सुख.रडत बसण्यापेक्षा माझ्याजवळ काय काय आहे याची यादी बनवा मग समजेल की मी किती सुखी आहे. आजपर्यंत आपण त्या कस्तुरी मृगासारखे वेडयागत धावत होतो. जसे ते सुगंधाच्या शोधात धावत होते पण थकून बसल्यावर त्याला कळले हा सुगंध तर माझ्या च बेंबीतून येतोय. अगदी सुखाचे पण तसेच आहे तर कोणा दुसऱ्यात पाहू नका स्वतमध्ये पहा .मग कळेल सुख म्हणजे नक्की काय असते .. मलाही कळले नव्हते. आज वयाच्या चळिशीच्या उंबरठ्यावर हे गुपित मला कळले .नि ते तुम्हाला सांगण्याची संधी मला मिळाली. या सुखांबाबत अजून तुमची काही निरीक्षणे असतील तर कॉमेंट्स मध्ये अगदी बिनधास्त कळवा.शिक्षण जर मनापासून घेतले तर तो सुखी होण्याचा मार्ग आहे.
तुमच्याशी मी कोणत्या विषयावर मंथन करावे ते ही कळवा .दिल्याने वाढते म्हणतात. मी माझे अल्प ज्ञान ,अनुभवाची शिदोरी द्यायला आलोय. तुम्ही देखील लिहिते व्हा बोलते व्हा .... कदाचित हे पण सुखच आहे की कोणाला कायतरी देणे.... आज जगात तंत्रज्ञानाची क्रांती झाली आहे पण जोडीला गरज आहे विचाराच्या क्रांतीची . नुसते मांडून चालणार नाही तसे वागूया . पुन्हा नक्की भेटूया एका नवीन विषयासह . 👍
पंढरीची वारी हा एक वेगळाच अनुभव आहे बरे यावर्षी वारीला वारकरी जाणार आहेत. वारीचा सोहळा याविषयी माहितीसाठी जरूर क्लिक करा.
अतिशय सुंदर आणि मार्मिक लेखन सर
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाआजकालच्या मोबाईल युगात मग्न झालेल्या लोकांसाठी हा लेख डोळे उघडण्याचे काम करेल. काही लोकांना आपला मोबाईल म्हणजे पण सुख वाटत आहे. पण खरंच सुख म्हणजे नक्की काय हे लेख वाचल्या नंतर समजले सुख फक्त अपेक्षा ठेवण्यात किव्हा ते पूर्ण करण्यात नसून जे आपल्या जवळ आहे त्यात खरे सुख आहे.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखुप छान भाषेत समजावून सांगितले,, धन्यवाद
उत्तर द्याहटवा