Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची शिक्षण विभागात अंमलबजावणी 1 मे 2022 पासून | Maharashtra Lokseva Adhiniyam Shaley Shikshn Vibhagala 1 May 2022 Pasun Lagu

  लोकसेवा हक्क कायदा 2015 व शिक्षण विभाग | loksevaa adhiniyam 2015 v shikshan vibhag 

                      महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयामार्फत 18 एप्रिल 2022 रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला एक अधिसूचना काढण्यात आली असून या आधिसूचनेनुसार संबंधित क्षेत्राला विविध सेवा विहित वेळेत पुरवाव्या लागतील. विविध शासकीय विभाग म्हणजे प्राधिकरणे यांना 2005 पासूनच तसे आदेश आहेत. शालेय शिक्षण विभाग पण या कार्यक्षेत्राखाली आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आदेशीत करण्यात आले आहे.1 मे 2022 पासून या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची आमलबाजवणी व्हावी असे आदेश देण्यात आले आहेत.या अधिनियमनुसार शिक्षण विभागातील कोणकोणती माहिती किंवा सेवा मिळवण्याचा अधिकार व्यक्तीला मिळणार आहेत हे पाहण्या अगोदर आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नेमका काय आहे? हे थोडक्यात समजून घेऊया. 

महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015
महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015(toc)

| Maharashtra Loksevaa Hakk Adhiniaym 2015 

                 नागरिकांना पारदर्शित समयोचित लोकसेवा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने जो अधिनियम काढला तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2025 होय. या अधिनियमाची 28 एप्रिल 2015 पासून अमलबजावणी सुरू झाला या अधिनियमा मागचा मुख्य हेतू हाच आहे की लोकाना कोणतेही क्षेत्र असो त्यातील सेवा वेळेत मिळाल्या पाहिजेत कारण तो त्याचा हक्क आहे. कधी कधी आप[ण पाहतो काही कार्यालयातून विनाकारण दिरंगाई सारखी प्रकरणे शासन दरबारी जात होती .यावर कायदेशीर उपाय व सामान्य लोकांची हेळसांड,पिळवणूक ,वेळ व आर्थिक बचत व्हावी. तसेच ती सेवा प्राप्त करण्यासाठी नकळत काही व्यक्ती आर्थिक अफरातफर यासारख्या बाबी घडत होत्या याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा अध्यादेश काढला असून हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. 

                  थोडक्यात सेवा प्राप्त करणे हा नागरिकच हक्क आहे व ती सेवा देणे त्या विभागाची जबाबदारी आहे अशा उदात्त भूमिकेतून हा अधिनियम पारित करण्यात आला.शिक्षण विभागाला देखील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत काही सेवावेळेत पुरवणे बंधनकारक झाले आहे. या सेवा पुरवत असताना एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आह. जर या यंत्रणेकडून जाणीपूर्वक कसूर झाली तर संबंधित व्यक्तीला किमान पाचशे रुपये ते कमाल पाच हजार रुपये दिरंगाई झाल्याबद्दल दंड आकारला जाऊ शकतो.

लोकसेवा अधिनियम शिक्षण विभागात अंमलबजावणी | loksevaa adhinyam amalbajavni 

             एक मे 2020 पासून महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला देखील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आच्या अंतर्गत राहून सेवा पूर्वा लागतील या सेवा पुरवण्यासाठी संबंधित कार्यालयातील प्रमुख व्यक्तीस पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे जसे की शाळा - मुख्याध्यापक. पदनिर्देशित अधिकारी यांनी विनाकारण दिरंगाई केल्यास त्यांनंतर प्रथम अपीलीय त्यांनी सेवा न पुरवल्यास द्वितीय अपीलीय अधिकारी अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. लोकसेवा पुरवण्यासाठी विहित कालमर्यादा म्हणजे किती दिवसांच्या आत ही माहिती संबंधित व्यक्तीला पुरवावे लागेल याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात काय तर यापुढे आपल्याला विद्यार्थ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या सेवा उचित वेळेत मिळण्यासाठी मदत होईल. अगदी प्राथमिक शिक्षणापासून  ते कनिष्ठ महाविद्यालय पर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

          या आधीनियमामुळे विद्यार्थी, पालक तसेच या प्रक्रियेत असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांना मिळणारे लाभ किंवा सेवा उचित वेळेत मिळतील.असे असले तरी या सेवा पुरवत असताना शिक्षक,मुख्याध्यापक तसेच प्रशासकीय अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची जबाबदारी वाढली आहे. या आधिनियमानुसार ज्या काही ठराविक सेवा पुरवायच्या आहेत त्यातील ठळक बाबी व त्या किती दिवसात पुरवाव्यात यांची माहिती घेऊया.

सर्वसाधारणपणे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक विद्यालय यांचे प्राचार्य यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणजे त्या कार्यालयाचा प्रमुख या नात्याने माहिती देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आले आहे. चला तर मग कोणत्या सेवा किती दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे यांचा आढावा घेऊया. 

 विद्यार्थी लाभाच्या सेवा |:(प्राथमिक,माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालये,अध्यापक महाविद्यालये )

1.बोनाफाईड प्रमाणपत्र | Bonafied Certificate

         विद्यार्थी किंवा पालकांनी बोनाफाईड प्रमाणपत्राची मागणी केल्यास पदनिर्देशित अधिकाऱ्याला जसे की मुख्याध्यापक  किंवा प्राचार्यांना ही माहिती सात दिवसांच्या आत  विहित अर्ज केलेल्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे. या दिरंगाई झाल्यास व्यक्ती प्रथम अपीलीय अधिकार्‍याकडे अर्ज करू शकते. 

2. शाळा सोडल्याचा दाखला | school leaving certificate

               बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला विहित वेळेत न मिळाल्याने विविध अभ्यासक्रमांना प्रवेश  घेताना अडचणी येतात. कधीकधी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश देखील मिळत नाही म्हणूनच संबंधित व्यक्तीने विहित अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत शाळा सोडल्याचा दाखला त्या व्यक्तीला मिळायला हवा अशी तरतूद या अधिनियमानुसार करण्यात आली आह.

3. द्वितीय गुणपत्रिका | duplicate result (bord exam वगळून)

            एखाद्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका हरवले असल्यास  त्या विद्यार्थ्याने द्वितीय गुणपत्रिका मिळावी यासाठी अर्ज केल्यास सात दिवसाच्या आत ती गुणपत्रिका  देणे बंधनकारक आहे. 

4. दाखल्यावरील प्रती स्वाक्षरी | Dakhlyavr Swakshri

                 ही जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षण निरिक्षक, प्रशासकीय अधिकारी  यापैकी जे संबंधित असतील त्यांना जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर शिकण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या लागल्यावर एका दिवसामध्ये प्रति स्वाक्षरी देणे गरजेचे आहे. 

5.दहावी, बारावी, खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी व आवेदनपत्रे | Khahjgi Aavedne

                  संबंधित विभागीय मंडळामार्फत  मंडळामार्फत जो कालावधी दिला गेला असेल क्या कालावधी मध्येच त्या कालावधी मध्येच ती भरली गेली पाहिजेत. 

6. विद्यार्थ्यांची जात, जन्मतारीख यातील बदलाबाबत | jat ,janmtarik Badal

              संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, मुंबई क्षेत्राकरता शिक्षक निरीक्षक यांनी जास्तीत जास्त 7 दिवसाच्या आत ही सेवा पुरवणे बंधनकारक आहे. 

7. राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान | Rajiv Gaandhi Anudan

                       संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी,माध्यमिक साठी  मुंबई क्षेत्रासाठी शिक्षण निरिक्षक यांनी 15 दिवसाच्या आत ही सेवा पुरवणे बंधनकारक आहे. 

                  वरील सर्व सेवा विद्यार्थी लाभाच्या आहेत याच बरोबर शिक्षण विभागाशी संबंधित असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनादेखील लाभाच्या काही सेवा किती दिवसात मेळाव्यात याबाबत तरतूद करण्यात आली आहेत. 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लाभाच्या सेवा | Shikshk Labahchya Seva

                     शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनादेखील काही विहित सेवा वेळेत न मिळाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामध्ये सध्या कार्यरत असणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या देखील सेवांचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील काही ठळक बाबी आपण पाहूया. 

1.वेतन पथकास वेतन देयके सादर करणे | Vetan Patrka Babt

                   बरेचदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांचे वेतन यांचे वेतन वेळेवर होत नव्हते याचीच दखल म्हणून या कार्यालयाच्या प्रमुखावर दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन पथकाला मासिक वेतन देयक सादर करणे बंधनकारक आहे.

2. कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी बाबत | Bhavishy Nirvah Nidhi

                    संबंधित खाते प्रमुखांनी भविष्य निर्वाह निधी अग्रिम/ ना परतावा/ अंतिम प्रदान यासारख्या बाबी सात दिवसाच्या आत वेतन पथकास सादर करणे. 

3.कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी मंजूरी आदेश Nirvah Nidhi

              खाते प्रमुखांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक वेतन यांनी 21 दिवसाच्या आत आवश्यक ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. 

4. सेवा पुस्तिका पडताळणी| Seva Pustk Pdtalni

                 संबंधित लेखाधिकारी यांनी 30 दिवसांच्या आत सेवा पुस्तिका पडताळणीची कामे करणे अपेक्षित आहे. 

5. प्रभारी मुख्याध्यापक मान्यता | Prbhari Manyata

                     संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग मुंबई साठी शिक्षण निरिक्षक यांनी सात दिवसाच्या आत प्रभारी मुख्याध्यापक मान्यता द्यावयाची आहे. 

6. शिक्षक समायोजन | Shikshk Samyojan

                     संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई साठी शिक्षण निरीक्षक यांनी 15 दिवसाच्या आत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  जे अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन करावे. 

  7.  शालार्थ माहिती अद्ययावत करणे | shaalarath mahiti adyyavt karane

                         ही जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यावर सोपविण्यात आलेले आहे तीन दिवसाच्या आत ही माहिती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. 

                    वरील बाबींबरोबरच इतरही अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या बाबी महत्त्वाच्या आहेत त्यांचाच येथे आवर्जून उल्लेख केलेला आहे. या लोकसेवा अधिनियम मुळे शिक्षण विभागाला एक वेगळे वळण लागलेल्या आपणास दिसेल. विद्यार्थी पालक याचबरोबर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या लाभाच्या सेवा वेळेत मिळाल्यामुळे विद्यार्थी,पालक,कार्यरत तसेच निवृत्त कर्मचारी नक्कीच खुश होतील.ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी ही विनंती. माहिती कशी वाटली कमेन्ट मध्ये नक्की कळवा.


18 एप्रिल 2022 रोजीचा अध्यादेश पाहण्यासाठी क्लिक करा


https://drive.google.com/file/d/1vS81O90x-7f3A-GWsyx9NGrDKvVC5lPC/view?usp=drivesdk

 

                                                          

                                  


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वेळेत कामे पूर्ण होणे खूप महत्वाचे आहे. सुजाण नागरिक व तत्पर शासन यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सनदशीर मार्गाने पूर्ण करायला हव्यात.

    👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. सदरील शासन परिपत्रक कुठे मिळेल

    उत्तर द्याहटवा
  3. सदर लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा.

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area