अभ्यास कसा करावा | Abhyas kasa karava
अभ्यास कसा करावा |
अभ्यास करताना घ्यावयाची दक्षता:(toc)
1. अभ्यासाची जागा | Place Of Study,Abhyasachi Jaga
विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना आज एका ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी असे न करता अभ्यासासाठी एक निश्चित अशी जागा निवडावी. मुद्दा छोटा आहे पण महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहतो बरेच विद्यार्थी कधी टीव्ही पाहताना कधी सोप्यावर कधी खुर्चीत अभ्यास करताना दिसतात असे करू नये तर अभ्यासासाठी एकाच जागेची निवड करावी शक्य नसल्यास एखाद्या दिवशी बदल झाला तरी चालेल.
2.अभ्यासाची वेळ | Study Time, Abhyasachi Vel
आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहावा यासाठी अभ्यासाची ज्या पद्धतीने जागा निश्चित केली त्याच पद्धतीने अभ्यासाची वेळ देखील निश्चित असावी. अनेक अभ्यासकांच्या मते पहाटे केलेला अभ्यास आपल्या जास्त लक्षात राहतो म्हणून शक्यतो पहाटे अभ्यास करावा.अभ्यास करत असताना त्याची निश्चित अशी वेळ ठरवली पाहिजे. समजा रात्री नऊ ते अकरा पहाटे पाच ते सकाळी सात. जी तुम्हाला शक्य असेल ती वेळ ठरवावी मात्र ती निश्चित असावी.
Salary अकाउंट काढण्याचे हे फायदे माहिती आहेत का?
3.अभ्यासाचा कालावधी | Duration Of Study,Abhyasacha Kalavdhi
आपण जो अभ्यास करतो त्यासाठी आपण जागा निश्चित केली.अभ्यासाचा वेळ ठरवला त्यानंतर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मी किती वेळ अभ्यास करणार ? बरेच विद्यार्थी अभ्यासाला बसतात आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अभ्यास बंद करतात. मानसशास्त्र सांगते आपले मन स्थिर व्हायला किमान दहा मिनिटे लागतात त्यानंतरच आपण जो अभ्यास करतो तो लक्षात राहतो. म्हणून अभ्यासाचा कालावधी किमान दोन तासांचा तरी असावा मधेच खूप थकवा आला तर दोन तीन मिनिटांची विश्रांती घ्यावी. काही पालक विद्यार्थ्यांना सलग पाच तास - सात तास अभ्यास करायला लावतात हे मानसशास्त्रनुसार चुकीचे आहे. अभ्यास जास्त वेळ करावा पण मध्ये काही मिनिटांची विश्रांती नक्की असावी थोडक्यात अभ्यासाचा कालावधी ठरवून घ्यावा.
ऑनलाईन फसवणूक कशी होते जाणून घ्या व सावध बना
4. मनाची स्थिरता | Stability Of Mind, Man Sthir v Abhyas
एखाद्या दिवशी आपले मन स्थिर नसेल मनात असंख्य विचार येत असतील त्यावेळी सर्वप्रथम आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. मन स्थिर नसेल मनात नको नको ते विचार येत असतील तर आपण वाचलेला भाग किंवा अभ्यास आपल्या लक्षात राहणार नाही त्यासाठी मन स्थिर असावे. मन स्थिर होत नसेल तर एखादे छानसे गाणे ऐकावे , काही क्षण डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष ठेवावे यांनी देखील आपले मन स्थिर होऊ शकते.जसे की विपश्यना सांगण्याचा मुद्दा हा की अभ्यास करताना मनाची स्थिरता अतिशय महत्वाचे आहे.
5. शांततापूर्ण वातावरण | Atmosphere Pasibale ,Abhyas V Shantata
अभ्यास करत असताना आपल्या आजूबाजूचे वातावरण शांततापूर्ण असावे. वातावरण शांततापूर्ण असेल तर आपण वाचलेला भाग आपल्या ध्यानात राहतो. यासाठीच की काय खेडेगावातील मुले घरात अभ्यास न करता शेतामध्ये, झाडाखाली किंवा एखाद्या मंदिरात ज्या ठिकाणी शांततापूर्ण वातावरण आहे त्या ठिकाणी अभ्यास करतात थोडक्यात अभ्यास आणि शांतता यांचा खूप जवळचा संबंध आहे.
6. वर्तनावर नियंत्रण| behavior centrol
बरेच विद्यार्थी अभ्यास करताना नखे कुरतडणे, पेन्सिल तोंडात घालनणे , कागदाचे कपटे करणे अशा बाबी करत असतात थोडक्यात त्यांच्या वर्तनावर त्यांचे नियंत्रण नसते. अभ्यास करताना आपले आपल्या वर्तनावर नियंत्रण असावे.
वरील ज्या बाबी आपण पाहिल्या त्या बाबी अभ्यास करण्यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यावी आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे असावे? यासंदर्भात आहेत आता यापुढे जी आपण चर्चा करणार आहोत ती अभ्यास पद्धतींची. अभ्यास करण्याच्या कोण कोणत्या पद्धती आहेत यांची माहिती पुढील प्रमाणे -
अभ्यास करण्याच्या पद्धती | Types Of Study,Abhyas Karnyache Prakar
1.पाठांतर | pathantar
आपल्या शिक्षण प्रणालीत पाठांतर किंवा घोकंपट्टी ही पद्धती सर्वांना परिचित आहे. पाठांतर म्हणजे का.? तर जो घटना आपल्याला अभ्यासायचा आहे तो वारंवार म्हणणे, किंवा तोंडपाठ करणे होय. या पद्धतीत एखादी व्याख्या किंवा एखादा प्रश्न सतत सतत उच्चारला जाऊन पाठ केला जात. काही प्रश्नांचा अभ्यास करताना ही पद्धती फायदेशीर आहे परंतु दीर्घोत्तरी प्रश्न सोडवतान., प्रश्नांची उत्तरे मोठी असतात त्यावेळी ती जशीच्या तशी पाठ करणे म्हणजे विनाकारण मेंदूला तान दिल्यासारखे आहे. त्यासाठी कोणती पद्धत अवलंबावी याची माहिती पुढील मुद्यांमध्ये येईलच तुर्तास वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करीत असताना जसे की भरताची राजधानी -दिल्ली अशा प्रश्नांची तयारी करताना पाठांतर पद्धती वापरायला हरकत नाही पण आवर्जून सांगावेसे वाटते की अभ्यासाची हि एकमेव पद्धती आहे असे नाही. study technique
2. सराव | Practice,Sarav Padhti
अभ्यासाच्या या पद्धतीमध्ये एखादा घटक लक्षात राहण्यासाठी वारंवार त्याच प्रकारची उदाहरणे सोडवली जातात. गणितासारख्या विषयात सराव पद्धती अतिशय कामाला येते . पण हा सराव करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. बरेच विद्यार्थी एकाच प्रकरणाचा सतत सराव करताना दिसतात या सरावात त्यांचा वेळ तर जातोच पण इतर प्रकरणे दुर्लक्षित राहतात. विज्ञाना सारख्या विषयात आकृत्या काढणे , बीजगणित सारख्या विषयात आलेख काढणे यांची तयारी या सराव पद्धतीद्वारे करावी.
3. उजळणी| Review, UJalnitun Abhyas
उजळणी म्हणजे आपण वाचलेल्या भागाला उजाळा देणे म्हणजेच तो भाग पुन्हा आठवण पाहणे. आपण केलेला अभ्यास विसरू नये यासाठी उजळणी अतिशय गरजेचे आहे. असं म्हणतात आपण एखादा घटक वाचला किंवा तो पाठ केला तर चोवीस तासाच्या आत त्याची उजळणी केली नाही तर 70 टक्के भाग आपला मेंदू विसरून जाण्याची शक्यता असते. तसेच जर वाचलेला घटक पुन्हा वाचलाच नाही तर तीन महिन्यात 90 टक्के भाग हा आपल्या लक्षात राहत नाही किंवा तो विस्मरणात जातो यावरून तुमच्या ध्यानात आले असे.अभ्यासात उजळणीला किती महत्त्व आहे. सांगण्याचे तात्पर्य अभ्यास किती केला हे महत्त्वाचे नाही तर केलेला अभ्यास किती लक्षात राहिला? हे महत्वाचे आहे. तो लक्षात राहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचे वेळापत्रक बनवा त्याच्या नोंदी ठेवा वारंवार त्याची उजळणी ujlani करा.
4. मुद्दे काढण्याची सवय | Note To Point Mudde Kadha
इतिहास, भूगोल यासारख्या विषयांचा अभ्यास करताना एखादा घटक अभ्यासत असताना मुद्दे काढण्याची सवय लावा. मुद्दे काढल्यामुळे मोठ्या प्रश्नांची तयारी अतिशय छान प्रकारे होते. त्या मुद्द्यांची स्पष्टीकरणे त्या मुद्द्याला अनुसरून लिहिता येऊ शकतात परीक्षकांना देखील हेच अपेक्षित आहे आपण नोटस , गाईड यातील भाग जसाच्या तसा पाठ केला कर बॅड इम्प्रेशन पडत असते. यासाठी मुद्दे काढण्याची सवय लावावी जसे की mudde kse kadahvet
उदा. खेळाचे महत्व
- शरीर लवचिक
- काटकपणा
- आत्मविश्वास वाढतो
- नेतृत्व गुण
- खिलाडू वृत्ती
- मन आनंदी
5. चिंतन | Concerns, Abhyas Aani Chintan
रात्री झोपण्यापूर्वी टीव्ही मोबाइल पाहत असू तर झोपण्या आधी ज्या बाबी पाहिल्या याच बाबी आपल्या मेंदूत घोळत राहतात समजा आपण मोबाईलवर एखादी गेम खेळलो तर तसेच आभास आपल्याला झोपेत स्वप्नात होत असतात म्हणून रोज रात्री झोपताना आज आपण दिवसभरात कोणत्या घटकाचा अभ्यास केला त्याचे चिंतन करा. जर मुद्दे काढले असतील तर ते मुद्दे नजरेखालून घाला.नकळतपणे ते तुमच्या कायम स्मरणात राहतील. यालाच चिंतन chintan म्हणतात ही देखील एक छान पद्धत आहे.
6. लेखन |Writing ,Likhantun Abhyas
ही एक अभ्यासाची महत्वाची पद्धती आहे बरेच विद्यार्थी लिखाणाचा कंटाळा करतात पण असे करू नका. असं म्हणतात तीन वेळा वाचणे व एकदा लिहिणे बरोबर असते. थोडक्यात एखादी व्याख्या, मोठ्या प्रश्नांचे मुद्दे वारंवार हाताखालून गेल्यास म्हणजेच त्याचे लेखन केल्यास तो भाग आपल्या ध्यानात राहतो..लेखन या अभ्यास पद्धती मुळे आपला लिखाणाचा सराव तर होतोच त्याच बरोबर लिखाणाचा वेग देखील वाढतो म्हणून अभ्यास करताना वही आणि पेन यांचा वापर जास्तीत जास्त करावा.
7. ध्येय | Aim Of Study Abhyasache Dhey Thrva
कोणतेही काम करताना ध्येय नसेल तर त्या कामाला अर्थ नाही . अभ्यासाला बसण्यापूर्वी आज मी काय शिकणार आहे याचा विचार करून अभ्यासाला बसा म्हणजे छोटे ध्येय समोर ठेवा.समजा मी आज इतिहासाचा पहिला पाठ अभ्यासात आहे तर मला स्वाध्यायातील अमुक प्रश्न सोडवता आले पाहिजेत.असे ध्येय ठेवूनच अभ्यासाला बसा. अशी छोटी छोटी ध्येय ठेवून दर दिवशी तुम्ही अभ्यासाला बसला तर हळूहळू सगळ्या बाबी तुम्हाला साध्य होतील यात शंका नाही.
8. की वर्ड्स | Key Words Mahtvache Shabd Lakshat Theva
अभ्यास करत असताना की वर्ड्स म्हणजे महत्वाचे शब्द लक्षात ठेवणे. जसे की एखादी व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी त्यातील महत्वाचे शब्द बाजूला काढणे व त्या शब्दांवरून व्याख्या बनवणे असे केल्यास न लक्षात राहणाऱ्या व्याख्या देखील पाठ होऊ शकतात.
9.आद्याक्षरे लक्षात ठेवणे |first letter rimind
एकादा प्रश्न पाठ करत असताना त्याचे जे मुद्दे असतील त्याची पहिली अक्षरे लक्षात ठेवून ते अक्षर आठवताच तो मुद्दा आठवणे म्हणजे अद्याक्षरे यांच्या मदतीने अभ्यास करणे होय.
जसे की
ज.- जखमी सैनिक ,
वि- प्रचंड वित्तहानी
अशी aadyakshre lihinyane आद्याक्षरे लिहिण्याने अवघडात अवघड घटकदेखील आपल्या ध्यानात राहू शकतो.
10. आकलन | grasping technique
एखादा घटक अभ्यासण्यापूर्वी तो आकलन करून घ्या म्हणजे समजून घ्या असे केल्यास विज्ञान सारख्या विषयात फिरवून किंवा application base प्रश्न तुम्ही नीट सोडवू शकता.
11.टिपणे बनवणे | notes
जो भाग समजला, पाठ झाला ,ज्याचा अभ्यास झाला तो भाग वगळून काही घटक असे असतात ते किती वाचले तरी विसरतात त्यांची वेगळी टिपणे किंवा नोंदी घेतल्यास परीक्षे आधी एक नजर मारल्यास अवघड ,किचकट भाग पण आपल्या ध्यानात राहील. tipne kadha
उदा. रासायनिक अभिक्रिया,अवघड सूत्रे इत्यादि
अभ्यास पद्धतीचे सार | Abhyas Padhti Sar
वरील अभ्यासाची तंत्रे किंवा पद्धती अभ्यासल्या नंतर तुमच्या लक्षात आले असेल की कितीतरी पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो पण आपण केवळ घोकंपट्टी किंवा पाठांतर एकच एक पद्धती अवलंबून ढोर मेहनत करतो म्हणजेच Donky Work करतो ते न करता smart work केले पाहिजे. म्हणजेच अभ्यासाची एकच एक पद्धती न वापरता तो घटक कोणता आहे, आपण अभ्यास करतो तो विषय कोणता आहे? प्रश्न कशा प्रकारचा आहे या सगळ्यांचा विचार करून वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आपण वापरल्या पाहिजेत. असे केले तर सहाजिकचआपला अभ्यास परिपूर्ण होईल. अभ्यास तर सगळेच करतात पण परिपूर्ण अभ्यास तोच विद्यार्थी करू शकतो ज्याला या सर्व अभ्यास पद्धतींची माहिती आहे.चला तर मग या नवीन अभ्यास पद्धती अभ्यास करताना वापरूया.अभ्यास करताना या पद्धती वापरूया अजून एक जरतुम्ही अभ्यास करताना काही छान उदाहरणे आढळल्यास आपली इयता, विषय व तो घटक व तुम्ही वापरलेली अभ्यास पद्धती यांची माहिती कमेंटमध्ये जरूर टाका.तुमची काही हटके पद्धत असेल तर ती देखील सांगा. असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. मी ही माहिती आपणापर्यंत पोहोचवली आपणही ही माहिती आपले मित्र मैत्रिणी यांना नक्की पाठवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.
हे झाले अभ्यास कसा करावा याबाबत पण आपण शिक्षण नेमके कशासाठी ?घेतो हे जाणून घ्यायला आवडेल तर मग फक्त खालील अक्षरांवर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/03/why-education-is-necessary.html
आमचे हे लेख वाचा
जिद्द हवी दहावी नापास पण आज महिन्याला 1 लाख पगार जरूर वाचा
परीक्षेला येणारा प्रश्न शिक्षक दिनाची बातमी बनवा