Type Here to Get Search Results !

दहावी भूगोल पाठ्यपुस्तकाची तोंडओळख |Dahavi Bhugol Pustkachi Olakh

 दहावी भूगोल विषयाची तोंडओळख | dahavi bhugol vishyachi tond olakh 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दहावी भूगोल पाठ्यपुस्तकाची  तोंडओळख करून घेणार आहोत. 

      दहावीचे वर्ष हे सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे.कारण हे वर्ष प्रत्येकाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देणारे वर्ष आहे.आजचे युग स्पर्धेचे युग आहे आणि जर आपल्याला या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर जास्तीत जास्त गुण संपादन करून आपले आपले एक वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत, मित्रांनो आत्ता तुम्ही सर्वजण नुकतेच  दहावीत पदार्पण करत आहात. सुरुवातीपासूनच तुम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यायची आहे. पण म्हणतात ना ,शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चला तर मग आपणही या म्हणीचा वापर आपल्या अभ्यासात करूया व जास्तीत जास्त मार्क्स मिळवूया

भूगोल विषयाची तोंडओळख
भूगोल विषयाची तोंडओळख

                                समाजशास्त्र या विषयांतर्गत आपण भूगोल या विषयाचा आढावा घेणार आहोत.  आपल्या निरीक्षण शक्तीला वाव देणारा असा हा विषय. भूगोल विषयाच्या प्रत्येक पाठाचा थोडक्यात परिचय  आपण करून घेणार आहोत, जेणेकरून धड्याचे नाव आपल्या डोळ्यासमोर येताच  आपल्याला त्या पाठात कशाचा अभ्यास करायचा आहे ?याचा अंदाज येईल. भूगोल हा विषय इयत्ता दहावी मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. आपण दहावीच्या भूगोल  विषयांमध्ये दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार  आहोत. कोणत्याही दोन गोष्टींची तुलना केल्यास त्या गोष्टी आपल्या जास्त लक्षात राहतात, म्हणूनच  आपण ज्या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत ते दोन देश म्हणजे पहिला आहे भारत आणि दुसरा आहे ब्राझील.दोन्ही देश विकसनशील देश आहेत.चला तर मग करुया सुरुवात करूया.
                        भूगोलच्या पाठ्यपुस्तकात एकूण 9  पाठांचा समावेश करण्यात आला आहे

पाठांचा परिचय(toc)

1)  प्रकरण 1 ले क्षेत्रभेट | Kshetra Bhet 

          या पाठात आपण क्षेत्रभेट म्हणजे काय ?क्षेत्रभेटीचे महत्त्व, नियोजन आणि अहवाल लेखन कसे करावे या बाबींचा अभ्यास करणारा आहोत. क्षेत्रभेट ही भूगोलाच्या अभ्यासातील एक एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे जेणेकरून क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थी आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करतील व तेथील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. व आपण मिळवलेल्या माहितीचे संकलन कसे करावे हे त्यांना अहवाल लेखनातून समजेल.प्रत्यक्ष अनुभवातून भूगोल शिकन्याची संधी म्हणजे हा पाठ आहे.

2)  प्रकरण 2 रे स्थान - विस्तार | Sthan V Vistar 

                हा पाठ दुसरा. या पाठात आपण भारत व ब्राझील या दोन देशांचे जगाच्या नकाशातील स्थान पहाणार आहोत, अक्षवृतीय व रेखावृतीय  विस्तार जाणून घेणार आहोत.हे स्थान नि या देशाला मिळालेली भूमी ,किनारे यांचा अभ्यास करणार आहोत. 

3) प्रकरण 3 रे प्राकृतिक रचना व जलप्रणाली  | Prakrutik Rachana V Jalprnali 

              या पाठात आपण भारत व ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक विभागांचा व जलप्रणालीचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.विद्यार्थी मित्रांनो हा पाठ दहावीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वाचा असून जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे हा पाठ जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर पाठ्यपुस्तकातील पुढील सर्व धडे तुम्हाला व्यवस्थित समजतील याची खात्री आहे. म्हणून सर्वप्रथम भारत व भारताचे प्राकृतिक विभाग तसेच ब्राझील व ब्राझील प्राकृतिक विभाग हे लक्षात ठेवा व या पाठाचा जास्तीत जास्त अभ्यास करा तुमच्या नकाशा वाचन व नकाशा भरा या प्रश्नांसाठी हा धडा अतिशय उपयोगी ठरणारा आहे.

4) प्रकरण 4 थे हवामान | Havaaman 

         प्रस्तुत पाठात आपण भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा तसेच हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आणि त्याच बरोबर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हवामान हा धडा समजावून घेताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक देशाची हवामान हे त्या देशाचे स्थान व विस्तार यावर अवलंबून असते पृथ्वीगोलावर त्या देशाचे स्थान कुठे आहे? यावरून त्या देशाचे हवामान  ठरत असते. हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा म्हणजे तापमान. तापमानावर आधारित असते ते त्या ठिकाणचे हवामान व हवामाना वर आधारित असते त्या ठिकाणचे पर्जन्य.

5) प्रकरण 5 वे नैसर्गिक वनस्पती व प्राणी | Naisrgik Vanspti V Prani 

            या पाठात भारत व ब्राझील या देशांमधील नैसर्गिक वनस्पती जीवन व त्यावर आधारित असणाऱ्या प्राणी जीवनाचा आपण तौलनिक अभ्यास करणार आहोत . भारतातील व ब्राझील मधील वनांचे वेगवेगळे प्रकार ,वनांची वैशिष्ट्ये व त्या वनांमधील वृक्ष व त्या वनांमध्ये आढळणारी वेगवेगळे प्राणी जीवन यांचा अभ्यास करणार आहोत. 

6)प्रकरण 6 वे लोकसंख्या | Loksankhya

       नैसर्गिक संसाधन प्रमाणे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे लोकसंख्या लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे घटक त्या देशांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीवर परिणाम करतात म्हणूनच आपण भारत व ब्राझील या दोन देशातील लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचा विविध वैशिष्ट्ये अभ्यास करणार आहोत. भारत  व ब्राझील मधील लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येची रचना यांची तुलनात्मक माहिती या पाठात अभ्यासणार आहोत .विद्यार्थी मित्रांनो हा  पाठ अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, एखाद्या देशाची प्राकृतिक रचना जशी असते त्याप्रमाणे त्या देशाचे हवामान व पर्जन्य असते व ज्या ठिकाणचे हवामान मानवी जीवनासाठी अनुकूल असते त्या ठिकाणी लोकसंख्येचे वितरण दाट आढळते व हवामान प्रतिकूल असेल तर  लोकसंख्येचे  वितरण विरळ  आढळते .लोकसंख्येची रचना पाहता ना तसेच सरासरी आयुर्मान साक्षरतादर यांचाही भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत

7)प्रकरण 7 वे मानवी वस्ती | Manvi Vasti 

          प्रस्तुत पाठात भारत व ब्राझील दोन देशांमधील मानवी वस्ती विकास व नागरीकरण  याच्यामधील  साम्य व भेद शोधणे तुम्हांला शक्य होईल . लोकसंख्येच्या वितरणावर आधारित ती मानवी वस्ती . मानवी वस्तीचे केंद्रित व विखुरलेल्या लोक वस्ती याच्यातील फरक आपण या पाठात पाहणार आहोत .
त्याचबरोबर भारत ब्राझील व ब्राझील या दोन देशांमध्ये नागरीकरणाचा वेग याचाही अभ्यास करणार आहोत.

प्रकरण 8 वे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय | Artvyavstha Aani Vyavsay 

      अर्थव्यवस्था हा घटक प्रत्येक देशासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे .प्रत्येक देशातील राष्ट्रीय उत्पन्न ,दरडोई उत्पन्न यावरून त्या  देशाची अर्थव्यवस्था किती बळकट आहे हे समजत असते  प्रस्तुत  पाठात आपण भारत ब्राझील व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचा यांच्या अर्थव्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.
रस्त्यावर अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक म्हणजे त्या देशातील उद्योगधंदे व व्यापार म्हणूनच भारत व ब्राझील या दोन देशांमधील वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे व्यापार यांचे वितरण कसे झाले आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत .

9) प्रकरण 9 वे  पर्यटन,वाहतूक व संदेशवहन| Parytn ,Vahtuk V Sandeshvahhan 

         पाठ्यपुस्तकातील हे शेवटचे प्रकरण .या पाठात भारत व ब्राझील या देशांमधील पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन यांची माहिती अभ्यासणार आहोत. समजण्यास  अतिशय सोपा असणारा हा पाठ आपल्याला नक्कीच  चांगले मार्क्स मिळवून देईल. वाहतुकीच्या साधनात स्वस्त व महाग वाहतूक कोणती तेही समजणार आहे. 
        चला तर मग करुया सुरुवात अभ्यासाला व भूगोल सारख्या सोप्या विषयात 40 पैकी 40 गुण  मिळवूयात .
                       केल्याने होत आहे रे.
                      आधी केलेची पाहिजे.

              या उक्तीप्रमाणे कामाला लागुया नि आपले भविष्य उज्वल बनवूया. वर्षभरात आपण भूगोल विषयाचा अभ्यास करताना अमुक घटना घडली तर ती का घडली याचा शोध बोध म्हणजे भूगोल विषय होय. नकळत वैज्ञानिक दृष्टी विकसित करणारा हा विष.य आहे. पूर्ण वर्षभरात या विषयाची परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत.फक्त जे लेख नियमित येत राहतील त्यांचे वारंवार वाचन करून सर्वच विषय गळी उतरवा. स्वप्न मोठी बघा नि ती सत्यात येण्यासाठी प्रयत्न देखील मोठेच करा.मनात तीव्र तळमळ असेल तर काहीच अशक्य नाही. नंतरच्या लेखात पहिले प्रकरण अभ्यासूया. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area