Type Here to Get Search Results !

आय पी ओ म्हणजे काय? Ipo Mhanje Kay V Lic Ipo

आयपीओ म्हणजे काय | Ipo Mhanje Kay Lic Ipo  

         शेअर मार्केट मध्ये जे लोक नवीन आहेत त्यांच्या कानावर पडणारा एक शब्द म्हणजे विविध कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ.तर आज आपण आयपीओ म्हणजे काय?What Is Meaning Of Ipo ?हे पाहणार आहोत. आपण पाहिले शेअर बाजारात  Bse आणि Nse या स्टॉक एक्स्चेंज पाच हजारच्या आसपास  कंपन्या लिस्टेड आहेत.पण या कंपन्या या Bse किंवा Nse वर नेमक्या येतात कश्या?यातच तुम्हाला आयपीओ म्हणजे काय ? याचे उत्तर मिळू शकते.Ipo Marathi Mahiti पाहूया. 
          आपल्याला शेअर्स विकत घेत असताना या हजारो कंपन्यांमधूनच  शेअर्स विकत घ्यावे लागतात. तरी या कंपन्या शेअर्स बाजारात प्रवेश करतात याचा नि आयपीओचा जास्त जवळचा संबंध आहे. ज्यावेळी एखादी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असते म्हणजे त्या कंपनी मध्ये काही मोजक्या लोकांचे  भांडवल असते व नफा देखील मोजक्याच लोकाना मिळत असतो. कधी कधी त्या कंपनीला आपले भागभांडवल वाढवून व्यवसाय वाढवायचा असतो ,विस्तार करायचा असतो  यासाठी अधिकच पैशाची गरज असते हा पैसा म्हणजे भांडवल उभे करण्यासाठी अनेक कंपन्या  सेबीकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करतात. आपल्या व्यवसाय,आर्थिक स्थिती विषयी माहिती देणारी आवश्यक ती कागदपत्रे देऊन आपली कंपनी पब्लिक लिमिटेड करावी अशी मागणी करतात. आणि हे सर्व करत असताना एखादी कंपनी शेअर बाजारात अचानक कसा प्रवेश करणार ?त्यासाठी जी प्रणाली असते ती म्हणजे आयपीओ?

ipo म्हणजे काय
ipo म्हणजे काय 

आय पी ओ म्हणजे काय ? | Ipo Kay Asto 

            आयपीओ म्हणजे काय एखादी कंपनी शेअर बाजारात पहिल्यांदा येणे म्हणजे आयपीओ होय. या आय पी ओच्या माध्यमातून कंपन्या Bse व Nse वर लिस्ट होत असतात.मग त्यांची नियमित खरेदी विक्री सुरू होते. 

शेअर्स आणि आयपीओ यामध्ये फरक | Sher Aani Ipo Yatil Farak 

          शेयर विकत घेणे आणि Ipo विकत घेण्यात काही फरक आहे का?तर आहे त्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे शेअर्स आपल्याला हवे तेवढे घेता येतात जसे की मला एक शेअर हवा असल्यास एकही घेऊ शकतो किंवा अधिक देखील घेऊ शकतो.पण Ipo चे तसे नसते कंपनी शेयर बाजारात प्रवेश करताना काही लॉट ठरवते जसे की 15 चा 1 लॉट तर आपल्याला पूर्ण लॉट खरेदी करावा लागतो.तो मिळण्यासाठी लॉटरी पद्धत असते. 

आयपीओ खरेदीची प्रक्रिया | Process Buying Of Ipo, Ipo Kasa Kharedi Krava 

              ज्या कंपनीला स्टॉक मार्केट मध्ये प्रवेश करायचा आहे ती कंपनी सेबिकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करते.Ipo विक्रीला येण्याआधी त्या कंपनीची आर्थिक ताळेबंद वर्तमानपत्रातून प्रकाशित केले जातात.  त्यानंतर किती शेअर विकले जाणार,कोणाला विकले जाणार? म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार,त्या कंपनीचे कामगार,मोठे गुंतवणूकदार,फॉरेन इन्वेस्टर असा सगळा व नियमात बसणारा विचार करून ते ठरवले जाते.हे करत असताना कंपनी आपली Price Band ठरवत असते.
          जसे की Lic ने 902 ते 949 ही ठरवली आहे. आपण आयपीओ विकत घेण्यासाठी आपल्याला 902 ते 949 यामधील रक्कम ठरवून ऑनलाइन माहिती भरावी लागते.पैसे भरले नि ipo मिळाला असे होत नाही लॉटरी द्वारे Ipo मिळत असतात. ऑनलाइन Apply करण्यासाठी साधारण तीन ते चार दिवसांचा अवधी मिळत असतो. यानंतर अमुक आयपीओ कोणाला लागला ते लॉटरी द्वारे कळते.हे कळल्यानंतर ज्याना Ipo लागत नाही त्यांचे त्यांनी भरलेले पैसे Dmat Account ला परत येत असतात व ज्यांना लागला त्यांच्या Demat खात्यात ते जमा होतात तदनंतर ते त्याची खरेदी विक्री करू शकतात. 
               थोडक्यात नवीन कंपनी Bse ,Nse वर येण्याची सर्व प्रक्रिया म्हणजे ipo होय. चला तर मग आयपीओ मधील गुंतवणुकीचे काही काही फायदे आहेत का ते पाहूया. 

आयपीओ चे फायदे | Ipo Khrdiche Fayde 

1 जास्तीत जास्त नफा | Jastit Jast Nafa ipo 

            आपण जर इन्वेस्टर असू तर आपण एखादा शेयर विकत घेतल्यानंतर त्यात वाढ होण्यासाठी कित्येक वर्ष वाट पहावी लागते.पण एखादा आयपीओ लिसटेड झाल्यानंतर ते कधी कधी issu price च्या डबल दराने लिस्ट होतात. थोडक्यात आयपीओ ची प्रोसेस 15 ते 20 दिवसांची असते या कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. 

2. नवा स्टॉक खरेदीची संधी | Navin Stok Kharedichi Sandhi 

                एखादी नवीन कंपनी आहे. तिचा व्यवसाय तेजीत आहे ती अजून मोठे होऊ पाहत आहे यावेळी आपण तिचा आयपीओ घेतला व काही वर्षे ते स्टॉक गुंतवणूक म्हणून ठेवले तर प्रचंड फायदा होतो म्हनुन आयपीओ खरेदी करावेत पण कंपनीची माहिती देखील मिळवावी. 

3. बाजारातील सकरात्मकतेचा फायदा | Jast Fayda 

            आयपीओ बाजारात येताना त्याविषयी एक सकारात्मक वातावरण होत असते. आपल्याकडे जे जास्त भांडवल असेल व ते आपण आयपीओ मध्ये गुंतवले तर ती कंपनी लिस्ट होताच किमान 10 ते 15 टक्के नफा मिळण्याची शक्यता नाकरता येत नाही. 
            थोडक्यात जास्तीत जास्त नफा तो ही अल्प कालावधीत करून घेता येऊ शकतो तो आयपीओ च्या माध्यमातून. 

आयपीओ खरेदीचे तोटे | Ipo Khredi Krnyache Tote  

1.खोटी सकारात्मकता | Khoti Skaratmkta

               कधी कधी एकादी कंपनी आयपीओ च्या माध्यमातून स्टॉक मार्केट मध्ये येताना प्रसारमाध्यमे ,youtub वरुन कधी कधी आभासी सकारात्मकता केली जाते. प्रचंड जाहिरात केली जाते नि listed होताना तो आयपीओ प्रचंड Minus होतो. जी बाब Paytm च्या बाबत झाली . अनेक गुंतवणूकदार याचे बळी पडले. 

2.प्रचंड नुकसान | Prchand Nuksaan 

            कधी कधी आयपीओ ला प्रतिसाद मिळत नाही. गुंतवणूकदार नव्या कंपनीवर विश्वास ठेवत नाहीत हीच नकारात्मकता बाजारात असेल तर आणि असा आयपीओ आपण घेतला तर प्रचंड नुकसान होऊ शकते.
        वरील फायदे तोटे विचारात घेतल्यावर  आपण आता आपण नेमकी कोणती खबरदारी आयपीओ घेताना घ्यावी ते पाहूया. 

आयपीओ घेण्यापूर्वी हे करा |Ipo Ghenyapurvi HeKra 

1.कंपनीचा व्यवसाय | Kmapni Buisness  

                 आपण जो आयपीओ घेणार त्या कंपनीचा Buisnes काय आहे?सध्या किंवा भविष्यात त्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता किती आहे याचा देखील विचार करावा. 

2. कंपनीची आर्थिक स्थिती  | Economic  Condition 

              कंपनी स्टॉक मार्केट मध्ये कधी कधी कर्जाचा बोजा झाल्यानंतर आम्ही अमुक अमुक आमचा हा प्लान आहे अशी बतावणी करतात.यासाठी केवळ जाहिरतबाजी न पाहता Actual आर्थिक बाबी पाहून मगच त्या आयपीओ बाबत विचार करावा. 

3.अधिक रक्कम | Adhik Rakkam

            जास्त नफा मिळावा म्हणून खूप मोठ्या लॉट by म्हणजे खरेदी केले व समजा listed होण्या आधी काही नकरात्मकता आली तर आपण त्याचे बळी पडू म्हणून एखादा लॉट खरेदी करावा. 

4. caal चे बळी | phon call che bli

             कधी कधी काही नफा मिळतो पण आपण कोणाचे तरी एकूण अजून वाढेल या आशेने विकण्याचा विचार करत नाही आणि याचा तोटा आपल्याला होऊ शकतो हे नक्की. 

5.सुरुवातीच्या काळात किमतीत वाढ अचानक घट | Achank Vadh V Ghat  

         कधी कधी स्टॉक लिसटेड झाल्यानंतर आपण पाहतो की तो खूप वेगाने वर तर वेगाने खाली येतो यासाठी मला कीती नफा हवा आहे?किती Loss झाल्यावर मी Position सोडणार हे आधी ठरवून ठेवावे.
              आज आयपीओ म्हणजे काय? आयपीओ कसा  खरेदी करावा? लॉटरी पद्धत व आयपीओ अशी सर्व माहिती तसेच आयपीओ घेण्याचे फायदे व तोटे ते कोणती खबरदारी घ्यावी अशी बेसिक माहिती आपण पहिली.आता आपण Lic च्या आयपीओ बाबत माहिती पाहूया. ते पाहण्याआधी Lic विषयी थोडे जाणून घेऊया

एल. आय. सी. आय पी.ओ. | Life Insurance Corporation Of India 

        Lic म्हणजेच भारतीय जीवन बिमा किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळ.ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारतात ज्या छोट्या मोठ्या 245 विमा कंपन्या होत्या त्यांचे एकत्रीकरण करून एलआयसी कायद्याद्वारे एलआयसी कंपनीची 1956 साली स्थपणा करण्यात आली.या कंपनीचा कारभार प्रचंड मोठा आहे. सध्या एलआयसी केवळ विमाच नहवे  तर Mutual Fund ,Home loan यात देखील गुंतवणूक करताना दिसत आहे.या कंपनीवर आजही 100 टक्के मालकी भारत सरकारची आहे. ही कंपनी आयपीओ च्या माध्यमातून केवळ साडे तीन ते चार टक्के समभाग विक्री करणार आहे.यातून एलआयसी ला 21 हजार करोंड भाग भांडवल उभे करायचे आहे. 

Lic आयपीओ साठी अर्ज करण्याच्या तारखा 

                     Lic आयपीओ साठी 4 मे ते 9 मे या दरम्यान ऑनलाइन Apply करायचे आहे. 

Lic Ipo लॉट मधील शेर  | Lic Lot Quanityty 

                  एलआयसी आयपीओ मध्ये 15 स्टॉक/शेयर  चा 1 लॉट आहे.आपण जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचे लॉट खरेदी साठी Apply करू शकतो. 

lic प्राइस बॅन्ड | Lic Price Band

              एलआयसी ने आपल्या आयपीओ ची 902 ते 949 ही price band पक्की केली आहे . अर्ज करताना या दरम्यान असणारी मागणी किमत आपण टाकू शकता. श्यकतो 949 याच दराने अनेक लोक Apply करतात

Lic धारकांना सूट | Poliy Holder Yanaa Sut

                  जे Lic स्टाफ आहेत त्यांना प्रती शेयर 45 व जे पॉलिसी धारक आहेत त्यांना 60 रुपये सूट देण्यात आली आहे.जास्तीत लोकांचा प्रतिसाद तसेच आपल्या ग्राहकांना याचा फायदा मिळावा यासाठी ही तरतूद आहे. 

एलआयसी आयपीओ Apply करण्यापूर्वी हे नक्की वाचा 

               Lic ही विमा क्षेत्रातील नंबर एकची कंपनी आहे केवळ आपण आयपीओ खरेदी करणे चुकीचे आहे तर या आयपीओ च्या काही सकारात्मक बाबी व काही नकारात्मक बाबी पहिल्या तर आपण काही एक निर्णय घेऊ शकतो.

lic ipo सकारात्मक बाबी |  Lic Ipo Skaratmk Babi

                   ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. लोकांचा या कंपनीवर प्रचंड विश्वास आहे.भारत सरकारची ही कंपनी असल्याने सरकार यासाठी विशेष प्रयत्न करत असते.कोरोंना महामारीने लोकांना विमा क्षेत्राचे महत्त्व कळले आहे.

काही नकारात्मक बाजू | Lic Nkaratmk Baju 

              सरकारी कंपनी privet लिमिटेड का बनत आहे ? विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत. Over All विचार करता विमा व्यवसाय अलीकडे 7 टक्के ने खाली आलेला आहे.gray मार्केट मध्ये केवळ हा आयपीओ खूप कमाई करून देईल असे संकेत नाहीत.लोकांची भयग्रस्त मानसिकता.मोठा आयपीओ मात्र Paytm सारखे झाले तर ? जागतिक मंदी,शेर बाजारात न तेजी ना मंदी अशी मधली अवस्था याचा देखील विचार केला पाहिजे.कोरोना काळात भीती मुळे अनेकणी policy काढल्या आता अजून किती ग्राहक वाढतील यात साशंक या काही नकारात्मक बाबी आहेत.मागील दोन वर्षांपेक्षा एलआयसीला मिळालेला नफा कमी दिसत आहे. या नकरात्मकतेचा परिणाम आयपीओ वर होऊ शकतो.
                या सगळ्या बाबी असल्या तरी काही एक सारासार विचार करून निर्णय घ्या किंवा लिसटेड होऊ द्या काय चित्र ते पहा.व मग आयपीओ पेक्षा काही स्टॉक बी करा नि lic मध्ये इन्वेस्टर बना किंवा खूप Groth दिसली तर Swing Trading करा. म्हणजे काही दिवस ठेवा नफा मिळताच squre ऑफ करा. एकच स्वत अभ्यास करा. कारण जेनहवा व्यवसाय म्हणून आपण शेयर मार्केट कडे पाहू तरच आपण यशस्वी होऊ. 
                   आजच्या या लेखात अगदी खोलात न जाता Ipo म्हणजे काय?तो घेण्याचे फायदे व तोटे.तसेच Lic Ipo ज्यासाठी 4 मे पासून Apply करायचे आहे त्याबाबत माहिती या लेखातून दिली आहे.पुन्हा भेटूया काही असे स्टॉक घेऊन की जे डोळे झाकून By केले पाहिजेत. खरेदी केले पाहिजेत.अधिक माहितीसाठी कमेन्ट करा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.    

                   शक्यतो IPO च्या भानगडीत न पडता NIFTI  FIFTY तील काही स्टॉक सिलेक्ट करून त्यात दीर्घ कालीन गुंतवणूक करा. रोपट्याचा वटवृक्ष एका दिवसात होत नाही. nifty तीळ स्टॉकच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

    https://www.dnyanyogi.com/2022/03/nifty-50-stock-information-marathi.html                                   
     
                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area