आमचे वाबळे गुरुजी maze aavdte shikshk
आमचे वाबळे गुरुजी |
या लेखातील वर्णने त्यातील अनुभव काल्पनिक आहेत पण या सगळ्यातून माणसाचे स्वभावातील वैविध्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे. कोणाला जर असे वाटले ------- हे माझ्या विषयी आहे तर तो योगायोग समजावा.तर आज मी आमच्या वाबळे गुरुजी यांच्या विषयी बोलणार आहे. mazi shala
आजही जरी मी कामानिमित किंवा शिक्षक म्हणून मुंबई सारख्या मायावी नगरीत असलो तरी इथल्या शाळा पाहिल्यानंतर मला आठवते ती माझी कौलारू शाळा.पूर्वी आता सारखी बालवाडी कुठे होती? ,जन्मदाखला तरी कुठे होता. डोक्यावरून हात कानाला पोहोचला की पहिलीला नाव घेतले जायचे. मी अंदाजे साडे पाच ते सहा वर्षांचा असेल.माझे भाऊ म्हणजे माझे वडील मला सायकलवर बसवून आमच्या घरापासून १ ते दीड किलोमीटर दूर असलेल्या शाळेत घेऊन गेले.मला शाळेत जायची जेवडी आवड होती त्यापेक्षा जास्त भीती वाटत होती .कारण माझ्यापेक्षा मोठी मुले शाळेत काय शिकवले जाते? यापेक्षा गुरुजीनी बदडले कसे ? हेच सांगत असयची.
एके दिवशी भाऊ मला शाळेत घेऊन गेले.वर्गात गेलो तर गोरे गोमटे , जाड जुड, सफेद नेहरू शर्ट व पायजमा घातलेले एक गृहस्थ दिसले.भाऊ त्याना बोलले पोराला शाळेत टाकायचे आहे. गुरुजीनी मला जवळ बोलावले व त्यांनी माझा एक हात पकडून कानाला लागतो का ते पहिले व भाऊणा सांगितले याचे नाव दाखल करून घेतो. आमच्या आळीतली मोठी पोर लांबून पाहत होती पण जवळ कोणी आले नाही. मला कळून चुकले हे हे वाबळे गुरुजीना मूल का घबरतात ते . चौतीला असणारा दादू मला बोलता बोलता बोलला होता. एका मुलाने शाळेत मारामारी केली नि गुरूजीनी फटका लगावताच त्याची चडी ओली झाली.मला कानाला हात लावताना ते सगळे आठवले व मी घामाघुम झालो. धाक असतो ते अनुभवणारी आपली पिढी म्हणजे शेवटची पिडी म्हटल तरी चालेल. नाहीतर आज गुरुजी कायद्याने पुरा बांधून टाकला. छडी लागे छम छम विद्या येई घमघम आता राहिलेच नाही. मी कसाबसा घाबरत घाबरत कानाला हात लावला.
गुरुजी भाऊना याचे पूर्ण नाव सांगा म्हटल्यावर भाउनी त्यांचेच पूर्ण नाव सांगितले. याला घरी काय म्हणता ? अस विचारताच भाऊ बोलले.ह्याला वहय मी बज्या म्हणतो. गुरुजी बोलले आस कूट नाव असत का?भाऊ बोलले तुम्हीच ठेवा कायतरी नाव. तुमच्या ह्यानी . गुरुजी विचारत पडले व ते हजेरी बुकात बाकी पोरांची नाव पाहू लागले.जेणेकरून दुसऱ्या कुणाचे ते नाव नसावे असे नाव त्यानं हवे होते. हे मला खूप उशिरा कळले.गुरुजी बोलले याचे नाव प्रशांत ठेऊ, नंतर जन्मतारीख पण अंदाजे टाका बोलले. गरूजीनी नामकरण केलेला बहुधा मी पहिला विद्यार्थी असावा म्हणून आजही तुमचे नाव प्रशांत का ठेवले? हा विषय आला की मला माझे वाबळे गुरुजी आठवतात.
दुसऱ्या दिवशी पासून शाळेत एक खपराची पाटी ,डबा व पेन्सिलीसाठी ५ पैसे व गोळ्या खायला ५ पैसे असा पहिळा १० पैशाचा पॉकेट मनी घेऊन मी शाळेत निघालो. आळितील ५ ते ७ मुला मुलींचे टोळके निघाले. मी त्यांच्यात सर्वात लहान . वस्ती सोडून काही अंतर गेल्यावर दोन्ही बाजूनी ऊसाची शेते लागली,की ती मोठी मूल ठरवून जोरात पळत सुटली. मी जाम घबरलो पुढे जायचे तर भीती व माघारी घरी गेलो तर आई मारणार अशी सगळी गडबड. मी मागे न बघता त्या मुलांच्या मागे पळत सुटलो. मला आजही कळले नाही मला घाबरवून त्यांना काय मिळाले असेल? रोज काही दिवस हे रडणे नि पळत सुटणे सुरूच. काही दिवसांनी मी आता घाबरत नाही म्हटल्यावर आम्ही सगळे सोबत जायला यायला लागलो. म्हणजे माझ्या मैत्रीणीनी मला त्रास नाही दिला तर माझा भित्रेपणा घालवला . हे सगळ आज कळत आहे त्या लहान वयात ती समज नहवतीच.
मी दररोज शाळेत जाऊ लागलो . अ ,आ इ किंवा १ ,२ जमेल तस काढू लागलो. गुरुजी सकाळी हजेरी घेऊन आम्हाला अभ्यास द्यायचे व चौतीच्या मुलांना शिकवायला जायचे. कीती वेगळा काळ होता आम्ही पहिली ते चौती एकाच वर्गात नि एकाच गुरुजींच्या हाताखाली शिकलो. आज मुलाना प्रतेक विषयाला शिक्षक पण मूल काही शिकत नाही हे वास्तव आहे. माझी शाळा नि गुरुजी यांची भीती कमी होऊ लागली.मी दुसरीला गेलो अभ्यासतील प्रगती जरा बरी झाली. भाऊ घरी अभ्यास घेत काही नाही आले तर चोप पण मिळायचा.पण का कुणास ठाऊक मार खायला लागू नये म्हणून केलेला अभ्यास आता आवडू लागला व सहाजिकच मी गुरुजींचा आवडता विद्यार्थी बनायला लागलो.गुरुजी चौथीच्या वर्गात गेले की मला मोठ्याने वाचायला सांगत याचे मला खूप कौतुक वाटायचे.
अजून एक प्रसंग आज मला अजूनही आठवतो मी तिसरीला असेन , रक्षाबंधनच्या दूसरा दिवस मला सक्की बहीण नसल्याने राखी कोणी बांधलीच नाही. बाकी मुले अगदी आनंदात हातातील राख्या एकमेकाना दाखवत होती.माझा हात मात्र सुना सुना होता हे आमच्या वाबळे गुरुजींनी बरोबर हेरले.माझी उदासी त्याना जाणवली व त्यांनी त्यांच्या हातातीळ बांधलेली भली मोठी राखी माझ्या इवल्या हातावार बांधली . तेवढी मोठी राखी दुसऱ्या कुणाकडेच नहवती . सगळी मूल मधल्या सुट्टीत माझी ती राखी पाहू लागली.हा दिवस माझ्या जीवनातील सगळ्यात अविस्मरणीय दिवस. आजही ती राखी नि माझे आवडते गुरुजी नजरे समोरून हटत नाहीत.
मला आठवते ,आमच्या शाळेत दुपारी १ ची वेळ झाली की गणपत नावाचे गृहस्थ दररोज यायचे. गुरुजी व त्यांच्यात अनेक गप्पा होत अगदी गावापसून देशात काय सुरू याच्या वर्तमानपत्र वाचत गप्पा रंगत. मी पुस्तकात डोके तरी त्यांच्या गप्पा मला ऐकायला आवडत त्या वयात मला इतक काही कळत नव्हते . पण तरी गप्पा मात्र आवडत होत्या.आमचे वाबळे गुरुजी खूप छान होते ते शहरात राहत म्हणून त्यांच्या मुलांसाठी उस म्हणा अंडी म्हणा अगदी आवडीने मुलांना आणायला सांगत . त्या घरून आणताना आम्हाला ते ओझ किंवा काम वाटतच नहवते उलट मी मी अशी भंडणे होती. खर किती भारी काळ होता. गुरूजीनी काम सांगणे मोठेपणाचे वाटायचे . आज शाळेत शिकवत असताना आजच्या मुला त तो आज्ञाधारकपणा दिसत नाही. मूल वेगळीच वागताना दिसतात. असो काळ बदलत आहे.
अजून एक राहिलेच की चौथीला असताना आमच्या गुरुजीनी जे शिवाजी महराज शिकवले ते आजही लक्षात आहेत. इतिहास अभिनयासह शिकवत.शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला हा भाग शिकवताना तर आमचे गुरुजीच शिवाजी झालेत असे वाटायचे . तो उत्साह त्या उतार वयात गुरुजींकडे होता तो आज माझ्या तरूनणपणात देखील मला जाणवत नाही.
आज जरा मागे वळून पाहताना मला सगळ्यात लक्षात राहिले ते वाबळे गुरुजी . अध्यापन करताना त्यात कसे रंगून जाव, विद्यार्थी दुखी हे पाहून त्याला राखी पाहून त्याची बहीण बनावे, तर कधी रजिस्टर ला प्रशांत नाव देऊन माझी आईसुद्धा बनावे. आज Technosavy,प्रयोगशील ,हुशार सर खूप असतील ,भेटतील ,घडतील ; पण वाबळे गुरुजी शिक्षणाच्या बाजारीकरणात भेटणार नाहीत असे गुरुजी या शिक्षण प्रणालीला पण नको आहेत अस मन कधी कधी म्हणते पण काही असो आज या शिक्षण व्यवस्थेला गरज आहे माझ्या वाबळे गुरुजीची --------------- त्यांचा हा वसा माझ्या अंगी आणण्याचा जरूर प्रयत्न करीन.
जाता जाता सांगतो गुरुजीनी मला ज्या तळमळीने शिकवले त्याचे चीज मी केले. कसे तर मी चौतीच्या केंद्र परीक्षेत आमच्या पंचकृषीत पहिला आलो.ते केवळ माझ्या गुरुजीमुळे. आज जे काही बनलोय व ज्ञान दानाच्या क्षेत्रात आलोय ते देखील त्यांना आदर्श मानत होतो म्हणून . पुन्हा भेटूया एका नवीन अवलियासंगे जे मला व आपल्याला काय सांगू ईचीत आहेत ते जाणण्यासाठी. धन्यवाद. आवडल्यास नक्की शेअर करा. कमेन्ट करा. आपल्या जीवनातील आवडत्या गुरुविषयी कमेन्ट मध्ये चार शब्द जरूर लिहा.
मला वाबळे गुरुजी प्रमाणे कितीतरी लोक भेटले जसे की माझा मित्र रणजीत की जो दहावी नापास होऊन आज कम्प्युटर इंजिनियर आहे लाखभर पगारची नोकरी आहे त्याचा हा दहावी फेल ते नोयडा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/05/dahavi-fail-te-noida.html
👌👌👌👌
उत्तर द्याहटवातुमचे ओघवते लिखाण मनाला भिडते, तुमचे वाभळे गुरुजी वाचताना मला आमच्या शेवाळे बाई डोळ्यासमोर आल्यात,, तुमच्या लिखाणात जादू आहे सर,, बालपणात घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाVery Nice👏👍
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख
उत्तर द्याहटवालेख छान आहे
उत्तर द्याहटवाखूप छान सर 👌
उत्तर द्याहटवाखुप छान सर
उत्तर द्याहटवाखरंच सर, हा लेख मला भूतकाळात घेऊन गेला.
उत्तर द्याहटवा