महात्मा ज्योतिबा फुले माहिती | Mhatma Fule Yanchi Mahiti
महात्मा फुले यांची माहिती |
महात्मा फुले (toc)
महात्मा फुले यांची कौटुंबिक माहिती | Kautumbik Mahiti
महात्मा फुले यांचे शिक्षण व बालपण |Fule Yanche Balpan
महात्मा ज्योतिबा फुले एक कार्य पुरुष | Mahtamaa Fule Yanchi Karye
1. शैक्षणिक कार्य | Shaikshnik Karya
2. शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य | Shetkryansathi Kary
या जगात काही व्यक्ती खूप आगळे वेगळे असतात यापैकीच एक महात्मा फुले होते. यांनी स्त्री शिक्षणाबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न देखील इंग्रज प्रशासनासमोर मांडले. त्यांनी आपल्या या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले .भांडवलदार वर्ग जी शेतकऱ्यांची पिळवणूक करत होता त्यांच्याविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आसूड उगारण्याचा चे काम महात्मा फुले यांनी केले. शेतकरीवर्ग मागास का आहे तर त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, नवनवीन योजनांविषयी त्यांना माहिती मिळत नाही असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले.
3. स्त्री सुधारणा विषयक कार्य | Strre Sudharnaa Vishayk Karay
मुलींसाठी शाळा सुरू केल्या याचबरोबर महात्मा फुले यांनी त्या काळच्या समाजात असणाऱ्या सती प्रथा, बाल विवाह यांचादेखील विरोध केला. समाजात स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे असे प्रबोधन त्यांनी केले. केवळ लिंग आवरून स्त्री आणि पुरुष असा भेद करणे हे त्यांना मान्य नव्हते .समाजामध्ये मुलगी शिकली तर ती दोन घरांचा उद्धार कशी करते. याविषयी त्यांनी जनमानस तयार केले. लोकांना हळु शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे थोडक्यात काय स्त्री सुधारणा विषयक बहुआयामी कार्य महात्मा फुले यांनी केले.
4.सत्यशोधक समाजाची स्थापना | Satyshodhk Smajachi Sthapna
महात्मा फुले यांनी सर्वसामान्य जनतेची धर्माच्या नावाखाली, कर्मकांडाच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी एक नवा विचार प्रवाह मांडला. तो म्हणजे सत्यशोधक समाज होणे. धर्मांध लोक त्याकाळी धर्माच्या नावाखाली, वृत्त वैकल्ये यांच्या नावाखाली सामान्य जनतेची, कष्टकरी शेतकरी जनतेची लूट करीत होते.ही लूट थांबविण्यासाठी या सत्यशोधक समाजाने विवाहाचे नवीन विधी यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक लूट होणार नाही अशी व्यवस्था केली. महात्मा फुलेंच्या या निरीक्षणातून समाजाचा किती बारकाईने त्यांचा अभ्यास होता. याची कल्पना आपल्याला आल्याखेरीज राहत नाही.
5.एक थोर विचारवंत | Mhatma Fule Ek Vicharvant
महात्मा फुले यांनी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य तर केलेच पण त्याच जोडीला भारतातील शेतकरी,कामकरी,आदिवाशी यांचे प्रश्न यावर अभ्यास करून आपले विचार मांडले.शेतकरी वर्गासाठी ब्रिटिश सरकारने काय करावे?याची मांडणी त्यांनी केली. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी हा विचार त्याकाळी त्यांनी मांडला होता . आज आपण शिक्षण हक्क कायदा पाहतोय त्याची बीजे त्यांच्या या विचारात सापडताना दिसत आहेत.समाजातील काही लोक सामान्य लोकांची ग्रंथ प्रामाण्य देऊन लूट करतात याची मांडणी देखील त्यांनी केली. या विवेचनातून ते विचारवंत होते याची जाणीव होते.
6. साहित्यिक म्हणून योगदान | Sahitik Mhanun Yogdan
महात्मा फुले यांनी आपले विचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून पुस्तक रूपाने प्रकाशित केले व सर्वसामान्य जनतेला सजग करण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक पोवाडा लिहिला. या पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्याच बरोबर कष्टकरी जनत., शेतकरी यांच्यासाठी ते कसे महान होते याची मांडणी या पोवाड्यातून केली. शेतकऱ्याचा असून या पुस्तकातून ब्रिटीश प्रशासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव करून दिल.. ब्राह्मणाचे कसब या पुस्तकातून धर्मग्रंथांचा नावाखाली काही विशिष्ट वर्ग लोकांची धर्माच्या नावाखाली, व्रतवैकल्यांच्या नावाखाली कसे लूट करतात अशी मांडणी यांनी केली. दलित समाजाचे दुःख अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकातून मांडल. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून सत्यशोधक समाज व त्याचे कार्य यांची माहिती दिल. थोडक्यात साहित्यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम महात्मा फुले यांनी केल.. महात्मा फुले थोर समाज सुधारक हो, त्याच बरोबर एक मान लेखकही होते, शेतीविषयक अभ्यासातून एक शेतीतज्ञ होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या जगात अनेक महान व्यक्ती जन्माला येतात आणि आपल्या कार्याचा ठसा उठवत असतात. पण विविध क्षेत्रात आपल्या कार्याद्वारे ओळख निर्माण करणारे महात्मा फुले हे अतिशय अग्रणी नाव घ्यावे असे आहे.. समाज मागासलेला होता.शिक्षणाचा अभाव होता अशा काळात मोलाची कामगिरी करणारे महात्मा फुले यांच्याविषयी बोलो तितके, लिहू तितके कमीच आहे. आज बोकाळलेल्या राजकीय रणधुमाळीत सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, तरुण वर्गाला, दलित वर्गाला, अन्यायग्रस्त स्त्री वर्गाला आजही त्या महान आत्म्याची म्हणजेच महात्मा फुले यांची गरज आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. चला तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जमेल तेवढे सामाजिक कार्य करूया व दीनदलित जनतेला आधार देऊया.
महात्मा फुले यांच्याप्रमाणे समाज सुधारणा करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/05/shahu-maharaj.html