शेअर बाजारात होणाऱ्या चुका | Sher Market Madhil Chuka
शेअर बाजारात होणाऱ्या चुका |
चला तर मग शेअर बाजारात किंवा स्टॉक मार्केटमध्ये सामान्य माणसाकडून किंवा ज्याला सर्वतोपरी ज्ञान असून देखील एखादी व्यक्ती प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना का करते? या सगळ्यांची उत्तरे या लेखातून घेऊया. काही शेर मार्केट टिप्स
शेअर बाजारातील चुका:(toc)
1.भूमिका न समजणे | Bhumika N Samajne
कोणताही व्यवसाय असो तो व्यवसाय सुरू करत असताना आपली भूमिका भूमिका काय असायला हवी हे माहीत असणे गरजेचे आहे.आपल्याला आपली भूमिका माहीत नसल्याने अनेक चुका होतात . जसे की जसे की एखाद्या दुकानदाराने किराणा मालाचे दुकान टाकल्यावर होलसेल विक्री करणार की किरकोळ विक्री करणार हीच भूमिका त्याला माहीत नसेल तर तो आपला दुकानदारी व्यवसाय नीट करू शकणार नाही .शेअर बाजारात देखील आपण आपण कोणती भूमिका बजावणार आहोत? हे समजत नाही त्यामुळे प्रचंड नुकसान होते एखादी व्यक्ती शेअर बाजारात लॉंग इन्वेस्टर म्हणून येत असते येत असते ;पण ट्रेडिंगचे भूत डोक्यात घुसल्याने कमी अभ्यास असून देखील ट्रेडिंग केले जाते व ती व्यक्ती प्रचंड नुकसानीचा सामना करते यासाठी आपली भूमिका स्पष्ट हवी. शक्यतो इन्वेस्टर हा रोल कमी जोखीम असलेला आहे. असे मला वाटते. थोडक्यात नेमकी भूमिका ओळखणे व नंतरच शेअर बाजारात प्रवेश करावा.ही सर्वात मोठी चूक तुमच्या लक्षात आली असेलच.
2.जास्त रक्कम गुंतवणे | Jast Rakkm Guntvane
अनेक व्यक्ती शेअर बाजारात एकाच वेळी लाखो रुपयांची गुंतवणूक करतात. झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे शेअर मार्केट ही त्यांची चुकीची धारणा यासाठी जबाबदार असते. शेअर बाजारात पैसे गुंतवत असताना जर ती रक्कम बुडाली तर आपले प्रचंड नुकसान होणार नाही. याची हमी गुंतवणूकदाराला हवी.या क्षेत्रातील जाणकार झाल्यानंतर थोडीफार जोखीम घ्यायला हरकत नाही पण अगदी सुरुवातीला कमी म्हणजे महिन्याला जास्तीत जास्त दोन ते तीन हजार रुपयांपासून सुरुवात करावी असे मला वाटते. खूप मोठी रक्कम गुंतवली व शेअर बाजारात काही खराब घडामोडी घडु लागल्या, जागतिक बाजार मंदीच्या सावटाखाली आला तर स्टॉक मार्केट खूप खाली येऊ शकते व ज्या गुंतवणूकदारांनी एकदम रक्कम गुंतवली आहे त्याचे प्रचंड नुकसान होऊ शकते. म्हणून रक्कम गुंतवत असताना ती टप्प्या टप्प्याने गुंतवावी.
3. कर्ज काढून शेअर मार्केट | Karj Kadhun Shear Market
शेअर बाजार तेजीत आहे. या क्षेत्रात प्रचंड पैसा आहे अशा ऐकीव माहितीच्या आधारे काही लोक कर्ज काढून ती रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. त्यामुळे कर्जाचा हप्ता आणि समजा शेअर बाजार खाली कोसळला तर होणारे नुकसान या प्रचंड नुकसान होऊ शकते यासाठी कर्ज काढून शेअर मार्केट करू नये. बऱ्याच व्यक्ती ही चूक करताना दिसतात.
4. मूलभूत बाबींचे ज्ञान नसणे | Shear Bajaratil Mulbhut Dnyan Nasane
शेअर मार्केट कडे एक व्यवसाय म्हणून बघता आले पाहिजे. ते करत असताना निफ्टी म्हणजे का.? सेन्सेक्स म्हणजे काय? इक्विटी मार्केट म्हणजे काय? फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? या सर्व बाबींची माहिती हवी.अगोदर ही माहिती मिळवावी नंतरच शेर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी.
5.शेअर्स मधील चुकीची एंट्री | Shaear Bajarat / Stock Market Madhil Chukichi Entry
एखादा शेअर किंवा स्ट्रोक दररोज वाढत आहे एवढे पाहून काही व्यक्ती तो स्टॉक खरेदी करतात काही दिवसातच ज्या लोकांनी तो शेर कमी किमतीत घेतला आहे व त्या व्यक्तीला त्यातील नफा कमवायचा असेल तर ते तो स्टॉक विक्रीस काढतात पण ज्याने चुकीची entry घेतल्याने स्टॉक खाली जायला लागला तर ज्याने चुकीची एंट्री केलीय त्याचे मात्र प्रचंड नुकसान होऊ शकते.किंवा रक्कम गुंतून पडू शकते.
6. संयम नसणे | Sayam Nasane
एखादा स्टॉक खरेदी केल्यानंतर काही कारणास्तव त्यात उतार चडाव हे होतच असतात. पण ज्या व्यक्तीकडे संयम नाही ती व्यक्ती तो स्टॉक loss मध्ये असेल किंवा minus मध्ये असेल तर घाबरून आपली पोजिशन सोडतात हे चुकीचे आहे.
7. अफवांचे बळी | Shear Bajaratil Afvanche Bali
कधी कधी अमुक एक स्टॉक वाढणार ? किंवा खाली येणाऱ अश्या बिन बुडाच्या वावड्या उठत असतात व यावर विश्वास ठेवून काही लोक आपले नुकसान करून घेतात तर असे करू नये.
8. पेंनी स्टॉक हव्यास | Penny Stock Havyas ,Lobh
काही स्टॉक हे अतिशय कमी किमतील असतात त्यानं पेनी म्हणून ओळखले जातात. ते स्वस्त असल्याने अनेक व्यक्ती जास्त quntity येते म्हणून किंवा त्या स्टॉकबाबत आलेल्या न्यूज वर विश्वास ठेवतात. व मोठी रक्कम यात गुंतवतात यामुळे आपली रक्कम गुंतून तर पडतेच पण मोठे नुकसान पण होऊ शकते.
9. कॉलचे बळी | Caal Che Bali
आपण dmat अकाऊंट काढल्यानंतर आपल्या फोन नंबरचा तपशील काही व्यक्ती मिळवतात व आपणास आज निफ्टि ,बँक निफ्टि मध्ये काय movment असेल किंवा एखाद्या स्टॉक मध्ये वाढ किंवा तो खली येणार आहे याबाबत आमच्याकडे खत्रीशीर माहिती आहे. असे सांगून अमुक future ,option किंवा equity मार्केट मधील स्टॉक by करा आपल्याला प्रचंड नफा मिळेल त्यातील काही नाममात्र नफा आम्हाला द्या अशी मागणी करतात . नफा झाला तर मागणी करतात पण तोटा झाला तर फोन बंद लागतात.bse ,nse कायम आवाहन करते अश्या लोकांपासून सावध रहा. पण म्हणतात ना लालच बुरी बला है आणि ते खरे आहे महनुम या कॉल पासून लांब रहावे, अनुभवाचे बोल अजून काय. गंमत आहे ना मी हा विकत अनुभव घेतला पण आपणास तो फुकट मिळत आहे. असो मुद्दा हा आहे की अश्या आलतू फालतू कॉल ला बळी पडू नका.
10. मार्केटचा अभ्यासाची कमतरता | Abhyas Nasane
अमुक स्टॉक का घेतला ? याचे उत्तर तुम्हाला देता आले तर तुमचं स्टॉक selection योग्य आहे पण जर देता आले नाही? तर कोणता स्टॉक घ्यावा ,कधी घ्यावा ,त्याचे Buisness मॉडेल काय आहे? दर तिमाहीत ती कंपनी नफ्यात आहे का?ती Large Cap आहे की small cap आहे अश्या एक ना अनेक बाबी आपल्याला माहीत हव्यात. कोणाच्या सांगण्यावरून स्टॉक घेतला असे न करता Bse ,Nse website व विविध App च्या माध्यमातून माहिती गोळा करून मगच स्टॉक By खरेदी किंवा sell विक्री करावा. थोडक्यात अभ्यासपूर्वक स्टॉक निवडावा.
11. एकाच स्टॉक किंवा क्षेत्रात जास्त रक्कम गुंतवणे | Eka Stok Madhe Jast Guntvnuk
असे केल्यास ते क्षेत्र किंवा स्टॉक काही कारणास्तव खाली आला तर प्रचंड नुकसान होऊ शकते यासाठी क्षेत्र विभिन्न असावीत व स्टॉक मध्ये पण verity स्टॉक असावी.
12.हाताशी भांडवल न ठेवणे | Kmi Bhandavl
आपण अमुक स्टॉक घेतला व तो खाली येत आहे पण कंपनी आज ना उद्या नकी growth करणार आहे. अशी खात्री आहे त्यावेळी आपल्याला तो स्टॉक खाली येत असेल तर न घबरता जसा खाली येईल तसे Avrage करण्यासाठी काही रक्कम आपल्याजवळ हवी म्हणून एकदम शेर बाजारात पैसे न गुंतवता संधी पाहून गुंतवणूक केल्यास नक्की फायदा होईल.
आपल्याला ही अजून काही वेगळे अनुभव असतील तर नक्की शेर करा .शेअर मार्केट म्हटल तर कल्पवृक्ष आहे.असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही पण आपण त्यातून काय घ्यावे हे आपल्या हाती आहे.आपण नवीन असाल तर या क्षेत्रात काही एक अभ्यास करून या, खूप जूने असाल तर तर आत्मपरीक्षण करा आपली रणनीती बदला. हीच अपेक्षा.हा लेख आवडल्यास आपले मित्र ,मैत्रीणी,नातेवाईक याना जरूर शेर करा.अजून काही सूचना असतील तर कमेन्ट मध्ये अगदी बिनधास्त कळवा .पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद.
आपण काटकसर करून शेर मार्केट मध्ये नाममात्र पैसे गुंतवून करोडपती कसे होऊ शकतो हे जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व काटकसरीचे महत्त्व समजून घ्या.
https://dnyanyogip.blogspot.com/2022/03/economical-planing-saving-power.html
तुम्ही खूप imp information देत आहात,, अशीच information det Raha,, धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाVery useful information..Sir ��
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा