राम नवमी बद्दल माहिती 2023 |Ram Navami Information in Marathi 2023
आजच्या लेखात राम नवमी मराठी माहिती पाहणार आहोत.अलीकडे रामजन्म ,रामराज्य यापेक्षा आपल्याकडे राम जन्मभूमी बद्दल बऱ्याच बातम्या येत आहेत. आयोध्येत रामाचे मोठे मंदिर उभे राहणार.ते राम मंदिर Ram Mandir किती भव्य दिव्य असणार वगेरे वगेरे . पण आपण त्या राजकारणात न जाता आज प्रभू श्री राम नवमी बद्दल माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मात देव- देवता यांना विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात अशी पक्की धारणा आहे की भूतलावर ज्यावेळी अधर्म ,पाप किंवा अन्याय वाढू लागले की ईश्वर विविध रूपात अवतार घेतात व या विघातक शक्तींचा नाश करतात. या अंगाने पाहिल्यास भगवान विष्णु यांनी या भूतलावर नऊ अवतार धारण केले त्यातील सातवा अवतार म्हणजे प्रभू राम होय असे सांगितले जाते.
राम नवमी माहिती |
राम नवमी संपूर्ण माहिती
वाल्या कोळी व रामायण | Valya Koli Aani Ramayn
असे म्हणतात की भक्तीत प्रचंड ताकद असते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे वाल्या कोळी होय. याच्याविषयी असे सांगितले जाते की हा लूटमार करणारा एक डाकू होता.अनेक लोकाना त्याने संपती साठी यमसधणी पाठवले . एके दिवशी नारदमुनी जंगलातील रस्त्याने जाताना असताना त्यांना या वाल्याने अडवले त्यावेळी नारद मुनींनी त्याला समजावले हे सर्व पाप तू कोणासाठी करतोय ?त्यावेळी वाल्या कोळी बोलला मी माझ्या मुला बाळांसाठी करतोय, त्यावेळी नारद बोलले सगळ खर आहे या पापात ते तुझे वाटेकरी होतील का ?तुझ्या वाट्याचे पाप ते घेतील का? यावर तो चिडून नारदास एका झाडाला बांधून धावत घरी गेला. त्यावेळी घरची सर्व मंडळी पाप घेण्यास नकार देऊ लागली. हे चित्र पाहून वाल्या डाकू दुखावला. यावर उपाय काय? अशी याचना तो नारदाकडे करू लागला त्यावेळी त्यांनी राम हा मंत्र वाल्याला दिला. सुरुवातीला राम म्हणता येईना म्हणून वाल्या मरा मरा हा मंत्र जपू लागला ....पुढे तो राम राम कसा झाला ते वाल्याला देखील कळले नाही.काही दिवसानी नारद पुन्हा त्या रस्त्याने आले व वाल्याची भक्ति पाहून त्यांना रामायण लिहिण्याची आज्ञा केली.व वाल्याचे महर्षी वाल्मिक हे मोठे ऋषी झाले रामायण म्हणजे ज्यातून रामाला या भूतलावर येण्याची विनंती केली. असे म्हणतात वाल्याची भक्ति पाहून देवाला अवतार घ्यावा लागला.थोडक्यात रामायण हा असा एकमेव ग्रंथ आहे की भक्तासाठी देवाला देखील वनवास भोगावा लागला.
रामजन्माची कथा | Kamjnmachi Katha
राजा दशरथाला तीन पत्नी किंवा राण्या होत्या.सर्वात मोठी राणी म्हणजे कौसल्या ,दुसरी कैकयी व तिसरी सुमित्रा. राजा दशरथाचे साम्राज्य खूप मोठे होते पण एकच खंत होती त्याचा वंश वाढत न्हवता. त्यांना मुळबाळ होत न्हवते आपल्याला मुळबाळ व्हावे यासाठी तीन राण्या व दशरथ यांनी एक भला मोठा यज्ञ केला. याचे फलित म्हणून कौसल्याच्या पोटी प्रभू राम यांचा Ram Janm जन्म झाला . सुमित्राच्या पोटी लक्ष्मण व कैकयी च्या पोटी भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. ही चार भावंडे अतिशय गुणा गोविंदाने राहत होती. पण राजगादीवरून वाद झाले व कैकयी ने राजा दशरथाकडे वर मागितला की राम वनवाससाल जाईल व भरत राजा होईल. ही कथा आपल्याला माहीतच आहे.पिता आदेश प्रमाण मानून 14 वर्षे राम,लक्ष्मण व सीता वनवासाला गेले.हे केवळ राम च करू शकतात म्हणून तर राम याना मर्यादा पुरोषतम म्हटले जाते.
रावण व राम युद्ध | Ravn V Ram Yudha
राम हे अवतारी पुरुष होते त्यांनी अनेक वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा वध केला. रावण हा अनेक लोकांवर अन्याय नि अत्याचार करीत होता. एवढेच नाही तर राम पत्नी शीतेचे हरण म्हणजे तिला पळवून बंदी देखील केले होते. प्रभू राम यांनी वानर सेना व मारुती यांच्या मदतीने शितेची सुटका तर केलीच पण त्या पापी ,अन्यायी रावणाचा वध देखील केला. त्याची सोन्याची लंका मारूतीने जाळून टाकली. सांगण्याचा मुद्दा हा की वाईट कर्माचे फळ वाईटच मिळते.म्हणून तर कपटी माणसाला रावणाची उपमा दिली जाते.
रामजन्म म्हणजेच रामनवमी | Mamjanm Mhanje Ramnavmi
प्रभू राम यांचा जन्म हिंदू नववर्षप्रमाणे चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी झाला म्हणून तो नवमी म्हणजे राम नवमी म्हणून साजरा केला जातो. प्रभू राम यांचा जन्म दुपारी सूर्य डोक्यावर असताना 12 च्या सुमारास झाला. आजही मंदिरात पाळणा सजवून त्यात रामाची प्रतिमा किंवा पादुका ठेवून राम जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिरात भजन ,कीर्तन, प्रवचन ,रामजन्मकथा,रामलीला म्हणजे नाटकातून रामायणाचे दर्शन घडवले जाते. असे विविध कार्यक्रम रामनवमीला होता असतात. सगळे आसमंत जणू राममय झालेले असते. सगळीकडे राम नामाचा गजर सुरू असतो.रामजन्माच्या नंतर मंदिरात आवर्जून रामाचा पाळणा म्हटला जातो.
अयोध्या नगरीत आनंद झाला
पुत्र रत्नाचा लाभ हो झाला
रामचंद्र नाम शोभे बाळाला
जो बाळा जो रे जो ..........
असे पाळणे मंदिरात बोलले जातात . जसे काही भक्त मंडळी देवाचे बारसे आताच घालत आहेत व प्रभू राम पाळण्यात आहेत असच काही वातावरण रामजन्माच्या वेळी असते.प्रसाद म्हणून सुंठ साखर घालून केलेला सुंठवडा लोकाना वाटला जातो. खरच हे धर्मिक सण उत्सव एक नवचेतना निर्माण करण्याचे काम करतात.
प्रभू राम एक आदर्श व्यक्तिमत्व | Aadrsh Vyktimatav Ram | रामाच्या अंगी असलेले गुण
प्रभू राम हे या विश्वातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.आजही बोलताना एखादे मूल शांत बसले तर रामागत शांत बसले आहे असे बोलले जाते. या प्रभू रामाचे गुण आपल्यात यावेत त्याचे नाव आपल्या मुखी राहावे म्हणून हिंदू धर्मातील लोक एकमेकांच्या समोर आले की राम राम असे एकमेकाना नमस्कार करताना बोलतात.आज देखील देश कसं असावा,घर परिवार कसा असावा तर तिथे रामराज्य असावे असे बोले जाते यावरून प्रभू राम किती ग्रेट होते ते समजते आज त्यांचा जन्मदिवस तर त्यांच्या व्यक्तिमतवातील काही खास गुणांवर प्रकाश टाकूया व हे गुण आपल्यात यावेत यासाठी वचनबद्ध राहुयात. व पाहूया Ram Navami Information in Marathi ज्यातून राम समजतील.
1. मातृ - पितृ भक्त | Mataa Pita Seva
राम हे माता पिता यांची प्रचंड सेवा करत होते. त्यांचे शब्द प्रमाण मानत होते . म्हणून तर उद्या राज्याभिषेक, ,राजतीलक होणार होता; पण पिता दशरथाने कैकयी च्या सांगण्यावरून चौदा वर्ष वनवासास जाण्याचे आदेश दिले व राम एक शब्द न बोलता वणवासाला निघून गेले. यातून मातृ पितृ भक्तीची कल्पना येते. आजकालची पिढी आई वडिलांचा आदर सोडा त्यानं उतार वयात आधार पण देत नाहीत .ही खेदाची बाब आहे.जास्त काही नको किमान जन्मदात्या आई वडिलांची वाताहत होणार नाही एवढी दक्षता घेतली तरी खूप झाले.हाच रामजन्म.
2. प्रजाहितदक्ष | lok kalyan
राम हे कायम प्रजेच्या हिताचे निर्णय घेत असत. रामराज्यात अगदी सामान्य माणसाला देखील आपले मत मांडण्याचा अधिकार होता. प्रजेचे हित ज्यात आहे असेच निर्णय प्रभू राम यांनी घेतले. म्हणून प्रजाहितदक्ष राजा म्हणून रामाला ओळखले जाते.
3. न्यायप्रिय | Justice,Nyay Priy Ram
प्रभू राम हे न्यायप्रिय होते. रावणाच्या तावडीतून सीता परत आणल्यानंतर सीता चारित्र्यवान आहे? का अशी कुजबूज ऐकताच सीतेला पुन्हा अग्निपरीक्षा द्यायला लावणारे राम होतो. यात स्त्रीवर अन्याय ही बाब खरी पण न्याय करताना त्यांनी भेदभाव केला नाही यातून ते किती न्यायप्रिय होते याची कल्पना येते.
4. राम म्हणजे सत्यवचन | satya mhnje raam
राम म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे राम. अशी ओळख असलेले एकमेव राम होते. कृष्ण अवतारात भगवान कृष्ण कायम शब्द खेळ मांडताना दिसतात. पण राम मात्र जे असेल ते सत्य नि अंतिम सत्य बोलत असत. वागत असत. आजही गावाकडे काही गुन्हा घडल्यास कोणी खोट बोलत असल्यास शहानिशा करण्यासाठी रामाची आन किंवा शपथ घेतात.
5.बंधुप्रेम | Ram Aani Bandhuprem
आज आपण पाहतो गावाकडे असो की शहरी भागात असो जी दोन लहान भावंडे एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत. तीच भवंडे संपती वाटपा वेळी भांडणे करतात. पण प्रभू राम याला अपवाद होते. आदल्या रात्री अगदी आनंदात मी उद्या आयोधेचा राजा होणार नि दुसऱ्याच दिवशी पित्याकडून वनवासात जाण्याचे आदेश . तरी मान्य का तर त्यांचे आपल्या भावावर प्रचंड प्रेम होते.
6. एकवचनी ,एकपत्नी |Truth Means Rams एक vachniram
पूर्वीच्या काळी राजांनी अनेक राण्या करण्याचा प्रघात होता. कारणे अनेक असतील पण राम हे एकपत्नी होते ही त्या काळातील अतिशय दुर्मिळ बाब. थोडक्यात एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला. तसेच दिलेले वचन ते कोणत्याच परिस्थितीत मोडत नव्हते म्हणून त्यांची एकवचनी म्हणून त्याना ओळख होती.
7. उत्तम व्यवस्थापक | good management
कोणतेही काम करताना अनेकांना बरोबर घेऊन जाताना राम दिसतात. लंकेला जात असताना जो रामसेतू बांधला त्यावेळी कित्येक जणांची मदत घेतली. हे तीनच्या व्यवस्थापक या गुणाचे उत्तम उदाहरण आहे.
8. उत्तम मित्र | Best Friend ,Ram Uttam Mitra
लंकेत रावण आपला शत्रू पण त्याचा भाव विभिशन आपला मित्र बनवणे त्यावर विश्वास ठेवणे हे रामच करू जाणे. आज भावाचा भावावार विश्वास नाही पण याला अपवाद राम होते. केवट ,सुग्रीव यांना केलेली मदत व वेळप्रसंगी त्यांच्याकडून घेतलेली मदत यातून ते उत्तम मित्र होते याची कल्पना येते.
9. उदार मन | Brod Minded Udar Mnache Ram
प्रभू राम हे उदार म्हणजेच मोठ्या मनाचे होते. म्हणून तर्व ते राजत्याग करू शकले. कायम दुसऱ्याला आनंद कसा मिळेल ? यासाठी एकेक आयुष्य खर्ची कोणी घातले तर ते आहेत राम.
प्रभू राम हे गुणांचा सागर होते असे म्हटले तरी वावगे होणार नाही असे असंख्य गुण त्यांच्याजवळ होते. पण त्यातील काही गुण ज्यांची आजच्या काळात गरज आहे त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. आई वडिलांची सेवा करूया,स्त्रीचा सन्मान करूया,नवनवीन मित्र बनवूया ,मैत्री निभावूया,आपल्याकडून कोणाचे भले होईल एवढे मन मोठे नसले तरी कोणाची फसवणूक होणार नाही .किमान एवढी तरी काळजी घेऊया.आपण व आपली भावंडे यात संपत्ती वरुण वाद होणार नाहीत असा निर्धार करूया. तरच खरा रामजन्म आपल्या ऋदयात साजरा करुयात. खोटा दिखावा न करता सत्य वागूया. या कलियुगात सुखी व्हायचे असेल तर रामायण वाचून उपयोग नाही रामासारखे जगण्याचा प्रयत्न करूया. बोलणे सोपे पण करणे कठीणअसे सगळ आहे पण सुरुवात करायला काय हरकत आहे.रामराज्य आजही आहे फक्त गरज आहे रामासारखे आपण वागण्याची बरोबर ना .मग हा रामजन्म आपल्या ऋद्यात घडवूया व प्रभू नाम कायम घेऊया. बोला प्रभू श्रीराम की जय.
राम नवमी माहिती व्हिडिओ | ram navami video
आमचे हे लेख वाचा