Type Here to Get Search Results !

reminder आनंदाचा | anand kasa milvava

 Reminder आनंदाचा anand ksa milvava?

     आज सकाळी आठवलेला प्रसंग. हा प्रसंग आठवताच डोक्यात चालू असलेले सर्व विचार निघून गेले निश्चल ,शांत फक्त त्याच एका प्रसंगाची क्षणचित्रे डोळ्यांपुढे फिरू लागली आनंद वाटला . मन उल्हासित झाले  शरीर पूर्णपणे निश्चल, आजूबाजूला काय चालू आहे याची देखील कोणत्याही प्रकारची संवेदना नाही. जणूकाही तो क्षण मी पुन्हा जगत होतो आणि आनंद घेत होतो त्या प्रसंगातील स्थळ व्यक्ती घटना त्यात मग सजीव-निर्जीव असा काहीच भेद नाही. सर्वच कसे जसेच्या तसे मनात निर्माण झाले आणि त्याच प्रसंगाचा पुन्हा एकदा जिवंत असा अनुभव घेऊ शकलो. 

आनंद  कसा मिळवावा?
आनंद कसा मिळवावा?
                        काही क्षणातच दरवाजा वाजला आणि त्या आवाजाने मी पुन्हा वास्तव परिस्थिती आलो. मग पुन्हा नेहमीचेच विचार जे सतत असतात नेहमीची कामे. ती पण सततची त्यात मात्र कोणताही बदल नाही आणि त्यातून कोणताही आनंद नाही.आयुष्यातील बराचसा वेळ या नेहमीच्या सततच्या विचारात आणि कामात जातोय. याची मला आज पुन्हा एकदा मात्र जाणीव झाली. वरील अचानक आठवलेला आनंदाचा प्रसंग हा अनुभव मात्र नेहमी होत नाही हा असाच अचानक कधी तरी येतो. माझ्या आयुष्यात पण ज्यावेळी येतो त्यावेळी मी वास्तव जगातला राहत नाही पूर्णपणे त्या प्रसंगाचा होऊन जातो आणि असा काही एकच प्रसंग माझ्या आयुष्यात नाही असे अनेक प्रसंग आहेत.

        काही आनंदाचे , काही दुःखाचे , कही विचार करायला लावणारे तर काही समजून घ्यायला शिकवणारे स्वतःला , दुसऱ्याला , प्रसंगाला. ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात असे आठवणीत राहणारे प्रसंग निर्माण झाले खरोखरच मी त्यांचा ऋणी आहे. त्याच बरोबरच अशा काही परिस्थितीतील घटना घडल्या की ज्यामुळे मला अधिकाधिक विचार करण्यास संधी मिळाली आणि त्या विचारांमुळे मी आणि परिस्थितीतील घटनांचा चांगला आनंद घेऊ शकलो किंवा त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकलो त्यामुळे मी या निसर्गाचा देखील ऋणी आहे .ज्या निसर्गामुळे मला माझ्या आयुष्यात आठवणीत राहणारी काही प्रसंग दिले. 

            आपल्या आयुष्यात असे निसर्गामुळे निर्माण होणारे किंवा व्यक्ती मुळे निर्माण होणारे प्रसंग कधी निर्माण होतील हे आपण कधीच सांगू शकत नाही. मला वाटते आपण जितके आयुष्य जगत राहतो त्या आयुष्यातील फक्त दोन ते तीन टक्के इतकाच कालावधीतील प्रसंग आपल्याला आठवतात पण ज्यावेळी आपल्याला हे प्रसंग आठवतात त्यावेळी आपण वास्तवात नसतो. विचारानेही आणि परिस्थितीनेही, कधी कोणता प्रसंग आठवेल हेही आपल्याला माहीत नसते पण जर आठवलेला प्रसंग आनंद देणारा असेल तर नक्कीच आपण वास्तवात जे काही काम करतो त्या काम करण्यासाठी आपल्याला एक अनामिक अशी ऊर्जा मिळते व आपण अधिक गतीने चांगले काम करतो किंवा आपण वास्तविक परिस्थिती अधिक सकारात्मक विचाराने इतरांशी वागतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला देखील आनंदी वातावरण प्रसन्न वातावरण तयार होते.तो प्रसंग कसा आहे यावर हे अवलंबून असते. 

            कधी कधी उलट जर आपल्याला दुःखद प्रसंग आठवला तर त्याचा परिणाम देखील वास्तविक परिस्थितीत तसाच दिसून येतो आपण करत असलेल्या कामात कंटाळा येणे, काम करावेसे न वाटणे, वास्तविक परिस्थितीत नकारात्मक विचार येणे मग त्याच पद्धतीने इतरांशी वागणे आणि यामुळे चिडचिड होणे अशा गोष्टी घडू लागतात. तसेच जर आठवलेला प्रसंग व्यक्ती शी निगडीत असेल आणि तो प्रसंग आनंदाचा असेल तर आपण मनोमन त्या व्यक्तीचे गुणगान गातो धन्यवाद मानतो. वेळ असेल तेव्हा फोन करून आपुलकीने विचारपूस करतो मनात आदर ठेवतो आणि यातूनच त्या व्यक्तीसाठी आपल्या जीवनात एक विशिष्ट असे स्थान निर्माण होते. त्याचप्रमाणे आठवलेला प्रसंग दुखाचा असेल तर आपण त्या व्यक्तीचा तिरस्कार करतो त्याबद्दल नकारात्मकता येते चीड निर्माण होते त्याचा आदर ठेवला जात नाही. पण यात एक विशेष म्हणजे आपण या व्यक्तीला त्या प्रसंगाला आपल्या विचारातून काढण्याचा प्रयत्न करतो पण तसे न होता त्याचे देखील आपल्या मनात विचारात एक स्थान निर्माण झालेले असते आणि आपण ती काही केल्या काढू शकत नाही.

           परिस्थितीचे किंवा एखाद्या घटनेचे देखील असू शकते म्हणजेच सहज जीवन जगताना एखाद्या परिस्थितीत घडलेल्या घटनेमुळे आनंद प्राप्त झाला असेल तर ती घटना आठवल्यावर आनंद मिळतो.  त्याच्याशी मिळती जुळती घटना एखाद्या वेळी वास्तव जीवनात आल्यास आपल्याला या पूर्वीच्या घटनेची आठवण येते आणि आपण बरेचदा त्याच पद्धतीने या वास्तव जीवनातील या परिस्थितीत वागत असतो. जसे इतरांमुळे आपल्या आयुष्यात प्रसंग येतात त्याच पद्धतीने आपल्यामुळे देखील इतरांच्या आयुष्यात प्रसंगांची निर्मिती होत असते त्यामुळे खरंच मला वाटते आपण इतरांच्या आयुष्यात कसे प्रसंग निर्माण करतो याचा विचार करायला हवा जर आपण आनंदाचे प्रसंग निर्माण करू शकलो तर नक्कीच त्या व्यक्तीला जेव्हा कधी ते प्रसंग आठवतील तेव्हा ती व्यक्ती आपला फक्त चांगलाच विचार करेल .आनंदी होईल.थोडक्यात प्रसंग नि आनंद यांचा जवळचा संबंध आहे.  

       या उलट आपण जर दुःखद अनुभव दिलेला असेल तर ते अनुभव त्या व्यक्तीला आठवतील त्या वेळी ती व्यक्ती तिरस्कार करेल वाईट विचार करेल आणि स्वतःची चिडचिड करून घेईल त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जर असा चांगला आनंदाचा विचार करून आनंदी प्रसंग जर निर्माण केले तर नक्कीच आपल्या कडून फक्त आणि फक्त आनंदच इतरांना दिला जाईल. यात अजून एक छोटासा असा विचार असू शकतो ज्या वेळी कोणतीही व्यक्ती जर आपल्याबाबत आठवलेल्या प्रसंगामुळे जर सकारात्मक विचार करून आनंदी होत असेल तर नक्कीच त्या सकारात्मक लहरी आपण जिथे असेल तिथे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतील आणि आपल्यालाही आनंदी ठेवतील याउलट दुःखद प्रसंग आठवून ती व्यक्ती नकारात्मक विचार करून दुखी होत असेल तर त्या नकारात्मक दुखी लहरी आपण जिथे असून तिथे आपल्याला देखील दुखी करतील त्यामुळे आपण आनंदाचे प्रसंग निर्माण करूयात आणि आपले आयुष्य आनंदाने जगू या आणि आनंदी Riminder ठेवूया.

     अगदी या ब्लॉगचा श्रीगणेशा मी सुख म्हणजे काय?या लेखापासन केला होता.आपल्याकडे जे जे आहे त्यात सुख मानणे म्हणजे सुख. असा विचार मी प्रस्तुत केला होता. या माझ्या विचारावर बी.एड. ,एम. एड चा मित्र तसेच आम्ही सोबत मुंबई महानगरपालिकेत  देखील सोबतच नोकरीला लागलो.हा दुग्ध शर्करा योगच म्हणायचा .सध्या सागर   प्रथम वर्ग अधिकारी म्हणून पनवेल या ठिकाणी वरिष्ट आधिव्याख्याता पदावर कार्यरत आहे. आम्ही एकमेकांच्या सुख दुखाचे केवळ साक्षीदार नाही तर तर भागीदार आहोत.नोकरी संभाळून स्पर्धा परीक्षा देऊन तो उंच शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या बालपणी घरची गरीबी,शेती वाडी नाही . दोन वेळचे खायला नाही तिथून आज सर्व सुखे पायाशी लोटांगण असे काही  असणाऱ्या माझ्या परम मित्राचे वरील विचार आहेत.आणि हो त्याच्याच लेखणीने त्याला अप्रतिम साज आला आहे. मी फक्त त्याची प्रतिक्रिया आपल्यासाठी देत आहे.अतिशय गरिबीत लहानपण नंतर शिक्षकाची नोकरी म्हणजे मध्यमवर्गीय जीवनाचा अनुभव व आज claas 1 अधिकारी म्हणजे एक श्रीमंत माणूस म्हणून जगत आहे त्याचे आनंदा विषयी असलेले विचार खूप काही शिकवत आहेत.  तर स्वत सुखी व्हावे असे वाटत असेल तर इतराना आनंद द्या. असा एक अप्रतिम सुखाचा संदेश आपल्याला मिळाला आहे. हा लेख कसा वाटला ते कमेन्ट मध्ये जरूर कळवा. या digitl व्यासपीठावर आपणही लिहिते व्हा बोलते व्हा. सागरचे व तमाम वाचक वर्गाचे आभार मानतो की ज्यांनी अगदी काही दिवसातच माझ्या या लेखमालेला उदंड प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद आपल्या कमेंट अजून नव लिहिण्यासाठी बळ देतात.  

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. तुमच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे.👍

    उत्तर द्याहटवा
  2. तुमचा लेख वाचणे हा सुद्धा एक आनंददायी प्रवास झाला आहे,, कधी तुमचा लेख प्रकाशित होईल आणि आम्ही वाचू असे झाले आहे

    उत्तर द्याहटवा
  3. सर तुमचे लेखन असेच बहरत रहावे आणि समाजातील सर्वांनाच आनंद मिळत रहावा.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम ,सहज सोपी मांडणी , भाषाशैली सर्वांना उमगेल अशी आहे.
    तुमच्या लिखाणाची आम्ही आवर्जून वाट पाहत असतो.
    अश्याच प्रकारे एक एक पुष्प व त्यापासून ज्ञानाचा सुगंध सर्वदूर पसरत राहील.
    आपल्याला मनापासून शुभेच्छा 👌👌👌🙏🏻

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area