सॅलरी अकाऊंट काढण्याचे फायदे | Salary Khate Ka Kadhave
सॅलरी अकाऊंट का काढावे ? सॅलरी अकाऊंट काढण्याचे फायदे काय आहेत. आजच्या काळामध्ये आर्थिक साक्षरता किती गरजेचे आहे. हे आपण मागील लेखात पाहिलेच आहे. व्यक्ती केवळ साक्षर असून उपयोगाचे नाही तर ते आर्थिक साक्षर पाहिजे. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ पैसे वाढवणे नाही किंवा आपल्या पैशात वाढ करणे एवढेच यामध्ये अपेक्षित नाही तर आपल्या जवळ असणारा पैसा जपून वापरणे काटकसरीने वापरणे असे अपेक्षित आहे. काटकसर केलेला पैसा सामान्य माणसाला देखील करोडपती बनवू शकतो. या विषयाचा एक स्वतंत्र लेख मागील लेखमालेत आलेला आहे.आपण तो जरुर पहावा.आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत तो नवीन विषय म्हणजे जे लोक सरकारी नोकरदार आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे तर आजचा विषय आहे सॅलरी अकाऊंट किंवा पगारी खाते असण्याचे फायदे कोणकोणते आहेत.
आपण पाहतो की आपण नोकरीला लागल्या लागल्या आपला पहिला पगार आपल्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून आपल्याला आपल्या बँक डिटेल्स मागितल्या जातात. ज्या खात्यावर ती रक्कम हवीय किंवा पैसे जमा हवेत तो तपशील मागितला जातो. जेणेकरून तुमचा पगार तुम्हाला मिळावा. त्याची नोंद व्हावी हा देखील यामागील हेतु आहे. यासाठीच ही तरतूद असते. हे करत असताना अगदी सुरुवातीला आपण बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट काढावे अशी मागणी करत नाही कारण तशी कल्पना बऱ्याच जनाना नसते किंवा असा काही वेगळा खातेप्रकर आहे हेच माहीत नसते.सर्वसाधारण कागदपत्रे घेऊन आपले बचत खाते उघडले जाते.याच बचत खात्याचा तपशील आपण आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या प्रणालीला देतो. हे केल्यानंतर आपला पगार नेहमीप्रमाणे सुरू असतो. पण आपण नोकरदार आहोत आपले सॅलरी अकाऊंट असावे कारण त्याचे प्रचंड असे फायदे आहेत व ते आपल्याला मिळू शकतात. मला देखील या खात्याच्या फायद्या विषयी माहिती नव्हती. माझ्या काही मित्रांनी याविषयी चर्चा केली त्यातून समजले की सॅलरी अकाऊंट काढण्याची भरपूर फायदे आहेत. आता आपण नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही आहे टेक खाते आपण सॅलरी खात्यामध्ये वर्ग करूशकतो. हे खाते काढल्यामुळे अनेक सवलती आपल्याला मिळतात काही फायदे देखील मिळतात. तीच माहिती आज पाहणार आहोत.
|
सॅलरी खाते काढण्याचे फायदे |
सॅलरी अकाऊंट चे फायदे:(toc)
हे सर्व फायदे आपल्याला SGSP म्हणजेच State Government Salary Packege अंतर्गत भेटत असतात.सांगण्याचा मुदा हा की ही शासनाची योजना असून अमलबजावणी बॅंका करत असतात.
१. झिरो बॅलन्स | Zero Balance
आपण पाहतो की आपण कोणतेही बँकेमध्ये बचत खाते काढा. काही मोजक्या बँका सोडल्या तर सर्वच बँकांमध्ये आपल्याला विशिष्ट अशी रक्कम आपल्या खात्यामध्ये ठेवावी लागते ती न ठेवल्यास आपल्याला दंड आकारला जाऊ शकतो. पण आपण जर सॅलरी अकाऊंट काढले तर त्याचा पहिला फायदा हा आहे की आपल्याला बँकेमध्ये अमुकच रक्कम ठेवावी असे बंधन असणार नाही थोडक्यात झिरो बॅलन्स चा फायदा तुम्ही घेऊ शकता.
२. एटीएम कार्ड वरील शुल्क | No Atm Yearly And Monthly Transaction Charge
यापूर्वी एटीएम वरील सुविधा फ्री स्वरूपात मिळत होत्या. पण अलीकडे फुकट काही राहिलेच नाही अशीच अवस्था सध्या सगळीकडे आहे. बँका तर यात अग्रणी आहेत. बँकांचे देखील तसेच झालेले आहे. बँक आपल्याकडून वर्षाला एटीएम वापरण्याबाबत काही शुल्क आकारत होते पण अलीकडे तर महिन्याला किती वेळा एटीएम मधून पैसे काढले? यावर देखील तुम्हाला शुल्क आकारले जाते. भले ते शुल्क नाममात्रा असो पण आपल्या खिशाला असलेला तो भुर्दंड आहे. तर आपण आपले बचत खाते असेल ते जर सॅलरी खात्यामध्ये परावर्तित केले तर आपल्याला कितीही वेळा एटीएममधून पैसे काढता येतील.
३. पासबुक व चेक बुक यांची मोफत सुविधा | Free Passbook &Check Book
आपण पाहतो की आपल्याला जर चेक बुक हवे असेल तर ते किती पानांचे हवे आहे यानुसार बँका शुल्क आकारत असतात त्याच बरोबर पहिले पासबूक संपल्यानंतर दुसरे पासबुक घेताना देखील बँका शुल्क घेत असतात. मात्र जर आपले सॅलरी अकाऊंट असेल आपल्याला कोणतेही शुल्क लागणार नाही हा अजून एक फायदा सॅलरी अकाऊंटचा आहे.
४. अपघात विमा | Accidental Cover
आपले जर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट असेल सर आपल्याला सॅलरी अकाउंट आहे म्हणून किमान पंधरा ते वीस लाखाचा अपघाती विमा मिळू शकतो. प्रत्येक बँकेचा हा परतावा कमी-अधिक असू शकतो. पण माझ्या मतानुसार हा फायदा खूप महत्त्वाचा आहे. आज माणसाचे जीवन धकाधकीचे आहे, अनेकांना धोकादायक असा प्रवास करावा लागतो अशावेळी आपले संरक्षण कवच म्हणून हा अपघात विमा आपले काम करेल. एकच विनंती करेल लवकरात लवकर हे खाते काढून घ्या. विमान अपघात झाल्यास हा परतावा 30 लाखापर्यंत भेटू शकतो.
५. डिमॅट खाते | Free Dmat Account
शेअर बाजारातील प्रमुख संकल्पना अभ्यासत असताना हा एक शब्द येऊन गेला. होता की जर आपल्याला शेअर्सची खरेदी विक्री करायचे असेल तर आपले डिमॅट खाते असावे. तरच आपण शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतो. जर आपले बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट असेल तर अनेक बँक आपल्याला कोणतेही शुल्क न घेता अगदी फ्री मध्ये डिमॅट अकाउंट काढून देतात देतात.
६. कर्ज सुविधेत सूट | Procesing Fee Reduce Many Ammount
आपण कर्ज घेत असताना वरील आपल्याला प्रोसेसिंग शुल्क द्यावे लागते जर आपले पगारी खाते असेल तर जवळजवळ पन्नास टक्के सवलत त्या प्रोसेसिंग फी मध्ये भेटू शकते.
७. तात्काळ कर्ज | Urgent Sanction Personal Loan
आपल्याला जर काही विशिष्ट रकमेची तात्काळ गरज भासत असेल तर दर मा आपले वेतन बँकेत जमा होत असल्याने हा खातेदार विश्वसनीय आहे असे तुमचे क्रेडिट तयार होत असते.यामुळेच सॅलरी अकाऊंट असलेल्या खाते धारकास बँक पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज तात्काळ मंजूर करतात व त्याच्या व्याजदरांमध्ये देखील इतरांपेक्षा काही सवलत आपल्याला देतात .
८. लॉकर सुविधेत सूट | Free Locker Facility
अनेक नोकरदार व्यक्ती दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे घरातील दागदागिने किंवा किमती दस्तऐवज घरात ठेवणे त्यांना जोखमीचे वाटत असते यावर पर्याय म्हणून ते बँकांमध्ये लोक घेत असतात. या लवकर छाती मध्ये कमीत कमी 25 टक्के सूट आपल्याला मिळू शकते.
९. ओवरड्राफ्ट ची सोय | facility of over draft
काही कारणास्तव आपला पगार वेळेत जमा झाला नाही किंवा आपल्याला अचानक काही रकमेची आवश्यकता आहे अशावेळी आपल्या पगाराच्या दोन ते तीन पट ओव्हर ड्राफ्ट म्हणजेच अधिकची रक्कम बँका देतात पण त्यासाठी काही कागदपत्रे व त्यांची पूर्तता करावी लागते हादेखील खूप मोठा फायदा पगाराच्या खात्याचा आहे.
१०. संयुक्त खात्याचा लाभ | Facility Of Joint Account
आपण नोकरीला असून व आपल्या घरातील इतर सदस्य सरकारी नोकरदार असतील तरीदेखील आपण त्यांच्यासोबत संयुक्त खाते काढू शकतो. वयोवृद्ध आई-वडील यांना अचानक काही पैसे लागले तर आपण नोकरीनिमित्त बाहेर असतो ते तात्काळ मिळावेत यासाठी आपण संयुक्त खात्याचा फायदा घेतला पाहिजे असे मला वाटते.
११. एन इ एफ टी ,आरटीजीएस शुल्क मुफ्त | Free Rtgs &Neft
बँका आपल्याकडून आपण जर आपल्या खात्यातून काही रक्कम दुसऱ्याच्या खात्यात पाठवली किंवा आरटीजीएस केली तर त्यावर ते शुल्क आकारतात पण आपले जर पगाराचे खाते असेल तर त्यावर ती कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
सॅलरी अकाऊंट काढण्याची प्रक्रिया | Salary Account Kadhnyachi Process
1. खातेप्रमुखांचे पत्र | Khate Pramukh Patr
आपण ज्या कार्यालयात काम करता त्या कार्यालयाचे पत्र की अमुक कर्मचारी आमच्या कार्यालयात कार्यरत असून त्याचे Saving खाते Salary खात्यात परावर्तित करावे.
2.आपल्या मुख्य कार्यालयाचा cif क्रमांक | aaplya mukhya karyalyacha cif number
तो संपूर्ण कार्यालयाचा एकच असतो जसे मुंबई मनपा चा 74025415521 हा आहे तरी खात्री करून भरावा ही विनंती.
3. इतर | Itar Kagdpatre
आवश्यकता भासत नाही तरी देखील आपले कार्यालय ओळखपत्र व नोकरी आदेश सत्यप्रत सोबत ठेवा.
आपण बँक Maneger ला भेटून अगदी कमी वेळात एका खेपेत हे काम करू शकता. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा.कमेन्ट करा अजून काही अधिकची माहिती असल्यास कळवा आपण ती न्यून ते पूर्ण करण्यासाठी नक्की वापरूया.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह . धन्यवाद !जाता जाता पैसा म्हणजे सर्व काही नाही आणि हो पैशा शिवाय देखील काही नाही हेच अंतिम सत्य.
तुम्ही mutual फंडात गुंतवणूक केलीय काय?mutual म्हणजेच शेयर मार्केट ,काय असते म्यूचुअल फंडात रिस्क किंवा जोखीम जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
उत्तम मार्गदर्शन
उत्तर द्याहटवा