Type Here to Get Search Results !

शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर | Shear Market Madhe Trader Ki Long Investor

 शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर|   Trader Ki Investor 

                      शेर मार्केटमध्ये आपण Trader की Investor बनावे? म्हणजेच सोप्या भाषेत व्यापारी/ Trader  बनू की investor /गुंतवणूकदार.आपण शेअर बाजारविषयी बोलत असताना बरेच बोलतात की की मी अमुक रक्कम शेअर बाजारात गुंतवली/ इन्वेस्ट /Invest केलीय.त्यावेळी या क्षेत्रात नवा असेल त्याला हे समजत नाही. तर आपण आज ट्रेडर म्हणजे काय ? इन्वेस्टर म्हणजे काय ? हेच पाहणार आहोत.Trader Mhanje Kay ?  
                    मागील लेखात आपण पहिले  की  आपला जो वायपट जाणारा व अवाजवी खर्च होणारा पैसा होता त्याची बचत म्हणजेच काटकसर करून ,आपले Dmat Account(अधिक माहितीसाठी क्लिक)काढूनआपण शेअर बाजारात काही एक रक्कम गुंतवायला सुरुवात करणारआहोत.पण ती गुंतवलेली रक्कम किती दिवस मार्केट मध्ये ठेवणार यावरून आपल्याला आपण शेअर बाजारात गुंतवणूकदार /इन्वेस्टर  बनायचे की व्यापारी /म्हणजेच ट्रेडर याची कल्पना येणार आहे. हा भाग नीट समजून घ्या.आपला रोल न समजल्यानेच सुरुवातीच्या काळात अनेकजण  काही चुका करतात. व आपला तोटा करून घेतात . पण पुढच्यास ठेस मागचा  शहाना.ते उगीच नाही. सोप्या भाषेत ही ठेस मला लागली  मला कळले की या  क्षेत्रात पैसा प्रचंड आहे फक्त भूमिका बरोबर हवीय. असो  मी लवकर सावध झालो नि मग ठरवले आता सामान्य माणूस पण मोठा झाला पाहिजे .कारण का तर  अमेरिकेसारख्या देशात ४० लोक हा व्यवसाय करतात मग आपण भारतीय किंवा मराठी माणूस मागे का?असो विषयांतर नको.चला तर पाहूया शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर भूमिका आहे फायद्याची .............
शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर
शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर



शेयर बाजारातील भूमिका(toc)|

१. ट्रेडर | Trader 

            सर्वप्रथम आपण ट्रेडर म्हणजे काय?ते पाहू.एक उदाहरण देतो म्हणजे समजेल.समजा नाशिक भागात द्राक्षे खूप पिकतात.मग मी काय ठरवले या वर्षी नाशिकला जायचे द्राक्षे ४० रुपये किलोने घ्यायचे व लगेच त्याच किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला आणून विकायचे.ही जी व्यापार करण्याची भूमिका आहे तो झाला ट्रेडर. थोडक्यात मी द्राक्षे मालकाला सर्व पैसे न देता काही Advance दिले व दोन दिवसानी मुंबईमध्ये द्राक्षे विकल्यावर उर्वरित रक्कम माल विकून जमा केली व  या व्यापरतून मला काही नफा झाला. अगदी हीच भूमिका ट्रेडर ची असते. 
             थोडक्यात एखाद्या कंपनीचे आजच शेअर विकत घ्यायचे  व ३.३० ला मार्केट बंद होण्याआधी विकून टाकणे म्हणजे ट्रेडर जे करतो ते trding. याचे अनेक प्रकार पडतात. ते आपण पुढे पाहू. 

ट्रेडर व स्टॉक ब्रोकर | Trader Ani Stock Broker 

             आपण पहिले की Bse व Nse मधून आपण सरळ सरळ स्टॉक म्हणजेच शेअर विकत  घेऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला एका स्टॉक ब्रोकरकडे demat खाते काढावे लागते. जसे Angel ,Zeerodhaa,Upstocs . तर हे स्टॉक ब्रोकर नि ट्रेडर यातील व्यवहार आपण पाहणार आहोत. आपण पहिले शेअर खरेदी करायला लागणारे app ब्रोकर आपल्याला देतात.आपले demat खाते  काढून देतात. त्या बदल्यात त्या ब्रोकर ला आपण शेअर खरेदी व विक्री केल्यानंतर  कमिशन म्हणजेच दलाली मिळत असते. जर आपण पैसे invest केले तर त्यानाविक्री करताना एकदाच दलाली मिळते.याउलट Trader दिवसातून बऱ्याचदा खरेदी विक्री याचे कमिशन किंवा दलाली ब्रोकर ला मिळते.  
    समजा मी एखाद्या कंपनीचे ५०० शेअर विकत घेतले व ते ५ किंवा १० वर्षानी विकणार तर स्टॉक ब्रोकर ला दलाली जी असेल ती मी शेअर विकतानाच  मिळणार असते.मग ब्रोकर  दलाली जास्त मिळावी म्हणून मार्जिन देतात.  आपल्याजवळ १०००० असतील तर ते दिवसभरासाठी  मला अधिकचे ५०००० रुपयांचे शेअर खरेदी करण्याची पॉवर देतात पण एका अटीवर आज मार्केट बंद होण्याआधी घेतलेली रक्कम म्हणजेच मार्जिन (अधिकची रक्कम ) परत करावी लागेल. जर आपण घेतलेले शेअर विकले नाहीत तर स्टॉक ब्रोकर ते स्वत विकू शकतात ती Authority त्याना असते. मार्जिन न घेता देखील आपल्याजवलील  पैशाने  Trading करू शकतो. 
           थोडक्यात झटपट खरेदी झटपट विक्री व जास्त नफा हा उद्देश म्हणजे Trader इतके हे सोपे आहे. या Trding चे काही प्रकार पाहूया. 

ट्रेडिंग चे प्रकार |Treding Prakar /Type 

             यामध्ये एकवाक्यता नाही पण समजून घेण्यासाठी आपण काही प्रकार पाहूया. 

१.इंटराडे  | Intraday 

                intraday म्हणजे सोप्या भाषेत त्याच दिवशी खरेदी त्याच दिवशी विक्री.केवळ या प्रकारतच स्टॉक ब्रोकर मार्जिन जास्त देतात. काही स्टॉक ब्रोकर आपण जी गुंतवणूक करतो त्याच्या १० पट रक्कम रक्कम ते देतात. यात ट्रेडर/खरेदी करणारा मार्केट सुरू झाल्यानंतर त्याला वाटले अमुक शेअर वर जाईल तर तो मोठ्या संखेने Stock ची  खरेदी करतो  का?  तर त्याला मार्जिन मिळलेले असते.हा अतिशय जोखीम असलेला प्रकार आहे कसे तर आपण एकादा स्टॉक by म्हणजे खरेदी  केला त्याची संख्या जास्त असते.जर त्या शेअरची किमत न वाढता खाली यायला लागली तर मार्जिन भेटल्याने  रक्कम जास्त असते व होणारा तोटा देखील जास्त असतो. 
       उदा. 
         समजा मी १ लाख रुपयांचे  X  कंपनीचे शेअर १००० शेअर म्हणजे  १०० रुपयना  १ घेतला व मी घेताच काही वेळातच तो ५ रुपयांनी तो  खाली आला व अजून खाली येण्याची शक्यता आहे. तर मी ५ रुपये प्रती शेअर तोटा सहन केला तर माझे ५००० रुपयांचे नुकसान झाले. यात मला ९०००० हजार स्टॉक ब्रोकरने  वापरायला म्हणजे मार्जिन दिले तो ते घेणार . मग माझे १०००० रुपये भांडवलतील  ५००० हजार एकाच दिवशी गेले. म्हणून यात जोखीम जास्त नव्हे तर  खतरनाक असते. आणि सुरुवातीला याच चुका जास्त नफा मिळवण्यासाठी होतात. अनुभवाचे बोल अजून काय . 

२.स्विनग ट्रेडिंग  | swing trading 

                  या प्रकारात स्टॉक ब्रोकर आपल्याला मार्जिन देत नाही तर आपण आपल्याजवलील पैसा यात गुंतवायचा असतो. जो स्टॉक खरेदी करून किमान आठ किंवा दहा ते बारा दिवस  खरेदी करून थोडा नफा झाला की विकणे याला Swing Trdinng म्हणतात. एखाद्या कंपनीत कायतरी  चांगली बातमी आहे मग तो शेअर वर जाण्याची शक्यता असते. अश्या वेळी लोक Swing Trading करतात. यात तो अमुक दिवसातच विकावा असे बंधन नसते. पण जर तो ८ दिवसात विकला  तर  आपण स्विनग केले एवडेच. थोडक्यात यात ट्रेडिंग पण आहे व investing पण आहे मात्र ती कमी कालावधीसाठी .Intraday सारखी यात जोखीम नाही. 

३.पोझिसनल ट्रेडिंग | Positional Trading 

                            सर्व काही स्विनग प्रमाणे. मात्र ती गुंतवणूक  ८ दिवसापेक्ष जास्त किंवा काही महीने केली तर ते झाले Positional Trading.यात देखील Intraday इतकी जोखीम नसते. 
                            या Trding च्या प्रकरांनातर एक वेगळी भूमिका ती म्हणजे गुंतवणूकदार होय. वरील तीन प्रकारात देखील गुंतवणूकदार आहेत पण जो व्यक्ती जास्त दिवस आपले पैसे एकाच स्टॉक मध्ये कित्येक वर्षे गुंतवून ठेवतो तो म्हणजे Long  Lnvestor होय. 

गुंतवणूकदार | Long Investor  

                  आपल्या  ट्रेडिंगचे प्रकार नि ट्रेडर म्हणजे काय हे लक्षात आले असेल. झटपट नफा व कमी गुंतवणूक मात्र रिस्क अधिक तो म्हणजे Trader किंवा आपल्या भाषेत व्यापारी. पण Long Term Investor हा आपल्याकडील पैसा हा कित्येक वर्षासाठी वेगवेगळ्या स्टॉक मध्ये ताकत असतो. कंपनीला काही फायदा झाला तर तिच्याकडून मिळणारा बोनस,वाढीव शेर यांचा तो फायदा घेत अससतो. थोडक्यात त्या कंपनीवर तिच्या Business Model वर त्याचा विश्वास असतो. हा झाला गुंतवणूकदार. 
                     जो आपले पैसे जास्त कालावधीसाठी स्टॉक मध्ये लावतो तो म्हणजे Long Investor होय. 

ट्रेडर की इन्वेस्टर | Trader Ki Investor 

                 आज आपण Trader म्हणजे काय तर आपल्याकडील थोडी रक्कम व ब्रोकर कडील जास्त रक्कम घेऊन शेअर ची खरेदी विक्री करतो तो. याउलट जो स्वतचे पैसे गुंतवतो मार्जिन वापरत नाही व अनेक दीवस किंवा वर्ष आपले शेअर विकत नाही तो झाला गुंतवणूकदार. यात आपण काय करावे.शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर  मी तर म्हणेन समान्य माणसाने Trder बनण्याची चूक करू नये. हा माझा देखील अनुभव आहे. तर आपण जी काटकसर करू ती ५००० कंपन्या आहेत त्यातील ज्या खात्रीशीर आहेत. Nifty Fifties /nifty 50  मधील आहेत.Nifty ५० म्हणजे काय ?  त्यात कोणत्या कंपन्या आहेत यावर स्वतंत्र लेख आलेले आहेत ते जरूर वाचा. 
              आज आपण ट्रेडर व Investor या दोन भूमिका बघितल्या. हळूहळू आपण एक Long Investor म्हणून मार्केट मध्ये Entry करणार आहोत;पण ती करताना आपण सामान्य माणूस एकदम पैसा कोठून येणार ? तर यासाठी  आपल्याकडे दरमहा काटकसर करून जे काही २००० ते ३००० उरतील त्यात कोणते व किती शेअर खरेदी करायचे .थोडक्यात आपला पोर्टफोलियो कसा असावा ?(अधिक माहितीसाठी क्लिक) याविषयी माहिती  पुढील लेखात पाहू. चला तर मग आर्थिक साक्षर बनूया .मार्केटविषयी मनातील ग्रह सोडून देऊया. ही माहिती आवडत असेल तर नक्की ब्लॉग फॉलो करा.स्वत मोठे बना व आपले मित्र मंडळी याना देखील मोठे करूया.
          मला खात्री आहे की आजच्या या लेखातून शेअर बाजारात ट्रेडर की इन्वेस्टर यापैकी आपण कोणती भूमिका घ्यावी याची आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असेल.      

                          Nifti Fifties स्टॉक किंवा शेअर्स च्या माहितीसाठी नक्की वाचा .अधिक माहिती साठी हे नक्की वाचा.




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area