पोर्टफोलिओ म्हणजे काय ? What Is Meaning Of Portfolio? Portfolio Mhanje Kay
आज आपण पोर्टफोलिओ म्हणजे काय ?ते पाहणार आहोत. जे लोक शेअर मार्केट मध्ये अगदी जुने आहेत त्याना हा शब्द कायम परिचयाचा असणार किंवा त्या व्यक्तीला कायम आपला पोर्टफोलियो काय म्हणतोय ? अशी विचरणा देखील होत असणार .आज आपण जो व्यक्ती या शेअर बाजारात अगदी नवीन आहेत. त्यांच्यासाठी पोर्टफोलियओ म्हणजे काय ते अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत.केवळ एवढेच नाही तर तर आपला पोर्टफोलियो कसा असावा? Aadrsh Portfolio याविषयी आदर्श पोर्टफोलियो यावर देखील चर्चा करणार आहोत. आणि शेवटी माझ्या पोर्टफोलिओ विषयी थोडक्यात बोलणार आहे. Portfolio Mhnje Kaay Marathi Mahiti हवीय मग जरूर वाचा.
पोर्टफोलिओ |
पोर्टफोलिओ माहिती(toc)
पोर्टफोलिओ म्हणजे काय ? Portfolio Mhanje Kay
पोर्टफोलिओ म्हणजे काय ? थोडे उदहरणातून समजून घेऊया. समजा आपल्या घरी जर एखादा किमती दस्तऐवज असेल तर आपण काय करतो तर ते दागिने,पैसे,मौल्यवान वस्तु घरातील आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवतो व वेळ असेल त्यावेळी म्हणा किंवा वर्ष सहा महिन्यातून त्यात झालेली वाढ किंवा घट यांचा अंदाज घेत असतो. अगदी या उदाहरणावरून आपल्याला पोर्टफोलिओ म्हणजे काय लगेच समजेल. समजा आपण आपले दाग दागिने एक तर बँकेत लोकरला किंवा घरात आपल्या तिजोरीत ठेवतो ही तिजोरी म्हणजेच आपल्या दगिन्यांचा पोर्टफोलिओ होय. अजून १ उदाहरण देता येईल की लहान मुले जो गल्ला बनवतात. कोणी पैसे दिले तर ते त्या गल्ल्यात किंवा डब्यात आपले पैसे साठवतात अगदी तसेच आपल्याला शेअर खरेदी करायचे असतील तर आपल्याला स्टॉक ब्रोकर कडून Dmat अकाऊंट काढावे लागते मग आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो हे आपण पहिले. तर ह्या शेअरमध्ये एकूण किती पैसे किंवा भांडवल गुंतवले याचा विचार म्हणजे पोर्टफोलिओ होय.
अजून सोप्या भाषेत सांगयाचे तर आपण किती रुपयांचे शेर खरेदी केले व सध्या त्या सर्वांची गोळाबेरीज काय आहे हे सांगणे म्हणजे पोर्टफोलियो होय.
आपल्या Demat खात्यामधील वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर एकत्रित मांडणी किंवा विचार म्हणजे पोर्टफोलियो होय . आपण सगळे कटकसरितून पैसे वाचवून ते पैसे शेर बाजारात गुंतवणार आहोत तर माझा पोर्टफोलिओ हा चांगला असावा म्हणजेच मला नफा मिळवून देणारा म्हणजे ग्रीन असावा. एवढे समजले तरी खूप झाले. समजा मी दहा कंपण्याचे हळूहळू जसे पैसे येतील तसे वर्षभरात ५० हजार गुंतवले व आज त्याची किमत ६० हजार असेल तर माझा पोर्टफोलियो फायद्याचा आहे असे म्हणता येईल पण तो जर ३० हजारावर आला तर मी स्टॉक किंवा शेर निवडताना काहीतरी गडबड केली आहे असा त्याचा अर्थ होतो.तर आपल्याला पोर्टफोलिओ म्हणजे काय ? कळले असेलच. आता आपण आदर्श पोर्टफोलियो कसा असावा व त्यासाठी आपण काय कृती केली पाहिजे ते पाहणार आहोत .
आदर्श पोर्टफोलियो |Ideal Portfolio Marathi
आदर्श पोर्टफोलियो म्हणजे काय याविषयी मत मतांतरे आहेत.पण तरी काही एक नियम किंवा पथ्य ठेऊन शेर बाजारात पैसे गुंतवले तर तो पोर्टफोलिओ आदर्श आहे असे म्हणता येईल. ------- Portfolio Trics And Tips
१. विभिन्न क्षेत्रनिहाय स्टॉक ची निवड | Sectorwise Stock Selection
पोर्टफोलियो आदर्श असण्यासाठी त्यातील महत्वाची कोणती बाब असेल तर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये विविध क्षेत्रातील स्टॉक असावेत, बरेच जण क्षेत्र न पाहता जे शेर तेजीत आहेत अशा स्टॉक मध्ये जास्त रक्कम गुंतवतात.
उदा. मागच्या दोन दिवसात Hdfc बँकेचा शेर एका दिवसात १० टक्के वाढला म्हणजे खूप वाढला म्हणून त्या कंपनीचे जास्तीत जास्त शेर घेतले का तर ? फायदा जास्त मिळेल म्हणून पण झाले असे काही दिवसनी बँक क्षेत्र मागे पडले तर आपला loss जास्त होऊ शकतो.
यासाठी बँकिंग,fmgc ,फार्मा ,Privet Banking, Teli Communication ,Steel etc अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी लिंकवर क्लिक करून nifty fifty क्षेत्र निहाय स्टॉक ची माहिती दिली आहे ती जरूर वाचा.
२. Nifty Fifty तील स्टॉक ला प्राधान्य | Nifty Fifty Stock Prefrence
आपण पहिले की Nifty फिफ्टी मध्ये विविध क्षेत्रातील ५० कंपन्या असतात तर जे नवीन आहेत त्यांनी गूगल वर जाऊन Nifty ५० स्टॉक लिस्ट सर्च करून त्या कंपन्या माहीत करून घ्या किंवा शेवटी शेवटी दिलेल्या लेखाला भेट जरूर द्या. सांगण्याचा मुद्दा कंपन्या टॉप च्या निवडा.
३. समप्रमान | Equality ,Samprmanta
आपण समजा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आठ क्षेत्रातील स्टॉक घेणार आहोत पण ते घेत असताना सगळ्या क्षेत्राला समान न्याय द्या. एकाच क्षेत्रात जास्त पैसे गुंतवू नका . ८ क्षेत्रे असतील व आपल्या जवळ ५० हजार आहेत तर प्रतेक क्षेत्रात ५ हजार याप्रमाणे ४० हजार गुंतवा व उर्वरित १० हजार जर एखादे क्षेत्र खाली आले तर त्यातील शेर अजून खरेदी करा कालांतराने त्या क्षेत्रात तेजी ही येतच असते त्याचा फायदा घ्या. प्रतकेक क्षेत्रात समान भांडवल गुंतवण्याचा प्रयत्न करा.
४. मर्यादित स्टॉक | limited stock
काही गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलियो मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे असे बरेच Vareint करतात असे करू नका.आपल्या पोर्टफोलियो मध्ये जास्तीत जास्त २० विविध कंपन्यांचे आणि हो त्यात देखील sector विचार जरूर करावा. जास्त कंपन्यांचे स्टॉक असल्यास त्यांचा अभ्यास करणे जिकिरीचे जाते . शिवाय अमुक एक स्टॉक खाली १० टक्के ने खाली आला तर पुन्हा खरेदी करून Avrage साधायचा असतो त्यासाठी हा विचार व्हावा.
५. मार्केट पडल्याचा फायदा | Down Trend Cha Fayada
जर बाजारात मंदी असेल तर घबरून ण जाता ती संधि आहे असे समजून म्हणजेच जो Down ट्रेंड आहे त्याचा फायदा घेता आला पाहिजे.
उदा. x कंपनीचा स्टॉक कंपनी चांगली असून अचानक १५ ते २० टक्के ने खाली आला तर Long Term Invest साठी तो स्टॉक by म्हणजेच खरेदी करावा.
६. दरमहा गुंतवणूक | Monthly Investment ,Mhinyala Guntvnuk
आपल्याला करोडपती वह्याचे असेल तर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आपण काटकसर करून पैसा स्टॉक मार्केट मध्ये लावणार तर त्यात सातत्य ठेवा. एक रक्कम बाजूला काढून ठेवा. व दरमहा त्या रकमेचे शेअर खरेदी करण्याची सवय लावा. काही लोक एकदम लाख रुपये गुंतवतात व loss दिसू लागला की घबरतात असे करू नका दरमहा आपण किती गुंतवणार हे ठरवून घ्या . व आपण काटकसर केलेला पैसा असल्याने नफा झाला म्हणून तो पैसा काढून न घेता किंवा खर्च न करता आपला पोर्टफोलिओ अगदी सुरुवातीला हजार ----------दस हजार ----------लाख ---------दस लाख ----------करोड असा हळूहळू वाढू द्या म्हणून तर म्हटल ही एक चळवळ बनायला हवीय. सबका साथ सबका विकास म्हणजे शेर मार्केट हे डोक्यात पक्के करा. तर दरमहा गुंतवणूक केली तर आपला पोर्टफोलियो पाच ते सहा वर्षात कमी पैसे गुंतवून देखील १० लाखाच्या घरात जायला हरकत नाही.
७. जोखीम व्यवस्थापन | risk managment
आपला पैसा गुंतवत असताना आपल्याकडील ६० टक्के रक्कम की large cap म्हणजे मोठे भांडवल असलेल्या तर ३० टक्के Midcap मध्यम भांडवल असलेल्या तर १० टक्के छोट्या पण याना पुढील काळात Growth नक्की आहे अशा स्टॉक मध्ये टाकायला हवीय. या संकल्पनेसाठी स्वतंत्र लेख येईल.
८. संयम | Pation ,Sayam
बाजारात चड उतार असतात म्हणून एखादा स्टॉक खाली आला घबरू नका. जर कंपनी चांगली असेल तर नंतर ती प्रचंड Grip,TEJI घेते म्हणून संयम अतिशय महत्वाचा आहे हे ध्यानात घ्या.लावलेल्या रोपाला लगेच फुले ,फळे लागत नाहीत. किंवा कोणी एका रात्रीत श्रीमंत बनत नाही हे कायम ध्यानात ठेवा.
आपण आज काय शिकलो | Kaay Shiklo
पोर्टफोलिओ मध्ये विविष Sector Wise स्टॉक असावेत . त्या विविध Sector मधील टॉप कंपन्या निवडाव्यात. सर्व सेक्टर मध्ये शक्यतो समान गुंतवणूक असावी. व २० पेक्षा जास्त कंपन्या पोर्टफोलियो मध्ये नसाव्यात.दरमहा गुंतवणूक करावी त्यात सातत्य असावे. हा पैसा करोडपती बनवत नाही तोवर आपला नाही कारण तो काटकसर करून वाचवला आहे हे विसरू नका. आपल्याला लाख दोन लाखाचे रोपटे नकोय तर वटवृक्ष हवाय किमान १ करोडचा. शक्य आहे फक्त गरज आहे तुका मने अशक्य ते शक्य करीता सायास . म्हणजे प्रयत्न . जाता जाता एवढेच सांगेन मी सुरुवात केलीय आपणही करा . मी मोठा होऊन उपयोग नाही लाखों सामान्य जन मोठे व्हायला हवेत हीच मनोमन तळमळ आहे. पुन्हा भेटू अजून एका पुढच्या पायरीवर . अजून कोणत्या विषयावर चर्चा व्हावी आस वाटत असेल तर कमेन्ट करा. ही चळवळ माझी न राहता आपली बनवा. हीच मनोकामना. आवडल्यास कमेन्ट मध्ये २ वाक्य जरूर लिहा. लहान बाळाला देखील कौतुक आवडते बरे. काही सूचना असतील त्यांचे तर आवर्जून स्वागत. धन्यवाद !
Nifty फिफ्टी व त्यातील सेक्टर वाइज माहितीसाठी जरूर खालील लिंकवर क्लिक करा . व आपला पोर्टफोलिओ कसा असावा यावर विचार करा टिपणे काढा.
खरेदी ला घाई नको अजून थंबलोय तर जरा थांबा .
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.
उत्तर द्याहटवाStock market क्षेत्रात नवख्या मेंबरसाठी खूपच उपुक्त माहिती आहे.
प्रत्येक मराठी माणसाने बाजाराचे ज्ञान असणे आज काळाची गरज बनली आहे.
कुठल्याही क्षेत्रात आपण मागे राहता कमा नये.
आपले याबाबतीत प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.👌👌👌
सोप्या भाषेत परिपूर्ण माहिती
उत्तर द्याहटवाअगदी सोप्या भाषेत अवघड वाटणारी माहिती सोपी करुन सांगीतली. खुप छान सर!
उत्तर द्याहटवाखुप महत्वाची माहिती दिलीत,, dhanyvad सर
उत्तर द्याहटवा