पंढरीची वारी | 2022Pandhrichi Vari 2022Che Niyojan
कोरोना जागतिक महामार्गामुळे अवघे जगच थांबून गेले होते. त्यामध्ये पंढरीची वारी देखील आली. गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीसाठी जाता आली नाही. इतक्या वर्षांची परंपरा म्हणून संताच्या पालख्या काही मोजक्या लोकांच्या सहाय्याने एसटीतून पंढरपूर मध्ये दाखल झाल्या.थोडक्यात काय पायी वारीची अखंड परंपरा कोरोना महामारी मुळे बंद पडली होती. वारी बंद पडली नाही पण वारकऱ्यांना पायी जाण्याची परवानगी नव्हती. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये आषाढी वारी कोरोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यामुळे पायी वारी जाणार आहे आणि त्या संदर्भात नियोजनासाठी बैठका देखील पार पडलेल्या आहेत. पंढरीची वारी पायी करता येणार म्हणून वारकरी वर्गामध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे.
असं म्हणतात की जो पांडुरंगाचा भक्त आहे. त्या भक्ताने किमान वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी करावी. या पंढरीच्या वारीतून त्याची भक्ती मोठ्या प्रमाणात वाढत असते. संसार, प्रपंच, मोहमाया यातून भक्तीच्या प्रांगणात जाण्याचा मार्ग म्हणजे वारी.अशी जणू वारकऱ्यांची धारणाच आहे तर 2022 मध्ये या पंढरीच्या वारीचा कार्यक्रम कसा असेल,वारीचे नियोजन कसे असेल मुक्काम कोठे असतील ते आपण आजच्या लेखात पाहूया.
पंढरीची वारी 2022 चे नियोजन |
पालखी नियोजन (toc)
ज्ञानेश्वर महराज पालखी सोहळा 2022 मुक्काम व्यवस्था | Palkhi Sohlyachi Mukaam Vyavsthaa
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान म्हणजे ज्या ठिकाणाहून पालखी निघणार ते आळंदी ठिकाणावरून 21 जून 2022 रोजी पालखीचे प्रस्थान होणार आहे. आणि ही पालखी 10 जुलै रोजी मजल दर मजल करत पंढरपूर या ठिकाणी लाखो भक्तगणांसह पायी जाणार आहे. तर या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची मुक्काम व्यवस्था कशी असेल?पालखी कोणत्या ठिकाणी किती दिवस थांबणार? यातील सर्वच वारकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. तसेच सामान्यजन देखील पालखीला जाता आले नाही तरी या पालखीचे दर्शन व्हावे या दर्शनासाठी आम्ही गेल्या दोन वर्षापासून वंचीत आहोत या भावनेने पालखीची चातक पक्षा सारखी वाट पाहत आहेत. चला तर मग पाहूया आपल्या परिसरात ही पालखी कधी येणार आहे ते ..
1. आळंदी : 21जून वार मंगळवार | Aalandi Mukaam 21 Jun
21 जून 2022 रोजी वार आहे मंगळवार. यादिवशी आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे चार वाजता प्रस्थान होणार आहे. पालखीचे प्रस्थान म्हणजे एक नयनरम्य सोहळा या सोहळ्याचे साक्षीदार तुम्हाला व्हायचे असेल तर 21 जून रोजी तुम्हाला आळंदी येथे जावे लागेल. टीव्ही वर देखील आपण पाहू शकतो.
2. पुणे : 22 जून बुधवार व 23 जून गुरुवार 2022 | Punyatil Mukkam 22 v 23 Jun
22 जून आणि 23 जून बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी पालखी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते अशा पुण्यामध्ये असेल .आळंदी येथून पुण्यामध्ये पालखी प्रस्थान केल्यानंतर पुण्यामध्ये अतिशय उत्साही आणि आनंददायी वातावरण असते. जिकडे पाहावे तिकडे वारकरीच वारकरी असे सर्व चित्र पुण्याचे व आजूबाजूच्या परिसराचे झालेले असते. बरेच वारकरी ज्यांना पूर्ण वारी चालणे शक्य नाही.आळंदी ते पुणे पर्यंत दोन दिवस वारीसाठी देतात आणि नंतर ते आपल्या घरी परत येतात म्हणून पुण्यामध्ये या दोन दिवसात प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
3. सासवड : 24 व 25 जून शुक्रवार व शनिवार | 24&25 Jun 2022 Sasvad Mukkam
24 जून आणि 25 जून गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पालखी पुण्यातून निघेल यानंतर सासवड या ठिकाणी यावर्षी दोन दिवस मुक्कामी असणार आहे. या प्रवासातील पालखी वारीतील मुख्य आकर्षण म्हणजे सासवड येथील दिवे घाट या घाटातून पालखी चालत असताना विलोभनीय दृष्य असते. ते दृश्य टिपण्यासाठी अनेक टीव्ही न्यूज चॅनल वाले आवर्जून याठिकाणी येतात. पालखीची शिस्त पाहयची असेल आपल्याला या दिवे घाटातून दिसून येते.
4. जेजूरी : 26 जून रविवार|Vari 2022 Jejuri Mukaam 26 Jun
शनिवारी सासवड येथून पालखी निघाल्यानंतर ती पुढे खंडोबा तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी मध्ये आगमन करेल. जेजुरी मध्ये संत ज्ञानेश्वरांची पालखी 26 जून वार रविवारी मुक्कामी असेल आम्ही वैष्णवजन आम्हा नसे भेदभाव याची प्रचिती जेजुरीत येते कारण वारीतील भक्त विठ्ठल भक्त असूनही तेवढ्याच आवडीने शंकराचा अवतार असलेल्या खंडोबाचे येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात दर्शन घेतात हीच खरी वारीची खासियत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
5. वाल्हे : 27 जून सोमवार | 27 Jun Valhe Mukaam
या भूतलावर अनेक भक्तमंडळी होऊन गेले यातील सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे जो पूर्वाश्रमी वाल्या कोळी होता. लूटमार हाच त्याचा धंदा.पण नारदमुनींच्या उद्देशाने ज्याने खूप मोठी तपश्चर्या केली आणि राम या भूतलावर येण्याअगोदर किंवा रामाचे अवतार कार्य सुरू होण्याअगोदर रामायण रचले गेले ते ज्यांनी रचले किंवा ज्यांच्या हातून लिहिले गेले ते पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी महर्षी वाल्मिकी नावाने सर्वांना सुपरिचित झाले अशा या वाल्मीक ऋषींचे मुळगाव म्हणजे वाल्हे. याठिकाणी 27जुन सोमवार या दिवशी या दिवशी ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आगमन होणार आहे.
6 . लोणंद : 28 जून मंगळवार व 29 जून बुधवार | 28 v 29 Jun Lonand Mukaam
वाल्हे या ठिकाणानंतर पालखी 28 जून व 29 जून 2022 मंगळवार व बुधवार रोजी लोनंद या ठिकाणी मुक्काम असणार आहे.लोनंद या ठिकाणाचे विशेष महत्त्व म्हणजे पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये आगमन करते त्यामुळे साताऱ्यातील थोर मंडळी पालखीच्या स्वागतासाठी लोणंद ठिकाणी येतात.
7. तरडगाव : 30 जून गुरुवार |Taradgav Mukkam 30 Jun
29जून 2000 22 रोजी पालखी लोणंद या ठिकाणावरून निघाल्यानंतर 30 जून 2000 22 रोजी तरडगाव याठिकाणी तिचा मुक्काम असणार आहे.
अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा लेख.....Awsome
उत्तर द्याहटवा