Type Here to Get Search Results !

अक्षय तृतीया सणाची मराठी माहीती 2023 | Akshay Trutiya Sanachi Marathi Mahiti

अक्षय तृतीया सणाची मराठी माहिती 2023 | Akshay Trutiya Sanachi Marathi Mahiti 2023 Akshaya Tritiya Festival Marathi Information 2023 aksahya tritiya information in  marathi 

हिंदू धर्मामध्ये सण ,उत्सव यांना प्रचंड महत्त्व आहे. हे सण उत्सव आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. या सण उत्सवामुळे आपल्याला एक नवी ऊर्जा मिळत असते. प्रत्येक सण आपल्याला काही ना काही संदेश देऊन जात असतो.आज आपण ज्या सणाविषयी माहिती पाहणार आहोत तो सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त  म्हणजे अक्षय तृतीया होय. या अक्षय तृतीया सणाची मराठी माहिती आपल्याला नक्कीच आवडेल. ती इतरांना पाठवून त्यांना देखील आपली हिंदू संस्कृती  सण उत्सव  यांची माहिती कळू द्या. अलीकडे लोक आपले सण उतस्व याबाबतीत तितकेसे उत्साही दिसत नाहीत.आज कालची तरुण पिढी तर केवळ मोबाईल च्या आभासी जगतात वावरताना दिसत आहेत त्यांना तर आजची ही Akshay Trutiya Sanachi Marathi Mahiti 2023 आवर्जून सांगा. जेणेकरून त्यांना आपली संस्कृति तसेच कोणताही सण साजरा करण्यामागील भूमिका समजेल.सर्वप्रथम साडे तीन मुहूर्त पाहूया.    

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्त | Sade Tin Muhurt mahiti marathi   

       हिंदू धर्मामध्ये किंवा ज्योतिष शास्त्रानुसार कोणतेही काम करण्यासाठी मुहूर्त पाहिले जातात. मुंज,साखरपुडा लग्न,नवीन घर, नवीन वस्तू घेण्यापूर्वी मुहुर्त पहिले जातात. पण पूर्ण वर्षभरामध्ये असे काही दिवस आहेत कि ज्यादिवशी कोणताही मूहूर्त पाण्याची आवश्यकता नाही आणि त्यांनाच साडेतीन मुहूर्त म्हणतात. या साडेतीन मुहूर्तात हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते तो सण म्हणजे गुढी पाडवा. हा एक पूर्ण दिवसाचा मुहूर्त मानला जातो त्यानंतर वैशाख महिन्याच्या तिसर्‍या दिवशी येणारी अक्षय तृतीया हा एक दुसरा मुहूर्त मानला जातो आणि त्यानंतर दसरा हा तिसरा मुहूर्त मानला जातो.  दिवाळीचा पाडवा अर्धा दिवस मुहूर्त असे मिळून साडे तीन दिवस.या दिवशी कोणतेही काम असो ते करत असताना मूहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही इतके ते शुभ आहेत अशी धारणा आहे.या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या मुहूर्ताची किंवा सणाची माहिती आपण आज पाहणार आहोत. 

अक्षय तृतीया सणाची माहिती
अक्षय तृयीया सणाची माहिती


अक्षय तृतीया माहिती (toc)|


अक्षय तृतीया सणाची मराठी माहीती 2023  | Akshay Trutiya Sanachi Marathi Mahiti 2023 Akshaya Tritiya Festival Marathi Information 2023


आपण अक्षय तृतीया सणाची माहिती पाहण्या अगोदर हा सण नेमका का ? आणि कधीपासून साजरा होऊ लागला. यामागील इतिहास किंवा आख्यायिका पाहूया. 

अक्षय तृतीया सण नेमका कधीपासून साजरा केला जात आहे akshay tritiya san sajraa honyamagil itihas अक्षय तृतीया म्हणजे काय ? what is meaning of akshay tritiya in marathi   


1. त्रेता युगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय तृतीया   | Tretaa Yug Prarambh mhnje akshaya tritiya  

 आपण जर पुराणे उघडून पहिली तर त्या पुराणात सांगितल्यानुसार अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असे सांगितले जाते की एक वाद विवादाचे,कलहाचे युग संपून ज्या दिवशी त्रेतायुगाचा आरंभ झाला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. म्हणून या दिवसाला शुभ दिवस मानले जाते.ह्या दिवशी त्रेता युग सुरू झाले असे सांगितले जाते. 

2. परशुरामांचा जन्मदिन म्हणजे अक्षय तृतीया  |Parshuramachaa Janm Divas means akshay tritiya 

 या भूतलावर ज्यावेळी पाप वाढते त्यावेळी भगवंत अवतार घेत असतो अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. विष्णूने जो सहावा अवतार घेतला तो परशुरामाचा. हा अवतार ज्या दिवशी घेतला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात परशुरामभक्त ही परशुराम जयंती उत्साहात साजरी करतात.थोडक्यात अक्षय तृतीया म्हणजे परशुराम यांचा जन्मदिन होय. 

3. गंगेचे भूतलावर आगमन म्हणजे अक्षय तृतीया  | Gangeche Bhutlavr Aagman zale to divas mhanje akshay tritiya 

   भुतलावर पाण्याअभावी सर्व धरतीमाता त्रस्त झाली होती. प्रचंड दुष्काळ पडला होता. अशावेळी भगीरथ राजाने खूप मोठी तपश्चर्या केली आणि त्याचे  फळ म्हणून स्वर्गातून गंगा या दिवशी भूतलावर आली म्हणजेच जमिनीवर आली तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 

4. महाभारत ग्रंथलेखन आरंभ | Mahabhart Granth Lekhn Aarambh 

  महर्षी व्यास यांनी महाभारताचे लेखन केले या महाभारत लेखनाला सुरुवात केली तो दिवस म्हणजे अक्षयतृतीयाचा दिवस. 


5. पांडव आणि अक्षय पात्र व अक्षय तृतीया यांचा संबंध | Pandv Aani Akshy Patr 

   पाच पांडव ज्यावेळी वनवासासाठी जात असताना काळजीपोटी  भगवान श्रीकृष्णाने पाच पांडवांना जे पात्र दिले ते म्हणजे अक्षय पात्र . या अक्षय पात्रामुळे वनवासात पांडवांच्या  खाण्यापिण्याची सोय झाली अशी एक कथा सांगितली जाते. 

६. अन्नपूर्णा देवीचा जन्म | Annapurnechaa Janmdivas 

     अक्षय तृतीया या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला. म्हणून या दिवशी स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा देवी ची पूजा केली जाते. आणि म्हणूनच कि काय खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान या दिवशी केले जाते.


अक्षय तृतीयेचा पूजा विधि मराठी माहिती 2023 | Akshy Trutiyaa Puja vidhi marathi mahiti Akshaya Tritiya Pooja Vidhi Marathi Information 2023

       अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रातःकाळी सकाळी लवकर उठावे स्नान करावे त्यांनंतर  एका चौरंगावर किंवा पाटावर नवे कोरे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा ठेवाव्यात या दिवशी  त्यांची पूजा केली जाते. पूजा करत असताना त्यांना अगरबत्ती, फुले, धूप, नैवेद्य दिले जातात.  

अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक काय करतात  मराठी माहिती What do people do on the day of Akshaya Tritiya marathi mahiti 2023


1. दान करतात  | Dan 

     या दिवशी लोकांकडुन मोठ्या प्रमाणात दान केले जाते. जो भुकेला आहे त्याला अन्नदान, जो तहानलेला आहे त्याला पाणी, ज्याच्याजवळ वस्त्रे नाहीत त्याला वस्त्रे. थोडक्यात हरतऱ्हेचे दान या दिवशी केली जाते .असं म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या  गोष्टींचे  आपण दान करतो त्या गोष्टी पूर्ण वर्षभर आपल्याला कधीच कमी पडत नाही. 


2. नवीन वस्तूंची खरेदी आणि अक्षय तृतीया   | Purchase of new goods in akshay tritiya 

        अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबातील गरीब व्यक्ती देखील कमीत कमी एखाद-दुसरा ग्राम तरी सोने खरेदी करतात. यामागे अशी धारणा आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केले तर वर्षभर सोन्याची खरेदी केली जाते. थोडक्यात आपल्या घराला बरकत मिळते असे म्हटले तरी वावगे नाही. 


3. कृतज्ञता दिन | Krutndyat Din 

       या भूतलावर मनुष्याचा जन्म मिळणे यासारखे पुण्य नाही .हा मनुष्याचा देह किंवा कोणत्याही सजीव प्राण्याचा देह पाच गोष्टी पासून बनलेला असतो आणि त्यांनाच अध्यात्मिक भाषेत पंचमहाभूते म्हणून संबोधले जाते.  या पंचमहाभूतांचा मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचा समावेश होतो आपले संपूर्ण शरीर या पंचमहाभूतांनी बनलेली असते ही पंचमहाभूते आपल्याला सोडून जातात त्या वेळी शरीरातील चैतन्य कमी होते म्हणून या दिवशी या पंचमहाभूतांची देखील पूजा केली जाते. 


4. पूर्वजांची आठवण म्हणजे अक्षय तृतीया  | Purvjanchi Aathvan 

      पंचमहाभूते ज्या शरीरात वास करतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, पण हा देह ज्या पूर्वजांनी मुळे मिळाला त्या पूर्वजांविषयी देखील आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीया सण साजरा केला जातो .म्हणून या सणाला विशेष महत्व आहे. या पूर्वजाना  पितर म्हणून संबोधले जाते. घरामध्ये गोड धोड  जेवण बनवले जाते आणि या पितरांच्या निमित्ताने नैवेद्य ठेवला जातो.पै पाहुणे यांना जेवायला बोलावले जाते. 


5 पूर्वजांना आवडणाऱ्या वस्तूंचे दान | Vstunche Dan 

  आपण जे आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत. आज आपले पूर्वज हयात नाहीत पण त्यांच्या आवडीनिवडी होत्या त्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असतात आणि त्यांची आठवण म्हणून त्यांना आवडणाऱ्या खाण्या पिण्यातील वस्तू दान करण्याचा एक रिवाज अक्षय तृतीयेला आहे. आणि अजून एक कारण आहे अक्षय तृतीयेला जे  दान केले जाते ते  अक्षय असते त्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही अशी देखील त्यामागील धारणा आहे


6. नामस्मरण | Namsmrn

 अक्षय तृतीयेच्या  दिवशी केलेले नामस्मरण  अखंड टिकत असते. म्हणून या दिवशी भक्तमंडळी जास्तीत जास्त नामस्मरण करतात त्यांच्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. 


7 नांगराची पूजा | Nangrachi  Pooja 

                 अक्षय तृतीया ज्या  दिवसांमध्ये येते ते उन्हाळ्याचे दिवस असतात. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्याला आपल्या शेतीची मशागत करायची असते आणि या मशागतीला सुरुवात करण्याचा शुभ दिवस म्हणजे अक्षयतृतीया. म्हणून या दिवशी शेतकरी नांगराची पूजा करतात जेणेकरून शेतीतून मिळणारे अन्नधान्य अक्षय असावे असा त्या मागील उद्देश असतो. 

अक्षय तृतीया सणातून कोणता  बोध घ्यावा  | Akshy Tritiyaa Bodh milto 

        आज आपण पाहतो की माणूस अतिशय संकुचित दृष्टीचा झालेला आहे.  पाप-पुण्य दानधर्म या गोष्टी तो मानायला तयार नाही. मी म्हणेन नका तुम्ही अन्नदान करू पण समाजात जे अनाथ,अपंग आहेत यांच्यासाठी जर काही मदत करता आली तर या दिवशी नक्की प्रयत्न करावा. अन्नपूर्णेचा जन्म म्हणून घरातील अन्नधान्याची नासाडी थांबवावी. आपले जे पूर्वज आहेत त्यांनी जे महान असे कार्य केले असेल ते कार्य आपल्या मुलाबाळांना सांगावे. जेणेकरून आपल्या पूर्वजांची माहिती  त्यांना समजेल.शक्य असल्यास त्या भगवंताचे नामस्मरण करावे. यामागील  अंधश्रद्धा सोडा पण या सगळ्यातून नक्कीच समाधान मिळेल.थोडक्यात काय या दिवशी आपण करतो त्याचा क्षय कधी होत नसेल म्हणजेच अंत कधी होत नसेल तर या दिवशी कायम चांगले विचार करा, इतरांशी चांगले वागा मनात कोणाबद्दल वाईट विचार आणू नका.


अक्षय तृतीया मराठी माहिती पहा Akshay Trutiya Sanachi Marathi Mahiti  video 






FAQ | काही प्रश्न

1. अक्षय तृतीया 2023मध्ये कोणत्या तारखेला आहे? 
   22 एप्रिल  

2. साडे तीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्त कोणता?
   दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.

3. अक्षय तृतीया या सणा दिवशी कशाची सर्वाधिक खरेदी केली जाते ?
      सोने व नवीन वस्तु  

आमचे हे लेख आवर्जून वाचा 
 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area