Type Here to Get Search Results !

अशोकनगर अभ्यासू निखिल | Ashoknagr Abhyasu Nikhil

    अशोकनगर अभ्यासू निखिल | Ashoknagar Abhyasu Nikhil 

                          या विशेष लेख मालेतून आमच्या अशोकनगर मनपा शाळेतील गुणी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा,अनुभवाचा उपयोग सर्वाना व्हावा कारण स्वानुभव हे अतिशय परिणामकारक असतात आणि म्हणूनच आजच्या या लेखातून अशोकनगरचा एक गुणवंत विद्यार्थी निखिल दहावीला बोर्ड परीक्षेत चांगले गुण कसे मिळवावेत या संदर्भात आपले अनुभव व्यक्त करीत आहे. 

अशोकनगर अभ्यासू निखिल
                            अशोकनगर अभ्यासू निखिल

अभ्यासू निखीलची माहिती (toc)

       नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! मी निखील देशमुख अशोकनगर महानगरपालिका माध्यमिक शाळा ,कांदिवली पूर्वचा माजी विद्यार्थी.  मार्च 2013 च्या परीक्षेमध्ये मी एसएससी बोर्डाची परीक्षा दिली आणि या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 92 टक्के गुण मिळवून मुंबई महानगरपालिकेमध्ये चौथा आलो गुण सांगणे यात माझा मोठेपणा नाही, परंतु तुम्ही देखील मी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण केले तर तुम्हाला देखील असे यश किंवा याहून मोठे यश मिळवू शकता. आमच्या शाळेतील श्री शिपकुले सरांच्या विनंतीला मान देऊन मी माझ्या अभ्यासातील काही टिप्स तुमच्या सोबत शेअर करीत आहे. 

                 आजच्या या लेखाच्या माध्यमातून मी दहावी मध्ये शिकत असताना अभ्यास कसा केला ? व हे यश कसे  मिळवले ? या विषयी माहिती सांगणार आहे. दहावीचे वर्ष म्हटले की विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील थोडे टेन्शन येत असते कारण दहावीच्या गुणांवरच पुढच्या सगळ्या शिक्षणाची इमारत उभी राहणारअसते.  आपले नातेवाईक देखील आपण परीक्षा दिल्यानंतर दहावीच्या परीक्षेमध्ये किती टक्के गुण मिळाले? हा प्रश्न कायम विचारत असतात .तुमच्या प्रमाणेच मला देखील दहावी मध्ये शिकत असताना बरेचदा ताण तणाव आणि टेन्शन यांचा सामना करावा लागला आहे. परंतु असा ताण आल्यानंतर मी हताश न होता नियोजित पद्धतीने अभ्यास केलाव यावर मात मिळवली. असं म्हणतात ना शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्ध  प्रसंगी कमी रक्त सांडावे लागते.  थोडक्यात योग्य अभ्यास पद्धती ,वेगवेगळ्या टेक्निक, नोट्स, योग्य मार्गदर्शन व जास्तीत जास्त सराव पेपर सोडवणे असे केले तर कोणताही साधारण विद्यार्थी दहावीला चांगले गुण मिळू शकतो हेच मला या माझ्या अनुभवातून सांगायचे आहे. चला तर मग सुरुवात करूया . हे अनुभव तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच कशा पद्धतीने अभ्यास करावा? यासाठी दिशा देतील. 

1. नववीचा निकाल आणि अभ्यासाचे साहित्य |  Nanvvicha Nikal V Abhyas Sahitya 

                               विद्यार्थी मित्रांनो माझा नववीचा निकाल लागला. आणि नववीच्या वार्षिक परीक्षेमध्ये मला 85 टक्के गुण मिळाले हे गुण पाहून मी थोडा नाराज झालो.कारण का तर माझ्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. मी यावर विचार करायला सुरुवात केली. कोणत्या विषयांमध्ये मला कमी गुण मिळाले? आणि का कमी मिळाले? याचा लेखाजोखा मी एका कागदावर  घेतला माझ्या नववीच्या परीक्षेत कोणत्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यावर मी विचार करायला सुरुवात केली. थोडक्यात मी सेल्फ ऍनॅलिसिस केले आणि तुम्ही देखील ते करायला हवे मी माझ्या अभ्यासातील स्ट्रॉंग पॉईंट आणि weak पॉईंट जाणून घेतले आणि यामुळेच मी दहावी मध्ये चांगले गुण मिळवले.  उदाहरणच द्यायचं झालं तर नववी मध्ये इंग्रजी आणि गणित ते विषयी माझे कच्चे होते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या विषयांचा अभ्यास करायला सुरुवात केळी. आपण देखील करावी ही अपेक्षा. 

                          जूनमध्ये शाळा सुरू होतात तेव्हा पुस्तके खरेदी करू असा विचार न करता एप्रिलमध्येच ज्यादा सुरू होताच मी माझ्या मित्रांकडून इयत्ता दहावीची जुनी पुस्तके गाईड प्रश्नपत्रिका हे सर्व साहित्य संग्रहीत केले.  आणि वेळ मिळेल तसे ते चाळायला वाचयाला सुरुवात केली. थोडक्यात आपल्या निकालाचे anylisis  करायला हवे.  आणि एप्रिलमध्येच म्हणजेच वर्ष सुरू होण्याआधीच अभ्यासा साठी लागणारे सर्व साहित्य जमवायला हवे. 

2. स्वयंअध्ययन की खाजगी शिकवणी | Swaym Adhyan Ki Shikvni 

                         दहावी म्हटल्यानंतर बोर्डाची परीक्षा त्यामुळे बरेचसे विद्यार्थी नववी पर्यंत ट्युशन लावली नाही तरी मात्र  दहावीला मात्र ट्युशन किंवा खाजगी क्लासेस लावतात. मला देखील असेच वाटू लागले आणि मी देखील एक प्रायव्हेट क्लास जॉईन केला. परंतु त्या क्लासेस मध्ये गेल्यानंतर त्यांचा केवळ घोकंपट्टीवर असलेला भर पाहून मला वाटू लागले मी या मार्गाने गेलो तर मी ठरवलेले ध्येय गाठू शकणार नाही. कारण माझा शाळेमध्ये  वर्गात शिकण्यासाठी जाणारा वेळ आणि  ट्युशन मध्ये जाणार मग मी अभ्यास कधी करणार ?असे मला वाटू लागले.  मी स्थिर होऊन विचार केला आणि प्रायव्हेट क्लास सोडण्याचा निर्णय घेतला आणिएक  संकल्प केला ही कोणत्याही क्लास शिवाय मी चांगले गुण मिळवून दाखवणार. मी क्लास सोडला हे पाहून माझे काही मित्रही क्लास सोडतील या भीतीने क्लासच्या सरांनी मला भीती घातली.तू क्लास सोडला तर तुला खूप कमी गुण नाहीतर तू नापास होशील. मी तुझ्या मित्रांना तुझ्या पेक्षा जास्त गुण पाडून दाखवतो असे भावनिक इमोशनल करण्याचे काम त्यांनी केले .तू क्लास सोडला तर तुला परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत.असे ते बोलले  पण मी घाबरलो नाही. मी माझ्या मतावर ठाम राहिलो आणि अभ्यासामध्ये स्वयंशिस्त ठेवली  याचेच फलित म्हणजे माझा निकाल. मला इथे सांगायचे आहे की मला क्लासेस नाही म्हणून चांगले गुण मिळणार नाहीत असे जर डोक्यात असेल तर ते डोक्यातून काढा. महानगरपालिकेचे शिक्षक जी तोड मेहनत घेऊन आपल्याला शिकवत असतात,सराव परीक्षा घेत असतात गरज आहे ती तुम्ही सर्व काही मन लावून करण्याची. 

3. घरातील वातावरण आणि अभ्यास | Gharatil Vatavrn Aani Abhyas 

                     मुंबईसारख्या ठिकाणी विशेष करून झोपडपट्टीमध्ये कायमच गोंगाट आणि कलकलाट असतो.  माझे घर देखील त्याला अपवाद नव्हते यावर उपाय म्हणून मी सकाळी शाळेतून आल्यानंतर माझी एका मित्राच्या घरी अभ्यासाला जात असे कारण तिकडे थोडीशी शांतता होती.आपण देखील आपल्या घरात पोषक वातावरण नसेल तर समाज मंदिर किंवा ज्या ठिकाणी शांतता  असेल अशा ठिकाणांचा शोध घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. मित्राकडे अभ्यास केल्यानंतर अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून संध्याकाळी किमान अर्धा तास अभ्यासातून आलेली मरगळ घालवण्यासाठी टीव्ही पाहत होतो. संध्याकाळच्या वेळी शांतता असते म्हणून मी आमच्या घराच्या छोट्याशा किचनमध्ये घरातील सगळी मंडळी झोपल्यानंतर रात्री दहानंतर जवळजवळ एक वाजेपर्यंत माझा अभ्यास सुरू असायचा.  संध्याकाळच्या वेळी अभ्यास करत असताना शक्यतो गणिताचा अभ्यास मी जास्त करत असे. गणित या विषयांमध्ये उदाहरणे सोडावी लागत असल्याने आपण त्यामध्ये व्यस्त असतो.  त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. आपल्या घरातील वातावरण अभ्यासासाठी पोषक नसेल  तर आपण आपल्या पालकांशी चर्चा करून काय करता येईल या विषयी मार्ग काढावा ? अभ्यासाला बसताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये चार चार तास अभ्यास होणे शक्य नाही तर थोडा थोडा करत तो कालावधी वाढवला पाहिजे. अगदी सुरुवातीला अर्धा तास पुढच्या आठवड्यामध्ये एक तास त्यानंतरच आठवड्यामध्ये दोन तास. थोडक्यात आपली अभ्यासासाठी बैठक तयार होणे जास्त गरजेचे आहे जेवढी बैठक मोठी तेवढे यश मोठे. म्हणून अभ्यास करताना कंटाळा आला तर काही वेळ पुस्तके बाजूला ठेवा पण पुन्हा अभ्यासासाठी पुस्तके हातामध्ये घ्या. एकदा आपल्याला अभ्यासाची सवय लागली की नंतर आपण अभ्यासाशिवाय राहू शकत नाही हा माझा अनुभव आहे. 

4. मेडिटेशन योगासने व आहार | Meditation Yogaa Aani Aahar 

                     एखादी गाडी चालण्यासाठी त्या गाडीला इंधनाची आवश्यकता असते.  तसेच आपले मन पण ताजेतवाने राहण्यासाठी मेडिटेशन योगासने आणि योग्य आहार यांची गरज असते. मला दहावीला जे यश मिळणे यशामध्ये मेडिटेशन आणि योगासनांचे योगदान महत्वाचे आहे.कारण त्यामुळेच  मी कायम ताजातवाना आणि प्रसन्न राहत होतो. 

 १.  मेडिटेशन किंवा ध्यान |Dhyan Aani Abhyas 

                 आपण मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने आपली एकाग्रता वाढते. आपले चंचल मन स्थिर व्हायला मदत होते. मेडिटेशन विषयी  आपल्याला जास्त काही माहित नसेल तर किमान अभ्यासा पूर्वी एका ठिकाणी डोळे मिटून पाच ते दहा मिनिटं शांत बसले  तरी देखील आपले मेडिटेशन होऊ शकते.  मी देखील अभ्यासा पूर्वी पाच मिनिटे ध्यान करायचो आणि याचा मला खूप फायदा झाला तर आपण देखील अभ्यास करण्याआधी पाच मिनिटे वेळ मेडिटेशन करावे. 

 २. योगासने आणि प्राणायाम | Yoga And Study 

                      मी अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी अनुलोम-विलोम आणि ब्राह्मणी यासारख्या प्राणायामाचे प्रकार अभ्यासाला बसण्यापूर्वी करत असे.आपण देखील जास्त नाही पण एखाद-दुसरी प्राणायाम किंवा काही शक्य नसेल तर मांडी घालून डोळे बंद करून ओम या शब्दाचा नाद आपल्या कानावर पडल्यास आपले चंचल मन स्थिर व्हायला मदत होते.किंवा विपश्यना देखील करू शकता. 

३. आहार आहार | Aahar Aani Study 

              दहावी मध्ये शिकत असताना मी सुरुवातीपासूनच आहाराविषयी दक्ष होतो. विद्यार्थ्यांनी बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.  मी हा मुद्दा यासाठी मांडत आहे कारण का तर उत्तम आरोग्य असेल तरच आपला अभ्यास उत्तम  होऊ शकतो. 

                         वरील सर्व बाबी अभ्यासासाठी पोषक वातावरण कसे गरजेचे आहे.आरोग्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी  ? याबाबी देखील अतिशय गरजेच्या आहेत म्हणून थोडक्यात सांगितल्या.  आता जो भाग की जो भाग समजून घेण्यासाठी तुम्ही अतिशय उत्सुक असाल तो म्हणजे मी दहावीला कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा माझ्या अभ्यासाच्या पद्धती कशी होती. चला तर मग-----------

अभ्यासाच्या पद्धती | Abhyasachi Padhti 

                              मी अभ्यास करत असताना काही बाबी या जाणीपूर्वक अमलामध्ये आणल्या आणि त्याचा उपयोग मला दहावी मध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी झाला त्या बाबी पुढीलप्रमाणे - 

1. नियोजन | Niyojn 

                          कोणत्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर नियोजनाला अतिशय महत्त्व आहे.  दहावी मध्ये देखील आपले काही एक नियोजन आपल्याकडे असले पाहिजे.  मी उद्या मला कोणता अभ्यास करायचा आहे ? याचे  रोज  रात्री झोपताना नियोजन करून ठेवायचो आणि ते माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी जाणीवपूर्वक त्या पद्धतीने अभ्यास करायचो. नियोजनबद्ध अभ्यास केल्यामुळे आपल्या संकल्पना पक्क्या होतात सराव चांगला होतो. आपल्या मनात असणारी भीती नियोजनामुळे कमी व्हायला मदत होते. 

2. संकल्पना समजून घेणे | Concept 

                                            अभ्यास करत असताना विज्ञान सारख्या विषयात ज्या वेगवेगळ्या संकल्पना असतात या संकल्पना पाठ न करता समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. जर एखादी संकल्पना समजली नाही तर शिक्षकांना विचारत होतो.बरेचसे विद्यार्थी न कळलेला घटकब ती  संकल्पना शिक्षकांना न विचारता  सोडून देतात आणि तो घटक परीक्षेत विचारला गेला तर मात्र आपल्याला कमी गुण मिळू शकतात. 

                उदाहरणच द्यायचे झाले तर इतिहासाचा अभ्यास करताना त्या इतिहासातील घटना माझ्यासमोर घडतच आहेत जसे की लढाई. त्यावेळी मी इमॅजिनेशन करायचो  आणि युद्धाचे परिणाम यासारख्या गोष्टी मला इमॅजिनेशन मुळे चटकन नि  आपोआप लक्षात राहायच्या. थोडक्यात अभ्यास करत असताना आपल्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत  तरच आपल्याला चांगले गुण मिळू शकतात. 

3. मुद्दे काढण्याची सवय | Mudde Kadhnyachi Savya 

                            अभ्यास करत असताना इतिहास, भूगोल विज्ञान यासारखे विषय अभ्यासत असताना पॉईंट काढण्याची सवय आपल्याला हवी.जर आपण पॉईंट किंवा मुद्दे बाजूला काढणे तर तो घटक समजायला मदत होते.  आणि परीक्षा मध्ये त्या मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचे स्पष्टीकरण देऊन चांगले गुण मिळवू शकतो.  मुद्दे काढण्याच्या सवयीमुळे अवघड भाग देखील आपल्याला सोपा वाटतो. नेमक्या शब्दात उत्तर कसे मांडायचे याची सवय पॉईंट काढण्याचे अभ्यास पद्धतीमुळे लागते. 

4. पेपर कसा सोडवावा | Peper Ksaa Sodvava 

                        कोणताही विषय असून आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर पेपर देत असताना काही बाबींकडे लक्ष पण दिले पाहिजे.  मी पेपर सोडवत असताना खालील बाबींकडे विशेष लक्ष देत असे

1. उत्तराची मांडणी  Uttranchi Mandni 

              आपण उत्तरपत्रिकेमध्ये जी मांडणी करणार आहोत ती मांडणी एक सलग  करता मुद्देसूद मांडणी करण्याची सवय लावावी त्यामुळे परीक्षा कावरे कापले वेगळेच इम्प्रेशन पडते. 

2. हस्ताक्षरब | Hastakshr 

                हस्ताक्षराचे बाबतीमध्ये मी एकच सांगेन ती प्रयत्नपूर्वक चांगले अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा. बरेच विद्यार्थी अक्षर चांगले असून देखील केवळ कंटाळा मुळे अक्षर चांगले काढत नाहीत असे न करता अक्षर टापटीप व चांगले काढावे अक्षरांवर रेषा द्याव्यात. महत्वाचे शब्द अधोरेखित करावेत. 

3. उत्तर लेखनाची भाषा | Uttar Lekhnachi Bhasha 

                         बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरे लिहित असताना गाईड मधली जशीच्या तशी भाषा न वापरता किंवा केवळ केलेले घोकंपट्टी न करता,साध्या सरळ भाषेमध्ये मांडणी असावी.  शॉर्ट बट स्वीट अशी भाषा शैली वापरावी. 

4.  उदाहरणे देणे | Udahrne Dene 

                             परीक्षेमध्ये एखादी संकल्पना विचारली असल्यास ती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पुस्तकातील      उदाहरणे न देता त्यापेक्षा वेगळी उदाहरणे देण्याचा प्रयत्न करावा यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही.  अभ्यास करत असतानाच नोट्स काढत असताना पुस्तकातील उदाहरणे न देता आपल्या परिचयाची उदाहरणे लिहून ठेवावीत. असे केल्यास परीक्षकांना आपला पेपर इतरांपेक्षा वेगळा वाटतो आणि सहाजिकच इतरांपेक्षा छान गुण आपल्याला मिळतात. 

5. वेळेचे नियोजन Veleche Niyojn 

                                शाळेमध्ये किंवा घरी सराव पेपर सोडत असताना वेळेचे नियोजन करा. प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्यानंतर शक्यतो प्रश्न क्रमांक एक दोन तीन अशा पद्धतीने सलग सोडवायला घ्या असे केल्याने परीक्षकांना पेपर तपासत असताना त्रास होत नाही.  त्यांची मानसिकता आणि आपल्याला मिळणारे गुण यांचा थोडाफार तरी संबंध असतो. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये आपण सर्व प्रश्न सोडवले आहेत का महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत का ? या सर्व बाबी तपासून पहा. 

अशा पद्धतीने जर आपण तयारी केली तर परीक्षेत आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळतील

परीक्षेला जाता जाता | Prikshelaa Jata Jata 

                     बोर्डाची परीक्षा ही आपल्या शाळेत होत नसून विविध केंद्रांवर ती होत असते म्हणजेच दुसऱ्या शाळांमध्ये होत असते. तेव्हा परिक्षेला जात असताना आपला पेपर सुरू होण्याची वेळ आहे. त्या वेळेच्या अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पेपर लिहिण्यासाठी काही पेपर तीन तास ,तर काही पेपर दोन तासाचे  असतात त्यासाठी उपाशीपोटी न जाता सकाळी घरचाच पण सकस आहार घ्या. परीक्षेला जाताना पेन पेन्सिल पट्टी याचबरोबर सगळ्यात महत्वाचे आपले हॉल तिकीट सोबत घ्या,हातात घडयाळ जेणेकरून वेळेत पेपर सोडवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचे आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. 

ध्येय आणि अडचणी | Dhey Aani Adchni 

                    जीवनामध्ये ध्येय असेल तर त्या ध्येयाच्या दिशेने आपण वाटचाल करतो.ही धेयच आपल्याला प्रयत्न करायला प्रेरित करत असतात. इयत्ता दहावी मध्ये काही झाले तरी बोर्ड परीक्षेमध्ये 95 टक्के गुण मिळालेच पाहिजेत असे टार्गेट किंवा ध्येय मी  ठेवले होते आणि त्यासाठी मी अगदी सुरुवातीपासूनच तयारी केली. ती कशा पद्धतीने केली ? याचे सर्व विवेचन वर आलेच आहे. या सगल्याचे  फलित मला ssc परीक्षेत 92 टक्के गुण मिळाले.  ध्येय ठेवल्याने आपण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. एकदा ध्येय ठरले की त्या ध्येयापासून  हलायचे नाही. हा संदेश पूर्ण आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. आपण ध्येय ठेवल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना कधीकधी अनेक अडचणी देखील येतात. आपले मन भरकटू शकते,कारण आपले वयच असे असते बाह्य जगाचे आपल्याला आकर्षण वाटू शकते ,मुला मुलीना एकमेकांविषयी प्रचंड आकर्षण असते .  मला देखील ते होते. मी दहावी मध्ये असताना या सर्व  बाबी मला देखीलसतावत होत्या;पण मी माझ्या मनाला सावरले . मी माझे कष्ट करणारे आईबाप डोळ्यासमोर ठेवले आणि काही जरी झाले तरी मला माझे ध्येय पूर्ण करायचे असेल तर या हवे - हवे वाटणार्‍या, आकर्षण निर्माण करणाऱ्या, मला खेचणाऱ्या बाबींकडे मला दुर्लक्ष करावेच लागेल.हे मी मनाला वारंवार ठणकावून सांगितले. 

                   अभ्यास करत असताना माझा  देखील आत्मविश्वासात कधीकधी चढ-उतार निर्माण होत होते तरी मी ढळलो नाही आणि माझा अभ्यास कायम चालू ठेवला. तुम्ही देखील शिक्षण घेत असताना काही अडचणी आल्या तरी डगमगून न जाता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.मी माझ्या ध्येयावर कायम लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळेच मी आज एक इंजिनियर म्हणून मानाने आणि समाधानाने जीवन जगत आहे याचे कारण म्हणजे मी दहावीला घेतलेली प्रचंड मेहनत आणि तीच मेहनत तुम्ही घ्यावी आणि माझ्या अनुभवाचा अल्पशा ज्ञानाचा तुम्हाला उपयोग व्हावा यासाठी हा लेख लिहिला आहे. 

    माझ्या अशोकनगर शाळेविषयी | Mazy Ashoknagr Shalevishyi 

                 मी ज्या अशोक नगर मनपा माध्यमिक शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये मला शिकवणारे सर्व शिक्षक अगदी खाजगी शाळांपेक्षा देखील जास्त मेहनत घेत होते . प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणे अभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात त्याची वैयक्तिक चौकशी करणे इथपर्यंत सर्व काळजी माझ्या शाळेने माझ्या शाळेतील शिक्षकांनी घेतली म्हणूनच मला हे यश मिळाले. माझा कायम आत्मविश्वास वाढवत होते. 

                  मी हा लेख  लिहावा व  ज्यातून अभ्यास कसा करावा? ते  इतर मुलाणा देखील कळेल असे शिपकुले  सरांनी मला  विचारले .मला ही संधी मिळाली म्हणून मी खुश झालो. सरांनी  सांगितले की तू जसे यश मिळवले तसे  यश महानगरपालिकेच्या सर्व मुलांना मिळायला हवे.  काहीना अभ्यास करायचा असतो पण तो अभ्यास करण्याची दिशा मिळत नसते आणि ती दिशा या मार्गदर्शनातून मिलेळ. तू  दहावीच्या वेळी तुझी  असणारी मानसिकता विद्यार्थ्यांना कळाल्यास सर्वच विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील असा विचार त्यांनी मांडला आणि मलाही तो पटला.शिपकुले सरांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.  आजही एखाद्या मित्राप्रमाणे ते माझ्या संपर्कात असतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सर्व गुरुजनांना वंदन करतो नि थंबता थांबता एवडेच म्हणेन मी  जे मी करू शकतो ते तुम्ही का नाही करू शकत ? तर मला खात्री आहे तुम्ही देखील ते करू शकता चांगले गुण मिळवू  शकता. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचाच आणि तुमच्या पैकीच एक असलेला निखिल देशमुख. 

                                         विद्यार्थी मित्रांनो माझा विद्यार्थी निखिल देशमुख याने जे उज्वल यश मिळवले  आणि ते उज्वल यश कसे मिळवले ? यशामागील काही गुपिते टिप्स अगदी मनमोकळेपणाने आपल्याला सांगितल्या फक्त दहावीलाच नव्हे तर पूर्ण आयुष्यभर कामी येतील या टिप्स . त्याने सांगितले की ध्येय गाठण्यासाठी  त्याला मेहनतीची जोड द्यावी. ती मेहनत कशी असावी? त्या मेहनतीत नियोजनाचे महत्त्व काय ? अभ्यास कसा करावा ? किती करावा ?अभ्यासाची वेळ कोणती असावी ? कोणकोणत्या पद्धतीने अभ्यास करावा ? आपली उत्तरपत्रिका आदर्श  कशी असावी ? एवढेच नव्हे तर आपला आहार व आपले आरोग्य अशा  एक ना अनेक सर्वच बाबींना स्पर्श करण्याचे काम निखिल ने केले आहे. यातून त्याचा व्यासंग दिसतो.तर विद्यार्थी मित्रांनो उशीर कशाला तुम्हीदेखील लागा तयारीला नि भूतो न भविष्यती असे यश तुम्हाला मिळवायचे आहे आणि आपले आई-वडील गुरुजन यांच्या डोळ्यात समाधानाचे क्षण आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम करायचे आहेत.  या संकल्पासह आजच्या विशेष लेखमालेला स्वल्पविराम देतो.स्वल्पविराम का तर असेच अनेक वेगवेगळे अनुभव dnyanyogi.com  च्या माध्यमातून तुम्हाला कायम मिळत राहणार आहेत. आजचा हा लेख आवडल्यास इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. खुप छान....तुझ्या ह्या लेखाचा खूप विद्यार्थ्यांना मदत होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर....हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात उत्साह निर्माण झाला असं वाटलं की आज कोणतरी एक शिक्षक MOTIVATIONAL LECGURE देत आहे आणि त्यातून आम्ही ज्ञान संपादन करत आहोत खरच अप्रतिम असा लेख....☺️😍

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area