अवाजवी खर्च आणि क्रेडिट कार्ड Avajvi Kharch Aani Cedit Card
अवाजवी खर्च आणि क्रेडिट कार्ड |
क्रेडिट कार्ड कामाची वस्तु | Credit Card Upyogi Vastu
क्रेडिट कार्ड म्हणजे अवाजवी खर्च असे असले तरी क्रेडिट कार्ड आपल्याजवळ असण्याचे काही चांगले उपयोग देखील आहेत. ऐनवेळी आपल्याकडे पैसे नसतील आपला पगार वेळेवर झाला नसेल तर या कार्डच्या मदतीने आपण आपली वेळ निभावून नेऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोबाइल खरेदी ,इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी तर करतोच त्याच बरोबर काही खास डिस्काउंट ऑफर असतात त्याचा देखील आपल्याला फायदा घेता येतो. क्रेडिट कार्डवर वस्तू घेतल्यानंतर जर ते पैसे 45 दिवसांमध्ये परत करणे शक्य नसल्यास त्याचे हप्ते किंवा देखील आपण करू शकतो, परंतु असे असले तरी क्रेडिट कार्ड अवाजवी खर्च करण्याची सवय माणसाला लावते एक प्रकारे आपल्या खिशातील हा छुपा सावकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.क्रेडिट कार्ड म्हणजे आवाजही खर्च कसा ते पुढे पाहूया.
अवाजवी खर्च म्हणजे क्रेडिट कार्ड कसे ?Avajvi Kharch Mhanje Credit Card
1. खर्चावर नियंत्रण न रहाणे | Khrchavr Niyntrn N Rahne
क्रेडिट कार्ड ज्या व्यक्ती जवळ असते ती व्यक्ती कार्ड स्वाइप केल्यानंतर दुकानदाराला पैसे मिळत असल्याने आणि ते पैसे आपल्या खिशातून जात नसल्याने, पैसा विषय गंभीर राहत नाही सहाजिकच त्याच्या खर्चावर त्यांचे नियंत्रण राहत नाही यावरून आपल्या लक्षात येते की क्रेडिट कार्ड अवाजवी खर्चाला वाव देते.
2. छुपे चार्जेस | Chupe Charges
क्रेडीट कार्ड च्या साह्याने आपण एखादी वस्तू खरेदी केल्यास प्रत्यक्षदर्शी जरी काही चार्जेस आपल्याला दिसत नसले तरी छुप्या पद्धतीने क्रेडीट कार्ड आपल्याकडून विविध शुल्क आकारत असते.हे शुल्क जर आपल्या क्रेडिट कार्ड नसतेच तर गेलेच नसते थोडक्यात छुपे चार्जेस लागले हा अवाजवी खर्चाचे भाग आहे.
3. व्याज आकारणी | Vyajachi Aakarni
क्रेडिट कार्ड मुळे अवाजवी खर्च करण्याची आपल्याला सवय लागलेली असते. या अवाजवी खर्चामुळे छोट्या रकमेपासून सुरुवात होऊन हळूहळू मोठ्या रकमेचा डोंगर कसा होतो ते कार्ड वापरणाराला कळत देखील नाही. सहाजिकच कधीनाकधी ते बिल भरण्यासाठी विलंब हा होतच असतो आणि असा विलंब झाल्यानंतर क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून लावली जाणारी चार्जेस महाभयंकर असतात.
4. रोख रक्कम काढल्यास प्रचंड व्याज | Rokh Rakkam Aani Vyaj
कधी कधी आपल्याकडे पैसे नसतात अशा वेळी व्यक्ती एटीएम च्या माध्यमातून क्रेडिट कार्डवरील विशिष्ट रक्कम काढू शकतो. ही सुविधा जरी असली तरी त्यावर आकारला जाणारा व्याजदर हा जवळजवळ साडे तीन टक्केच आसपास आहे यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की क्रेडिट कार्ड आपल्याला अवाजवी खर्चासाठी म्हणजेच अतिरिक्त पैसे देण्यासाठी हळू भाग पाडत असते.
5. चक्रवाढ व्याज सारख्या समस्येचा सामना | Chakra Vadh Vyaj
आपण जर क्रेडिट कार्ड वरून एखादी वस्तू घेतली व ते क्रेडिट कार्डच बिल आपण वेळेत पे करू शकलो नाही. तर क्रेडीट कार्ड कंपनी आपल्याकडून व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज घेतात. या सर्व समस्या आपल्याकडे कार्ड नसते तर उद्भवले नसत्या म्हणूनच या लेखामध्ये आर्थिक साक्षरता म्हणून क्रेडिट कार्डचा अवाजवी वापर कसा होतो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
6. चंगळवादाची सवय |Changalvadachi Savay
क्रेडिट कार्ड ज्या व्यक्तीकडे असते ती व्यक्ती कोणतेही खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी करत असते व ते नकळत घडत असते.
उदा. डी-मार्ट सारख्या ठिकाणी आपण गेल्यानंतर जर ते रोख स्वरूपात आपण बिल भरणार असू तर खिशातून पैसा जाणार असल्यामुळे आपण वस्तू घेताना दहा वेळा विचार करतो मात्र क्रेडिट कार्ड आपल्याजवळ असेल तर 45 दिवसांनी पैसे भरायचे आहेत या भ्रमात राहतो पण हे आपल्या लक्षात येत नाही की 45 दिवसांनी आपल्याला पैसे भरायचे आहेत ती एक प्रकारची कर्जच आहे
7. उसनवारीची सवय | Usanvarichi Savay
पूर्वीच्या काळी आपल्याकडे पैसे नसतील तर व्यक्ती आपल्या मित्राकडून नातेवाईकांकडून उसने पैसे घेत होता. आता हे ऊसनवारीचे काम क्रेडिट कार्ड करताना दिसत आहे.ही उसनवारी हळूहळू आपल्याला कर्जाच्या गर्तेत ढकलते. माझा स्वतःचा देखील अनुभव आहे की दहा हजाराचे क्रेडिट कार्डचे सुरुवातीला असणारे बिल हळूहळू खर्चात अनावश्यक वाढ होऊन पन्नास हजारावर कसे गेले हे मला देखील कळले नव्हते.
8.सिबिल स्कोर खराब | Cibil Skor Down,Kharab
कधीकधी अनावधानाने क्रेडिट कार्डचे बिल भरायला विलंब होतो पण अशा वेळी या कंपन्या तात्काळ दंड आकारतात आणि याचाच परिणाम म्हणजे आपला सिबिल स्कोर खराब होतो कालांतराने कोणते मोठे लोन घेत असताना आपल्याला अडचण येऊ शकतात.
9. फसवणुकीची शक्यता | Online Fasvnukiche Prakar
कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून फोन येतात आपल्याला ओटीपी विचारला जाऊ शकतो आणि या समस्या बँक पेक्षा क्रेडिट कार्डला जास्त असतात.जर चुकूनआपल्या कडून ओटीपी शेर झाला तर मोठी आर्थिक झळ आपल्याला बसू शकते आणि ही झळ जर म्हणजे क्रेडिट कार्ड नसते तर झालीच नसती म्हणूनच मला वाटते अवाजवी खर्च म्हणजे क्रेडिट कार्ड आहे.
10. खर्च करण्याची मानसिकता | Kharch Krnyachi Mansikat
सतत क्रेडिट कार्ड वापरायची सवय घातक आहे अशी व्यक्ति कायम खर्च करते तशी तिची मानसिकता बनलेली असते ती मानसिकता बदलण्यासाठी या कार्ड कहा वापर कमी करायला हवा. तरच अवाजवी खर्च कमी होऊ शकतो अन्यथा नाही.
लेखाचे सार | Lekhache Sar
आर्थिक साक्षरतेचे अंतर्गत आजचा विषय होता तो म्हणजे अवाजवी खर्च म्हणजे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हळूहळू कर्जाच्या खाईत ढकलत असते .असे असले तरी ऐनवेळी विशिष्ट रकमेची सोय म्हणजे कपड्यांची खरेदी, वाढदिवसाचे सेलिब्रेशन असे मला अजिबात म्हणायचे नाही तर घरातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडले तिला दवाखान्यात जावे लागले अशा इमर्जन्सी सिच्युएशन आपण क्रेडिट कार्डचा वापर जरूर करावा परंतु किरकोळ कारणांसाठी कोणताही खर्च असो लगेच क्रेडिट कार्ड स्वाइप करणे चुकीचे आहे.मी प्रयोग करून पाहिला आहे तुम्ही तुम्ही देखील प्रयोग करून पहा.काही दिवस क्रेडिट कार्डचा वापर कमी करा तुमच्या लक्षात येईल तुमचे तुमच्या खर्चावरती नकळतपणे नियंत्रण आलेले आहे आणि खर्चावर नियंत्रण येणे बचतीची सवय लागणे हा सगळा भाग आर्थिक साक्षरतेचा आहे. आर्थिक साक्षरते अंतर्गत सदरात आपण काटकसर ही करोडपती होण्याचा मार्ग कसा याविषयी माहिती पहिली आहे. त्याचबरोबर शेयर बाजाराचे पायाभूत ज्ञान मिळवून त्यात Long Term Investing आपल्याला कसे फायदे मिळवून देते त्याचबरोबर शेयर बाजारात सामान्य माणूस कोणत्या नि का चुका करतो त्यामागील कारणे हे सगळे जाणून आर्थिक साक्षर बनायचे असेल नि अजून आमचे इतर लेख वाचले नसतील तर जरूर भेट द्या आणि dnyanyogi.com च्या माध्यमातून हीच आर्थिक साक्षरता आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायची आहे. आज सामान्य माणूस मोठी स्वप्न देखील पाहत नाही इतके सगळे भयानक चित्र आहे असे असले तरी काटकसर ही जादूची छडी आहे की ती हळूहळू करून सोन्याचा रांजण म्हणजेच आपल्याला नक्कीच करोडपती बनवू शकते सविस्तर जाणण्यासाठी कायम आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा.ही आर्थिक क्रांति लाखों लोकांच्या मना मनात झाली पाहिजे व मराठी माणूस करोडपती झाला पाहिजे . मी स्वप्न पहिल आहे त्या मार्गावर जात आपण देखील यावे हीच अपेक्षा.
आजच्या लेखातून मांडलेला विषय अवाजवी खर्च म्हणजे क्रेडिट कार्ड. आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट करा. आपण साक्षर आहोत थोडे आर्थिक साक्षर बना आपल्याकडेही या आर्थिक साक्षरतेच्या बाबत काही माहिती असल्यास नक्की शेअर करा .धन्यवाद!