दहावी इतिहास पाठ्यपुस्तकपरिचय ,तोंड ओळख |Dahahvi itihas Vishyachi Tond Olakh
विद्यार्थी मित्रांनो,सध्या आपण इयत्ता दहावी मधील वेगवेगळ्या विषयांमधील पाठ्यांश थोडक्यात अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मधील समाजशास्त्र विषयाची विभाग ही दोन वेगवेगळ्या विषयात केली गेलेली आहे
1) इतिहास राज्यशास्र 60 गुण
2) भूगोल 40 गुण असे एकूण 100 गुण अशी याची गुणविभागणी आहे.
या दोन विषयांपैकी आज आपण इतिहास या विषयांमधील पाठांचा पाढ्यांश थोडक्यात पाहणार आहोत .इतिहास म्हटल्यावर आपल्याला आठवतात त्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढलेल्या वेगवेगळ्या लढाया. शूर वीरांचे पराक्रम तसेच इंगजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य वीरांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेला संघर्ष. तसेच भारतावर वेगवेगळ्या परकीय आक्रमकांनी केलेल्या स्वाऱ्या, मात्र हे सगळे अभ्यासत असताना सन ,सनावळ्या लक्षात ठेवत असताना दमछाक होत असे .
बऱ्याच वेळा कुठली घटना इसवी सन किंवा इसवी सन पूर्व कधी घडली हे नेमके परीक्षा चालू असताना आठवत नसे .या पारंपारिक इतिहास पद्धतीला तडा देण्याचे काम इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात केले गेले आहे.इयत्ता दहावी चा इतिहास हा उपयोजित इतिहास आहे. "उपयोजित इतिहास म्हणजे या इतिहासाचा अभ्यास तुमच्या भावी जीवनासाठी उपयोगी ठरणार आहे" जेणेकरून इतिहासाचा अभ्यास करून तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतील एवढेच नव्हे तर एक जाणकार इतिहासलेखक म्हणून तुम्ही पुढील काळात नावारूपाला याल .इतिहासाची ही एक वेगळी पाऊल वाट आपल्याला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणारी असेल ,जणू काही ती एक सोनेरी पहाट असेल . कदाचित इतिहासाच्या या नव्या अभ्यास पद्धतीतून उद्याचा सुवर्णमय इतिहास लिहिणारे तुमच्यासारखे जाणकार तयार होतील,चला तर मग अशा या उपयोजित इतिहासाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया.आणि या विषयाकडे अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता भावी काळातील एक करीयरची संधी म्हणून पाहूया.अभ्यास मंडळाने इतिहास विषयात जो बदल केला आहे तो खरेच कौतुकास पात्र आहे.
इतिहास विषयांमध्ये आपल्याला एकूण 9 पाठांचा अभ्यास करायचा आहे.
दहावी इतिहास पुस्तक परिचय |
प्रकरण थोडक्यात तपशील पाठ (toc)
1) प्रकरण 1 ले - इतिहास लेखन: पाश्चात्त्य परंपरा | Ithihas Lekhan Pashyat Prampra
या पाठात आपण इतिहास लेखनाची जी परंपरा पाश्चात्य इतिहासकारांनी सुरु केली. त्या काही पाश्चात्य विचारवंताची माहीती , त्याचे ग्रंथ व इतिहास लेखनासंबधी त्याचे आधुनिक विचार यासंबंधी माहीती जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी एखादी महत्वाची घटना लक्षात राहावी म्हणून ती शिलालेखा वर कोरली जात असे . उदा . फ्रान्समधील लुव्र संग्रहालयात सुमारे ४५०० वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीच्य काळातील शिलालेख ठेवलेला आहे .याच बरोबर इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासलेखनाची उद्दिष्टे, इतिहास संशोधनाच्या पद्धती, यांची माहीती अभ्यासणार आहोत.
2) प्रकरण2 रे - इतिहास लेखन:भारतीय परंपरा | Itihas Lekhn Bhartiy Prampra
या पाठात आपण पाश्चात्य विचारवंतांनी सुरू केली इतिहास लेखनाची परंपरा भारतीय इतिहासकारांपर्यत कशी पोहचली याचा अभ्यास करणार आहोत . आपला इतिहास, आपली संस्कृती, परंपरा यांची सर्व जगाला ओळख व्हावी. यासाठी श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर ,ताराबाई शिंदे ,विनायक दामोदर सावरकर, यांसारख्या अनेक इतिहासकारांनी केलेले प्रयत्न याचा थोडक्यात आढावा या पाठात घेतला गेलेला आहे.
3)प्रकरण3 रे - उपयोजित इतिहास | Upyojit Itihas
उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाचे महत्व ,उपयोजित इतिहासामध्ये सामान्यांचा सहभाग व उपयोजित इतिहास संशोधन पद्धती त्याचबरोबर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन ,तसेच उपयोजित इतिहासासंबंधी व्यवसायिक क्षेत्रे या विषयी माहिती घेणार आहोत .
4)प्रकरण4 थे - भारतीय कलांचा इतिहास | Bhartiy Klaancha Itihas
भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या कलां प्रकारांसाठी साठी प्रसिद्ध आहे .अशा या वेगवेगळ्या कला प्रकारांचा इतिहास आपण या पाठात अभ्यासणार आहोत . चित्रकला , शिल्पकला, स्थापत्य,ललित कला ,दृककला या व अशा अनेक वेगवेगळ्या भारतीय कला प्रकारांचा इतिहास आपल्याला या पाठातून कळेल . त्या च बरोबर कलाक्षेत्रात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायिक संधी यांची माहिती मिळेल.
5) प्रकरण 5 वे - प्रसारमाध्यमे आणि इतिहास | Prsarmadhyame Aani Itihas
भारतीय इतिहास लेखनाला उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमांचा परिचय या पाठात करून घेणार आहोत .वृत्तपत्र, मासिके नियतकालिके त्याचबरोबर आकाशवाणी ,दूरचित्रवाणी अशा प्रसार माध्यमांचा इतिहास सर्वांना समजेल. प्रसारमाध्यमांच्या इतिहासातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिक संधी यांची माहिती या पाठातून मिळेल.
6) प्रकरण 6 वे - मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास | Mnoranjnachi Sadhne Aani itihas
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा किंवा आराम मिळण्यासाठी फार पूर्वीपासून मानव वेगवेगळ्या मनोरंजनाच्या माध्यमाचा वापर करत आहे,अशा मनोरंजनाच्या माध्यमाचा इतिहास या पाठात जाणून घेणार आहोत लोकनाट्य व मराठी रंगभूमी याच्या परंपरांचा इतिहास आपल्याला समजेल. मनोरंजन क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिक संधी आपल्याला पाठातून जाणून घेता येतील.
7) प्रकरण 7 वे:- खेळ आणि इतिहास | Khel Aani Itihas
खेळणे की मानवाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये खेळायला महत्व दिले गेले . प्राचीन ग्रीक संस्कृती ही जगाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे कारण आज ज्या ऑलम्पिक स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धांची सुरुवातच ग्रीक संस्कृती पासून झालेली आहे तसेच हडप्पा मोहेंजोदडो या शहरांचे जेव्हा उत्खनन केले गेले तेव्हा ही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्या उत्खननात मिळाली म्हणजेच खेळ खेळणे ही आपल्या संस्कृती ने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे . म्हणूनच आपण या पाठात खेळांचा इतिहास खेळांचे वेगवेगळे प्रकार ,खेळांचे महत्त्व व खेळाच्या क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या करियरच्या वेगवेगळ्या संधी यांचा अभ्यास करणार आहोत. जेणेकरून या पाठाचा अभ्यास केल्यावर खेळाकडे खेळ म्हणून न पाहता भावी काळातील आपल्यासाठी असणारी एक व्यवसायिक संधी म्हणून पाहू.
8) प्रकरण 8 वे - पर्यटन आणि इतिहास | Parytn Aani Itihas
पर्यटन म्हणजेच फिरणे प्रवास करणे , दुरच्या स्थळांना भेट देणे . भारतात पर्यटनाची परंपरा काळापासून चालू आहे याचे अनेक पुरावे आपल्या इतिहासकारांकडे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी लोक सतत का एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात फिरत असतात यातूनच पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले आहेत पर्यटनाचा विकास करणे ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे व आपला सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे यांची जाणीव यातून सर्वांमध्ये निर्माण होईल तसेच पर्यटन क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आपल्याला या पाठातून समजतील .
9) प्रकरण 9 वे - ऐतिहासिक ठेव्यांचे जतन | Eitahasik Thevyanche Jatan
आपल्याला जो ऐतिहासिक प्राचीन ठेवा मिळालेला आहे त्याचे जतन व संवर्धन करणे व त्याचा वारसा पुढील पिढीला देणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे .सदर पाठात भारतातील वेगवेगळी प्रसिद्ध संग्रहालये,अभिलेखागारे,ग्रंथालये, कोशवाड़मय यांची माहीती अभ्यासणार आहोत.
अशाप्रकारे आपण इतिहास या विषयातील एकूण नऊ पाठांचा पाठ्यांश थोडक्यात अभ्यासला आहे .संत तुकाराम म्हणतात,
असाध्य ते साध्य करिती सायास
या उक्तीप्रमाणे कोणतीही गोष्ट अवघड नसते,नियमित सरावाने सगळे सहज साध्य होते चला तर मग लागा अभ्यासाला व घडवा एक नवीन इतिहास.विद्यार्थी वर्गात इतिहास समजून घेतात पण ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी एववेळ वास्तुनिष्ट प्रश्न सोडवतात मात्र करणे द्या?दीर्घ उत्तर असणारे प्रश्न सोडून देतात. याचाच विचार करून यापुढील लेखमालेत आपल्या पाठा खाली दिलेल्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे मुद्यासाहित आपणास उपलब्ध करून दिल्यास तुम्ही छान पेपर सोडवू शकाल अशी आशा आहे. ही लेखमाला आवडेल का?किंवा मी या लेखमालेत अजून काय काय द्यावे असे आपल्याला वाटते ते कमेन्ट च्या माध्यमातून नक्की कळवा. इतिहास जीवणोपयोगी कसा आहे ?तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवायला मदत करणे यावर आपण वर्षभर काम करणार आहोत.
अशाच प्रकारे भूगोल पुस्तक परिचय 10 वी साठी खलील लिंकवर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/04/dahavi-bhugol-pustkachi-olakh.html