Type Here to Get Search Results !

दहशतवाद राष्ट्र विकासातील मोठा अडसर | Dahshtvad Rashtra Vikastil Motha Adsar

 दहशतवाद राष्ट्र विकासातील मोठा अडसर | Dahshtvad Rashtra Vikastil Motha Adsar                          

               21 मेआपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन याच दिवशी litte या दशतवादी संघटनेच्या मानवी बॉम्ब हल्ल्यात तमिळनाडूतील एका सभेत मृत्यू झाला.हा दहशतवाद किती भयानक आहे याची कल्पना आली.त्यांचा हा स्मृतीदिन दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.आजच्या या लेखातून हा दहशतवाद आपल्या राष्ट्र विकासात मोठा अडसर कसा ठरत आहे याची माहिती या लेखात पाहणार आहोत. 

दहशतवाद राष्ट्र विकासातील अडसर
दहशतवाद राष्ट्र विकासातील अडसर

 दहशतवाद माहिती(toc) 

भारतावर झालेले दहशतवादी हल्ले | Bhratvar Zalele Dahshtvadi Halle  

           भारताने आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे या हल्ल्यात अनेक सैनिक तसेच अनेक निरपराध भारतीय मारले गेले आहेत.अनेक संसार उद्ध्वस्त झाले. आपल्या राष्ट्राचे फार मोठे नुकसान या आतंकवादाने किंवा दहशतवादाने केले आहे. 

1. 2001साली संसदेवरील हल्ला | Sansade Varil Halla

                भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी 2001 साली संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते या अधिवेशना दरम्यान लष्कर ए तोयबा व जेश ए मोहम्मद या संघटनेने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते तर नऊ लोक मारले गेले होते. जर आतंकवादी संसदेवर हल्ला करू शकतात तर इतर ठिकाणी तर कधीही ते हल्ला करू शकतात. या हल्ल्याने जनमानसात भयंकर भीती नि अस्थिरतेचे वातावरण केले होते. 

2. 2006 मुबई साखळी बॉम्ब स्फोट | Mumbai Sakhli bomb Sfot 

                    11 जुलै 2006 साली झालेला हा साखळी बॉम्ब स्फोट अतिशय भयंकर होता रेल्वेत संध्याकाळच्या वेळी 7 ठिकाणी एकाच वेळी केलेला हा हा दहशतवादी हल्ला अतिशय भयानक होता. या हल्ल्यात 210 परिवार उजाड झाले होते तर किमान हजारभर लोक तरी जखमी झाले होते.लोकल धावत असताना हल्ले नि तेही गर्दीच्या वेळी यावरून या संघटना किती खतरनाक असतात याची कल्पना येते. 

3. 2006 मालेगाव बॉम्बस्फोट | Malegaon Bomb Sfot 

                हा हल्ला देखील 2006 साली 26 डिसेंबर ला मालेगाव या ठिकाणी रमजान महिन्यात झाला. तात्पर्य काय तर आतंकवादी यांचा कोणता धर्म नसतो ती एक विघातक शक्ति असते. या हल्ल्यात देखील 32 लोक मरण तर शेकडो लोक जखमी झाले होते. 

4. 2007 समझौता रेल्वे वरील हल्ला | Smazuta Railway Halla 

          भारत व पाकिस्तान  दरम्यान धावणारी समझौता एक्सप्रेसवर 2007 साली बॉम्ब हल्ला झाला या हल्ल्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या जवळजवळ 60 ते 70 लोकांचा या घातपतात मृत्यूझाला. अनेकजण जखमी झाले. 

5.2008 जयपूर हल्ला | Jaypur Bom Sfot 

       जयपूर ही राजस्थान मधील पर्यटन नगरी आणि तिथे अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आला या स्फोटात 80 लोक मरण पावले.कित्येकजन जखमी झाले. 

6. 2008 अहमदाबाद स्फोट| Ahamdaabaad Halla 

              गुजरात राज्यातील अहमदाबाद 21 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले परंतु विस्फोटके हलक्या स्वरूपाची असल्याने खूप मोठी जीवितहानी झाली नाही या हल्ल्यात जवळजवळ 50 लोक मरण पावले अनेक लोक लखमी पडले. 

7. 2008 चा 26/11 मुंबई वरील हल्ला | 26/11 Mumbi Vril Bomb Halla

             26/11 ला मुंबईवर झालेला हल्ला अतिशय विनाशकारी होता दहशतवाद्याना प्रतिकार करताना अनेक कर्तबगार अधिकारी,पोलिस यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.ताज हॉटेल ,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनान्स या गर्दीच्या ठिकाणी 10 दहशतवाद्यानी शेकडो लोकाना रक्ताच्या थारोळ्यात पाडले होते. 

8. 2019 पुलवामा सैन्य तुकडीवर हल्ला | Pulvama Bomb Halla,Spot  

                 पुलवामा याठिकाणी तर सैनिक छावणीवर आराम करत असताना स्फोटकांनी भरलेला ट्रक छावणीवर नेऊन हा हल्ला घडवण्यात आला या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान मारले गेले.याला प्रतिकार म्हणून सरजीकल strik द्वारे कडवे उत्तर भारताने दिले होते.

          वरील माहिती पाहिल्यानंतर ही समस्या किती भयानक आहे याची कल्पना आलीच असेल. हा दहशतवाद राष्ट्र विकासात कसा अडसर ठरत आहे ते काही मुद्यांच्या आधारे पाहूया. 

  दहशतवाद राष्ट्र विकासातील मोठा अडसर | Dahshtvad Rashtra Vikastil Motha Adsar  

                                       कोणतेही राष्ट्र असो जर त्या राष्ट्रात दहशतवादी कारवाया होत असतील तर त्या राष्ट्राला आपला विकास करताना अनेक अडसर म्हणजे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

1.असुरक्षितता | Asurkshitata

              दहशतवादी हल्ला झालेल्या भागातील किंवा देशतील लोक कायम स्वताला असुरक्षित समजत असतात.बाजारात ,गर्दीच्या ठिकाणी,मॉल मध्ये जाताना त्यांना सुरक्षित वाटत नाही. 

2. मानसिक दबाव | Mansik Dabav

                 मुंबई सारख्या ठिकाणी प्रवास करत असताना किंवा काही कारणास्तव उशीर झाला तर घरातील इतर मंडळी चिंतेत असतात याचाच अर्थ काय तर दहशतवाद एक प्रकारचे मानसिक टेंशन तयार करत असतो याचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांवर होत असतो.जगण्यात मोकळेपणा त्यांना जाणवत नाही. 

3.आर्थिक नुकसान | Arthik Nuksan 

  दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियाना काही एक मदत शासन करत असते. दहशतवादाचा सामना करताना युद्ध सामग्री खर्च पडते परिणामी त्या देशाच्या तिजोरीवर तान निर्माण होतो व त्या देशाची तिजोरी रिकामी करण्याचे काम दहशतवाद करत असतो. 

4. सैन्य दलावरील खर्च | Sainya Dlaavaril kharch 

       ज्या राष्ट्रावर असे हल्ले होतात किंवा होण्याची शक्यता असते त्या देशांना आपले बजेट तयार करत असताना सैन्य दल ,युद्ध सामुग्री यासाठी अधिकचा निधी द्यावा लागतो की जो पैसा इतर सोयी सुविधा देण्यासाठी कामी आला असता हे सर्व या दहशतवादचे फलित आहे. 

5. कुटुंबाची वाताहत | Kutumbachi Vaataht

                ज्या परिवाराला याची झळ सोसावी लागलीय त्या कुटुंबातील कर्ती व्यक्ति गेल्याने त्या कुटुंबाची वाताहत होते.हे सर्व या दहशतवादी कारवायांमुळे होते. 

6. पर्यटन व्यवसायावर परिणाम | Paryatan Vyvsaayachi Vatahat 

           जयपूर,मुंबई या शहरांवर हल्ले झाले व परिणाम काय तर जे परदेशी किंवा देशातील पर्यटक याठिकाणी जाणे टाळू लागले . थोडक्यात देशाला पर्यटन व्यवसायातून मिळणारा पैसा येणे कमी झाले हा परिणाम दीर्घ काळ टिकून राहतो. 

        हे सर्व अडसर पाहिल्यानंतर आपले सैन्यदल आपली ताकत वाढवून त्यांना कडे प्रतिउत्तर देतच असते,परंतु नागरिक देखील दक्ष हवेत कारण कोणाचा चेहरा ओळखून तो दहशतवादी आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही तर त्यासाठी काही बाबी आपण लक्षात घेतल्यास या कारवाया करणाऱ्या लोकांवर जरब नक्कीच बसेल. 

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उपाय | Dahashtvadavr Upay  

                              दहशतवादी कारवाया रोकण्यासाठी या व्यक्ती ज्या ठिकाणाचा आसरा घेतात तो आसरा मिळू न देणे. हे करण्यासाठी आपल्या शेजारी पाजारी लोक कोण आहेत?काय व्यवसाय करतात?याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांची विचारपूस करायला हवी. काही संशय आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे.काही लोक घर आपले घर भाड्याने देतात त्यावेळी संभणधीत व्यक्तीचे आधार कार्ड,ओळखपत्र ,नोकरीचेठिकाण,मूळ गाव यांची खातरजमा करावी,आपल्याकडे राहायला येण्या आधी ती व्यक्ती कोठे राहत होती हे देखील कन्फर्म करावे. पोलिस Verification शिवाय Agriment न बनवणे या बाबी आपण करायला हव्यात. 

       प्रवास करत असताना बेवारस वस्तु आढळल्यास पोलिसाना कळवणे,प्रवासात संशयास्पद हालचाली करणारा प्रवाशी नजरेस आल्यास पोलिसाना कळवणे किंवा तिला जाब विचारणे यासारख्या बाबींची काळजी घेतल्यास नक्कीच आपण 21 मे हाच दहशतवाद विरोधी दिन केवळ एक दिवस नव्हे तर कायम दक्ष असणे गरजेचे आहे.

          आजच्या या विशेष लेखातून दहशतवाद राष्ट्र विकासातील मोठा अडसर कसा आहे व त्यावर एक सजग नागरिक म्हणून आपण काय करायला हवे किंवा आपली कर्तव्ये किंवा मातृभूमि रक्षण ही सर्वांची जबाबदारी कशी आहे याबद्दल कल्पना आली असेल पुन्हा भेटूया नवीन विषयासह. ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. 

      आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती  जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 




                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area