धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले? |
Dhirubai Ambani Udyojak Kase Banle?
या लेखामध्ये आपण धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले ?म्हणजेच ते महान उद्योगपती कसे बनले? याविषयी माहिती पाहणार आहोत.धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले
कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या महान व्यक्तीविषयी किंवा त्याच्या प्रगतीविषयी माहिती पाहिल्यानंतर त्यांना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आपण देखील असे महान बनावे. ही भावना येत असते.जसे की क्रिकेट म्हटले की सचिन तेंडुलकर. आपणही क्रिकेट खेळत असू तर आपल्याला वाटते की मी देखील सचिन तेंडुलकर बनायला हवे. डॉक्टरी पेशा म्हटलं की डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासारखे काहीतरी वेगळे व असामान्य काम करून दाखवावे.असे प्रत्येकालाच वाटत असते. संरक्षण क्षेत्रातील कामगिरी पाहिली की आपल्यालाही वाटते मला ही एपीजे अब्दुल कलाम बनायचे आहे; पण हे जरी खरे असले तरी या मागे या महान व्यक्तिमत्त्वांनी जो संघर्ष केलेला असतो, जो त्याग केलेला असतो, हा त्याग मात्र आपण पाहत नाही आणि म्हणूनच आजच्या या लेखांमधून या महान व्यक्ती नेमक्या कशा पद्धतीने जीवन जगल्या आहेत?कोणता संघर्ष त्यांनी दिला म्हणून ते आज एका उच्च शिखरावर ती पोहचलेले आहेत. याचाच तुम्हाला परिचय व्हावा आणि या विद्यार्थीदशेपासूनच तुम्ही देखील एका ध्येयाने पेटून उठावे व काहीतरी असं नवे करून दाखवावे की जेणेकरून त्यामुळे आपल्या आई-वडिलांचे, आपल्या गुरुजनांचे, आपल्या शाळेचे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे यापलीकडे जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करावे ही त्यामागील भूमिका आहे. आज आमच्या समोर येणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना नवं काहीतरी करायचं आहे पण त्यांच्यापुढे तसे आदर्श नाहीत, म्हणूनच आजच्या या विशेष लेखातून धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले?याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धीरूभाई अंबानी यांचा हा जीवन संघर्ष पाहिल्यानंतर तुम्हाला देखील खूप काही शिकायला मिळेल. चला तर मग धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले ?ते आपण पाहूया.......
जगामध्ये अनेक उद्योजक होऊन त्यामधील बरेचसे उद्योग हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत. म्हणजेच काय तर त्यांना औद्योगिक वारसा हा लाभलेला आहे वडिलोपार्जित उद्योगच त्यांनी त्यात थोडी भर घालून त्या उद्योगांमध्ये वाढ करून तो उद्योग किंवा व्यवसाय मोठा केलेला आहे.परंतु एका सामान्य घरांमध्ये जन्माला येऊन आणि कमी शिक्षणामुळे वेळप्रसंगी पेट्रोल पंपावर नोकरी करून जिद्दीने जीवन संघर्ष करत आज एक महान उद्योगपती बनणारे धीरूभाई अंबानी हे एकमेव आहेत. धीरूभाई अंबानी हे असे उद्योजक आहेत त्यांनी जे विश्व निर्माण केले ते विश्व शून्यातून निर्माण केले आणि म्हणूनच आपण देखील धीरूभाई यांना आदर्श मानून ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे.
धीरूभाई अंबानी यांचा थोडक्यात प्रवास सांगायचं म्हटलं तर अतिशय गरीब कुटुंबात जन्म परंतु आज रंक ते राव आणि राव ते महाराव असा प्रवास म्हणजे धीरूभाई अंबानी. धीरूभाई यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी. यांचा जन्म गुजरातमधील एका छोट्याशा चोखड या गावी झाला. धीरूभाई अंबानी अभ्यासामध्ये हुशार नव्हते जेमतेम दहावीपर्यंत कसेतरी शिकल्यानंतर आपले अर्धवट शिक्षण सोडून वयाच्या 17 व्या वर्षी ते घराबाहेर पडले.शिक्षणामध्ये रस नाही म्हटल्यानंतर आता काहीतरी केले पाहिजे? या उद्देशाने ते आपला मोठा भाऊ रमनिकलाल यांच्या जोडीला येमेन देशातील येडन मध्ये गेले.
येडन ला गेल्यावर नोकरी काय करायची? तर सुरुवातीला त्यांनी या शहरातील बर्मा शेल नावाच्या पेट्रोल पंपावर रोजंदारी ने काम करायला सुरुवात केली आणि अवघ्या 300 रुपये महिना पगारावर त्यांनी हे काम केले. परंतु प्रचंड जिद्द असणाऱ्या धीरूभाई यांना पेट्रोल पंपावरील नोकरीमध्ये रस वाटत नव्हता म्हणून त्यांनी काही दिवसांमध्ये त्या नोकरीला रामराम ठोकला आणि त्यानंतर बेस्ट अँड कंपनी लिमिटेड या एका फ्रेंच कंपनीमध्ये सेलच्या उत्पादनांचा वितरक म्हणून काम करायला सुरुवात केली. यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले. दुसऱ्या देशांमध्ये राहून एका तुटपुंज्या पगारावर नोकरी करणे धीरूभाइंच्या बुद्धीला पटले नाही म्हणून त्यांनी परदेशातील आपला मोर्चा भारतात वळवला.1959 साली धीरूभाई अंबानी मुंबईला आले आणि इथूनच धीरूभाई उद्योजक कसे बनले? या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
धीरूभाई अंबानी यांनी आपल्या नोकरी व्यवसायातून 15 हजार रुपयांचे भांडवल जमवले होते.या भांडवलाच्या जोरावर त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन ही एक छोटेखानी कंपनी सुरू केली. या कंपनीचे कार्यालय मुंबई मधील मज्जित बंदर ला सुरू केले. कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीमार्फत मसाल्याची निर्यात केले जात होती आणि सुरुवातीच्या काळात त्यांना यामध्ये तोटा देखील झाला मात्र त्यानंतर त्यांनी यार्णच्या व्यवसायातून बर्यापैकी नफा मिळवला.आता मात्र आपण एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर काहीतरी मोठं केलं पाहिजे या ध्येयाने ते काम करू लागले.
गुजरात राज्याला कापड व्यवसायाची एक जाण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच धीरूभाई अंबानी यांनी आमदाबाद जवळील नारोडा याठिकाणी एक कापड गिरणी सुरू केली.या कापडगिरणीच्या माध्यमातून रशिया ,पोलंड जांबियाव सौदी या देशांमध्ये आपल्या मिल मध्ये तयार होणारे कापड निर्यात करायला सुरुवात केली. या कापड गिरणीची घोडदौड पाहून एका विकसनशील देशांमध्ये एक कापड व्यावसायिक इतक्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो याची दखल जागतिक बँकेने देखील घेतली. आणि 1975 सानी जागतिक बँकेने विकसनशील देशातील सर्वोत्तम कापडगिरणी म्हणून एक प्रशस्ती पत्र देऊन या कापड गिरणी चा गौरव केला. बघा ज्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ त्या क्षेत्रामध्ये जिवाचे रान केले की यश नक्की मिळते. हे तुम्हाला अंबानी यांच्या कापड गिरणीच्या उदाहरणांमधून समजलेच असेल. अशाच मोठमोठ्या निर्णयातून धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले? याचे कोडे उलगडत जाईल.
धीरूभाई अंबानी यांच्यामते कोणत्याही उद्योगाला आपण जर कला आणि कष्टाची जोड दिली तर तो उद्योग नक्कीच यशस्वी होतो. हा एक सरळ साधा सोपा सिद्धांत त्यांनी आपल्या पुढे मांडला. स्वप्न तर खूप मोठी आहेत परंतु आपल्या जवळ भाग भांडवल नाही म्हणून धीरूभाई अंबानी हरले नाहीत तर त्यांनी 1977 सानी रिलायन्सचा पब्लिक इशू बाजारात आणला. एकाच वेळेला संपूर्ण पैसे न मागता हप्त्या हप्त्याने पैसे मागण्याची रिलायन्सची पद्धत गुंतवणूकदारांना सोयीची वाटू लागली आणि सहाजिकच लोकांचा रिलायन्स कंपनी वरील विश्वास वाढत गेला आणि खूप मोठे भागभांडवल शेअर मार्केट च्या माध्यमातून रिलायन्स उद्योग समूहाला मिळू लागले. आणि आज देखील आपण जर शेअर बाजार पाहिला तर त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा हा सर्वात जास्त असलेला दिसतो.
धीरूभाईंना यश का मिळत गेले? तर प्रचंड परिश्रम करण्याची तयारी, उद्योगावरील एकाग्रता आणि प्रचंड आशावाद या त्रिसूत्रीच्या आधारावरच धीरूभाई अंबानी एक महान उद्योजक बनले. 1978 नंतर मात्र धीरूभाईंनी परदेशात निर्यात करण्याबरोबरच भारतातील स्थानिक बाजारपेठांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. रिलायन्स समूहाची मोठमोठ्या शहरांमध्ये शोरूम उघडायला सुरुवात केली आणि जसा काय शोरूम उद्घाटनाचा धडा कास धीरूभाई अंबानी यांनी लावला.
धीरूभाई अंबानी यांनी 1985 झाली पेट्रोकेमिकल्स या उद्योगांमध्ये रस घ्यायला सुरुवात केली आणि या पेट्रोकेमिकलच्या उत्पादनातूनच आता मात्र धीरूभाई अंबानींचा उद्योग समूह सुसाट वेगाने धावू लागला .की जो आज पर्यंत थांबलेला नाही आणि भविष्यात देखील थांबणार नाही. यानंतर धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रियल, रिलायन्स पेट्रोकेमिकल,रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कम्युनिकेशन यासारख्या एक ना अनेक कंपन्या स्थापन करायला सुरुवात केली. 1993साली चार हजार कोटींच्या वर विक्री करणारी सर्वात मोठी खाजगी कंपनी म्हणून realince ची ओळख बनली.यावरून धीरूभाई अंबानी हे एखाद्या व्यवसायाला किती तन-मन-धनाने न्याय देण्याचा प्रयत्न करत होते हे आपल्या लक्षात आले असेल.
धीरूभाई अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप किंवा कंपनी खूप वेगाने प्रगती करत होती,मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते 1996 साली धीरूभाई अंबानी यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांची उजवी बाजू काम करेनाशी झाली,परंतु अशा परिस्थितीत देखील ते मागे हटले नाहीत.आपल्याला काम करणे शक्य नाही हे ओळखून त्यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारी मुलगे मुकेश व अनिल अंबानी यांच्यावरती सोपवली. कालांतराने या दोन भावंडांमध्ये संपत्तीवरून वाद विवाद झाले.असो तो आपला विषय नाही.
थोडक्यात काय तर शून्यातून उद्योग जगतामध्ये आपली सृष्टी निर्माण करणारा एक महान उद्योजक म्हणजे धीरूभाई अंबानी. माझे कष्ट करणारे हात आणि माझी जिद्द हेच माझे भांडवल. असे म्हणून उद्योग जगतात भरारी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे धीरूभाई अंबानी.हा लेख वाचल्यावर तुम्हाला देखील कष्ट केले की यश मिळतेच हे लक्षात आले असेल.धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले?हे पाहिल्यांनंतर मी अमुक अमुक कसा बनणार या दिशेने कामाला सुरुवात करा.या जगात अशक्य काहीच नाही.फक्त जे जीवाचे रान करतात ते यशस्वी होतात. हा आजवरचा इतिहास आहे.हा धीरूभाई अंबानी उद्योजक कसे बनले ? लेख आवडल्यास इतरांना नक्की शेर करा.कमेंट करा.
असेच एक जिद्दी व्यक्तिमत्त्व की जे दहावी नापास झाल्यानंतर हार न मानता प्रचंड मेहनत घेऊन आज भल्या मोठ्या पगारावर कॉम्प्युटर इंजीनियर म्हणून काम करीत आहे.हा संगर्षं जाणून घेण्यासाठी जरूर क्लिक करा.
https://www.dnyanyogi.com/2022/05/dahavi-fail-te-noida.html
असेच नवीन नवीन उद्याजकांची माहिती आम्हाला देत रहा,, व आमचा उत्साह वाढवत रहा,, thank you so much sir jiii
उत्तर द्याहटवाVery Nice Sir
उत्तर द्याहटवा