Type Here to Get Search Results !

ऑनलाइन अशी होतेय फसवणूक | online Midiyavar Ashi Hotey Fasvnuk

ऑनलाइन  अशी होतेय फसवणूक | online  Midiyavar Ashi Hotey Fasvnuk

                          आर्थिक साक्षरता या लेखमालेत आज आपण आपला आहे तो पैसा सुरक्षित ठेवणे याला देखील आर्थिक साक्षरताच म्हणतात. तर आज आपण डिजिटल मिडियावर  म्हणजे ऑनलाइन कशी फसवणूक कशी होते ते पाहणार आहोत. 

           आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की अनेक लोक आमची ऑनलाइन फसवणूक झालीअशी तक्रार करत असतात.तर या ऑनलाइन लुटीला बळी न पडणे ही देखील आर्थिक साक्षरताच आहे.मी देखील माझे मित्र,सहकारी यांना डिजिटल माध्यमातून फसवणूक होत असताना तर काहीना त्या फसवणुकीपासून वाचवले देखील आहे.तर सर्वप्रथम डिजिटल मीडियावर अशी होतेय फसवणूक म्हणजे आपल्याला कसे फसवले जाते नि आपण कसे फसतो हे पाहूया. 

डिजिटल मीडियावर अशी होतेय फसवणूक
ऑनलाइन व्यवहार करताना  अशी होतेय फसवणूक

डिजिटल मीडिया /ऑनलाइन फसवणूक माहिती(toc)

ऑनलाइन ,डिजिटल मिडियावर होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार | online , Digital Midiyavr Honarya Fsvnukiche prkar

                 डिजिटल  मिडियावर होणारी फसवणूक म्हणजे संगणक,इंटरनेट,फेसबूक यांच्या माध्यमातून जी फसवणूक होते तिला ऑनलाइन फसवणूक किंवा काहीजण डिजिटल मिडियावर झालेली किंवा सायबर क्राइम असे देखील म्हणतात.त्यातील काही फसवणुकीच्या पद्धतींची माहिती पाहूया.ह्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण आज खूप वाढले आहे.  

1. लॉटरी लागल्याचा मेसेज | Lotry Laglyache Message

                                  डिजिटल माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून होणारे फसवणुकी मध्ये लॉटरी लागल्याचा मेसेज या माध्यमातून देखील फसवणूक होत असते.ही फसवणूक कशा पद्धतीने होते की तुम्हाला एक लाखाची लॉटरी लागली आहे मात्र त्या लॉटरीची रक्कम आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी शासनाकडे तुम्हाला त्यावर लागणारा अमुक अमुक टक्के टॅक्स द्यावा लागेलअशी विचारणा केली जाते.लाखो लोकांमधून तुमचा नंबर सिलेक्ट झाला आहे तेव्हा आपण लवकरात लवकर अमुक एका नंबर वर पैसे पाठवून उर्वरित रक्कम आपल्या खात्यामध्ये तात्काळ द्यावी असे आव्हान केले जाते.अशिक्षित अडाणी लोक यांना याविषयी जास्त माहिती असल्याकारणाने खूप मोठ्या रकमे च्या असणे ते टेक स्वरूपात लागणारी रक्कम भरतात आणि त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारचे लॉटरीचे पैसे मिळत नाहीत आणि ज्या नंबर वरून फोन आला तो नंबर अस्तित्वात नाही अशा आयडिया फसवणूक करण्यासाठी ऑनलाइन दरोडेखोर वापरत असतात.अशा पद्धतीने आज मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक होत आहे. 

2. फेसबुक वरील बनावट वाहन विक्री च्या माध्यमातून | Facebook Var Vahnnanche Photo

                    फेसबुक वरती आपल्या पोस्टमध्ये मी सैन्यामध्ये माझे वाहन विकायचे आहे. माझी  अमुक अमुक ठिकाणी पोस्टिंग झाल्याने मला माझी चारचाकी गाडी विकायची आहे आणि विशिष्ट अशी रक्कम त्यासाठी टाकली जाते आपण इंट्रेस्टेड असाल तर आम्हाला फोन करा.सामान्य लोक साधारणपणे सैनिकाची गाडी आहे या विश्वासू भावनेने संपर्क साधतात त्यावेळी आर सी नंबर गाडीचे फोटो सर्व काही पाठवले जाते.त्यामुळे आपली फसवणूक होते हे संबंधित व्यक्तीच्या लक्षात येतच नाही हा गुन्हा करण्यासाठी हे गुन्हेगार OLX  यासारख्या माध्यमातून ज्या व्यक्तीला खरोखरच गाडी विकायची आहे त्या व्यक्ती सर्व कागदपत्रे शेअर करत असते.  मात्र त्याने टाकलेली सर्व कागदपत्रे त्याची स्क्रीन स्क्रीन शॉट काढून शॉट काढून माझी गाडी विकायची आहे असा तोतया फोन करतात. आपण शासनाच्या वाहन वेबसाईटवर त्या गाडीचा नंबर टाकल्यास येणारी माहिती बरोबर असते परंतु आपल्या लक्षात येत नाही की जी व्यक्ती आपल्याशी संपर्क साधत आहे ती व्यक्ती त्या गाडीचा मालक नाही .अशा वेळी सावध राहिले पाहिजे ही फसवणूक करताना मी सैन्यात असल्याने तुम्हाला ज्या ठिकाणी हवी त्या ठिकाणी गाडी गाडी पाठवली जाईल.तुम्ही त्यासाठी फक्त ट्रान्सपोर्ट चार्ज लवकरात लवकर पाठवा असे भावनिक आवाहन पाहून मागणी वस्तू स्वस्तात मिळत आहे, या आशेने लोक असतात माझा एक जवळचा मित्र गावावरून मुंबईसारख्या ठिकाणी अशाच एका गाडीच्या खरेदीसाठी आला होता परंतु सुरुवातीपासूनच मला तुला संशय येत असल्याने त्याला या आर्थिक लुटी पासून मी रोखू शकलो. कधीकधी शंकेखोर मन देखील चांगळे असतं असंच म्हणावं लागेल.तरी आपण कोणताही व्यवहार ऑनलाइन करतंय एसएचजी आणि सावध राहायला हवे,

3. एटीएम कार्ड ब्लॉक | ATM kard Block 

                     मी अमुक अमुक बँकेतून बोलत असून मी बँकेचा मॅनेजर आहे व काही तासातच आपले एटीएम कार्ड ब्लॉक होणार होणार आहेअसे सांगितले जाते. आजकाल कामाच्या व्यापामुळे सर्वांनाच बँकेत जाणे शक्य नसते त्यामुळे लोक आपले एटीएम कार्ड बंद पडू नये ब्लॉक होऊ नये यासाठी ती व्यक्ती सांगते की तुमचे कार्ड RE NEW करण्यासाठी तुम्हाला एक कोड येईल तो कोड आम्हाला पाठवा आणि आपण तो कोड पाठवला की खात्यातून पैसे गायब. आपण डिजिटल मीडिया द्वारे फसवले गेलेले आर्थिक निरीक्षर हा शब्द यासाठी योग्य आहे. कारण आर्थिक साक्षरता असलेली व्यक्ती अशी कोणतीच माहिती दुसऱ्याला देणार नाही. अशी देखील अनेकांची ऑनलाइन फसवणूक आहे. 

4. ऑनलाईन वस्तूंची मागणी | Online Vastunchi Magni

               अमुक रुपये भरा आणि महागडी वस्तू आपले करा असे संदेश आपल्याला येतात. ही महागडी वस्तू स्वस्त किमतीला भेटत आहे म्हणून व्यक्ती अमुक एक रक्कम पाठवतात, परंतु ती वस्तू आपल्याला मिळत नाही.  कालांतराने फोन केल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन बंद लागतो अशीदेखील फसवणूक होताना दिसते.

5. एटीएम क्लोनिंग | ATM Che Cloning Tayar Karane 

           अनेकदा आपण पाहतो की बऱ्याच एटीएम केंद्रावर सिक्युरिटी नसल्या कारणाने काही भामटे एटीएम कार्ड वर लक्ष ठेवून असतात.आपण टाकत असलेला तीन तसेच कार्ड नंबर मिळवण्याचे प्रयत्न करत असतात तो कार्ड नंबर त्यांना मिळाल्यानंतर आपले एटीएम क्लोनिंग म्हणजेच त्याच एटीएमचे डुप्लिकेट एटीएम तयार करतात आणि आपल्या खात्यातून खूप मोठी रक्कम काढून घेतात.ऑनलाइन फसवणुकीचा हा danger प्रकार  आहे. 

6. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक | Kredit Kardchya Madhymatun Fasvnuk 

            तुमच्या क्रेडिट कार्ड वरती खूप छान ऑफरआहे.  परंतु त्यासाठी आपणास आपल्याला पाठवलेला ओ टी पी आम्हाला पाठवावा लागेल तरच ती ऍक्टिव्हेट होईल.असे सांगितले जाते आणि आपण तो डीपी शेअर करतात आपल्या क्रेडिट खात्यातील रक्कम देखील मायनस होते तरी या फसवणुकीच्या प्रकारातून देखिल सावध राहावे.त्यामुळे ऑनलाइन व्यवहार अतिशय  सावंदजह अजकरवेत. 

7. खोटे फोन नंबर | Google Varil Khote Phone Krmank 

                आपले एटीएम नेट बँकिंग चालत नसेल ,किंवा अन्य अडचणी आल्यास अशावेळी आपण गूगल वरती संबंधित बँकेचे फोन नंबर सर्च करतो. कधीकधी ऑनलाइन गुन्हेगार असणारे लोक बनावट नंबर गूगल वरती टाकतात आणि आपल्याशी संपर्क करतात.आम्ही आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेट करून देतो.बँकस्टाफ आहोत त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख बँक खाते क्रमांक अशी सर्व माहिती आपल्या कडून काढतात आणि आपल्याच नावावर लॉग इन करतात यातून देखील ऑनलाइन फसवणूक होऊ शकते.म्हंजून आपले फोन नंबर attch आहेत का ही वकर्णवर पहावे. 

8. ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक |  Appchya Madhymatun Fsvnukvaiktik

            कधी कधी आपण ऐकून घेतो ते ॲप आपली वैयक्तिक माहिती जाणून घेत असतात आणि त्या माहितीच्या आधारे आपली बँक डिटेल्स नेट बँकिंग याविषयीची माहिती व्यवस्था असतात त्यासाठी आपण घेतलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कसे आहे त्या तपासून घेतले पाहिजे. 

9. फोनच्या माध्यमातून |  Phonchya Madhymatun Honari Fasanuk 

                             कधी कधी आपल्याला बँकेतून अस आम्ही आपल्याशी बोलत आहोतअसे भासवले जाते. बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा अन्य मार्गांनी आपली वैयक्तिक माहिती जाणून घेऊ शकतात.  आपली बरीच वैयक्तिक माहिती ते फोनवरून सांगत असल्यामुळे आपल्याला ते बँकेचे प्रतिनिधी आहेत असे वाटते आणि याचाच गैरफायदा घेऊन ते आपले नेट बँकिंग किंवा इतर बँकेचे व्यवहार पासवर्ड ते मिळतात आणि आपल्या खात्यावर नकळत लॉगिन करून आपली ऑनलाईन फसवणूक करतात.

10. विविध लिंक च्या माध्यमातून | Vividh Link chya Madhymatun Honari Fasvnuk 

               हे ऑनलाईन दरोडेखोर आपल्याला विविध लिंक  पाठवतात या लिंक वर क्लिक करून अमुक-अमुक माहिती भरा ही माहिती भरल्यानंतर आपल्याला या सवलती मिळतील.जरूर घ्या,लवकर घ्या. आपल्याला कोणती तरी गोष्ट सवलतीच्या दरात मिळत आहे. हेच आमिष आपल्याला आर्थिक संकटात टाकते आणि आपण त्या लिंकवर क्लिक करुन आपला सर्व तपशील तिकडे देतो आणि काही क्षणातच आपले खाते झिरो होत असते म्हणून सावधानता हाच सर्वात मोठा उपाय आहे.आलेल्या नवकया  लिंक वर  क्लिक करू नये. 

11. इतर | fsavnuk  

                     वरील गुन्हे आर्थिक स्वरूपाचे होते परंतु कधीकधी या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचेही निदर्शनास आले आहे फेसबुकच्या माध्यमातून किंवा अन्य चॅटिंग च्या इतर माध्यमातून अनोळखी व्यक्ती एकमेकांशी ओळख बनवतात त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होते आणि नको नको त्या गोष्टी करायला सांगून नंतर मात्र ते  व्हायरल करण्याची भीती घातली जाते आणि संबंधित व्यक्ती आपल्या इज्जती साठी परिवारासाठी याची चर्चा कोणाकडे करत नाहीत ही खेदाची बाब.

                                थोडक्यात  ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी आपण बनणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊन चोऱ्या करणे,घरफोडी करणे, चोरीची जुने प्रकार बंद पडून डिजिटल गुन्हेगार किंवा सायबर क्राईम ही एक नवी जमात तयार होत आहे तरी यापासून आपले व आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांचे होणारे नुकसान करायचे असेल तर खालील बाबी आपण कोणताही व्यवहार करत असताना लक्षात ठेवले पाहिजे. 

डिजिटल माध्यमातून /ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी हे करा | digitl,online  fasavnuk ashi talavi 

1. सार्वजनिक वायफाय | Satrvjnik wifi

      आपली ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून फसवणूक होऊ नये यासाठी बँकेचे व्यवहार वगैरे करत असताना नेट बँकिंग करत असताना सार्वजनिक इंटरनेट किंवा वाय-फाय व्यवस्था यांचा वापर करू नका,कारण यातून आपली बरीच वैयक्तिक माहिती हॅक केली जाऊ शकते आणि तिचा गैरवापर होऊन होऊ शकतो. 

2. वैयक्तिक माहिती | Vayiktik Mahiti 

                   आपल्याला येणारा फोन कोणताही असो त्यावेळी आपण आपले नाव, जन्मतारीख,इमेल  यासारख्या बाबी कधीच शेअर करू नयेत. यातील काही बाबी आपण शेअर केले की त्यांच्या माध्यमातून ती व्यक्ती आपला मेल ऍड्रेस नाव आणि जन्मतारीख यांच्या माध्यमातून आपण लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट केले जातात व आपली ऑनलाइन लूट केली जाते.

3. पासवर्ड अद्ययावत करणे | Password Adyyavt Karne 

                 अनेक लोक आपला पासवर्ड हा वर्षानुवर्षे तोच ठेवत असतात .परंतु अशी न करता महिन्या-दोन महिन्यातून आपला पासवर्ड हा बदलला पाहिजे. अन्यथा आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्या पासवर्ड वरती लक्ष ठेवून लॉगिन करू शकतात.आपली वैयक्तिक माहिती संपत्ती यांना इजा पोहचूवू  शकतात त्यासाठी आपला पासवर्ड अद्यावत करा आणि पासवर्ड हा खूप सोपा नसावा जेणेकरून समोरची व्यक्ती त्याच्याविषयी काही अंदाज येऊ शकेल अशा गोष्टी पासवर्ड मध्ये नसाव्यात. 

4 . वैयक्तिक माहिती ची गोपनीयता  | Vayiktik Mahitichi Gopniyata 

                       यामध्ये आपले संपूर्ण नाव जन्मतारीख,आधार कार्ड क्रमांक, मेल आयडी नेट बँकिंग लोगिन आयडी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मधील सी सी व्ही नंबर यासारख्या बाबी कधीच कोणाला शेअर करू नयेत. 

5. सखोल चौकशी | Sakhol Chaukashi

                                   एखादी वस्तू खरेदी करत असताना तिच्याविषयी सखोल चौकशी करावी ती वस्तू ऑनलाइन घेत आहोत. तेच ऑफलाइन हवे आहे अशी मागणी करून क्रॉसचेक करावे. मग खात्री पटल्यास ती वस्तू ऑनलाईन मागवावी. थोडक्यात काय तर सखोल चौकशी केल्याशिवाय कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नये अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.

6. गुगल सर्च हिस्ट्री | Google Search History  

                आपण गूगल वरती काय शोधत आहोत काय सर्च केले आहे याची History असते किंवा आपण फोन मध्ये ज्या ॲप मध्ये प्रवेश केल्यानंतर ते ॲप तसेच ऍक्टिव्हेट ठेवतो तर असे करू नये. त्यांना काम झाल्यानंतर आपल्या स्क्रीन वरून खुल्या अवस्थेत असते ते काढून टाकावे.अन्यथा आपला फोन हरवला कोणाला सापडला तर त्या चालू अवस्थेत असलेल्या ॲप किंवा इंटरनेट लॉगिनच्या माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते. 

7 संबंधित खाते ब्लॉक करणे | Khate Blok Krane

                        आपल्या खात्यामध्ये काही गैरव्यवहार सुरूआहे मग ते बँकेच्या क्रेडिट कार्डचे असो की डेबिट कार्डचा  आपल्याला काही मेसेज आल्यास तात का बँकेत किंवा Custmer Careला मेल व  फोन करून आपले खाते ब्लॉक करावी. 

8. सायबर क्राईमला फोन | Sayber Crime Khatyala Phon 

              डिजिटल माध्यमातून आपली फसवणूक झाल्यास 15 52 60 या क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा व आपली आपली तक्रार नोंदवावी. या तक्रारीची तात्काळ दखल घेतली जाते आणि आपली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराचा तात्काळ शोध घेतला जातो त्यासाठी वरील क्रमांक  आपल्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवावा.

9. फोनची सेवा | Phon sevekde laksh 

                            कधी कधी काही तोतया आपला नंबर कस्टमर केअरला कळवून तो बंद करतात व  त्याच नंबर चे कार्ड वाममार्गाने मिळवतात आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा मेसेज वगैरे येत नाही. मात्र त्या कार्ड च्या माध्यमातून आपल्या नेट बँकिंग तसेच इतर तपशील ते मिळतात त्यासाठी आपल्या फोनची सेवा किंवा नेटवर्क काही विशिष्ट तासांपेक्षा गायब असेल तर मात्र त्याची तक्रार नोंदवावी.आपला फोन हरवल्यास देखील तात्काळ नंबर ब्लॉक करावा. 

10.कागदपत्रे | Kagatptre Gola karane 

                    आपली ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तपासाला तात्काळ दिशा मिळावी यासाठी ॲपच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल तर त्या app चे नाव जी फसवणूक झाली त्याची स्क्रीन शॉट नेट बँकिंग च्या माध्यमातून झाले असेल तर आपल्या पासबुक वर एन्ट्री खाते क्रमांक किती तारखेला ही घटना घडली या संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत म्हणजे डिजिटल माध्यमातून चोरी करणारे हे डिजिटल चोर किंवा सायबर गुन्हेगार तात्काळ पकडले जातील.

11. जाणीव | janiv jagruti 

                        बँक आपल्याला वारंवार आवाहन करतात की आम्ही आपणास कोणत्या प्रकारचे वैयक्तिक तपशील मागत नाही याची जाणीव आपल्याला फोन आल्यानंतर लगेच व्हायला हवी. जेणेकरून आपल्याकडून कोणत्या प्रकारचा ओटीपी संबंधित गुन्हेगारास जाणार नाही व आपली लूट देखील होणार नाही. 

12 तात्काळ मेल | Mail  Karane

                 सायबर क्राईम या विशेष पथकाला आपली फसवणूक झाल्यास त्यांच्या संबंधित वेबसाईटलाम्हणजेच https://cybercrime.gov.in/ ला  तात्काळ मेल करून माहिती पुरवावी जेणेकरून ते गुन्हेगार लवकर पकडले जातील.

                      अशा प्रकारे आजच्या लेखातून डिजिटल मीडियातून म्हणजे ऑनलाइन व्यवहार करता असताना या चुका होतात व त्याचे खुईप मोठे व परिणाम आपल्याला  भोगवर लागत आहेत. . होणारी फसवणूक म्हणजेच टेलिफोन संगणक इंटरनेट एप्स मेसेजेस सगळ्याच माध्यमातून होणारी फसवणूक कशाप्रकारे हो डिजिटल मीडियातून होणारी फसवणूक,आणि इंटरनेटवरून होणाऱ्या लुटीला या लेखातून जरा जरी अटकाव झाला तरी फायदा आहे . म्हणजेच टेलिफोन संगणक इंटरनेट एप्स मेसेजेस सगळ्याच माध्यमातून होणारी फसवणूक कशाप्रकारे होते ते यावर उपाय काय करावेत.  याविषयी या लेखात माहिती दिलेली आहे असे ऑनलाईन फसवणुकीचे अजून काही प्रकार आपल्याला माहीत असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा आर्थिक साक्षरतेच्या चळवळीमध्ये नक्कीच ते मुद्दे देखील समाविष्ट करून घेतले जातील कारण का तर पैशाने पैसा केवळ वाढवणे म्हणजे आर्थिक साक्षरता नाही तर आपल्याकडील पै मी पै सुरक्षित ठेवणे म्हणजे त आहे .काटकसर  देखील अपेक्षि  चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद!

आमचे हे लेख जरूर वाचा 


- राज्यातील सद्य वातावरण बघता हा निबंध परीक्षेला येण्याची शक्यता लोकशाहीत मतदानाचे महत्त्व


बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना - 2 लाख स्कॉलरशी


दहावी नंतर नेमके काय करावे? या चिंतेत आहात मग


दहावी नंतर कॉलेज नको तात्काळ नोकरी हवीय तर मग जरूर वाचा विविध कोर्स माहिती  


तुम्हाला देखील 90 टकेपेक्षा जास्त गुण हवेत... तर मग कसा केला होता 92 टक्के पाडण्यासाठी आमच्या शाळेच्या निखिल देशमुख या विद्यार्थ्याने अभ्यास विशेष कोणताही class नसताना


    

   

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area