जागतिक परिचारिका दिन | Jagtik Prichrika Din International Nurses Day
आजच्या या लेखामध्ये आपण 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे International Nurses Day म्हणून जो दिवस साजरा केला जातो. त्याविषयी माहिती पाहणार आहोत ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल.
जागतिक परिचारिका दिन |
जागतिक परिचारिका दिन माहिती(toc)
जागतिक परिचारिका दिनामागील पार्श्वभूमी | Jagtik Pricharikaa Dinachaa Itihas
1971साली लंडन याठिकाणी एका आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेमध्ये अनेक देशातील प्रतिनिधि एकत्र जमले होते.या परिषदेच्या अध्यक्ष फ्लॉरेन्स नाइटिंगेल होत्या. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची नर्सिंग क्षेत्रांमधले कामगिरी आरोग्य क्षेत्रात अतिशय भरीव मानले जाते आणि म्हणूनच 12 मे हा त्यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे योगदान | Florence Nitingel Yogdan
1854 मध्ये क्रिमियन युद्ध झाले.या युद्धामध्ये अनेकब्रिटिश सैनिक जखमी झाले. या सैनिकांना सेवा देण्यासाठी डॉक्टरांची संख्या कमी पडत होती.अशावेळी आपल्या जिवाची पर्वा न करता अगदी रात्रंदिवस नाइटिंगेल यांनी सैनिकांची सेवा केली.
रुग्णाची सेवा सुश्रुषा करत असताना जर स्वच्छतेकडे नीट लक्ष दिले गेले तर रुग्णाचा होणारा मृत्यूदर कमी करता येतो. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले त्यांच्या या स्वच्छता सिद्धांतांमुळे सिद्ध केले.लढाईत सैनिकांचा जो मृत्यूदर 69% होता तोदर 18% वर आणण्याचे अभूतपूर्व काम त्यांच्या या हाइजीन थेअरी/Hygin Theory ने केले.
आज देखील आपण पाहतो की कोरोना महामारीमध्ये कोरोना आटोक्यात आला तो आपण आपले हात स्वच्छ धुणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमधून. स्वच्छता आणि आरोग्य यांचा कसा जवळचा संबंध आहे याचे भान आरोग्य क्षेत्राला देण्याचे काम नाईटिंगेल यांनी केले थोडक्यात काय तर एक आधुनिक सेवा सुश्रुषा तंत्र अवघ्या जगाला समर्पित करण्याचे काम फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी केले म्हणूनच त्यांची आठवण म्हणून हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो.
नाईटिंगेल यांच्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर त्या गर्भश्रीमंत घरामध्ये जन्माला आल्या होत्या. तरीदेखील रूग्णसेवेला त्यांनी प्राधान्य दिले हेच त्यांचे मोठेपण व खरे योगदान. सेवा हा त्यांनी धर्म मानला पण आज आपण पाहतोय त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रात्रंदिवस कशाचीही पर्वा न करता नर्सेस आपल्याला सेवा देत असतात खरोखरच त्यांच्याविषयी या दिवसाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे त्यांच्या अहोरात्र करत असलेल्या कार्याला सलाम आहे.
परिचारिका | pricharika nurses
आपल्याला नर्स म्हटलं की शब्द कळतो मात्र परिचारिका म्हटल्यानंतर आपण गडबडून जातो. थोडक्यात परिचारिका म्हणजे डॉक्टर रुग्णांना औषधोपचार देत असतात मात्र ते औषध उपचार वेळच्या वेळी देणे, रुग्णांची काळजी घेणे, रुग्णांची स्वच्छता ठेवणे हे ज्या व्यक्ती काम करतात त्यांना परिचारिका म्हणतात.
लंडनमधील परिचारिका दिन | landnmadhil pricharrikaa Nurses Day
नाईटिंगेल यांचे योगदान लंडनसाठी, त्यांच्या सैनिकांच्या आरोग्यासाठी कसे महत्त्वपूर्ण होते ते आपण पाहिलेच. म्हणूनच त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून 12 मे या दिवशी लंडनमध्ये नर्सेस एका ठिकाणी जमतात व एक मेणबत्ती पेटवून एक दुसरीच्या हातामध्ये पास करत असतात या सर्व मेणबत्त्या एका उंचावरची लावल्या जातात. या मेणबत्तीप्रमाणे रुग्णांचे आयुष्य कायम तेवत ठेवू. त्यांची आयुर्मर्यादा उंचीवर नेऊन ठेवू. हेच आमचे आद्य कर्तव्य आहे. हा संदेश यातून आपल्याला मिळतो.
अमेरिका,इंग्लंड किंवा अन्य युरोपीय देशात यासारख्या देशांमध्ये जस आपण स्वच्छता पंधरवडा साजरा करतो अगदी त्याच प्रमाणे नर्सिंग आठवडा किंवा नर्सिंग विक/nursing week साजरा केला जातो. या आठवड्यामध्ये नर्सेस साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वर्षभर जे रुग्णांची सेवा करतात त्यांनाही आठ दिवस एखाद्या सणासारखे वाटतात.आपल्या भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत नसला तरी आपण सर्वसामान्य लोकांनी कोरोना सारख्या महामारीतून आपल्याला वाचणारे डॉक्टर आणि नर्सेस ही आपल्यासाठी परमेश्वरा निर्माण केले देवदूत आहेत याची जाणीव ठेवून त्यांना या दिवशी शुभेच्छा द्याव्यात.
परिचारक यांचे महत्त्व | Importance Of nurses Paricharikanche mhatav
काही मुद्द्यांच्या माध्यमातून परिचारिका किती महत्वाचे कार्य करतात याची जाणीव करुन देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
1 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा | Rugnseva Hich Ishwarseva
आपण पाहतो हॉस्पिटल मध्ये जे रुग्ण भरती होतात त्यांना विविध प्रकारच्या आजार असतात काहीना संसर्गजन्य आजार देखील असतात काहींची मोठमोठ्या opration असतात तर काही अपघातामध्ये इतके जखमी होतात की त्यांच्याकडे पाहण्याची देखील हिंमत होत नाही. काही किळस असणाऱ्या घटना असतात पण तरीदेखील नर्स रुग्ण म्हणजे आमच्यासाठी ईश्वर आहे असे म्हणून कार्य करतात.
2. सकारात्मक वातावरण | Sakaratmk Vataavaran
रुग्णाच्या वेळी हॉस्पिटलमध्ये जातो यावेळी त्याला झालेल्या आजारपणामुळे तो घाबरलेल्या अवस्थेत असतो. डॉक्टर येतात इंजेक्शन, औषधे देतात आणि निघून जातात. ते जास्त वेळ रुग्णजवळ राहू शकत नाही, कारण त्यांना अनेक रुग्ण तपासायचे असतात; पण अशावेळी नर्सेस मात्र त्या रुग्णाची एखाद्या नातेवाईका प्रमाणे विचारपूस करत असतात आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे व्हाल असा एक आशावाद निर्माण करत असतात.
3. नियमित औषधोपचार | Niymit Aushadhe
डॉक्टरांनी औषधे किंवा इंजेक्शने Recomend केलेली आहेत, ती वेळच्या वेळी देण्याचे काम नर्सेस करत असतात. तसेच रुग्णाची प्रगती कशी आहे ? ती डॉक्टरांना माहिती पुरवतात.
4. लसीकरण मोहिमेत हातभार | Lasikarn Mohimet Sahbhag
आज वर्तमानातील उदाहरण द्यायचे झाले. तर या कोरोना महामारी ने अवघ्या मानवजातीला एका भयग्रस्त मानसिकतेत नेण्याचे काम केले होते. या साथीच्या आजारात अनेक तरुण, तरुणी तसेच वयोवृद्ध लोक मृत्युमुखी पडले. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी यावर एकच उपाय होता तो म्हणजे लसीकरण आणि या लसीकरणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली त्या होत्या नर्सेस.
आज पोलिओ हद्दपार झालाय अनेक साथीचे आजार हद्दपार होत आहेत ते केवळ लसीकरणामुळे. दुर्गम भागात जाण्यासाठी वाहनांची सोय नसताना या परिचारिका आपल्या कर्तव्य धर्माचे पालन करून लसीकरण मोहिमांमध्ये सहभाग घेतात व या मोहिमा यशस्वी करून दाखवीतात.
5. दुर्गम भागात आरोग्य सेवा | Durgam Bhagat Aarogya Seva
एखादा भाग कितीही दुर्गम,जंगलाचा असला तरी त्या भागामध्ये शासकीय दवाखाने असतातच. अशा दुर्गम भागात राहणे धोक्याचे असून देखील परिचारिका दुर्गम भागात लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना औषधोपचार मिळावा यासाठी कार्य बजावताना दिसतात.
6. सेवेच्या मानाने मोबदला कमी | Mobdlaa Kami
आज आपण पाहतो सरकारी दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका या बारा बारा तास ड्युटी करतात. तरीदेखील त्यांना मिळणारा मोबदला अतिशय कमी असतो. खाजगी क्षेत्रात तर बोलायलाच नको जेवढे काम त्या करतात तेवढा मोबदला देखील त्यांना मिळत नाही असे सगळे चित्र पाहायला मिळते. म्हणून नर्सेस आपला सेवा धर्म नीट निभावत नाहीत असे नाही तर त्या इमाणे इतबारे रुग्ण सेवा करत असतात.
7. डॉक्टरांना मदत | Doctranaa Madat
डॉक्टरांच्या पुढे अनेक रुग्ण येतात.या शेकडो किंवा हजारो रुग्णांना एक डॉक्टर कसे उपचार करणार? यावेळी डॉक्टरांना या उपचार कार्यात 24 तास सेवा देण्याचे काम परिचारिका करतात. थोडक्यात डॉक्टरांच्या मदतनीस आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सेवा हा ज्यांचा धर्म I
रुग्णाचे हसू तोच हाच यांचा मोबदला I
अशी ज्या करतात सेवा I
वाटावा सर्वांना त्यांच्या चांगुलपणाचा हेवा I
अशा या परिचरकांचा सर्वांकडून गुणगौरव व्हावा I
चला तर मग यावर्षी आपण देखील जोरदार परिचारिका दिन साजरा करूया.व परिचारिका यांच्या आनंदात सहभागी होऊया.चला पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.