Type Here to Get Search Results !

कोसळणारे शेअर मार्केट आणि मानसिकता | Kosalnare Sher Market Aani Mansikta

 कोसळणारे शेअर मार्केट आणि मानसिकता | Kosalnare Sher Market Aani Mansikta 

            कोरोंना काळानंतर अलीकडे  काही दिवसापासून शेअर मार्केट कायम कोसळत आहे अशा वेळी आपली मानसिकता कशी असावी याविषयी आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

             आपण जीवन जगत असताना देखील सगळेच दिवस सारखे नसतात. काही दिवस सुखाचे असतात तर काही त्रासदायक तर कधी कधी ना आनंद ना दुख असे देखील असतात.हा मानसिकतेचा सर्व भाग शेअर बाजाराला लागू पडतो.शेअर बाजार कधी तेजीत ,कधी मंदीत तर कधी जागच्या जागी म्हणजे त्यात म्हणावी तशी   Movment नसते असे सगळे चित्र असते.अशा वेळी ट्रेडर असो की इन्वेस्टर यांनी Panik न होता आपली मानसिकता नीट ठेवली पाहिजे. जर आपण आपली मानसिकता नीट ठेवली नाही तर आपले निर्णय चुकू शकतात व प्रचंड नुकसणीचा सामना करावा लागू शकतो.कोसळणाऱ्या शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक कशी करावी ? करावी की करू नये असे अनेक प्रश्न मनात येत असतात.तर ती मानसिकता काही मुद्यांच्या आधारे पाहूया.

कोसळणारे शेअर मार्केट आणि मानसिकता
कोसळणारे शेअर मार्केट आणि मानसिकता

अशी असते मानसिकता(toc)  

1. पडझड कधी थांबेल | Padzad Kadhi Thambel 

                  शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट कोसळायला लागली की ही पडझड कधी थांबेल या चिंतेमध्ये गुंतवणूकदार असतात.कारण  खूप मोठी रक्कम त्यांनी शेअर बाजारात गुंतलेली असते आणि ही पडझड लवकरात लवकर न थंबता  जर जास्तच होत राहिली तर प्रचंड नुकसान होईल त्यामुळे गुंतवणूकदारांना  मानसिक ताण जाणवत असतो. 

2. गुंतवणुकीबाबत निर्णय | Guntvnukibabt Nirnay 

                      शेअर बाजार कोसळले की  आता गुंतवणुकीबाबत कोणता निर्णय घ्यावा ? अधिकची रक्कम टाकून झालेला तोटा एव्हरेज करावा?की बाजार किती कोसळतोय हे पाहून निर्णय घ्यावा ?अशी मानसिकता गुंतवणूकदाराची झालेली असत नक्की काय करावे हे त्याला समजत नाही कारण का तर कोसळत्या मार्केटमध्ये एक-दोन दिवस बाजार तेजीत असतो पुन्हा मंदीत जातो त्यामुळे एका वेगळ्या तणावाचा सामना गुंतवणूकदाराला करावा लागतो. नेमके काय होईल याचा कोणताच अंदाज बांधता येत नाही. 

3. कुटुंबातून दबाव | Kutumbatun Dabav 

                   गुंतवणूकदाराने शेअरबाजारात पैसे लावलेले किंवा गुंतवलेले आहेत याची कल्पना त्याच्या घरच्यांना असते. गुंतवणूकदारास  मार्केट कोसळत असताना कोणता निर्णय घ्यावा ते कळत नसते आणि त्यातच  घरातील इतर सदस्य त्याच्यावरती काही एक दबाव आणत असतात, की मार्केट खुप कोसळत आहे ,मार्केट मधून एक्झिट व्हा ! असा सल्लाही देतात पण तो सल्ला हिताचा आहे की तोट्याचा आहे हा निर्णय गुंतवणूकदार  घेऊ शकत नाही आणि एक वेगळा तान  त्या गुंतवणूकदाराच्या घरांमध्ये आणि मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. 

4. मित्र परिवारातील चर्चा | Mitra Parivar Aani Chracha 

               अमुक एका व्यक्तीने शेअरबाजारात इतके ला गुंतवले आहेत अशी कल्पना कळत-नकळतपणे आपल्या मित्र परिवाराला असते.  आणि ज्यावेळी शेअर बाजारात उलथापालथ होते खास करून बाजार खूप ढळतो असतो अशावेळी मित्रमंडळी यांना नेमके काय सांगू? किती नुकसान झाले ? ते सांग असे एक ना अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनामध्ये येत असतात. 

5 स्टॉक बाबतचे निर्णय | Stok Babat Nirnay 

                       कोसळलेल्या शेअर बाजारात मी कोणत्या कंपन्यांवर विश्वास ठेवू नि  कोणत्या कंपन्यांचे शेअर घेऊ आणि कोणत्या कंपन्यांचे शेअर विकु ? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडतो कारण का तर कोसळणाऱ्या बाजारात काही मोजक्या कंपन्या सोडल्या तर सर्व शेअर्स किंवा कंपन्या मायनस झालेल्या दिसतात थोडक्यात नेमके काय करावे तेच गुंतवणूकदाराला समजत नसते. 

6. आर्थिक तरतूद | Aarthik Tartud 

                शेअर बाजार कोसळला आहे परंतु या कोसळलेल्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी किंवा घेतलेले शेअर्स ऍव्हरेज करण्यासाठी माझ्याजवळ भांडवल नाही. मी कुठून आणू आधीची भांडवलात वाढ करणे योग्य आहे का? पडणाऱ्या बाजारात गुंतवणुकीचा हा निर्णय फायद्याचा राहील का असा देखील प्रश्न गुंतवणूकदाराला पडतो या आर्थिक तरतुदीचा तान त्याला येत असतो. 

7. बाजारातील ट्रेंडचा प्रभाव | Trend Chaa Prabhav

                                शेअर बाजारात असणारा ट्रेंड  मानसिकतेवर परिणाम करत असतो बाजारात एखादा स्टॉक  किंवा त्या विषयीची मानसिकता सर्व काही ठीक असून नकारात्मक बनत गेली तर मग तो शेयर मोठ्या प्रमाणात खाली कोसळतो. थोडक्यात याच मानसिकतेचा प्रभाव एखादा स्टॉक वर होतो.याउलट  कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग नसताना देखील काही लोक त्याला खरेदी करतात म्हणून सगळेच त्या स्टॉकच्या मागे लागतात अशी मानसिकता बाजारात कधी कधी होते.  त्यांची ही मानसिकता  मंदी आणि तेजी आहे  त्यापेक्षा भयानक करण्याचे काम करत असतात. या सर्व बाबी  मानसिकतशी संबंधित आहे. अशाप्रकारे स्टॉकवर ट्रेंडचा आणि ट्रेंडचाअवघ्या  बाजारावर परिणाम करत असतो. 

8. निर्णय क्षमता घेण्यात अडचणी | Nirnyat Adchni 

                            शेअर बाजार एकदा कोसळायला लागला की गुंतवणूकदाराची निर्णय क्षमता आपोआपच कमी होत जाते. योग्य निर्णय त्याच्याकडून घेतला जात नाही. एक तर कोसळणाऱ्या बाजारात होणारे प्रचंड नुकसान पाहून तो विशिष्ट रक्कम शिल्लक आहे ती वाचावी की त्यात अजून भर टाकावी व सरासरी साधावी अशा मानसिकतेत तो  काम करत असतो. शेअर बाजार करायला लागल्यानंतर कधी कधी तो किमान दोन ते तीन महिने ढासळत राहतो यानंतरही तो दोन तीन महिने एका मधल्या अवस्थेत राहतो आणि त्यानंतर तेजी येण्याची शक्यता असते येथे निर्णयक्षमता आणि मानसिकता विकास संबंध आपल्याला पाहायला मिळतो. 

9. संयम न राहणे | Sayam N Rahane 

              साधारणपणे शेअर बाजार तेजीत असताना किती नफा घ्यावा? याबाबत गुंतवणूकदार संयम ठेवतात. थोडीफार उलथापालथ झाली तर घाबरत नाहीत, पण ज्यावेळी शेअर बाजार नेटाने  कोसळतो त्यामुळे तो शेअर बाजार कालांतराने वरती जाईल आपले सर्व पैसे बुडणार तर नाहीत न ? असा साधा विचार देखील संयम नसल्यामुळे गुंतवणुकदाराकडे राहत नाही. 

10 भयग्रस्त मानसिकता | Bhaygrast Mansikta 

                  बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार आनंदी असतो शेअर बाजार कोसळला लागल्यानंतर याअगोदर घडलेल्या शेअरबाजारातील मार्केट कोसळण्याच्या घटना त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि एक प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होते.

                              अशा वरील सर्व बाबीतून आपल्याला मानसिकता आणि गुंतवणूक त्यांचा किती जवळचा संबंध आहे हे लक्षात आले असेल परंतु मार्केटमध्ये अशी घसरण चालू असेल त्यावेळी नेमके काय केले पाहिजे याविषयी थोडक्यात पाहूया. 

शेअर बाजारात घसरत होता घसरण होत असताना हे करा | Market Koslat Astana Ya Babi Kara 

                     शेअर बाजारात घसरण होत आहे अशा वेळी सर्वप्रथम आपली मानसिकता सांभाळा. आज जरी शेअर बाजार खाली जात असला तरी काही दिवसांनी तो वरती येणार आहे असा इतिहास आहे याची जाणीव ठेवा.  आपण गुंतवलेली रक्कम तात्काळ वर्ग करू नका. ज्या चांगल्या कंपन्या असतील फंडामेंटल स्ट्रॉंग असतील त्या कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असतील तर ते विकू नका.आणि  नसतील तर मात्र खरेदी करण्याची संधी आहे असे माना. कोसळणाऱ्या शेअरबाजारात मनाने खचून न जाता जर आपल्या जवळ विशिष्ट रक्कम असेल तर त्याचे चार भाग करून मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहून थोडे थोडे पैसे गुंतवत चला.जेणेकरून काही दिवसांनी  जर मार्केट तेजीमध्ये यायला लागले तर नफा झाल्यानंतर आपली मुद्दल तुम्ही काढू शकता. थोडक्यात काय तर घाबरून जाऊ नका. कोसळणारे मार्केट संकट न मानता  ही गुंतवणुकीची नामी संधी आहे. असे नव्या गुंतवणूकदाराने देखील लक्षात घ्या आणि हो कोसळण्याची  ही संधी वारंवार मिळत नसते .शेअर बाजारात काही विशिष्ट घटना घडल्या किंवा  जागतिक बाजारात काही निर्णय घेतले गेले तर त्याचे पडसाद बाजारावर पडत असतात.म्हणून त्याकडे लक्ष ठेवा. कायम सकारात्मक विचार करा आज पडीचे दिवस आहेत उद्या सुगीचे दिवस येतील म्हणजेच काय तर कधी ना कधी शेअर बाजार पुन्हा तेजीत येईल अशी मानसिकता तयार करा फंडामेंटल स्ट्रॉंग असणा अरे शेअर्स खरेदी करण्यावर कायमच भर द्या.

    हा लेख नक्कीच जर तुम्ही कोसळणाऱ्या मार्केटमुळे चिंतित असाल तर ती मानसिकता बदलण्याचे व सकारात्मक ठेवण्याचे काम करेल यात शंकाच नाही.शेअर बाजाराकडे व्यवसाय म्हणून आत्मियतेने पाहूया,कारण व्यवसाय म्हटले की चड उतार असतात हे नक्की. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. 

            शक्यतो आपल्याला जास्त मार्केट मधील जास्त कळत नाही तोवर NIFTY FIFTY मधील शेअर किंवा स्टॉक घ्या. याविषयी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

          

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Be fearful when others are greedy. Be greedy when others are fearful. -Warren Buffett

    उत्तर द्याहटवा
  2. Market downturns are a good time to invest more money in your diversified portfolio of ETFs. Why? You buy your ETFs cheaper, which means higher overall portfolio returns.

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area