Type Here to Get Search Results !

म्युच्युअल फंड काढण्याचे फायदे तोटे व रिस्क | Mutual Fund Kadhnyache Fayde Tote V Risk

म्युच्युअल फंड काढण्याचे फायदे तोटे व रिस्क| Mutual Fund Kadhnyache Fayde Tote V Risk  

               आर्थिक साक्षरतेचा एक भाग म्हणून आपण आज  म्यूचुअल फंड म्हणजे काय?म्यूचुअल फंड काढण्याचे फायदे  तोटे व रिस्क म्हणजेच ही गुंतवणूक किती जोखमेची आहे याचा अभ्यास करणर आहोत. तर सर्वप्रथम म्युच्युअल फंड  म्हणजे काय ?याची माहिती पाहूया.

म्युच्युअल फंड काढण्याचे  फायदे तोटे व रिस्क
म्युच्युअल फंड काढण्याचे  फायदे तोटे व रिस्क

म्युच्युअल फंड माहिती(toc)

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?| Mutual Fund Mhanje Kay 

            "म्युच्युअल फंड म्हणजे अशी गुंतवणूक की ज्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला कर सवलत मिळते त्याच बरोबर गुंतवणुकीच्या बदल्यात मोबदला देखील चांगला मिळतो असा एक गुंतवणुकीचा प्रकार होय."

                       अलीकडच्या काळात शेअर मार्केट रिअल इस्टेट सोने खरेदी तसेच इतर क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा अनेक लोक या गुंतवणुकीला महत्त्व देता आहेत तर अशा या  म्युच्युअल फंड  काढण्याचे काही फायदे आहेत का? ते आपण पाहूया. 

म्युच्युअल फंड काढण्याचे फायदे |mutual fund kadhnyache fayde 

                        म्युच्युअल फंडाची व्याख्या करत असतानाच आपल्या लक्षात आले की असा गुंतवणुकीचा पर्याय आहे की ज्यामध्ये आपल्याला रिटन्स किंवा मोबदला जास्त मिळतो. यावरूनच म्युच्युअल फंड किती फायद्याचा हे आपल्या लक्षात आले असेल हा  म्युच्युअल फंड काढण्याचे अनेक फायदे आहेत ते फायदे पुढीलप्रमाणे

1. गुंतवणुकीचा सहज आणि सोपा प्रकार | guntvnukicha sahj aani sopa prkar

                  म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सहज आणि सोपा प्रकार आहे कारण का तरी गुंतवणूक आपण ॲपच्या माध्यमातून तसेच विविध कंपन्यांची फंड ऑफिसेस, बँका या ठिकाणी जाऊन देखील, तसेच एजंटच्या मदतीने देखील  गुंतवणूक करू शकतो थोडक्यात काय तर गुंतवणूक करण्याचा हा सहज आणि सोपा मार्ग आहे. 

2. वेळेची बचत |  velechi bachat 

                   एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी बराच विचार करावा लागतो त्या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करावा लागतो पण म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर हा गुंतवणुकीचे सर्व निर्णय घेत असतो सहाजिकच आपल्या वेळेची बचत होते. 

3. गुंतवणुकीत विविधता | vividhta 

                     म्युच्युअल फंड मधील गुंतवणुक एकाच क्षेत्रात न करता शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट ,बॉन्डस यात गुंतवली जात असल्याने आपली रक्कम मी विविध क्षेत्रात गुंतवली जाते हा म्युच्युअल फंड काढण्याचा सर्वात मोठा फायदा आहे.  एखाद्या क्षेत्रात चढ-उतार असतील तरी आपल्याला फारसा तोटा होत नाही.

4. करामध्ये सवलत | Kar Savlticha Fayda 

           म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही आपल्याला टॅक्स बेनिफिट म्हणजेच 80 cअंतर्गत कर सवलतीचा फायदा मिळतो.  दीड लाख रुपये पर्यंत हा फायदा पण घेऊ शकतो. थोडक्यात चांगला परतावा आणि tax benifit असा दुहेरी फायदा यागुंतवणुकीचा आहे. 

5. माहितीतील पारदर्शकता | Pardarshk Mahiti 

                          म्युच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युअल फंड मार्फत त्यांचे विशिष्ट कालावधी नंतर अहवाल प्रसिद्ध केले जातात. की अमुक अमुक म्युच्युअल फंड किती फायद्यामध्ये  मध्ये आहे .याची माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर आपण देखील आपण गुंतवलेल्या रकमेवर मध्ये किती वाढ झाली आहे.  ते आपण कधी पाहू शकतो .अगदी आपल्या मोबाईल वर देखील ते पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.थोडक्यात अतिशय पारदर्शकता येथे आपल्याला पाहायला मिळते. 

6.छोट्या रकमेपासून गुंतवणूक करण्याची सोय | Kami Rakkam Guntvnyachi Soy  

                  म्युच्युअल फंड मधील व्यवहार हा युनिट नुसार चालतात. त्यामुळे तुम्ही अगदी 100 रुपयापासून देखील गुंतवणूक करू शकता.  छोट्या रकमेपासून सुरुवात करून थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने आपण आपली  आर्थिक प्रगती करू शकतो. ही सोय म्युच्युअल फंड मध्ये आहे.

7. मोफत आर्थिक सल्ला | Aarthik Salla  

                  म्युच्युअल फंड  मध्ये अभ्यासू फंड मॅनेजर असतात. थोडक्यात काय तर आपण कोठे गुंतवणूक करावी?  हे विचारण्यासाठी कोणा तज्ञाकडे जाण्याची आवश्यकता नाही एक प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये हा पैसा गुंतवला म्हणजे गुंतवणुकीचा मोफत आर्थिक सल्ला घेतल्यासारखे चआहे.

8.तणावरहित गुंतवणूक | Tnaavrahit Guntvnuk  

                     कोणत्या क्षेत्रामध्ये पैसा गुंतवले तरी नंतर थोडाफार तरी तान आपल्याला सहन करावा लागतो. स्टॉक मार्केटमध्ये आपण पैसा गुंतवला आणि आपण जो स्टॉक किंवा शेअर्स घेतला आहे त्याच्यात घसरण व्हायला लागली तर आपल्याला ताण येऊ शकतो इतर गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्यात देखील असा ताण आपल्याला येऊ शकतो मात्र म्युच्युअल फंड मध्ये असा ताण घेण्याची आवश्यकता नसते. 

9. अप्रत्यक्ष शेअर मार्केटमधील गुंतवणूक | Stok Market Investment  

                     आपण पाहिले की आपल्याला करोडपती व्हायचे असेल तर आपण आर्थिक काटकसर करून शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतला पाहिजे पण तो गुंतवत असताना आपल्याला काही अभ्यास करावा लागतो. मग यावर पर्याय काय आहे तर आपण आपली जी काटकसर झालेली रक्कम आहे ती नियमितपणे खंड न पडू देता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली तर एक प्रकारे ती आपण केलेली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असते असा त्याचा अर्थ होतो आणि गुंतवणूक आपल्याला खूप मोठे रिटर्न्स मिळवून देते. 

10. पैसा आपल्या हाताशी | Paisa  Hatashi 

                  म्युच्युअल फंडचा हादेखील एक फायदा आहे ही रक्कम तुम्ही कधीही ,कोणत्याही वेळी, आणि कितीही काढू शकतात यावरती कोणतेही बंधन नाही हा देखील एक म्युच्युअल फंड चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. 

                            वरील फायदे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असतील. अगदी कमी रकमेपासून आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो.आजच्या घडीला सर्वात जास्त परतावा देणारे क्षेत्र म्हणजे म्युच्युअल फंड असे सगळे चित्र असले तरी म्हणजे काही तोटे देखील आहेत. यावर एक नजर टाकूया ------

म्युच्युअल फंडाचे तोटे | Mutual Fandache Tote 

                        आज आपण पाहतो की वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स, युट्युब ,फेसबूक यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडाची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. आणि कधी कधी या जाहीरातबाजी मध्ये आपण फंड निवडत असताना पाऊस संभ्रमावस्था निर्माण होते. चला तर मग म्यूच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचे काही तोटे अभ्यासूया 

1. आमिषांचा बळी | Amishancha Bali  

                   कधी कधी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना काही म्युच्युअल फंड एक वर्षात अमुकच रिटर्न मिळेल अशी आपल्याला हमी देतात;पण तसे होत नाही सध्याचेच पहा ना सध्या स्टॉक मार्केट,शेअर मार्केट प्रचंड घसरताना दिसत आहे .अशावेळेस आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर आपला तोटा होऊ शकतो.  हा तोटा का झाला ? तर आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी अमुक परतावा मिळेल असे आमिष दिले दिले गेले .त्याचा हा परिणाम आहे, म्हणून गुंतवणूक करत असताना बाजार भाव काय आहे ? तो फंड, त्याचा इतिहास फंड मॅनेजर कोण आहे?  याची सखोल माहिती मिळवावी  अन्यथा आपण  आमिषाला बळी पडू शकतो. 

2. प्रचंड जाहिरातबाजी | Prachand Jahiratbaji 

                             म्युच्युअल फंड वरती प्रचंड जाहिरातबाजी होते .या जाहिरातबाजीचा आपल्यावरती परिणाम होतो आणि यामुळे  निर्णय घेत असताना आपण चूक करू शकतो. 

3. अनेक क्षेत्रातील गुंतवणूक | Anek Kshetrat Guntvnuk 

                          म्युच्युअल फंड मध्ये केली जाणारी गुंतवणूक स्टॉक, बॉण्ड यामध्ये केली जाते त्यात  असणारी विविधता आपला तोटा कमी करते त्याच पद्धतीने मिळणाऱ्या परताव्यावर देखील याचा परिणाम होतो होतो व फायदा देखील कमी होऊ शकतो. 

4. शुल्क आकारणी  | Shulk Aakarni 

                 म्युचल फंड मध्ये आपल्याला परतावा जास्त जास्त मिळतो तसेच आकारले जाणारे शुल्क देखील जास्त असते .फंड मॅनेजर फुकट सल्ला देत नाहीत तर त्यासाठी आपल्या परताव्या तील काही विशिष्ट रक्कम ते वजा करून घेतात थोडक्यात smc charges जास्त आहेत. 

5. छुपे कमिशन | Chupe Camishn 

               म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्या नंतर ज्या फंडांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांच्याकडून काही परसेंटेज मध्ये विविध चार्जेस च्या माध्यमातून एक प्रकारे कमिशनचा घेतल्यासारखे आहे.  फक्त त्याला कमिशन नाव न देता ती रक्कम आपल्याकडून घेतली जाते. 

6. बंद करताना प्रचंड रक्कम | Closing Charges 

             मॅच्युअल फंड बंद करत असताना किंवा त्यातून  आपण एक्झिट म्हणजेच आपली गुंतवणूक थांबवणार असतो त्यावेळी खूप मोठा एक्झिट लोड आपल्या कडून घेतला जातो आणि याची माहिती आपल्याला सुरुवातीला दिली जात नाही. 

   म्युच्युअल फंडाचे फायदे तोटे पाहिल्यानंतर या क्षेत्रात पैसे गुंतवणे किती जोखमीचे आहे ते आपण पाहूया. 

मॅच्युअल फंड मधील रिस्क | Mutual Fund Madhil Risk 

                              नोटाबंदी पासून रिअल इस्टेट व गुंतवणुकीचा  इतर क्षेत्रांमध्ये थोडे मंदीचे वातावरण असल्याचा फायदा स्टॉक  मार्केटला अप्रत्यक्षरीत्या म्युच्युअल फंडला होत आहे. लोकांना स्टॉक मार्केट म्हटले की त्यामध्ये प्रचंड धोका आहे, कारण शेअर मार्केटमध्ये झालेले मोठे घोटाळे वर्तमानपत्रातून ,टीव्ही वरती त्यांनी पाहिलेले आहेत.त्याचबरोबर अनेक लोक शेअर मार्केट मुळे रस्त्यावर ते आले आहेत हे देखील  त्यांनी पाहिले आहे. असे सर्व असले तरी आपण फंड मॅनेजर देखील माणूसच आहे. काही आर्थिक निर्णय घेत असताना त्याच्याकडून देखील चुका होऊ शकतात आणि आपला तोटा होऊ शकतो याची आपल्याला कल्पना हवी.म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवलेला पैसा हा एक प्रकारे स्टॉक किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेलाअसतोपण अनेकांना स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड एकच आहेत हे माहीत नसते.म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट यांचा काहीच संबंध नाही ही जी धारणा आहे ती अतिशय चुकीची धारणा आहे म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घेऊन गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडामध्ये कर सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर ती रक्कम लॉकिंग कालावधी साठी आपल्याला ठेवावी लागते म्हणजेच गरज असेल तेव्हा पैसे आपल्याला मिळू शकत नाहीत ही देखील मोठी रिस्क आहे. बँकमध्ये ठेवलेल्या ठेवी अमुक वर्षानंतर अमुक रक्कम मिळेल अशी परताव्याची  हमी देतात ती हमी  म्युच्युअल फंड परताव्याची हमी देत नाही या जोखीम किंवा रिस्क  लक्षात घेऊनच मॅच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी

                         आर्थिक साक्षरता या लेख माले अंतर्गत आज आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल काढण्याचे फायदे तोटे व त्यातील रिस्क यांची माहिती पाहिलीगुंतवणूक करत असताना एका क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक करू नका अजूनही गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत याविषयीची माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहू या तोपर्यंत धन्यवाद



    



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area