Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल | Swatntrya Sangram Aani Javahrlal

 स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल | Swatntrya Sangram Aani Javahrlal 

           आपल्या देशाचा स्वातंत्र्य संग्राम म्हटले की अगदी वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून अगदी महात्मा गांधी यांच्यापर्यंत आपण अनेकांची नावे किंवा त्यांचे कार्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.परंतु स्वतंत्र भारताचे पहिले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू केवळ गांधी प्रेमामुळे पहिले पंतप्रधान बनले अशी काही मंडळी टीका करतात.जे देशाचे पहिले पहिले पंतप्रधान बनले आणि त्यांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान काहीच नसावे  ही बाब काही केल्या मनाला पटत नव्हती ,म्हणूनच आजच्या लेखात स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल असा विषय आजच्या या लेखासाठी घेतला आहे.विषयाला सुरुवात करण्याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय करून घेऊ. 

स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल
स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल

पंडित नेहरू माहिती (toc)

पंडित नेहरू यांचा जीवन परिचय | Pandit Nehru Yancha Jivan Parichay 

     पंडित जवारलाल नेहरू यांचा जन्म 14नोव्हेंबर 1889 मध्ये झाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू. ते  त्या काळातील प्रसिद्ध वकील होते.त्याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते म्हणून देखील त्यांची ओळख होती. घरची गडगंज श्रीमंती यामुळे वडील मोतीलाल नेहरू यांनी पंडित नेहरू यांचे सर्व शिक्षण होम स्कूलिंग म्हणजेच घरातून शिक्षण या पद्धतीने  पूर्ण केले.पुढे त्यांनी आपले पदवीचे शिक्षण इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठात पूर्ण केले.  पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. 1912 मध्ये त्यांना वकिलीची डिग्री मिळाली.वकिली व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वकिली व्यवसायात जास्त रस वाटला नाही . पंडित नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमलादेवी होते.१९१६ मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित नेहरू आणि कमला देवी यांना 1917 मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले ते म्हणजे इंदिराजी. अतिशय श्रीमंत घरात जन्म तरीदेखील शिक्षणाच्या बाबतीत  पंडित नेहरू सजग होते. जीवन परिचय पाहिल्यानंतरआपलआपला मुख्य विषय  देशाचा म्हणजे भरताचा  स्वातंत्र्य संग्राम आणि  जवाहरलाल यांचे  यांचे त्या लढ्यात योगदान काय?तर आहे याची माहिती पुढील प्रमाणे----

जवाहरलाल आणि स्वातंत्र्य संग्राम |Javahrlal Ani Swtntrya Sangram(toc) 

                      स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू ची ओळख सर्वांनाच आहे पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात केलेल्या कार्याची माहिती पुढील प्रमाणे

1. होमरूल लीग चळवळी भाग | Homrul Lig Chalvlit Sahbhag

                     ऍनी बेझंट यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीमध्ये अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पंडित नेहरू देखील सहभागी झाले होते. या चळवळीच्या माध्यमातूनच अगदी सुरुवातीला पूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली नाही .उमर अलीमुळे या चळवळीकडे  जवाहरलाल नेहरू खेचले गेले मात्र ऍनी बेझंट यांच्या निधनानंतर ही चळवळ मागे पडल्याचे दिसते. 

2. असहकार आंदोलनात सहभाग | Ashkar Aandolnat Sahbhag 

                       महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलनाची चळवळ उभी केली होती.  या असहकार आंदोलनामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सक्रिय सहभाग घेतला. होता ब्रिटिशांना आपल्या देशातून हुसकावून लावायचे तर त्यांना कोणत्या प्रकारची सहकार्य भारतीय लोकांनी करू नये असे आव्हान महात्मा गांधी आणि अवघ्या भारतीय जनतेला केले होते या आंदोलनात पंडित नेहरू यांनी घेतला होता. 

3. पूर्ण स्वराज्याची मागणी | Purn Swrajyachi Magani 

                             इंग्रज भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार होते मात्र टप्प्याटप्प्याने देणार होते ही गोष्ट जवाहरलाल नेहरू यांना मान्य नव्हती ते पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी अग्रेसर होते 1927 च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी ही मागणी उचलून धरली मात्र या गोष्टीला ब्रिटिश तयार होणार नाहीत याची जाणीव बड्या नेत्यांना वाटत असल्याने गांधीजींचे अनेक नेत्यांनी याला विरोध केला मात्र तरीदेखील नेहरूंनी ही मागणी मागे घेतली नाही मग यावर उपाय म्हणून पंडित नेहरू यांना काही दिवस गांधीजींनी वाट पाहण्याची विनंती केली असे करत करत 1929 च्या अधिवेशनात मात्र जवाहरलाल नेहरू यांनी पुन्हा पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि त्या मागणीला मान्यता देखील मिळाली 

4. पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलने | Purn Swrajyachi Magni 

                            आम्हाला थोडे थोडे नको तर पूर्ण स्वराज्य मिळावे यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर होते. इंग्रजाना भारतीय जनतेचा रोष दिसत होता तरीदेखील जोवर शक्य आहे तोवर राज्य करावे ही सोची समजी चाल ते करत होते हे जवाहरलाल नेहरू यांनी ओळखले होते म्हणूनच ते पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी कायम आग्रही होते. त्यांनी 26 जानेवारी 1930 या दिवशी पूर्ण स्वराज्याची मागणी केल्याने खऱ्या अर्थाने तो दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला गेला. भारत माता की जी घोषणा दिल्या गेल्या. मात्र या मागणीला  पूर्ण यश मिळाले नाही.  म्हणून या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन या दिवशी साजरा केला जातो. या पूर्ण स्वराज्याच्या मागणीचे सर्व श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू यांना जाते कारण देशातील बड्या नेत्याना देखील इंग्रज हा देश इतक्यात सोडून जातील असे वाटत नव्हते. ही पूर्ण स्वराज्याची मागणी यातूनच स्वातंत्र्य संग्राम आणि जवाहरलाल यांचे योगदान किती भरीव होते हे सांगायला पुरेशे आहे. पंतप्रधान झाल्यावर नेहरू काही निर्णयात असफल झालेही असतील पण आपल्या आजादीच्या लढ्यात त्यांचे भरीव योगदान होते हे नक्की.  

5. छोडो भारत आंदोलन | Bharat Chodo  Movement  

                      छोडो भारत आंदोलनामध्ये देखील पंडित नेहरू यांचा सहभाग होता. छोडो भारत आंदोलनातील  सहभागामुळे त्यांना जेलमध्ये देखील जावे लागले .हे सर्व पाहिल्यानंतर भारतीय राजकारणातील अचानक उगवलेले पात्र जवाहरलाल ही टीका चुकीची आहे. कारण भारताला स्वातंत्र्य महिन्याच्या अगोदर जवळजवळ 17 ते 18 वर्षे जवाहरलाल नेहरू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असल्याचे आपल्या दिसते. गांधीजींच्या सर्वच लढ्यात ते कधी कार्यकर्ता तर लधी राष्ट्रीय नेता म्हणून कार्य करताना दिसत आहे. 

6. हंगामी सरकारमधील प्रधानमंत्री | Hngami Sarkarmdhil Prdhanmantri 

                     भारतीय लोकांचा विरोध पाहून इंग्रजांनी भारतीयांना तात्पुरते स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले मात्र स्वातंत्र्य देण्या अगोदर आगोदर त्या  देशाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी हंगामी सरकारची स्थापना केली गेली. या  हंगामी सरकारची जबाबदारी पंडित नेहरू यांच्यावर सोपवण्यात आली हंगामी सरकारच्या काळात पंडित नेहरू यांनी आपल्या भारतातील अनेक समस्यांचा अभ्यास केला. 

7.  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान | Swatntrya Bhrtache Pahile Pantprdhan 

                       जवाहरलाल नेहरू हे  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर देखील देशाचा कारभार पाहत असताना कायम त्यांनी समन्वयाची भूमिका  घेतली. भारत देशाची इतर देशांची आंतरराष्ट्रीय संबंध चांगले असावेत यावर त्यांनी भर दिला. भारत देशाप्रमाणे अमेरिका आफ्रिका या सारख्या देशात देखील स्वतंत्र मिळाले पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या लढ्याचे समर्थन केले.  थोडक्यात काय इतर देशांना देखील पारतंत्र्यातून मुक्त होण्याची प्रेरणा त्यांनी. दिली. कॅबिनेट किंवा  मंत्री मंडळ स्थापन करत असताना आपल्या विरोधकांना देखील त्यामध्ये सामावून घेतले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी सख्य नसतानादेखील त्यांना त्यांचे अलौकिक बुद्धिमत्ता पाहून मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून नेमणूक केली हिंदु महासभेचे नेता श्याम मुखर्जी यांना देखील मंत्रिमंडळात सामावून घेतले.थोडक्यात गुणांची पारख असलेले पंतप्रधान म्हणजे जवाहरलाल नेहरू. 

8. आर्थिक प्रगती | Aarthik Pragti 

                               देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी पंडित नेहरू यांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.  त्याच बरोबर भारताने अर्थव्यवस्था स्वीकारली ती मिश्र अर्थव्यवस्था. होती पंडित नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाक्रा  नांगल सारखे मोठे धरण प्रकल्प हाती  घेतले. ही धरणे म्हणजे आजच्या काळातील आधुनिक मंदिरे आहेत असे ते धरण बांधणीच्या कामाबाबत उद्घाटन प्रसंगी बोले होते. उद्या हेच देशाचे नंदनवन करतील असे विचार त्यांनी मांडले होते आणि खरोखर सुरुवातीच्या काळात जेवढी ही कामे झाली त्यानंतरच्या काळात अशी मोठो कामे झाली नाहीत. थोडक्यात देशाच्या विकासासाठी काय केले पाहिजे? याचा एक action plan नेहरूंच्या डोक्यात होता असे म्हटले तरी वावगे होणार नाही.  

9. वैज्ञानिक प्रगती वर भर | Vaidnyanik Pragtivar Bhar 

                     देशाचा विकास करायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे यासाठी त्यांनीAimms, Iits या सारख्या संस्थांची उभारणी केली. आण्विक  उर्जेचे समर्थन केले. मात्र ही आण्विक ऊर्जा  देशाच्या संरक्षना बरोबर देशात विद्युत आणि तंत्रज्ञान यामध्ये जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. 

10.लहान मुलांविषयी प्रेम | Lahan Mulanvishyi Prem 

                     पंडित नेहरू यांना लहान मुलांविषयी प्रचंड आकर्षण होते.  त्यांना लहान मुले प्रचंड आवडत होती.  कोणत्याही सभा समारंभामध्येब किंवा सभा संपल्यानंतर लहान मुलांना ते भेटत असत आणि त्यांच्या या बालक प्रेमामुळेच त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. 

                                     थोडक्यात काय तर महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असहकार चळवळ,सविनय कायदेभंग चळवळ, छोडो भारत या चळवळी किंवा आंदोलने केली. या कार्यात  त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सुरुवातीला एक कार्यकर्ता म्हणून तर कालांतराने एक राष्ट्रीय नेता म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या या लढ्यात, स्वातंत्र्य संग्रामात पंडित नेहरू यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.  ते केवळ हौशी होते, गांधीजी यांच्या मर्जीतील होते असे म्हणणे चुकीचे आहे.  

              पंडित नेहरूयांच्याकडून काही निर्णय घेताना गफलती देखील झाल्या हे देखील खरे आहे जसे की,  कश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेल्याने प्रश्न न सुटता तो खितपत पडला.भारत - पाकिस्तान फाळणीला मान्यता देणे यासारख्या काही चुका देखील असतील. तरीदेखील नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारत देशाचा राज्य कारभार नीट चालावा यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत प्रचंड होती भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 17 वर्षांची कारकीर्द त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली.या भल्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. 

                         आजच्या या लेखातून स्वतंत्र संग्राम आणि जवाहरलाल यातून आझादीच्या लढ्यामध्ये त्यांचे असलेले योगदान व देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख  बनवण्याचे काम त्यांनी कसे केले ,तसेच पहिले पंतप्रधान म्हणून केलेले कार्य ,त्यांच्या कार्यकालात झालेल्या काही चुका या सर्वच बाबींचा आढावा या लेखातून घेण्यात आला.हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.  आवडल्यास इतरांना देखील पाठवा कमेंट करा. धन्यवाद !

               आपल्या भारत देशाच्या इतिहासात अश्या बऱ्याच व्यक्ती आहेत त्यांच्या कार्याविषयी एकांगी विचार मांडून त्याना मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो.स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत देखील असेच झाले आहे त्यांनी दलित उद्धार किंवा अस्पृश्यता निवारक म्हणून प्रचंड कार्य करून केवळ त्याना स्वतंत्र्यवीर म्हणून एक समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही त्यांच्या या कार्याचा परिचय करून घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा. 

 https://www.dnyanyogi.com/2022/05/savarkrancha-asprushyta-nivarn-ladha.html

   

           तसेच स्वराज्याचा छावा संभाजी एक उत्तम  प्रशासक,उत्तम राजकारणी  व एक महान  साहित्यिक असून देखील त्याना एक दिशा भरकटलेला युवराज अशी मांडणी इतिहासकार करतात पण हे चुकीचे कसे आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://www.dnyanyogi.com/2022/05/swrajyacha-chavaa-rajkarnprashasansahit.html

                                               

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area