स्वराज्याचा छावा राजकारण,प्रशासन, साहित्य | Swrajyacha Chavaa Rajkarn,Prashasan,Sahitya
आजच्या लेखात आपण स्वराज्याचा छावा संभाजी यांचे राजकारण,प्रशासन व साहित्य यांचा आढावा घेणार आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाकर्ते पुत्र संभाजी राजे अशीच इतिहास ज्यांची नोंद घेतो.त्या स्वराज्याच्या छाव्याची राजकारणी,प्रशासक व साहित्यिक या अंगाने माहिती पाहणार आहोत.शिवाजी महाराज महान राजे होते याद शंकाच नाही. स्वराज्याचा छावा मांडताना इतिहासकार या मांडणीत सकारात्मक दिसत नाहीत. ही खेदाची बाब. स्वराज्याचा छावा राजकारण,प्रशासन एवढेच नाही तर एक उत्तम साहित्य लिहिणारे साहित्यिक,कवीमन लाभलेले कवी व ज्याना या हिंदवी स्वराज्याचा छावा म्हणून ओळखले जाते अशा संभाजी महाराजांच्या वरील उल्लेखित कार्याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
स्वराज्याचा छावा संभाजी राजांचे कार्य(toc)
राजकारण | Rajkarn
स्वराज्याचा छावा राजकारण करण्यामध्ये देखील मागे नव्हता.अतिशय कमी वयामध्ये राजकारण देखील त्यांनी अवगत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांची आग्रा कैदेतून सुटका करण्यामध्ये नऊ वर्षाच्या या स्वराज्याच्या छावा संभाजीचे योगदान अतिशय मोलाचे आहे. संभाजी राजे नऊ वर्षांचे असताना मोगल आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो पुरंदरचा तह झाला. या पुरंदराच्या तहामध्ये जामीन म्हणून संभाजी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैद केले त्यावेळी युवराज संभाजी देखील त्यांच्या सोबत होते फरक एवडाच त्यांची सोय वेगळ्या ठिकाणी होती.हजेरी देण्यासाठी संभाजी महाराजांना देखील आग्रा दरबारात जावे लागत असे. आग्र्याला जात असताना छत्रपती संभाजी म्हणजे स्वराज्याचा छावा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रस्त्यांनी हजेरीसाठी येत असे. यामागे हेतु हाच होता की राजांची आग्र्याहून सुटका करत असताना कोणत्या मार्गाने त्यांनी बाहेर पडावे ?याचा ते अभ्यास करत होते त्यातून त्यांची राजकारणी वृत्ती आपल्याला दिसते.
स्वराज्याचा कारभार करायचा तर निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्यांनी बरांपू वर छापा टाकला असे बरांपूर की जे शिवाजी राजांनी लुटलेल्या सुरतेपेक्षा कितीतरी श्रीमंत शहर होते.या लुटीतून संभाजी राजांना प्रचंड धन मिळाळे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमार बळकट करण्याला महत्त्व दिले तेच काम स्वराज्याचा छावा संभाजी यांनीकेले. राजकारण करत असताना केले त्याने अनेक किनाऱ्यावरील आपल्या तटबंदी पूर्ण केल्या. किनारी भागामध्ये जहाजबांधणी उद्योगाला बळकटी दिली हेतू हाच की भविष्य काळामध्ये परकीय आक्रमणे समुद्रमार्गे होऊ शकतात याची जाणीव त्याना होती. थोडक्यात जमिनीवरील युद्धनीती प्रमाणे पाण्यातील युद्धनीती यावर लक्ष दिले. जेणेकरून गोऱ्यांचा म्हणजे इंग्रजांचा धोका त्यांनी आधीच ओळखला होता राजकारणामध्ये संभाजी महाराजांबद्दल सांगायचे म्हणजे त्याच्या सरदारांनी बंड केले त्या सरदारांना कडक शासन करण्याचे काम त्यांनी केले यातून शिवपुत्र संभाजीची राजकारणी धुरीनता दिसून येते.पण इतिहासकार वेगळाच इतिहास मांडताना दिसत आहेत.
प्रशासन | Prashasan
स्वराज्याचा छावा संभाजी यांची प्रशासनावर देखील पकड होती. अगदी लहान वयामध्ये त्यांच्यावर आजी जिजाऊ यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या. १६७१ ते १६७४ या कालावधीमध्ये त्यांनी मुलकी प्रशासन प्रमुख म्हणून काम पाहिले. स्वराज्याचा छावा प्रशासन नीट पाहू शकतो याची जिजाऊ यांना खात्री होती म्हणून त्यांनी प्रशासनातील हळूहळू करत अनेक जबाबदाऱ्या संभाजी महाराजांवर टाकल्या.
स्वराज्याचा छावा असलेले संभाजी यांच्यावर दान प्रमुख म्हणजेच मंदिरे. गोरगरीब जनता वेगवेगळे समाज कार्यक्रम यांना किती दान द्यायचे याची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याकाळी दरबारात अनेक मंत्री असत त्यातील काही मंत्री आपापसात तक्रारी करत असत. या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी देखील संभाजी महाराजांवरच होती. संभाजी महाराजांचा धर्मशास्त्राचा अभ्यास प्रचंड होता त्यांचे वाचन प्रचंड असल्याने ज्ञान अगाध होते. बुद्धिमत्ता कुशाग्र होती म्हणून त्या काळामध्ये जे धर्म खटले चालत त्या धर्म खटल्यांमध्ये न्याय देण्याचे काम स्वराज्याचा छावा म्हणून ओळखले जाणारे संभाजी यांच्यावर होते.
संभाजीराजांनी प्रशासन पाहत असताना आपल्या प्रशासनामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी लोक शेतकरी लोक यांच्या दरबारात भेटी न घेता प्रत्यक्ष त्यांच्या वस्तीवर जाणे वाड्या-वस्त्यांवरती जाणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे यावर त्यांचा कटाक्ष होता. शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न सुटले की शेतकरी शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो यासाठी त्यांनी धरणे,नाले बांध बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि जातीने तो निधी कमी पडणार नाही म्हणून स्वराज्याच्या छाव्याने प्रशासक म्हणून चोख भूमिका बजावली.
राज्यकारभार करत असताना भ्रष्टाचारमुक्त कारभार यावर त्यांनी विशेष भर दिला. राजदरबारातील उच्च पदावर असणारे मंत्री ,पदाधिकारी यांना जे नजराणे किंवा भेटवस्तू येत होत्या त्या भेटवस्तू घेण्याला संभाजींचा विरोध होता. थोडक्यात त्यांच्या प्रशासनात सामान्य जनता व तिचे हीत यालाच महत्व दिलेले दिसते.बुधभूषण या आपल्या ग्रंथात त्यांनी प्रशासन कसे असावे? याविषयी खूप छान मांडणी केलेली आहे. शेतकऱ्यांपासून वारकऱ्यांचा पर्यंत सर्वांना निधी पुरवण्याचे काम प्रशासक किंवा प्रमुख म्हणून त्यांनी व्यवस्थित पजीले.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढे मांडला जातो तो पूर्वग्रहदूषित इतिहास आहे आणि अभ्यासकांनी खरा इतिहास समोर आणणे गरजेचे आहे. आणि तोच काही एक प्रामाणिक प्रयत्न संभाजी महाराज कसे उत्तम प्रशासन पाहणारे प्रशासक होते यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.
साहित्य | Sahitya
इतिहासकारांनी संभाजी हे एक उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट राजकारणी ,पराक्रमी राजा होते यासारख्या बाबी लपवून ठेवल्या, त्याचबरोबर त्यांची अजून एक ओळख होती म्हणजे ती म्हणजे ते राजा असून देखील उत्तम साहित्य लिहीत होते मात्र या साहित्यिक छाव्याची त्यांच्या साहित्यिकाची इतिहासकारांनी दखल घेतली नाही.संभाजीराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी ' बुधभूषण' या संस्कृत ग्रंथाचे लेखन केले. बुधभूषण या ग्रंथातून त्यांनी प्रशासन, युद्ध नीती कारभार या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. हा ग्रंथ श्लोक स्वरूपात व संस्कृत असून या ग्रंथामध्ये ८८३ श्लोक आहेत. या ग्रंथामध्ये वरील विषया सोबतच भोसले कुळाची संपन्नता त्यांनी वर्णन केली आहे. राजपुत्राने कसे वागावे? याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. थोडक्यात सर्वसंपन्न असा बुद्धभूषण हा ग्रंथ आहे .
संभाजी राजांनी जो सातसतक हा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ अध्यात्म यावर आधारित आहे. या ग्रंथातून त्यांनी संतांची महिमा आणि त्यांची भक्ती वर्णन केलेले आहे संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात याविषयी त्यांनी आपल्या ग्रंथातून भाष्य केलेले आहे.
नायिकाभेद या ग्रंथामध्ये त्यांनी पूर्वीच्या काळी शिव मंदिरामध्ये जी नृत्ये केली जात होते जेणेकरून भगवान भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा भक्ती म्हणून जी नृत्य त्यांचे विविध प्रकार केले जात याची माहिती सांगितली आहे. नृत्य सादर करताना नृत्याबरोबर चेहऱ्यावरील भाव किती महत्त्वाचे आहेत हे ते सांगतात. त्यातून त्यांची निरीक्षणशक्ती अभ्यास यांची प्रचिती येते.
नखशिका या ग्रंथात त्यांनी नखापासून शिक म्हणजे डोके. या पद्धतीने पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत . आतापर्यंत ज्या कवींनी स्त्रियांची वर्णने केली ती वर्णन करत असताना डोक्यापासून पायाकडे अशी मांडणी होती. संभाजी महाराजांनी पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत असे वर्णन केले यातून स्त्री शक्तीचा त्याना प्रचंड आदर होता हेच दिसते. मात्र इतिहासकारांनी त्यांच्यावर ती कायमच अन्याय करण्याचे काम केलेले आहे. आणि त्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास नीट करून त्याना अधिक जाणून घ्यायला हवे.या अशा अभ्यासातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू समोर येत जटिल. संभाजी महाराजांचे साहित्य वाचून संस्कृत पंडित गागाभट्ट भारावून गेले. त्यांनी आपल्या समयनय या ग्रंथात स्वराज्याचा छावा असलेल्या संभाजी स्तुति केली आहे व हा ग्रंथ त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेला अर्पण केला आहे. थोडक्यात काय संभाजी महाराज हे एक साहित्यिक देखील म्हणून ग्रेट होते हे नक्की.
आज पर्यंत आपल्या पुढे संभाजी महाराज म्हणजे व्यसनी,छंदी युवराज अशीच मांडणी इतिहासकारांनी केलेले दिसते;पण आजच्या लेखात स्वराज्याचा छावा यांचे प्रशासन राजकारण आणि साहित्य यावर प्रकाश टाकल्यानंतर असे लक्षात येते की संभाजी म्हणजे स्वराज्याचा छावा नव्हते तर स्वराज्याचा खरा रक्षक म्हणजे मुख्य आधारस्तंभ होते. पण त्यांना इतिहासकारांनी आकस भावनेतून किंवा अन्य कारणांमुळे कायम बदनाम केले संभाजी महाराजां विषयी सांगण्यासारखे भरपूर आहे पण आज मुख्यत्वे त्यांच्या तीनच बाबींवर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे.
वाचकांनी ,अभ्यासकांनी,इतिहासकारांनी संभाजी महाराजांवर अजून सखोल संशोधन करून दस्तऐवज मिळवून करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अवघ्या जगाला ओळख करून द्यावी.काही मोजके इतिहासकार अभ्यासक यासाठी-प्रचंड मेहनत घेत आहेत. तर आजच्या या लेखातील स्वराज्याचा छावा याचे प्रशासन राजकारण आणि साहित्य यांच्या माध्यमातून संभाजी महाराजांची एक प्रशासक म्हणून एक राजकारणी म्हणून आणि साहित्यिक म्हणून ओळख आपल्या सर्वानाच झालीय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.धन्यवाद!
Superb information
उत्तर द्याहटवा