Type Here to Get Search Results !

राजीव गांधी सद्भावना दिवस माहिती | rajiv gandhi sadbhavna divas mahiti

 राजीव गांधी सद्भावना दिवस माहिती | rajiv gandhi sadbhavna divas mahiti 

राजीव गांधी यांचा जन्मदिवस 20 ऑगस्ट हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो या त्यांच्या सद्भावनादिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत हा विकसित देशांच्या पंक्तीला जाऊन बसला पाहिजे असे स्वप्न पाहणारे राजीव गांधी या सद्भावना दिवशी त्यांना वंदन काँग्रेसच्या विविध कार्यालयांमध्ये या दिवशी त्यांच्या प्रतिमेला फुले अर्पण केले जातात आणि त्यांची आठवण म्हणून केक देखील कापले जातात सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारे असे राजीव गांधी व्यक्तिमत्त्व होते अतिशय तरुण आहेत त्यांचा दुर्दैवी निधन झाले होते आपल्या भारत देशासाठी अतिशय दोन महिन्याची बाब त्यांच्या नावाने दिला जाणार सद्भावना पुरस्कार 1992 सालापासून दिला जात आहे तो आज तागायत दिला जात आहे
 

           भारत हे  जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेले राष्ट्र आहे.लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकाद्वारे देशाची व्यवस्था अव्याहत सुरू असते. या व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतात ते पंतप्रधान आजच्या या विशेष लेखात आपण  तंत्रज्ञांनावर भर देणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत.राजीव गांधी यांचे बालपनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा सहवास त्यांना मिळाला. राजीव गांधी यांचे एकंदरीत योगदान पाहण्या अगोदर त्यांचा अगदी थोडक्यात जीवन परिचय पाहूया.



राजीव गांधी माहिती (toc) 

राजीव गांधी जीवन परिचय | Rajiv Gandhi Jivan Parichay 

                          राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई या ठिकाणी ज्यांना भारत देशाची आयर्न लेडी किंवा कोणताही निर्णय असो त्यावर ठाम राहणाऱ्या व  परिणामांची पर्वा न करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी होते. राजीव गांधी लहानपणापासूनच अतिशय शांत स्वभावाचे होते माजी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मुलांना कायम एका श्रीमंत घरातील मुले अशी वागणूक न देता कायम  त्यांच्या शिक्षणावर भर दिला. इंदिरा गांधी या राजकारणात सक्रिय असल्यामुळे आपल्या मुलांचे शिक्षण नीट व्हावे म्हणून त्यांनी राजीव गांधी यांचा प्रवेश देहरादून येथील एका प्रसिद्ध शाळेमध्ये घेतला. विशेष म्हणजे ते तिथे शिक्षण घेत आहेत तोपर्यंत त्यांची आई  भारत देशाची .पंतप्रधान आहे ते क्वचितच लोकांना माहीत होते हे विशेष.  भारतात आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव गांधी केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी इंजीनियरिंग ची डिग्री घेतली इंजिनिअरिंग करून उत्तम पायलेट बनावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ते पायलेट बनले देखील. 

                1980 साली  त्यांचे लहान बंधू संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि राजकारणामध्ये आई  इंदिरा गांधी  एकट्या पडल्या ; म्हणून त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि इंदिराजीना त्यांच्या कामामध्ये मदत करू लागळे. परंतु काही दिवसातच इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. या हत्येनंतर देशातील सर्वात मोठ्या काँग्रेस पक्षाची तसेच पंतप्रधानपदाची सर्व धुरा राजीव गांधी यांच्या हाती आली. अगदी सुरुवातीला राजकारणामध्ये यायला त्यांची पत्नी सोनिया गांधी यांनी देखील राजीव गांधी यांनी राजकारणात येऊ नये असाच पवित्रा घेतला होता परंतु इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात दंगली उसळल्या एक प्रकारची अनागोंदी निर्माण झाली आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या अनागोंदीतून देशात शांतता निर्माण करायची असेल तर राजीव गांधी यांनी तात्काळ पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत अशी मागणी केली आणि देशहिताचा विचार करून आपल्या आईची हत्या होऊन देखील भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा राजीव गांधी यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतरभारत देशातील सर्वात  तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.वयाच्या 40 व्या वर्षी ते भारत देशाचे पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आणि खूप मोठे यश काँग्रेस पक्षाला मिळवून दिले.त्यांनी माहिती-तंत्रज्ञान व विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान देणे त्यांनी आपल्या भारत देशासाठी किंवा एक पंतप्रधान म्हणून कोणते योगदान दिले ते आपण पुढे पाहूया. 

राजीव गांधी यांची महत्वाची कार्ये | Rajiv Gandhi Karye 

                              राजीव गांधी यांनी देशासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले परंतु आजच्या लेखामध्ये त्यांचे काही विशेष निर्णय की ज्यामुळे आज भारत देश एका वेगळ्या उंचीवर ती गेलेला आपल्याला दिसतो अशी काही त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे

1. सी-डॅक संस्थेची स्थापना | C DAC Chi Sthapna  

                                    तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाचे कार्य राजीव गांधी यांनी कोणते केले तर 1988 साली  पुणे येथे या संस्थेची स्थापना केली ही. ती स्थापना करण्याचे कारण म्हणजे अमेरिकेने संगणकाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केली होती आणि ते तंत्रज्ञान आपल्याला मिळावे यासाठी राजीव गांधी यांनी अमेरिकेला विनंती केली परंतु सुरक्षेचे कारण पुढे करत अमेरिकेने त्याला विरोध केला.उद्याचा भारत हा उज्वल भारत असला पाहिजे आणि तो उज्वल भारत निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आपल्याकडे हवे याची कल्पना राजीव गांधी यांना होती.अमेरिकेचा नकार त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी सी-डॅक संस्थेच्या माध्यमातून परम या सुपर संगणकाची किंवा महासंगणकाची निर्मिती केली.आज आपण सर्व भारतभर संगणक संगणक किंवा इंटरनेटच्या जाळी बघतोय राजीव गांधी यांची देण आहे. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली सी-डॅक या संस्थेने परम संगणकाची निर्मिती केली आणि माहिती तंत्रज्ञान मध्ये अवघ्या जगात एक वेगळा ठसा उमटवला परतही सर्व श्रेय राजीव गांधी यांना जाते. 

2. दूरसंचार क्षेत्रातील क्रांती | Dursanchaar Kshetratil Kranti 

               दूरसंचार म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश जाण्याचे माध्यम म्हणजेच टेलिफोन. राजीव गांधी यांच्या मते माहितीची देवाण घेवाण अतिशय वेगाने झालीत तेवढ्याच वेगाने देशाची प्रगती होते असते. यासाठी त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये माझ्या प्रत्येक भारतीयाच्या हातामध्ये टेलिफोन असेल असे एक आगळेवेगळे स्वप्न पाहिले होते त्यांच्या अपघाती निधनामुळे ते अपूर्ण राहिले परंतु आज आपल्याला या मोबाईलच्या माध्यमातून त्यांचे ते स्वप्न किंवा त्यांची दूरदृष्टी यातून लक्षात येते.राजीव गांधी यांच्या काळात दूरसंचार क्षेत्रात पीसीओ चे जाळे निर्माण झाले राजीव गांधी यांच्या संकल्पनेतूनच 1986साली एमटीएनएल या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून टेलिफोन गावागावाट पोहचू लागला माहितीची देवाण-घेवाण होऊ लागली. 

3.डिजिटल क्रांतीला सुरुवात | Digital Krantichi Suruvat  

                            आज आपण जी डिजिटल क्रांती म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिसणारी क्रांती पाहतोय ती क्रांती भारतात आणण्याचे काम पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले आहे. 

4. पंचायत राज | Panchayta Raj 

                  लोकशाहीचा फायदा हा अगदी खेडेगावात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे याच दृष्टिकोनातून राजीव गांधी यांनी पंचायत राज ही योजना मांडली ते पंतप्रधान असताना ती योजना पूर्णत्वासगेली नाही मात्र आज भारताच्या लोकशाही मध्ये ज्या काही सर्व सुखसोयी शहरामध्ये मिळत आहेत. त्या सुविधा पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावागावात देखील मिळत आहेत. थोडक्यात काय तर लोकशाही तळागाळापर्यंत नेण्याचे काम राजीव गांधी यांच्या पंचायत राज या योजनेने केले हे विशेष पंचायत राज मुळे लोक निवडणुका,सामाजिक कामे, गावाचा विकास सहाजिकच देशाचा विकास असा विचार कुठेतरी पुढे येऊ लागला. 

5. नवोदय विद्यालयांची स्थापना | Navoday  Vidyalyanchi Sthapna 

                         राजीव गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात देखील अनेक महत्वपूर्ण बदल घडवून आणले यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे खेड्यापाड्यातील हुशार विद्यार्थ्यांचा उपयोग राष्ट्राच्या विकासात कसा करून घेता येईल तर  त्यांना दर्जेदार शिक्षण दिल्याने ते कसे मिळेल या संकल्पनेतून त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवोदय विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून खेडेगावात शिकणारी बौद्धिक कुवत जास्त असणारे जी मुले होती त्यांना उच्च शिक्षण देण्याचे काम या नवोदय विद्यालय यांनी केले या नवोदय विद्यालय स्थापनेचे निर्णयातून शिक्षण आणि राष्ट्र विकास यांचा मेळ राजीव गांधी घालताना दिसतात. 

6. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण | Rashtriy Shaikshnik Dhoran 

                     1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल केले. ब्रिटिशांनी सुरू केलेली कारकुनी शिक्षण प्रणाली किती घातकआहे, हे ओळखून तिला छेद देण्यासाठी भारताचे असे मजबूत शैक्षणिक धोरण 1986 तयार झाले. त्यावेळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते.आज या शिक्षण क्षेत्रात आपण जे चांगले बदल पाहत आहोत हे सर्व बदल 1986 च्या शैक्षणिक धोरणामुळे आहेत हे विसरून चालणार नाही.

7. संशोधनाला चालना | Sanshodhnaala Chalana 

                          राजीव गांधी यांच्या मते देश जेवढी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती करेल तेवढे त्या राष्ट्राचे जागतिक पटलावर स्थान निर्माण होते. त्यासाठी त्यांनी परम संगणकाची निर्मिती केली हे आपण पाहिलेच त्याच बरोबर नवनवीन संशोधने देशाच्या विकासासाठी ठरतील यासाठी त्यांनी संशोधनाला चालना दिली अनेक ठिकाणी संशोधन केंद्रे उभी केली आणि या केंद्रांच्या माध्यमातून नवनवीन शोध लागत गेले आणि याचाच फायदा आपल्याला आपल्या देशाच्या विकासासाठी होत गेला. 

राजीव गांधी यांचा अपघाती मृत्यू | Gandhi Mrutyu 

                          आपल्या आईच्या निधनानंतर भारत देशासाठी मला काहीतरी करायचे आहे. या प्रेरणेने भारतीय  राजकारणात आलेल्या राजीव गांधी यांचा एका बॉम्ब दुर्घटनेत मृत्यू झाला तामिळनाडू राज्यात प्रचार सभेसाठी एका ठिकाणी ते गेले असताना एका महिलेने राजीव गांधी यांना भेटण्याची विनंती केली.सुरुवातीला राजीव गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या महिलेला विरोध केला परंतु राजीव गांधी यांच्या सांगण्यानुसार या महिलेला राजीव गांधी यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली परंतु ती महिला लिट्टे या दहशतवादी संघटनेची सदस्य होती ती महिला राजीव गांधींच्या जवळ येताच मोठा स्फोट झाला आणि या मानवी बॉम्बने देशात नवे काही तरी करू पाहणारा एक तरुण पंतप्रधान 21 मे 1991 रोजी गमावला ही खेदाची बाब. 

               इंदिरा गांधी यांच्या  मृत्यूनंतर अपघाताने का होईना अगदी तरुण वयात पंतप्रधान पुण्याची संधी  राजीव गांधी यांना मिळाली परंतु असे असले तरी तो घराणेशाहीचा लवलेश राजीव गांधी यांच्या मध्ये नव्हता आपले कार्य हीच ओळख या सूत्रानुसार त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये काम पाहिले उद्याचा भारत हा माहिती तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर असला पाहिजे त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यांचे हे स्वप्न साकार होताना दिसत आहे कदाचित त्यांनी ते स्वप्न पाहिले नसते विज्ञान-तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची आजची प्रगती दिसत आहे तेवढी प्रगती दिसली नसती हे नक्की

    आजच्या लेखातून राजीव गांधी सद्भावना दिवसाच्या निमित्ताने विज्ञान व तंत्रज्ञानावर भर देणारे पंतप्रधान राजीव गांधी यांची माहिती त्या जोडीला त्यांची इतर कार्ये देखील पहिली.आपण पाहिळे की  त्यांनी प्रत्येक घरात फोन हे पाहिलेले स्वप्न आज प्रत्येक घरात नवे तर घरातल्या प्रत्येकाकडे फोन.असे सर्व चित्र दिसत आहे.अश्या दूरदृष्टी असलेल्या महान व्यक्तिमत्त्वाचा इथल्या विघातक वृत्तीने घात घेतला हीच खेदाची बाब.राजीव गांधी यांना अजून जर भारत भूमी ची सेवा करण्याची संधी मिळाली असती  तर कदाचित आज आपला भारत आर्थिक महासत्ता नक्कीच बनला असता.चला तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद!

आमचे हे लेख जरूर वाचा 

काटकसर करून करोडपती बनता येते 


माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या


@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा 


    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area