जुलै च्या वेतन वाढीनुसार किती होणार वाढ increment nantar pagarat kiti hoil vadh
पगार वाढ म्हटले की कर्मचाऱ्यांना एक वेगळीच उत्सुकता असते .समजा अमुक टक्क्यांनी माझा महागाई भत्ता वाढला तर आपल्या पगारात नेमकी कितीने वाढ झाली? किंवा होईल. याची आपल्याला पगार वाढ होण्याआधी नेमकी किती वाढ होणार ? याची फार उत्सुकता असते.
आता जुलै महिन्यात आपल्याला इन्क्रीमेंट लागणार ? मग आपला पगार किती रुपयांनी वाढणार? याची तुम्हाला देखील उत्सुकता असेल.पण नेमकी ती वाढ कितीने होणार?हे आपल्याला त्या महिन्याची सॅलरी स्लिप आल्यावर समजत असते. आपली ही महिनाभर उत्सुकता ताणून न धरता ,आपला पगार नेमका कितीने वाढणार ज्ञानयोगी व्यासपीठ काम करीत आहे आपली पगार वाढ किती होणार हे कळण्यासाठी अनेक आकडेमोड करून ती पगार काढावी लागते.लिपिक लोकांना ते Calculation माहीत असते .काही Softwere देखील असतात.असो आपला पगार 1 जुलैला किती वाढणार?हा आपला आजचा उत्सुकतेचा विषय आहे.
जर 1 जुलै चा पगार नव्या दराने महागाई भत्ता ऍड होऊन 1 जुलै चा पगार किती असेल यापुढे जाऊन जर वरिष्ठ वेतनश्रेणी लागल्यावर माझ्या पगारात कितीने वाढ होईल? अशी पगार येण्याआधी सर्व माहिती ती ही अचूक काढणे मोठे दिव्य आहे . हे काम अतिशय किचकट आहे. खूप माहिती संकलित करून एकत्रित करण्याचे काम व अचूक पगारवाढ किती हे सांगण्याचे काम आमचे B.Ed चे अतिशय हुशार व्यक्तिमत्व ,आमचे परम मित्र श्री संदीप सदगीर सर दरवर्षी करतात. ते सध्या मनपा माध्यमिक शिक्षक म्हणून मनपा शिक्षण विभागात कार्यरत आहेत.त्यांनी अतिशय मेहनतीने 2008 पासून त्यांनतर मनपा मध्ये माध्यमिक विभागात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बांधव व भगिनी यांचा नेमका किती पगार वाढेल?याची माहिती अगदी अचूक उपलब्ध करून दिली आहे. म्हणून त्यांचे आभार!
आपल्याला खर्चाचे योग्य नियोजन,किंवा आर्थिक नियोजन करता यावे? भविष्यात आर्थिक घडामोडी कश्या असाव्यात याचा काही एक नियोजन करता यावे म्हणून आपणास आगाऊ स्वरूपात माहिती उपलब्ध करून देत आहोत.
सर्व डिटेल पाहण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा.
दहावीचा निकाल बोर्डाकडून कधी वाटप क्लिक करा