Type Here to Get Search Results !

11 प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 2 कसा भरावा व त्यासाठी करावयाची पूर्वतयारी | 11th admission 2022 part 2 fill up guidence

 11 प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 2 कसा भरावा व त्यासाठी करावयाची पूर्वतयारी 11 Admission Procedure 2023 24 How to Fill Part 2 and Prerequisites

 आज आपण  11 प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 2 कसा भरावा याविषयी प्राथमिक माहिती घेणार आहोत. तसेच तो भरण्यासाठी कोणती पूर्व तयारी करावी याची देखील माहिती पाहणार आहोत. अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 - 24 ला सुरुवात झाली असून 25 मे2023 पासून ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे. 25 मे2023 पासून विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या संकेत स्थळावर म्हणजेच websit वर जाऊन स्टुडन्ट आयडी आणि पासवर्ड मिळवत आहेत. व त्यानंतर त्यांना  लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाग एक 11 th admission part 1  देखील भरत आहेत. 


💥दहावीनंतर इंजिनियरिंग डिप्लोमा कोर्स 2023 24 साठी ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात  👈


आपण भाग 1 मध्ये आपली  प्राथमिक माहिती व आरक्षण तपशील देखील भरलेला आहे ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरल्यानंतर आता विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग-2 भरण्याआधी तो कसा भरायचा आहे व तो भरण्या आधी कोणती तयारी करून ठेवणे गरजेचे आहे? किंवा भाग दोन मध्ये आपल्याला कोणते काम करायचे आहे ?याची माहिती असणे अतिशय गरजेचे आहे.ऐनवेळी गडबड होऊ नये. 

11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 कसा भरावा
11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 कसा भरावा

अकरावी प्रवेश भाग 2(toc) 


अकरावी प्रवेश 2023 24 अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल | 11 vi pravesh bhag 2 kdhi bhraycha aahe. 

      दहावीचा निकाल लागल्यानंतर  अगदी  एक ते 2 दिवसांमध्येच 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 म्हणजेच पसंती क्रम भरण्याची तारीख अगदी काही दिवसात 11 प्रवेशाच्या website वर कळवली जाईल. त्यानंतर भाग  भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु तरी देखील काही एक तयारी आपण आधीपासूनच करून ठेवा. जर आपण अकरावी रजिस्ट्रेशन आणि भाग एक भरला नसेल तर अगोदर हे काम करून घ्या. 


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 2 भरताना कॉलेज कसे निवडावे vedeo 👈


अकरावी प्रवेश 2023 24 रजिस्ट्रेशन कसे करावे 11th Admission 2023 24 How to Register

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी जर आपण रजिस्ट्रेशन अजून केलेले नसेल  तर आपल्याला सर्वप्रथम अकरावी प्रवेशासाठी जे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे. त्या संकेतस्थळावरती आपल्याला जावे लागेल आणि त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपला विभाग सिलेक्ट करून त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अकरावीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी या अगोदरच मी एका स्वतंत्र लेखांमध्ये अतिशय सविस्तर अशी माहिती  तसेच विडियो बनवला आहे. जर आपण अकरा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले नसेल तर खालील लिंक वरती करून क्लिक करून आपले अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे रजिस्ट्रेशन करून घ्या.


💥अकरावी ऑनलाइन 2023 24  प्रवेश रजिस्ट्रेशन 2023 24 असे करावे   👈


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24  भाग 1 कसा भरावा तो भरण्याची प्रक्रिया 11th Online Admission 2023 24 Part 1 Filling Procedure

आपण अकरावी प्रवेशासाठी वर सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो. तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला अकरावीच्या अधिकृत संकेतस्थळावर डाव्या बाजूला भाग एक भरण्याबाबत टॅब दिसून येईल त्या टॅब वरती क्लिक करून आपली प्राथमिक माहिती त्या ठिकाणी संपूर्ण भरावयाचे आहे. त्याची माहिती देखील आपण सविस्तरपणे या आधीच्या लेखांमध्ये पाहिलेले आहे. या अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 चा भरण्याची प्रक्रिया पाण्यासाठी आपण या अगोदरचा आमचा लेख सविस्तरपणे वाचा आणि आपला भाग एक देखील भरून घ्या.


अकरावी ऑनलाइन 2023 24 प्रवेश भाग एक /part 1  प्रक्रिया 👈


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 आपला फॉर्म लॉक करा 11th Online Admission 2023 24 Lock your form

अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग 2 ला सुरुवात होण्याआधी विद्यार्थ्यांनी आपण जो भाग 1  भरलेला आहे. त्यातील सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरलेली आहे की नाही ते पहा.  आपली प्राथमिक माहिती तसेच आरक्षणासंदर्भात माहिती हमीपत्र संदर्भात माहिती व्यवस्थितरित्या भरून आपला फॉर्म lock  करायचा आहे कारण आपला फॉर्म लॉक केल्याशिवाय आपल्याला भाग 2  भरता येत नाही. तसेच आपला फॉर्म शाळेकडून veryfy  झाला आहे की नाही याची देखील माहिती आपण मिळवायचे आहे अकरावी प्रवेशाचा भाग दोन करण्यासाठी पूर्वी ही आपल्याला आपला फॉर्म लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈 


11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 मध्ये नेमके काय करायचे असते  | 11 vi pravesh part 2 madhye kaay karyache aste अकरावी प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्यापूर्वी ही पूर्वतयारी करा 

  अकरावी प्रवेश part 1 मध्ये तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशन केले आणि तुमची प्राथमिक माहिती भरून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवलेला आहे आता तुम्हाला भाग दोन मध्ये ऑप्शन फॉर्म म्हणजेच पसंती क्रमांक भरायचा आहे.


पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होण्या आधी हे करा ? | bhag 2 bhrnyapurvi he kara 

  11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 11 th admission  part 1  मध्ये दिली जाणारी माहिती ही तुमची व्यक्तिगत माहिती,फोन,इ मेल ,आरक्षण आणि तुमचे दहावीचा बैठक क्रमांक याबाबत होती, परंतु आपल्याला कोणते विद्यालय भेटणार? आणि आपण कोणत्या विद्यालयासाठी ऑप्शन फॉर्म भरला आहे? ही सर्व महत्त्वाची प्रक्रिया भाग 2 मध्येच करावयाची आहे  त्यासाठी काही बाबी अगोदरच निश्चित करून घ्यायला हव्यात. 


💥अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्या बाबत शिक्षण संचलनालयाने दिलेले नवीन आदेश 👈


1.अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग-2 भरत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या STREAM म्हणजे शाखेमध्ये जायचे आहे हे आधीच ठरवून घ्या. 

जसे की आर्ट

 कॉमर्स

 सायन्स

 एच एस वी सी. यापैकी काय घेणार ते ठरवा. 


2.अध्ययनाचे माध्यम | MIDIUM

    आपल्याला कोणत्या शाखेमध्ये जायचे आहे?हे निश्चित झाल्यानंतर आपल्याला कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे आहे? जसे की मराठी, गुजराती, इंग्रजी, उर्दू की हिंदी हे confirm करा.


💥पुणे विद्यापीठाचे आजच निवड झालेले कुलगुरू डॉ. सुरेश शिंदे यांची माहिती 👈


3. शाखा व माध्यम यांचा मेळ 

      आपण ज्या शाखेतून शिक्षण घेणार आहोत?त्या  शाखेमध्ये कोणकोणत्या माध्यमातून आपल्या शहरांमध्ये विद्यालय उपलब्ध आहेत ?किंवा शिकण्याची संधी उपलब्ध आहे यांचा देखील अभ्यास करा. ऐनवेळी या चुका झाल्यास खूप मोठे नुकसान होऊ शकते. 

उदाहरणार्थ 

       तुम्हाला जर विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल आणि तुम्ही जर मराठी माध्यम निवडणार असाल तर ही शक्यता खूप कमी आहे. किंवा नाही म्हटले तरी चालेल अशा बाबी आदीच CLEAR करून घ्या. 

      थोडक्यात काय तर प्रवेश घेण्यापूर्वी आपण आर्ट, कॉमर्स,सायन्स यापैकी कोणती शाखा निवडणार आहोत ?आणि कोणत्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहे? आणि त्या माध्यमाची कॉलेजेस उपलब्ध आहेत का नाहीत ?  याची माहिती गोळा करायला सुरुवात करा. अन्यथा ऐन वेळी महाविद्यालयांची यादी उपलब्ध होईल. परंतु ते माध्यम/MEDIUM त्या विद्यालयात नसेल तुमच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. या शक्यता कमी असल्या तरी नाकारता नककीच येणार नाहीत. 


3. आपल्याला मिळालेली टक्केवारी आणि संबंधित महाविद्यालयाचे कट ऑफ | college cut off 

     अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग-2 भरण्यापू र्वी इयत्ता दहावी मध्ये आपल्याला किती टक्के आहेत? आणि  X या अमुक एका महाविद्यालयात गेल्यावर्षी 2022 23 साठी  किती टक्केपर्यंत च्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे? याचा अंदाज घ्या.आपल्याला टक्केवारी कमी असेल आणि आपण जर नामांकित विद्यालयाचे पसंतीक्रम दिले तर त्या विद्यालयात आपला नंबर लागणार नाही याची कल्पना असू द्या मुदा हा की सगळ्या बाबी विचारत घेऊन भाग 2 भरा. कारण11 11 th part two हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. थोडक्यात काय तर आपले गुण आणि गेल्या वर्षीची त्या विद्यालयायात किती टक्के गुण मिळणाऱ्या  विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला आहे याचा देखील थोडाफार अंदाज घ्या.


💥पुस्तकातील वहीच्या पानांचा उपयोग कसा करावा शासनाच्या सूचना 👈


कॉलेज चे गेल्या वर्षीचे /2022 23 चे merit कट ऑफ कसे पहावे How to check last year merit cut off of college

1. सर्वप्रथम अकरावी प्रवेश संकेत स्थळाला भेट द्या. 

2. संकेत स्थळाला  भेट दिल्यावर आपला विभाग निवडा 

3. विभाग निवडल्यावर log in न करता आपल्या स्क्रीन च्या डाव्या बाजूला गेल्या वर्षी लागलेले तसेच यावर्षीच्या पहिला  राऊंड आणि त्याचे cut ऑफ दिलेले आहेत यावर क्लिक करा 


अकरावी प्रवेश 2023 24 साठी कट ऑफ कसे पहावे यासाठी खालील vedeo पहा. 



अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी 2022 23 पहिल्या यादीचे कट ऑफ 


1. मुंबई विभाग कट ऑफ 2022 23 

यावर्षी कॉलेज निवडत असताना अर्थात आपला ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण गेल्या वर्षीचे पहिल्या यादीचे कट ऑफ खालील एक्सेल file मध्ये पाहू शकता. कॉलेज निवडण्या आधी जरूर कट ऑफ पहा. 


अकरावी प्रवेश मुंबई विभाग 2022 23 चे पहिल्या फेरीचे कट ऑफ DOWNLAOD 


2. पुणे विभाग 2022 23 चे कट ऑफ लिस्ट DOWNLOAD


3. नागपूर विभाग 2022 23 कट ऑफ लिस्ट  DOWNLOAD


4. नाशिक विभाग 2022 23 कट ऑफ लिस्ट   DOWNLOAD


5. अमरावती विभाग 2022 23 कट ऑफ लिस्ट  DOWNLOD




4. विद्यालयाचा प्रकार व फी  |  COLLEG type and college fee 

         इयत्ता 11 वीला आपण ज्या विद्यालयात प्रवेश घेणार आहात.ते विद्यालय अनुदानित आहे की विनाअनुदानित,aided आहे की unaided  याच्या नोंदी घ्या. जर ते विद्यालय अनुदानित असेल तर आपल्याला खूप कमी फी भरावी लागेल. आणि जर ते विनाअनुदानित असेल तर आपल्याला थोडी जास्त फी भरावी लागेल. याची कल्पना असू द्या.आपल्याला येण्या-जाण्यासाठी सोयीचे आहे एवढाच विचार न करता त्या विद्यालयाची फी याचादेखील विचार 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 भरताना आवर्जून  करा. 


5 महाविद्यालयांची यादी व कोड | colleges list and cod 

    अकरावी प्रवेशासाठी तुम्ही जी दहा विद्यालय निवडणार आहात त्या विद्यालयाची यादी व  त्याचे कोड कागदावर जवळ ठेवा आणि फॉर्म भरतेवेळी ते व्यवस्थित भरा. काही मुले सरसकट क्लिक करतात ही चूक करू नका. मला हे सांगायचे आहे की 11 वी प्रवेश भाग 2 जबाबदारीने भरा. 


6. पसंतीक्रम देताना ही खबरदारी घ्या | option form bhrtana ,fill krtana kalji ghya 

             महाविद्यालयाचा पसंतीक्रम देत असताना तुम्हाला ज्या महाविद्यालयाला प्रथम प्राधान्य द्यायचे आहे त्याचं महाविद्यालयाच्या नावापुढे पहिल्यांदा टिक करा व त्यानंतर दुसरा प्राधान्य असेल त्याला दुसऱ्यादा  क्लिक करा. प्राधान्यक्रम एक ते दहा कागदावर तयार ठेवा. प्रवेश फॉर्म भाग-2 भरत असताना त्याच पद्धतीने पसंतीक्रम टाका. बरेच विद्यार्थी 10 महाविद्यालय निवडतात आणि पसंतीक्रम देत असताना सरसकट सिलेक्ट करू नकोस  करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळी यादी जाहीर होते त्यावेळी जास्त गुण असून देखील चांगले विद्यालय मिळाले नाही, म्हणून तक्रार करत असतात ही सर्व चूक पसंतीक्रम भरत असताना केलेल्या दुर्लक्षपणामुळे झालेली असते हे लक्षात घ्या.


💥अकरावी प्रवेश भाग 2 कसा भरावा live डेमो 👈


अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग 2 भरण्याची प्रक्रिया 2023  process of 11th part 2 fill  

         11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही साधारणपणे खालील प्रमाणे असू शकते यात  थोडेफार बदल होऊ शकतात. काही बदल असल्यास यथावकाश आपल्याला कळवले जाईल तसा अपडेट दिला जाईल.ही संभाव्य पद्धती आहे हे लक्षात घ्या 


1. संकेत स्थळाला भेट 

अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती जावे लागेल. https://11thadmission.org.in/ 


2.आपला region विभाग निवडा 

 वरील अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला डिव्हिजन/region  म्हणजेच विभाग सिलेक्ट करावे लागेल. 

उदाहरणार्थ. मुंबई

💢अकरावी प्रवेश माहिती पुस्तिका  👈

3. लॉगिन करणे  

    अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग 1 भरत असताना तुम्हाला जो स्टुडन्ट आयडी मिळाला आहे तो टाकून लॉगिन करायचे आहे. आणि त्यानंतर आपला पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 तुम्हाला डॅशबोर्ड वरती दिसेल.


अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


4.सिलेक्ट स्ट्रीम  SELECT STREAM 

          11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 साठी तुम्ही लॉग इन झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल?कि तुम्हाला कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. याविषयी विस्तृत विवेचन वरती आलेलेच आहे तर तुम्हाला ज्या शाखेमध्ये जायचे आहे ते शाखेवर ती क्लिक करायचे आहे. 

-Arts

-Commerce

-Science

Hsvc 

       यापैकी तुम्ही ज्या शाखेला प्रवेश घेऊ इच्छितात त्यावर ती क्लिक करायचे आहे.


💥अकरावी प्रवेश वेळापत्रक  कोणत्या तारखेला काय होणार माहिती 👈


5. सिलेक्ट मिडीयम SELECT MIDIUM 

शाखा निवडल्यानंतर कोणत्या माध्यमातून तुम्हाला शिकायचे आहे याची निवड करायचे आहे.

- MARATHI

-HINDI

-ENGLISH

-GUJRATI

-URDU

 यापैकी एका माध्यमावर तीत्वी क्लिक करायचे आहे. माध्यम केल्यानंतर SAVEAND NEXT या वरती करायचे आहे. 


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश आपण भाग 2 भरल्या नंतर आपल्याला कोणते कॉलेज भेटले ते असे चेक करतात डेमो 👈


6. महाविद्यालयाच्या निवडीसाठी सर्च बार college selection search baar 

     आपल्याला महाविद्यालय फटकन निवडता यावीत? यासाठी website वर एक अप्रतिम SEARCH BAR दिलेला आहे. या सर्च  बारमधील पर्याय सिलेक्ट करून,option select  तुम्ही महाविद्यालय निवडू शकता जसे की............

शाखा Straem

मिडीयम MIDIUM 

स्टेटस STATUS 

कॉलेज प्रकार  TYPE 

एरिया ,क्षेत्र ,ठिकाण AREA


     जर तुम्ही सर्च बार मध्ये कांदिवली एरिया टाकला आणि कॉलेज टाईप मध्ये अनुदानित असा शब्द टाकताच कांदिवली मध्ये जेवढे महाविद्यालय अनुदानित आहेत व जे  तुम्ही टाकलेले मिडीयम आहे यावरून तो सर्च बार कांदिवली परिसरातील केवळ अनुदानित महाविद्यालय आपल्याला दाखवेल. 

     थोडक्यात काय तर ही प्रवेश प्रक्रिया अधिकाधिक सोपी करून देण्याचा प्रयत्न  शासनामार्फत केला जात आहे किंवा केंद्रीय प्रवेश यंत्रणे मार्फत केला जात आहे याबबत स्वत संचालक पालकर साहेब जातीने लक्ष देत आहेत. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना वरील सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. 


    11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 भरण्यापूर्वी या बाबी समजून घ्या  

 1. सर्वप्रथम आपली शाखा विचारपूर्वक निवडा. STREAM SELECT

 2. शाखा निवडल्यानंतर शिक्षणाचे माध्यम निवडा. MIDIUM

3. आपले गुण आणि महाविद्यालय चे कट ऑफ डोक्यात असू द्या COLLEGE CUT OFF

 4. प्राधान्यक्रम भरताना अनुदानित महाविद्यालय शक्यतो पहिल्यांदा आणि विनाअनुदानित असा प्रेम ठेवा. COLLEGE TYPE

5. केवळ जाण्यायेण्याची सोय एवढाच मुद्दा लक्षात न घेता प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयाची गुणवत्ता काय आहे याचादेखील विचार करा COLLEGE QUALITY DECIPLIN


    थोडक्यात काय तर दहावीला चांगले गुण मिळालेले आहेत आनंद देखील साजरा झाला आहे. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग 2च्या  तयारीला मनापासून  लागा. 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग भाग-2 भरण्यापूर्वीच इंटरनेटवरून आपापल्या एरियातील विद्यालयांची माहिती मिळवायला सुरुवात करा. तुमचे मोठे ताई-दादा असतील त्यांच्या भेटी घ्या.कॉलेज त्याची  शिस्त यांचादेखील विचार करा.  चांगल्या महाविद्यालयांमध्ये अकरावीचा प्रवेश घ्या. प्रवेश प्रक्रिया सुरू होताच स्वातंत्र्य  लेखाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक सखोल मार्गदर्शन केले जाईलच. परंतु भाग 2  मध्ये नेमके काय असेल? कोणती खबरदारी घ्यावी लागेल ?  याची जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. भविष्यातील संभाव्य चुका टाळण्यासाठी आपले मित्र, मैत्रिणी यांच्यापर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवा.मी शिक्षकांना ही विनंती करतो की त्यांनी ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया भाग 2 या कामांमध्ये सहकार्य करावे. ही विनंती पुन्हा भेटूया एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद!


आमचे हे लेख वाचा 

दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावी ? 

दहावी उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि झेरॉक्स कशी मिळवावी याबाबत माहिती 

अकरावी प्रवेश 2023 24 साठी झालेले महत्त्वाचे बदल 

अकरावी ऑनलाइन प्रवेश घेताना कोणती कागदपत्रे लागतात 

दहावी नंतर पुढे  शिक्षणाच्या संधी  

दहावी नंतर लगेच नोकरीसाठी हे कोर्स करा 







टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area