Type Here to Get Search Results !

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पुनर्रचित सेतु अभ्यासक्रमाची शालेय स्तरावर करावी लागणार अंमलबजावणी | Shaikshnik Varsh 2022 - 23 Punrrchit Setu Abhyaskrmachi Amlbajavni

 

शैक्षणिक वर्ष 2022-23  मध्ये पुनर्रचित सेतु अभ्यासक्रमाची शालेय स्तरावर करावी लागणार अंमलबजावणी | Shaikshnik Varsh 2022 - 23 Punrrchit Setu Abhyaskrmachi Amlbajavni 

                आजच्या या सेतू अभ्यासक्रमा वरील लेखामध्ये आज आपण 2022-23 मध्ये  इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सेतु  पुनर्रचित अभ्यासक्रम राबवावाव लागणार आहे. त्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेमार्फत तसे परिपत्रक देखील काढण्यात आलेले आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी  कशी करायची? हे पाहण्या अगोदर सेतू अभ्यासक्रम संकल्पना शालेय शिक्षणामध्ये का आणली गेली? त्या विषयी माहिती बघूया. पण त्याआधी सेतु अभ्यासक्रम संकल्पना समजून घेऊया.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पुनर्रचित सेतु अभ्यासक्रमाची शालेय स्तरावर करावी लागणार अंमलबजावणी
सेतू अभ्यासक्रम 2022 -23


 
सेतू अभ्यासक्रम संपूर्ण माहिती(toc)         

सेतू अभ्यासक्रम संकल्पना |Concept Of Setu Abhyas,Setu Abhyas Sanklpnaa 

                    सेततू अभ्यासक्रम म्हणजे काय? हे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ,काही कारणास्तव बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या  मागील इयत्तेतील अध्ययन किंवा काही कौशल्य ,क्षमता विकसित झालेल्या नाहीत असे निदर्शनास आल्यानंतर त्या विकसित करण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अगदी जून महिन्यामध्येच विद्यार्थ्याच्या या अध्ययनातील कमतरता दूर होऊन चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याला अध्ययनासाठी तयार करणे व त्यासाठी खास संशोधन करून तयार केलेला अभ्यासक्रम म्हणजे सेतु अभ्यास होय.  इतकी सोपी संकल्पना सेतू अभ्यासक्रमाची आहे. 

         विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात अध्यापन करण्यापूर्वी मागील इयत्तमधील कोणत्या क्षमता त्याने विकसित केल्या आहेत ? व कोणत्या बाकी आहेत हे पूर्वचाचणी घेऊन तपासणी करणे आणि काही विक्षिषट दिवसात मार्गदर्शन करून त्यामध्ये त्या क्षमता विकसित करून चालू शैक्षणिक वर्षातील अध्ययन घेण्यासाठी त्याला सक्षम बनवणे म्हणजे सेतु अभ्यासक्रम होय.

         आता आपल्या ध्यानात आले असेल की सेतु अभ्यासक्रम म्हणजे काय तर एक प्रकारचे उपचारात्मक अध्यापन आहे की ज्यातून विद्यार्थ्याला त्याचा चालू इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यासाठीचा एक प्रभावी उपक्रम म्हणजे सेतु अभ्यास होय.गेल्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये सेतु अभ्यास राबवून या वर्षी पुनर्रचित अभ्यासक्रम राबवण्याची गरज का पडली यावर एक नजर टाकुया............ 

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम राबवण्याची गरज | Punarrchit Setu Abhyaskram Garaj 

            कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना म्हणावे तसे दर्जेदार शिक्षण मिळालेले नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत.जसे की विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहून न शिकणे,ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असणे, दुर्गम भागात नेटवर्क सारख्या समस्या,स्थलांतर होणे,कमी कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणे,विद्यार्थ्यां आणि  शिक्षकांचा प्रत्यक्ष संबंध न येणे, अध्ययन अध्यापनात आंतरक्रिया न होणे अशा अनेक कारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया म्हणावी तशी प्रभावीपणे काम करताना दिसत नाही. म्हणूनच शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.अध्ययनात तो ज्या घटकांमध्ये मागे पडलेला आहे त्या घटकाचे  ज्ञान त्याला देऊन चालू इयत्तेत  त्याच्यामध्ये प्रगती करून घ्यावी यासाठी सेतु अभ्यासक्रम सन 2021-22  मध्ये देखील राबवला गेला. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे त्याची म्हणावी तशी प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही म्हणूनचन काही एका संशोधनाअंती महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने यावर उपाय म्हणून यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष2022-23 मध्ये पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात केले आहे. यावर्षी सेतु पुनर्रचित अभ्यासक्रमाची गरज काय ? याची वरील कारनाबरोबरच  अजून देखील काही कारणे आहेत. हे आपल्या लक्षात आले तरच आपण त्याची अंमलबजावणी मनापासून करू शकतो. 

1. शिक्षणाच्या गुणवत्तेत झालेली घसरण | Shikshnachya Gunvttet Ghasran 

                    विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या झालेल्या मूल्यमापनावरून,विविध सर्वे मधून प्राप्त माहितीवरून असे लक्षात आलेआहे की  विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कोररोना काळामध्ये घसरण झालेली आहे. आणि ती घसरण भरून काढण्यासाठी यावर्षीदेखील पुनर्रचित सेतु अभ्यासक्रम शैक्षणिक 2022-23 च्या अगदी सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे.

2. पायाभूत ज्ञान Paayabhut Dnyan 

                   कोरोना काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अनेक अडथळेआळे. यामुळे विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तेनुसार जी कौशल्ये व क्षमता त्यांच्यामध्ये विकसित व्हायला हव्या होत्या त्या  विकसित झालेल्या दिसत नाहीत. नवीन शैक्षणिक वर्षात लगेचच अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली तर विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान नसल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होईल. शिक्षणामध्ये त्यांना रुची वाटणार नाही. म्हणूनच त्याच्या इयत्तांचे आणि विषयांचे ढोबळमानाने पायाभूत ज्ञान त्यांना मिळावे यासाठी सेतु अभ्यासक्रम गरजेचा आहे. यामुळे ते अध्ययनासाठी तयार व्हायला देखील मदत होईल. 

3. इयत्ता निहाय आणि विषय निहाय क्षमता | Iytta Aani Vishynihay Kshmtaa 

                                 गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावात जरी शाळा बंद पण शिक्षण सुरूअसा जरी शासनाने कौतुकास्पद उपक्रम हाती घेऊन मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचा यक्ष प्रयत्न केला होता. मात्र असे असळे तरी कुठे तरी त्याची अंमलबजावणी करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा, गणित, समाजशास्त्र या  विषयामध्ये त्या त्या इयततेनुरूप व  विषयानुरूप क्षमता विकसित झालेल्या दिसत नाहीत. मग यावर पर्याय काय तर अगदी सुरुवातीला शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना सुरुवातीच्या काही  दिवसांमध्ये त्या मागील इयत्तेतील विषयातील  क्षमता विकसित करण्यासाठी सेतु अभ्यासक्रम तयार करण्यात आला यावरून सेतु अभ्यास  का आला आहे हे शिक्षक मित्रांना महित असणे जास्त गरजेचे आहे.  

4. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 ची शिफारस | Rashtriy Sampadnuk 2021Chi Shifars 

                         राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021मध्ये असे लक्षात आले की भाषा, गणित,विज्ञान तसेच समाजशास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी ही  खूपच कमी आहे.संपादणूक पातळी कमी असणे याचा अर्थ आपण जे विद्यार्थाना देतोय ते त्यांच्यापर्यंत नीट पोहचलेले नाही म्हणूनच यात सुधारणा करण्यासाठी एक प्रभावी उपाय काय? तर  विद्यार्थ्यांना असे अतिरिक्त मार्गदर्शन करून   त्यांच्या संपादन पातळीत वाढ करणे. यासाठी सेतु अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये देखील पुनर्रचित स्वरूपात सेतु अभ्यास राबवला जात आहे.  

5. शैक्षणिक वर्ष 2021-22  पूर्ण क्षमतेने शाळा सुरु न राहणे | 2021-22 Shala Purn Kshmtene Suru N rahne 

                शैक्षणिक वर्ष 2021-22 जर आपण विचार केला तर विद्यार्थी पूर्ण क्षमतेने शाळेमध्ये येत नव्हते. जास्त पट असणाऱ्या शाळा किंवा शहरी भागातील शाळेतील विद्यार्थी दिवसा आड शाळेमध्ये येत होते. मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागामध्ये तर विद्यार्थ्यांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे. आणि म्हणूनच या वर्षी 2022-23 मध्ये  देखील पुनर्रचित अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.

         सेतु अभ्यासक्रम का गरजेचा आहे हे आपल्या लक्षात आल्या नंतर गेल्या वर्षी आपण तो राबवला परंतु यावर्षी पुनर्रचित सेतु अभ्यासक्रम कसा आहे त्याचे स्वरूप काय आहे हे अभ्यासणे गरजेचे आहे चला तर मग पुनर्रचित अभ्यासक्रमाचे स्वरूप अभ्यासूया.

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप |Punrrchit Setu Abhyas Swrup 

                शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपण येतो अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केलेलीच आहे च आहे.अगदी त्याच पद्धतीने या वर्षी देखील आपल्याला ही अंमलबजावणी करायची आहे. या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत 3 जून 2022 ला  परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे त्यानुसार या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल 

1.सेतु अभ्यासक्रम कोणत्या इयत्तासाठी |Setu Kontya Iyttesathi 

               शेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी यांच्यासाठी आहे. 

2.सेतू अभ्यासक्रम कोणत्या माध्यमांसाठी| Kontya Madhyamasathi,Medium 

                            सेतु  अभ्यासक्रम हा  काही मध्यमा करीता प्रस्तावित करून त्या इयत्तासाठी परिषदेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तर हा सेतु अभ्यास  मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी तयार करण्यात आलेला आहे.

3 कोणत्या क्षमतांचा विकास |Kontya Kshmtancha Vikas 

                       पुनर्रचित सेतु अभ्यासक्रमातून मागील इयत्तांच्य महत्वाच्या क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे.याबाबत परिषदेने मार्गदर्शन केलेले आहे आणि त्या क्षमतांचा विकास या सेतु पुनर्रचित अभ्यासक्रमातून  करायचा आहे. 

4. सेतु अभ्यास कोणत्या विषयांसाठी| Setusathi Vishy 

             इयत्ता 2 री ते दहावीच्या भाषा,गणित,समाजशास्त्र या विषयांसाठी आहे.  

5.सेतू अभ्यास कालावधी| Kalavdhi 

             पुनर्रचित सेतु अभ्यास का 30 दिवस राबवायचा आहे. या 30 दिवसात प्रतेक दिवसाचे योग्य नियोजन देण्यात आले असून त्यानुसार कृतिपत्रिका म्हणजेच worksheet (सोप्या भाषेत स्वाध्याय )सोडवून घ्यायचे आहेत. 

6. कृतीपत्रिकेचे स्वरूप |Krutiptrikaa Swrup 

            विद्यार्थी स्वय अध्ययन करून त्या सोडवू शकतील असे स्वरूप या Work Shit चे आहे. 

7.कृतीपत्रिका कशा मिळवाव्यात |Krutiptrika Download 

         या कृतीपत्रिकाच्या लिंक गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील मिळणार आहेत. आपण फक्त योग्य नियोजन करून प्रामाणिकपणे सोडवून घ्यायच्या आहेत.

सेतु अभ्यासक्रम चाचण्या बाबत| setu abhyaskram chachnya 

                   सेतु अभ्यासात आपल्याला एक पूर्व चाचणी आणि एक उत्तर चाचणी घ्यावयाची आहे.या दोन्ही चाचण्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या म्हणजेच SCERT च्या https://www.maa.ac.in/ या वेबसाइट,WEBSIT वर म्हणजेच संकेत स्थळावर पाठवल्या जाणार आहेत.सेतु पूर्व चाचणी 9 जून 2022ला उपलब्ध होईल. व सेतु उत्तर चाचणी 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यन्त उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

सेतु अभ्यासक्रम घेण्यासाठीच्या तारखा |

                     आपणास माहीत असेल की विदर्भात कडक उन्हाळा असतो यामुळे तेथील शाळा उशिरा भरतात म्हणून सेतु अभ्यास कसा राबवावा यातील सूचनेनुसार विदर्भ सोडून महाराष्ट्र राज्यात 17 ते 18 जून या दरम्यान पूर्व चाचणी घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर 20 जूनपासून 23जुलै 2022 पर्यन्त सुट्ट्या वगळून 30 दिवसात Worksheet सोडवून घ्यायच्या आहेत तसेच शिक्षकांनी मार्गदर्शन देखील करावयाचे आहे. त्यानंतर 25 जुलै ते 26 जुलै दरम्यान उत्तर चाचणी घ्यायची आहे. 
            थोडक्यात काय तर सेतु अभ्यासक्रम राबवण्यासाठी शिक्षण विभागाने खूप मेहनत घेतली आहे हे नक्की. फक्त शिक्षकांनी सदकरात्मकतेने हे राबवणे गरजेचे आहे. 

पुनर्रचित अभ्यासक्रम अमंलबजावणीची  जबाबदारी | Shetu Abhyas Rabavnyachi Jbabdari   

           सेतु अभ्यासक्रम वेळापत्रकांप्रमाणे राबवण्याचीt जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर आहे.तर  शिक्षकांनी आपल्या तासिकेला या कृतीपत्रिका सोडवून घेणे अपेक्षित आहे.तसेच 30 दिवसात अमलबजावणी अपेक्षित आहे.स्वतंत्र वहीत किंवा आखीव कागदावर देखील सोडवून घेण्याची मुभा आहे. 
          अशा पद्धतीने 2022-23 मध्ये पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम राबवायचा आहे. परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार जर अमलबजावणी झाली व सेतू अभ्यास किती महत्वाचा आहे हे विद्यार्थ्याना पटवून देण्यात शिक्षक यशस्वी झाला तर खरोखर मागील दोन वर्षातील बरीचशी अभ्यासतील संपादणूक वाढायला मदत होईल यामुळे 2022 -23 मध्ये शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचे काम हा सेतू अभ्यास करेल. शिक्षण क्षेत्रातील घडामोडीसाठी तसेच सेतू अभ्यास याविषयी,worksheet ते कोणती माहिती जतन करावी व कशी करावी यासाठी आमच्याdnynyogi.com ला वारंवार भेट देत चला.प्रतिक्रिया देत चल. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !

   
आमचे हे लेख देतील विशेष माहिती 










    
  



 


   

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area