Type Here to Get Search Results !

आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन प्रवेश वेळापत्रक जाहीर | Iti Pravesh Prakriya 2022

आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन प्रवेश वेळापत्रक जाहीर| ITI Admission Process 2023 24 Online Admission Schedule Announced

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. आज आपण iti प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार त्याचे वेळापत्रक पाहूया. 

iti का करावा| why should iti 

इयत्ता दहावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी न करता  रोजगाराभिमुख शिक्षण घ्यायचे आहे.म्हणजेच लवकरात लवकर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी म्हणजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय प्रवेश. iti ला प्रवेश घेऊन आपण तात्काळ स्वतच्या पायावर उभे राहू शकता.आजच्या लेखामध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2023 24  आय टी आय  प्रवेशाच्या प्रक्रियेबाबत माहिती पाहणार आहोत.
Iti प्रवेश प्रक्रिया 2023 24 वेळापत्रक जाहीर
आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24



iti प्रवेश(toc) 

आयटीआय प्रवेश 2023 24 ला  सुरुवात | ITI Admission Starts2023 24

12 जून 2022 पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध कोर्सेस साठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू झालेले आहे. राज्यात या वर्षी जवळ जवळ iti च्या 1 लाखांपेक्षा जास्त जागा आहेत. आयटीआय प्रवेशाबाबत व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्याद्वारे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 माहिती | ITI Admission Process 2023 24 Information 

1. आयटीआय प्रवेश 2023 24  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांना आपले ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. आणि तो ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात 12 जून पासून सुरू झालेले आहे.

2. iti प्रवेश 2023 24 वेळापत्रक पीडीएफ |iti admission 2023 24 time table pdf

आपल्याला iti प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी खालील वेळापत्रक पहावे 
iti ऑनलाइन प्रवेशवेळापत्रक पीडीएफ 


आयटीआय कोर्स 2023 24  माहिती पुस्तिका | ITI Course 2023 24 Information Booklet

एकंदरीतच iti ची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत? त्याचबरोबर प्रवेश अर्जातील माहिती कशा पद्धतीने online भरायची आहे याची सर्व माहिती माहिती पुस्तिका मध्ये देण्यात आलेली आहे. ही माहिती पुस्तिका आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करण्याची सोय आहे.माहिती पुस्तक पीडीएफ स्वरूपात प्राप्त करायचे आहे व ते प्राप्त झाल्यानंतर त्याचे सविस्तर वाचन करून शैक्षणिक वर्ष 2023-24आय टी आय प्रवेश  प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे.



Iti प्रवेश प्रक्रिया निशुल्क मार्गदर्शन कोठे मिळवावे  |  Where To Get Iti Admission Process Free Guidance

महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळामध्ये मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केलेले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी किंवा अर्ज भरतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण ही येऊ नये.त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरताना काही अडचणी आल्यास देखील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट द्यावी. आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे?अशा मार्गदर्शक सूचना देखील संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज करण्याची पद्धत |  Iti Pravesh Arj Kasa Karava 

अनेक विद्यार्थ्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय ला प्रवेश घ्यायचा असतो पण तो अर्ज कसा करावा? याविषयी माहिती नसते तर यावर्षी देखील आयटीआय प्रवेशाचे सर्व अर्ज  ऑनलाइन भरले जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट ही आपल्याला कोणत्याही शासकीय किंवा खाजगी महाविद्यालय मध्ये जमा करता येईल.ज्याना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज भरायचा त्याना मदत केंद्राची सोय आहे.संकेत स्थळावर जाऊन आपला मोबाईल नंबर नोंदणी करावयाचा आहे. तुम्हाला जो register id मिळेल.  तोच id टाकून log इन करावयाचे आहे.हे आपणास का सांगत आहे? तर सेल्फ स्टडी च्या माध्यमातून तुम्ही हे सर्व शिकणे अपेक्षित आहे.व हे सगळे तुम्ही करायचे आहे.


ITI प्रवेश 2023 24 साठी संकेत स्थळ | Website for ITI Admission 2023 24 

iti प्रवेश ऑनलाइन भरण्यासाठी https://admission.dvet.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या. व सर्व माहिती समजावून घ्या. 


Iti ऑनलाइन अर्ज कसा भरावा | How to Fill Iti Online Application Form

ऑनलाइन log in केल्यानंतर application फॉर्म या title वर क्लिक करून iti प्रवेश अर्ज भरायचा आहे. 


आय टी आय नोंदणी शुल्क | Iti Registration Fee  

iti अर्जाची फी ज्याना आरक्षण आहे. त्यांना  100 रुपये,ओपन म्हणजे खुला वर्ग 150 रुपये ,महाराष्ट्रा बाहेरील विद्यार्थ्यांना 300 रुपये फी आकारली जाणार आहे.

 💥MBA,BED,LAW, कृषी पदवी M. tech यासाठी ऑनलाइन सीईटी वेळापत्रक जाहीर 👈

प्रवेश अर्ज कॉन्फर्म करणे | Application Form Confirmation 

फॉर्म भरल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी भरलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत नजीकच्या iti विद्यालयात देणे बंधनकारक आहे. अर्ज अपूर्ण,चुकीची माहिती भरलेली असेल तर अर्ज रद्द होऊ  शकतो म्हणून नीट पडताळणी करा. व सर्व सत्य माहिती भरा अन्यथा आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो. हे ध्यानात असू द्या. 


पहिल्या फेरीसाठी पसंती क्रम | Pasanti Kram 

 कागदपत्रे  दिल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो व्यवस्थित भरा. व एकापेक्षा जास्त अर्ज करू नका तसे आढल्यास आपला प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. तसेच भरलेल्या माहितीत तफावत आढळल्यास देखील प्रवेश रद्द होऊ शकतो.

 

iti प्रवेश तारखा 2023 24 | Iti Pravesh Date Update  

iti प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 12जून पासून सुरुवात झाली असून तो पूर्ण भरल्यानंतर तो  नजीकच्या विद्यालयात तो अर्ज जमा करणे त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी मिळेल. 

  

मुंबई शासकीय iti कॉलेज पत्ता | Mumbai Govt iti College Address 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही मुंबई ,374,साने गुरुजी मार्ग ,घास गल्ली अग्रि पाडा मुंबई,400011  


iti ला प्रवेश का घ्यावा ? |Why take admission in iti?

   iti ला प्रवेश हा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे ,ज्याना व्यवसाय करायला आवडते, व तात्काळ नोकरी हवीय त्यांनी देखील iti करायला हरकत नाही. जे अभ्यासात साधारण आहेत त्यांनी देखील iti ला प्रवेश घेऊन स्वतच्या पायावर उभे राहावे. यासाठी iti हा उत्तम मार्ग आहे.
 

1. तात्काळ नोकरी

 ज्या विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरीची आवश्यकता आहे. त्या विद्यार्थ्यांनी दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावी न करता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये किंवा एखाद्या आयटीआय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. दोन वर्षांचा आयटीआय कोर्स केल्यानंतर तुम्हाला तात्काळ एखाद्या कंपनीमध्ये रोजगार मिळू शकतो.


2. व्यवसायाची आवड

ज्यांना नोकरी करण्यापेक्षा आपण एखादा व्यवसाय करावा.आपली एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करावी.असा हेतू असेल त्याने आयटीआय प्रवेश घ्यावा .आयटीआय मधून विविध कोर्स करून आयटीआय ला विविध कोर्से केल्यानंतर व्यक्ती आपला व्यवसाय सुरु करु शकते.


3.  नवे करण्याची संधी

आयटीआय ला प्रवेश घेतल्यानंतर नोकरी की व्यवसाय हा पर्याय तुमच्या हातामध्ये राहत असल्यामुळे आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करून दाखवावे त्याची संधी तुम्हाला उपलब्ध होते. अकरावी बारावी केल्यानंतर तितकीशी उपलब्ध नसते म्हणून अनेक विद्यार्थी ऐकायचे कोर्सेस करताना दिसतात.


4. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संधी

आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटा, रिलायन्स,मारुती यासारख्या उद्योग क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळते.

     थोडक्यात काय तर आय टीआयच्या माध्यमातून व्यक्ती करियर करू शकते त्याच बरोबर व्यवसायदेखील करू शकते अशा संधी उपलब्ध होत असल्यामुळे अनेक विद्यार्थी दहावी-बारावीनंतर आयटीआय चे कोर्सेस करतात. आणि आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तात्काळ सोडवतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय शिक्षण खूपच कठीण वाटते त्या विद्यार्थ्यांनी देखील आयटीआय ला प्रवेश घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.अकरावी-बारावीला जाऊन कमी गुण मिळण्यापेक्षा किंवा नापास होण्यापेक्षा आयटीआय ला जाऊन एखादा चांगला कोर्स करणे. आपल्या पायावरती उभी राहणे कधीही चांगले म्हणूनच अनेक पर्यायांपैकी आयटीआय एक चांगला प्रकार आहे म्हणून याला iti प्रवेश घेतला पाहिजे.


महत्वाचे आयटीआय कोर्स

 आजारी आयटीआय कडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी होत असला तरी देखील असे काही कोर्सेस आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आज देखील रोजगाराची संधी प्रचंड उपलब्ध आहेत ती कशी ते आपण पाहूया.


1. डिझेल मेकॅनिक | diesel macenic

आज आपण पाहतो की ज्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये मोबाईल आपल्याला दिसत आहे.त्याच पद्धतीने काही दिवसांमध्ये प्रत्येक घरासमोर  4 चाकी गाडी असं सर्व दिसणार आहे. म्हणूनच डिझेल मेकॅनिकल आयटीआय कोर्सला मोठ्या  प्रमाणात मागणी आहे. तरी विद्यार्थ्यांनी या कोर्सला जायला हरकत नाही. 

2. वेल्डर | velder

आज आपण पाहतो की मेट्रो रेल, बुलेट ट्रेन यासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये प्रचंड मनुष्यबळाची गरज असते.तंत्र कुशल पदातील एक पद म्हणजे वेल्डर.आजही रेल्वेमध्ये वेल्डर विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून भरती पुढे ढकलावी लागते.जे विद्यार्थी भरतीला जातात ते सर्वच्या सर्व विद्यार्थी सिलेक्ट होतात असे सर्व चित्र आहे. म्हणजेच काय तर या कोर्सला प्रचंड अशी मागणी आहे विद्यार्थी आयटीआय करू इच्छितात त्यांनी या कोर्सला प्रवेश घ्यायला हरकत नाही.


3.  टर्नर फिटर यासारखे कोर्स| turner fiter

 वर सांगितल्या पद्धतीने गाड्यांची संख्या वाढत आहे सहाजिकच फिटर चे प्रमाण देखील त्याच प्रमाणात वाढणे गरजेचे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी टर्नर, फिटर यासारख्या आयटीआय कोर्सला प्रवेश घेऊन तात्काळ नोकरीचा पर्याय उपलब्ध करून घ्यावा .

अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈

Iti ऑनलाइन प्रवेश रजिस्ट्रेशन वेळापत्रक 2023 24 vedeo पहा




अशा पद्धतीने रोजगार कसा मिळवायचा या अनुषंगाने शैक्षणिक2023-24मध्ये होणारी महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ,राबवली जाणारी आयटीआय प्रवेश प्रक्रिया आपल्याला लागणारी कागदपत्रे,प्रवेश अर्ज त्याच बरोबर इतर माहिती देखील देण्याचा प्रयत्न या लेखांमधून केलेला आहे. हा लेख आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषय असो तोपर्यंत.धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area