सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी | 2022 Setu Abhyas Purvchachni
शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रमाणे चालू शैक्षणिक वर्षात 2022 -23 मध्ये देखील शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर साधारणपणे 17 ते 18 जून दरम्यान आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययनातील संपादन पाहण्यासाठी पूर्वचाचणी घ्यायची आहे. ही पूर्व चाचणी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची घ्यायची असून मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी घ्यायची आहे सदर चाचण्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेने उपलब्ध करून दिलेली आहेत.सेतू अभ्यासक्रम पूर्वचाचणी
सेतू अभ्यासक्रम चाचणी कोणत्या विषयांसाठी | Setu Chachni Kontya Vargala
आपल्याला सेतू अभ्यासक्रम चाचणी घ्यायची आहे ती भाषा गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांसाठी आहे. हे आपल्याला माहितीच आहे परंतु पालक व विद्यार्थी याना नेमका सेतु अभ्यास काय आहे हे कळण्यासाठी ही अतिरिक्त माहिती देत आहे.
सेतू अभ्यासक्रम चाचणी | Setu Abhyaskram Chachni
इयत्ता पहिली ते दहावी सेतु अभ्यासक्रमाच्या संदर्भात जी आपल्याला पूर्वचाचणी घ्यायची आहे ती पूर्वचाचणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांनी आपल्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. पहिली ते दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी किंवा संबंधित विषय किंवा वर्ग शिक्षकांनी डाऊनलोड करून घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. सदर चाचणी उपलब्ध केल्यानंतर ती विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्यायची आहे.विषय शिक्षकानी त्या चाचणीचे गुणगान देखील करायचे आहे. परिषदेने सांगितल्याप्रमाणे त्या गुणांच्या नोंदी देखील करून ठेवायच्या आहेत. हे सर्व नीट होण्यासाठी म्हणजेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जबाबदरीने काम करण्याची आवश्यकता आहे.
सेतू अभ्यासक्रम उपक्रमाची यशस्वीतता | Setu Abhyas Yashsvitata
सेतू अभ्यासक्रम हा साधारणपणे मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने अध्ययन व्हावे.कोरोनाकाळामध्ये अभ्यासात विद्यार्थ्यांची अभ्यासतील गती मंदावलेलीआहे. ती गती वाढावी या हेतूने परिषदेने काही एक संशोधनाअंती या चाचण्या तयार केल्या आहेत. शासनाचा सेतू अभ्यासक्रम व त्याची यशस्वितता शिक्षक आणि विद्यार्थी यांना यशस्वी करायचा आहे. वर सांगितलेले सर्व विषयांच्या चाचण्या व अभ्यासक्रम म्हणजेच कृतीपत्रिका परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फक्त आपल्याला दररोज तो अभ्यास किंवा त्यात सांगितलेल्या कृती सोडवायच्या आहेत. नकळतपणे आपण ज्या कृती सोडवू यातून आपल्या मध्ये विविध क्षमता वाढणार आहेत. आणि वाढलेल्या क्षमतांचा आपल्याला चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यास करताना उपयोग होणार आहे, म्हणून हा सेतू अभ्यासक्रम कशासाठी आहे? हे विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगितले पाहिजे तर आणि तर तो यशस्वी होऊ शकतो.म्हणजेच या सेतु अभ्यासक्रमाची यशस्वितता शिक्षकव विद्यार्थी यांच्यावरती आहे.
सेतु अभ्यासक्रम कशासाठी? | Setu Abhyas kashasathi
कोरोना काळामध्ये म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये नियमित अध्यापन आणि अध्ययन झालेलेच नाही.जरी झाले असली तरी जेवढा वेळ हवा तेवढा वेळ आपल्याला मिळालेला नाही. शाळेमध्ये जसे वातावरण असते तसे वातावरण शिकण्यासाठी घरामध्ये पोषक नसते.सहाजिकच गेल्या दोन वर्षांमध्ये आपला अभ्यास हा कमी झालेला आहे. आपण मागील दोन वर्षे मागील इयत्तेतून पुढील इयत्तेमध्ये गेलो. मात्र त्या इयत्तेला कोणत्या क्षमता यायला हव्यात? कोणत्या क्षमता मुलामध्ये आलेल्या दिसत नाहीत. याचा अर्थ काय तर विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी आपली अध्ययनातील प्रगती किंवा संपादणूक कमी झाली आहे.सेतु अभ्यासक्रम पूर्वचाचणीच्या माध्यमातून तपासला जाणार आहे. आणि कोणते घटक तुम्हाला येतात आणि कोणते घटक तुम्हाला येत नाहीत त्याच्या सर्व नोंदी तुमचे विशेष शिक्षक ठेवणार आहेत आणि नंतर दिवस निहाय 30 दिवसांच्या कार्यक्रमांतर्ग एका घटकावर तुम्हाला परिषदेने दिलेल्या कृतीपत्रिका सोडून घेतल्या जाणार आहेत. या कृतीपत्रिका सोडवत असताना समजून घेऊन सोडवा. एखादा घटक समजला नाही तर शिक्षकांना विचारा. परंतु केवळ परीक्षा म्हणून या कृतीपत्रिका कडे पाहू नका.आपले संबोध, संकल्पना क्षमता यांचा विकास व्हायला हवा.थोडक्यात काय तर आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या परीक्षेप्रमाणे सेतु अभ्यासकडे न पाहता मला जे येत नाही ते शिक्षकांच्या मदतीने शिकायचे आहे.अशी भूमिका जर तुम्ही ठेवली सहाजिकच मागील इयत्ता मधील जे क्षमता तुमच्या कमिल कशी झालेले आहे क्षमता नक्कीच वाढतील.
विद्यार्थी मित्रांनो !सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला स्वतः कृतिपत्रिका सोडवायच्या आहेत.कोरोंना काळात तुम्हाला अभ्यासाच्या ज्या सवयी होत्या त्या मोडल्या आहेत आता त्या पुनः लागणार आहेत.सेतु कृतीपत्रिका सोडवल्याने अभ्यासाची बैठक वाढणार आहे. म्हणून 17 किंवा 18 जूनला पूर्व चाचणी झाल्यानंतर ज्या कृतीपत्रिका सोडवून घेतल्या जातील,त्या कृतिपत्रिका मनापासून सोडवा.तर त्या तुम्ही मनापासून सोडवल्या तर चालू इयत्तेत शिकत असताना तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ज्या इयत्तेत शिकत आहात त्याचा देखील तुमचा चांगला अभ्यास होईल. थोडक्यात काय तर शिक्षण विभाग तुमच्या अभ्यासतील खंड भरून काढण्याची नामी संधी देत आहे आणि या संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. मन लाऊन कृतीपत्रिका सोडवायला हव्यात.
शिक्षक व पालकांची भूमिका | shikshk v palkanchi bhumika
शिक्षक व पालक हा सेतू अभ्यासक्रम नेमका कशासाठी आहे? हे समजून घ्यायचे आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मागे सोडवा! सोडवा! असा तगादा न लावता प्रेमाने जेणेकरून त्याची अध्ययनातील आवड वाढेल आणि त्याला न समजलेले घटक समजतील याच पद्धतीने पुढे जायचे आहे. हसत खेळत शिक्षण जर आपण सेतु अभ्यासक्रमांमध्ये राबवले तर मला वाटते विद्यार्थी अतिशय आवडीने आणि मन लावून प्रयत्न करतील. आपल्या मुलाने किंवा विद्यार्थ्याने किती अभ्यास केला यापेक्षा तो किती मन लावून ती कृती करत आहे.याकडे जरा लक्ष द्या. सांगण्याचा मुद्दा असा की मारून मुटकून त्याला कृतिपत्रिका सोडवायला लावू नका. ही विनंती असे झाले तर ही योजना इथेच फेल झाली समजा .अन्यथा त्याचा कोणताही उपयोग आपल्याला होणार नाही.
सेतु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची भूमिका |Vidyarthi Bhumika
सेतू अभ्यासक्रमांतर्गत वेगळ्या कृतीपत्रिका सोडवत असताना आपल्याला जो भाग जमत नाही तो भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची मदत घ्या. परंतु आपल्या मित्रांच्या वह्या घेणे आणि तो भाग जसाच्या तसा उतरून काढणे.अशी गफलत करू नका. जर तुम्ही असे केले तर तुमचा वेळही वाया जाईल आणि शासनाचा सेतु अभ्यास राबवण्या मागील हेतु देखील संध्या किंवा सफल होणार नाही. सेतू अभ्यासक्रमाचा आणि तुमच्या वार्षिक परीक्षेतील निकालाचा,गुणांचा कोणताही संबंध नाही. मग तुम्ही परीक्षार्थी म्हणून त्याकडे का पाहत पहावे?असे न करता मला माझा मागच्या इयत्तेतील अभ्यास पूर्ण करायचा आहे अशी भूमिका हवीय.सेतु पूर्व चाचणी व कृतीपत्रिका हसत खेळत आनंदी वातावरणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा.
सेतू अभ्यासक्रम चाचणी | Setu Abhyaskram Chachni
सेतु अभ्यासक्रम चाचणी सध्या तरी मराठी माध्यम व सेमी इंग्लिश माध्यमाच्या देत आहोत.इयता 9 वी आणि 1 0 वी च्या पूर्व चाचण्या मिळवण्यासाठी फक्त खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा.
इयता 9 वी सेतू अभ्यासक्रम चाचण्या
1. 9 वी मराठी कुमारभारती पूर्वचाचणी (मराठी)- DOWONLOAD
2. 9 वी इंग्रजी मराठी माध्यम - DOWNLOAD
3.9 वी गणित पूर्वचाचणी मराठी माध्यम - DOWNLOAD
4. 9 वी इतिहास व राज्यशास्त्र मराठी माध्यम-DOWONLOAD
5.इयता 9 वी भूगोल मराठी माध्यम
6.इयता 9वी विज्ञान मराठी माध्यम
9 वी सेमी इंग्रजी पुर्वचाचण्या
7. गणित सेमी इंग्रजी चाचणी - DOWNLOAD
8.विज्ञान सेमी इंग्रजी माध्यम पुर्वचाचणी -
DOWNLOAD सध्या उपलब्ध नाहीत.
इयता 10 वी सेतू अभ्यास चाचण्या
1. 10 वी मराठी कुमारभारती पूर्वचाचणी (मराठी)- DOWNLOAD
2. 10 वी इंग्रजी मराठी माध्यम - DOWNLOAD
3.10 वी गणित पूर्वचाचणी मराठी माध्यम - DOWNLOAD
4. 10 वी इतिहास व राज्यशास्त्र मराठी माध्यम - DOWNLOAD
5.इयता 10 वी भूगोल मराठी माध्यम - DOWNLOAD
6.इयता 10 वी विज्ञान भाग 1 मराठी माध्यम- DOWNLOAD
7इयता 10 वी विज्ञान भाग 2 मराठी - DOWNLOAD
सेमी इंग्रजी पुर्वचाचण्या
7. इयता 10 वी गणित सेमी इंग्रजी माध्यम पूर्वचाचणी - DOWNLOAD
8.विज्ञान सेमी इंग्रजी माध्यम पुर्वचाचणी - DOWNLOAD अजून उपलब्ध नाही
तर अशा पद्धतीने आज आपण 9 वी व 10 वी मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाच्या सेतू पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका या कक्शा मिळवाव्यात याविषयी माहिती सांगितली आहे. घेतला आहे. यांच्या सेतु अभ्यासक्रम पूर्व चाचणी कशी मिळवावी हे पहिलेच आहे.आजच्या या लेखातून आपणास ज्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्या 1 ते 2 दिवसात सोडवून घेऊन त्यांचा निकाल तयार करायचं आहे कारण का तर तो नंतर सबमिट करावा लागतो. नंतर च्या लेखात आपण कृतीपत्रिका दिवसांनिहाय जेपरिषदेने दिले आहे तसे नियोजन करणार आहोत.