ताजी बातमी अभिनेत्री आलिया भट होणार आई! |Aaliya Bhat Pregnent
आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाला दोन महिने झाले नि आलियाने एक आनंदाची बातमी आपल्या प्रेक्षकवर्गाला दिली आहे. आलिया भट ने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिचे सोनोग्राफी रिपोर्ट शेअर केलेले आहेत,एवढेच नव्हे तर आमच्या घरी नवीन बाळ येणारआहे.असे देखील त्यामध्ये म्हटले आहे या फोटोमध्ये आलिया भट सोबत रणबीर कपूर देखील आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये जगत असताना आपल्या संसारिक जीवनाला महत्व दिसत नाही .मात्र हे जोडपे याला अपवाद दिसत आहे म्हणूनच लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांमध्ये एक सुखद समाचार, बातमी त्यांनी आपल्याला दिलेली आहे.वाचकांना सर्वात आधी ही बातमी देऊन आनंदी करण्याचा आमचा एक अल्पसा प्रयत्न जेणेकरून सर्वांना अपडेट राहता येईल.
आलिया भट ची ही गुड न्यूज ऐकून तिचा चाहते भलतेच खुश आहेत. त्यांनी देखील विविध कमेंट माध्यमातून या दोन्ही जोडप्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्याचे आपल्याला दिसते असो. आलिया भट आणि रणवीर कपूर यांना त्यांच्या या गुड न्यूज बद्दल खूप खूप शुभेच्छा! पण जाता जाता एकच म्हणावेसे वाटते,सर्वसामान्य माणसाला इकडे दोन वेळच्या खाण्याचा प्रश्न पडलेला असतो परंतु या सेलिब्रिटींच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील वर्तमानपत्रे येवढ्या आत्मीयतेने घेतात. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. आपल्या भारत देशात कितीतरी प्रश्न आहेत? किती प्रश्न दुर्लक्षित होतात . याला कुठेतरी वाचक जबाबदार आहे. कारण वाचकांनाच अशा बातम्या जाणून घेण्याची उत्सुकता असते.त्याचाच एक भाग म्हणून मला देखील या व्यासपीठावरून ही बातमी आपला सेंड करत असताना एक जळजळीत वास्तव देखील समोर मांडावेसे वाटले. एका सेलिब्रिटी आलिया भट आणि रणवीर कपूर यांची साधी गुड न्युज येणे किंवा सोप्या सोप्या भाषेत आलिया भट गरोदर आहे.म्हणजेच प्रेग्नेंट आहे हे देखील आपल्याकडे हेडलाइन्स होत असेल,यावर विचार व्हायला हवा !आणि वाचक वर्गांनी आपली पसंती कोणत्या प्रश्नांना हवी याकडे लक्ष द्यायला हवे.
असो स्वतःची काळजी घ्या सध्या बरेच लोक सर्दी, ताप, खोकला या जरा निग्रस्त आहेत एक प्रकारे कोरोना सारखीच लक्षणे घराघरांमध्ये दिसत आहेत. परंतु घाबरून जाऊ नका.योग्य वेळी उपचार घ्या. आराम करा. आनंदी राहा.आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या घरी आलेल्या गुड न्यूज चा आपण देखील आनंद घेऊ
या आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा विषयासह.असोआलिया भट यांची एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला द्यावी हाच आजच्या छोट्याशा लेखांमधला विषय होता. तो तुमच्या लक्षात आला असेलच.आलिया भट होणार आहे. आई सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच आमच्या घरी बाळ येणार! या आलिया भट यांनी सोशल मीडियावर फोटोने या बातमीला दुजोरा दिलेला आहे धन्यवाद!