Type Here to Get Search Results !

अंध,अपंग,अनाथ यांचा दीपस्तंभ | Andha Apang Anath Yancha Dipstambh

अंध,अपंग,अनाथ यांचा दीपस्तंभ | Andha Apang Anath Yancha Dipstambh

अंध,अपंग,अनाथ यांचा दीपस्तंभ.या लेखात आपण अंध,अपंग,अनाथ यांना अधिकारी बनण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत. हा लेख अंध,अपंग व अनाथ यांच्या जीवनात क्रांती घडवणारा आहे. एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण त्याच्या पर्यन्त ही माहिती नेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.मला खात्री आहे की आमचे वाचक ही माहिती अशा दिव्यानग लोकांपर्यंत पोहोचवणार नाहीत तर वाचून देखील दाखवरील.

अंध,अपंग,अनाथ यांचा दीपस्तंभ
अंध,अपंग,अनाथ यांचा दीपस्तंभ

समाजामध्ये अंध,अपंग, आणि अनाथ याना समाजात जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शरीराने अपंग असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे परावलंबित्व नुनगंड व लहान वयात मित्रांचे हसू अशा अनेक बाबी सोसाव्या लागतात,परंतु त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जीवनाचे कल्याण करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी देवदूताचे काम करत आहेत.यापैकी एक संस्था म्हणजे दीपस्तंभ फाउंडेशन होय. या फाउंडेशनच्या मदतीने अंध,अपंग अनाथ यांना केवळ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात असे नाही तर अधिकारी बनवण्याचे काम केले जाते.आणि हो ते ही देखील मोफत.


दीपस्तंभ फाउंडेशन ची स्थापना | Dipstambh Foundation Chi Sthapna


  दीपस्तंभ फाऊंडेशनणे एक समाजसेवेचे व्रत अंगिकारलंआहे. ज्यांना खरंच मदतीच्या हातांची गरज आहे. त्यांना आपण मदत केली पाहिजे या भूमिकेतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना दीपस्तंभ फाउंडेशन ही संस्था अंध,अनाथ आणि अपंग यांना देखील मदतीचा हात देत आहे. या संस्थेचे संस्थापक यजुवेंद्र महाजन आहेत. त्यांना त्यांच्या या सामाजिक कामांमध्ये मदत करण्यासाठी अनेक अभ्यासू व्यक्तींची मदत देखील होत आहे.



 दीपस्तंभ फाउंडेशनचा मनोबल प्रकल्प | Dipstambh Foundation Cha Manobal Prklap


दीपस्तंभ फाउंडेशन मार्फत अनाथ,अपंग यांच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी मनोबल प्रकल्प हाती घेण्यात आला. हा प्रकल्प 1 जुलै 2018 पासून सुरू करण्यात आला. मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग म्हणजेच विकलांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर विविध कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध आहे.



मनोबल प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या सुविधा| Manobal Prklpatil Suvidha


1.राहण्याची सोय | Rahnyachi Soy


अंध अपंग अनाथांसाठी असलेल्या मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून जे विद्यार्थी या प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना राहण्याची मोफत सोय आहे.


2.मोफत जेवणाची सोय | Jevnachi Soy

समाजातील या गरजू निजरा दुर्लक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाबरोबरच जेवण खाण्याची देखील सोय या मनावर संस्थेमार्फत केले जाते.


3.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र | Spardha Priksha Kendra


स्पर्धा परीक्षा तसेच इतर entrance exam चा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची सोय त्याचबरोबर विविध संदर्भ ग्रंथ देखील उपलब्ध करून दिले जातात.

4.अत्याधुनिक अभ्यास साहित्य |Technology Based Study Material


अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी पुस्तके, ध्वनीचित्रफिती, आधुनिक तंत्रज्ञान वापरले लॅपटॉप,संगणक अशी सर्व अत्याधुनिक सुविधा मनोबल फाउंडेशन मार्फत अगदी मोफत पुरवल्या जातात.जनसेवा हीच ईश्वरसेवा हीच त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते.

5. व्याख्याते मार्गदर्शन | Vyakhyate Margdarshan

दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन या विद्यार्थ्यांना स्वतः मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्याचे काम करतात. त्याचबरोबर अनेक वेळा यशस्वीअधिकारी यांची व्याख्याने मनोबल प्रकल्पांतर्गत होता त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

मनोबल तर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा |Manobal Marfat Shaikshnik Suvidha

1. अंध अपंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | Andha Apanag Margdarshan


मनोबल संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांना युपीएससी-एमपीएससी एम एस डब्ल्यू यासारख्या परीक्षांची तयारी करायची असेल तर त्यांना मोफत आणि निवासी प्रशिक्षण दिले जाते मार्गदर्शन केले जाते.

2. शिक्षणाची सोय | Shikshnachi Soy


जे विद्यार्थी अंध ,अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बी इ, बी सी ए ,बीबीए,बी कॉम ,बीएससी, पीएचडी तसेच अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अशी सर्व सोयी मनोबल प्रकल्प देतो.

4. इतर कोर्सेस | Itar Korses

संगणक प्रशिक्षण, संगीत, टेलरिंग, अभिनय यामध्ये आवड असणाऱ्यांना देखील शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.


3. गरजूंसाठी स्कॉलरशिप | Graju sathi Schilarship


जे विद्यार्थी गरजू आहेत.त्यांच्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तसेच अंध,अपंग आहेत. अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील दिली जाते.


4. पात्रतेच्या अटी | Patratechya Ati


मनोबल या सेवाभावी संस्थेमार्फत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता ही उत्कृष्ट हवी. अपंगअसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मोफत संधी दिली जाते.त्याचबरोबर तुमचे विद्यार्थी किमान किमान 40 टक्‍क्‍यांपर्यंत अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो.


मनोबल संस्थेचे निवासी प्रशिक्षण | Manobal Sanstheche NIivasi Prashikshn

दीपस्तंभ फाउंडेशन द्वारे अपंगांच्या कल्याणासाठी राबवले जाणारे उपक्रम जळगाव या ठिकाणी दिले जातात सध्या या ठिकाणी 320 विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत खरोखर असे कार्य अतिशय उल्लेखनीय असे कार्य असून सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.


मनोबल प्रकल्प संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया | 2022 mnobal prvesh

आपल्या जन्म मनोबल संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून आपण प्रवेशासाठी अर्ज करू शकता.


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeciDWYeQCcJdjSIezE0ikUW8_58EyXw70X32BHwfgs9zU8Wg/viewform?pli=1


ऑनलाईन रजिस्टर करण्याची मुदत | Online register 


विद्यार्थ्यांनी 10 जुलै 2022 अगोदर वरील लिंक च्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. 


एन्ट्रन्स टेस्टची तारीख | entrance exam 


विद्यार्थ्यांचे दहावी ,बारावीला किमान पदवी ला पडलेले गुण विचारात घेतले जातातच त्याशिवाय मनोबल फाउंडेशन मार्फत देखील एक कहानी परीक्षा घेतली जाते.आणि आता आणि परीक्षेतून ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांन सर्व प्रशिक्षणाचा लाभ घेता येतो.

प्रवेश अर्ज फी |  prvesh araj fi 

एंट्रन्स एक्झाम देण्या  अगोदर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क म्हणून पन्नास रुपये भरावे लागतील.

दीपस्तंभ फाउंडेशन चा पत्ता

आपल्याला जर या दिपस्तंभ संस्थेशी संपर्क साधायचा असेल तर आपल्यासाठी पत्ता देखील उपलब्ध करून देत आहोत


1. जळगाव या केंद्राचा पत्ता jalgaon kendra ptaa

        दीपस्तंभ फाउंडेशन,

           जळगाव, महाराष्ट्र

      42 हाउसिंग सोसायटी,

 जिल्हा न्यायालय शाहुनगर जळगाव


2. पुणे या ठिकाणचा पत्ता pune pata


दीपस्तंभ फाउंडेशन,

      पुणे, महाराष्ट्र. 


अशा पद्धतीने या दोन केंद्रांवरती आपण संपर्क देखील साधू शकता.


दीपस्तंभ फाउंडेशनची वेबसाईट| Dipstambh Website 

 

        https://deepstambhfoundation.org/


प्रवेशाबाबत सविस्तर माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा dipstambh admission pdf


                 DOWNOAD



 दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक  | dipstambh che sansthapk 

 यजुवेंद्र महाजन या अपंग विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाच्या निमित्ताने किंवा इतर प्रसारमाध्यमांच्या साह्याने अपंग विद्यार्थ्यांना किंवा एकंदरीतच सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात.ते असे म्हणतात

 मला जमेल का ? याची चिंता करू नये. त्यांच्या  मते जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना  इतरांनी म्हणण्यापेक्षा ते स्वतः मला अमुक अमुक जमेल का?असा सतत विचार करतात.आणि म्हणूनच त्यांना यश मिळत नाही.मनाची नकारात्मकता म्हणजे आपण अपंग विद्यार्थी आहोत आपले शरीर सुदृढ नाही आपण अमुक गोष्ट करू शकत नाही या नकारात्मकतेत ते  वावरत असतात.  इतरांच्या मनाचा जास्त विचार अपंग विद्यार्थी करतात.  शरीराने धडधाकट आहेत त्यांना देखील असे वाटते की आम्ही जे  करु शकत नाही तर मग हे कसे करतील ? म्हणून यावर मात करण्यासाठी ते एकच सांगतात स्वतः मधली नकारात्मकता काढून टाका. जर तुम्ही ठरवलं आणि मनापासून ठरवले तर या जगात मध्ये अशक्य असे काहीच नाही.खरोखरच हे त्यांचे विचार त्यांना देखील लागू होतात.कारण एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अंध,अपंग आणि अनाथ मुलांसाठी हा जगन्नाथाचा रथ ओढणे साधीसुधी गोष्ट नाही.  आजच्या या लेखाच्या माध्यमातून दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल प्रकल्प वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचबरोबर या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण देखील थोडी फार मदत अशा संस्थांना केले पाहिजे ही भूमिका तयार करणे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आहे. 


 सदरचा हा लेख म्हणजे या वर्षीची अंध अपंगांची सेवाच समजा. दीपस्तंभ बाबत ही माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना या संधीचा लाभ मिळावा हाच एक उदात्त येतो आहे. मी वाचकांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला नातेवाईक, मित्रपरिवार, आणि विशेष करून जे अपंग उमेदवार असतील त्यांच्या पर्यंत हा संदेश पोचवा. जेणेकरून दीपस्तंभासारखी संस्था सर्वतोपरी अपंगांच्या उत्थानासाठी कार्य करत आहे. खारीचा वाटा म्हणून आपण ती माहिती अपंग व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा सेतु बनवूया जाता जाता एकच म्हणेन दिपस्तंभ च्या मनोबल उपक्रमासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा अपंगांचे मनोबल वाढवणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन यांचे देखील मनोबल अधिकाधिक वाढत राहो.  समाजसेवेसाठी या शुभेच्छांसह धन्यवाद!


 







 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area