Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे आणि फडणवीस कोणाला किती खाती ,मंत्रीपदे? Eknath Shinde Aani Fadanvis Konala Kiti khati Mantripade

 एकनाथ शिंदे आणि फडणवीस कोणाला किती मंत्रीपदे?eknath shinde aani fadanvis konala kiti mantripade

आजच्या लेखात आपण एकनाथ शिंदे आणि फडणवीस कोणाला किती मंत्रीपदे? किंवा कसे असेल महाराष्ट्राचे नवे कॅबिनेट याविषयी चर्चा करणार आहोत.
एकनाथ शिंदे आणि फडणवीस  कोणाला किती खाती ,मंत्रीपदे?
एकनाथ शिंदे आणि फडणवीस  कोणाला किती खाती ,मंत्रीपदे? 



 राजकारणामध्ये काय किंवा एकंदरीत समाज जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत असतात. त्या सर्वांवर प्रभाव टाकत असतात.राजकारणात बंडखोर आमदार माघार घेतील का?इथपासून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा राजीनामा हा प्रत्येकाच्या तोंडामध्ये विषय होता.परंतु आज जर आपण पाहिलं तर शिवसेनेतून बाहेर पडलेला एक गट व त्यांचे प्रतिनिधित्व एकनाथ शिंदे करत आहेत.त्याचबरोबर काही अपक्ष आमदार त्यांच्या जोडीला आहेत. आता या नव्या सरकारमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी फडणवीस किंवा भाजप आणि एकनाथ शिंदे या नव्या समीकरणांमध्ये जनसामान्यांमध्ये चर्चेचा एक विषय आहे. तो म्हणजे कोणाला किती पद मिळणार ? एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक अपक्ष आमदार देखीलआहेत. त्यांना नेमकी कोणती पद मिळणार?याबाबत सर्व चर्चा टीव्ही चॅनलवरती सुरू आहेत.लोक देखील त्यावर बोलत आहेत मते मांडत आहेत. सगळीकडे Eknath Shinde Aani Fadanvis Konala Kiti Mantripade? किती पदे मिळतील ही चर्चा सुरू आहे.



 एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये दोन पदांच्या बाबतीत तर निश्चिती झालेलीच आहेअसे म्हणावे लागेल ती पदे म्हणजे देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतीलआणि शिवसेनेतून वेगळा गट निर्माण केलेले जवळपास पन्नास आमदारांचा पाठिंबा असणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होतील.हे चित्र जवळ स्पष्टच आहे.आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी मध्ये ते सर्वांना समजणारच आहे। परंतु याच्या पुढे जाऊन या नव्या सरकारचे मंत्रिमंडळ तयार होताना भाजपच्या जवळ सुमारे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत.सख्या बळाचा जर विचार केला तर भाजपने संख्याबळ हे जास्त आहे. असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्या गटाने जो पाठिंबा दिलेला आहे. त्या पाठिंब्यामुळेच भाजपला सत्तेत येण्याची संधी मिळालेले आहे. साहजिकच देवेंद्र फडनवीस यांना कॅबिनेट मंत्री पद राज्यमंत्रीपद यांची विभागणी करत असताना अडचणी येतील. हा प्रश्न वाद न घालता सहज सोडवावा लागेल. हे निश्चित आहे. त्याच बरोबर एवढा जनतेचा रोष पत्करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेचे आमदारांना त्याचबरोबर अपक्ष आमदारांना देखील आपल्याला चांगली खाते मिळावीत ही अशी मनीषा असणे रास्त आहे.



टीव्ही टीव्ही चॅनल वरती ज्या चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा पाहिल्यानंतर फडणवीस आपल्या कॅबिनेटमध्ये चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,आशिष शेलार,प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे,गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मध्ये घेऊ शकतात. हे केवळ अंदाज आहेत.नेमके काय होईल? ही परिस्थिती शपथविधी झाल्यानंतर कळेल.परंतु सगळ काही अजब वाटत आहे.



 एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेट व मंत्रिमंडळाचा विचार केला तर C इतर अपक्ष उमेदवार आहेत त्यांना विविध मंडळे दिली जाऊ शकतात.त्या मंडळांची त्यांच्यावर त्यांच्यावरची जबाबदारी येऊ शकते मंत्री पदांचे वाटप करत असताना फडणवीस आणिएकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर, खाते वाटप झाल्यानंतर झाले असे नाही. मंत्र्यांनी केलेले बंड याविषयी जनतेच्या मनात कुठेतरी असंतोष म्हणजेच नाराजी आहे. तो असंतोष कसा कमी करायचा?हे देखील एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाकडे मोठे आव्हान असणार आहे. आपल्या मंत्रिमंडळात प्रत्येक आमदारांना कसे सामावून घेता येईल ?म्हणून एकनाथ शिंदे आणि फडणवीस कोणाला किती मंत्रीपदे? घेतीलअशी विचार करायला लावणारी परिस्थिति निर्माण झाली आहे.



एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमतून मात्र मंत्रिपद वाटप याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असे सांगितले आहे. तसेच एका ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व आम्ही पुढे नेणार आहोत व आनंद दिघे साहेब यांची शिकवनी नुसार कारभार पाहणार आहोत. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हीच आमच्या मंत्रिमंडळाची मुख्य भूमिका असेल. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निमित्ताने आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने गेल्या अडीच वर्षात खूप वेगवेगळ्या घडामोडी,समीकरणे पहिली. महाराष्ट्र हे एक सगळ्याच बाबतीत पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते परंतु लोकशाहीची बळकटी याबबत कायतरी कमी पडत आहे ,म्हणूनच अलीकडे खूप अस्थिरता वाढलेली पाह्यला मिळत आहे.असो यापुढे ज्या निवडणुका होतील त्यात आपल्या मताचे मूल्य अमूल्य आहे याचा विचार करून पक्ष कोणताही असो.मात्र माझ्या देशाला जो पुढे घेऊन जाईल त्यालाच बहुमत द्या.त्रिशंकु राजकारण खरोखरच लोकशाहीसाठी नि लोकांच्या कल्याण कामासाठी देखील अडचणीचे ठरत आहे.म्हणून लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य असते हा धडा केवळ राज्यशास्त्राच्या पुस्तकात न राहता तो आपल्या जीवनात कधी येणार ?याचा विचार करा.


आजच्या या लेखाच्या माध्यमातून आजच्या लेखात आपण एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाला किती मंत्रीपदे? याबाबत सोशल मीडिया,विविध टीव्ही चॅनेल वरील चर्चासत्रे यांच्या माध्यमातून माहिती मांडली आहे.एकनाथ शिंदे आणि फडणवीस कोणाला किती मंत्रीपदे? याबाबत कोणत्याच पक्षाने अजून आपली भूमिका मांडलेली नाही. हे ही तितकेच खरे. अजून काही दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.हे वरील केवळ अंदाज आहेत याची वाचकानी नोंद घ्यावी.


आमचे हे लेख वाचा


महाराष्ट्राच्या राजकारणात आज ज्यांचे नाव सगळ्यांच्या तोंडात असे एकनाथ शिंदे यांच्याविषयी सर्व माहिती हवीय



मुलांमध्ये या लोकशाही ,मतदान याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी लोकशाही बोलते हा निबंध आवर्जून वाचा



11 वी प्रवेश पुस्तिका वाचा नि सर्व माहिती डिटेल मिळवा











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area